लंगोटनगरी पोपटराजा
वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या,
माहित नाही खास, काय घडले विशेष!
पण हाय!! लंगोट कड्यावरून घसरले,
अन पोपट सगळे फांद्यांवर दिसले.
जितकी विद्वत्ता जास्त, तितके त्यांचे पोपट पंचरंगी!
त्यांनी एकच गिल्ला केला. त्याचा आवाज समुद्रापार गेला.
‘लंगोटवाहू वादळ कुठून आले? कसे आले? पाहू पाहू त्यावर खास संशोधन करू!’
हाती लेखण्या घेतल्या, आणि लंगोट उडवणाऱ्या वादळामागे पोपट सावरत मूढ सगळे अमाप धावले.
वादळाविरुद्ध एक जोरदार कम्प्लेन हवेतल्या हवेत ठोकून म्हणाले,
‘आता फार काम झाले! घेऊ या विश्रांती, स्वतःच्या कोशात!’
......... ..............
काही वीर कृतिशील! फार चळवळे! दंड केवळ बलशाली!
म्हणाले, ‘आपल्या लंगोटीच्या इतक्या विसविशीत गाठी कोणी बांधल्या?
शोधबिध काही नाही!! आम्हाला सगळे माहित आहे!
लढा रे लढा रे! कठीण समय आला!
घात त्यांनी इतका केला, घात त्यांचा करू चला!’
विवेकहीन हल्ले करता करता त्यांचे पोपट दमून गेले.
त्यांचा लंगोट्याचा शोध, मग हवेत विरून गेला.
............... ......................
शुक्रतारा मंदवारा, कसल्या कसल्य फुलांच्या बागा, त्यातल्या सुन्द्र्या बाळगणारे बिनकामे!
न पेलणाऱ्या वासनांचे बडबडगीत गाणाऱ्या गुलछबू पोपटांना लंगोट उडालेली हवीच होती!
त्यांनी निवांत तंगड्या पसरल्या. म्हणाले,
‘बरे झाले देवा, उडाल्या त्या लंगोट्या
राहिले ते पोपट, नव्या पाखरांची जरा,
ओळख होईल नीट!’
.................. .......................
ज्यांचे पोट हातावर, त्यांना कष्टाशिवाय दुसरे काय ठावूक?
त्यांचे पोपट उघडे काय, झाकले काय,
कुठले वादळ आले काय, गेले काय,
त्यांना कशाचा पत्ताच नव्हता!
पोपट सलामत तो लंगोट पचास,
या अनुभवसिद्ध समूहस्मरणावर त्यांची भिस्त!
गाठीबिठी राहू द्या! साधे फटकूर मिळाले तरी
त्यांचे चालण्यासारखे होते, त्यांचे पोपट अगदी साधे होते
तेवढ्यावरती त्यांचे भागण्यासारखे होते!
......................... ..........................
गावाबाहेर दूर एक फकीर रहात असे.
सगळे लंगोट त्याला नीट माहित होते.
पोपटांच्या नाना परी तो अचूक ओळखून होता.
त्याने स्वतः कधी कोणती लंगोट वापरली नव्हती,
कि कधी कोणते पोपट पाळले नव्हते!
त्याच्या वाटेस कुणी कधी गेलेच तर तो
हसून कलंदर उत्तर देई,
‘उखाड ले जो उखाडना है,
मेरे पोपट तो लंगोट से परे हैं!’
गाव त्याला बिचकून असे, मनातल्या मनात त्याला सलाम करे!
.............. .....................
बरेच दिवस तो सगळी गंमत पहात राहिला.
शेवटी एकदा गावात गेला.
लंगोट हरवून बसलेल्या सगळ्यांनाच तो
बिनलंगोटीचा फकीर त्यादिवशी एकदम त्यांच्यातला वाटू लागला.
सगळे जमले. समस्या मांडली.
‘आमचे पोपट उघडे बाबा!
हरवलेली लंगोट शोधायची कशी?
नवीन लंगोट विणायची कशी?’
‘हो! हो! उतावळ्या पोपटांनो शांत व्हा!’
एका भल्यामोठ्या पाषाणावर फकीर शांतपणे बसला.
जवळची भलीमोठी झोळी उघडली.
त्यातनं एकेक लंगोट बाहेर काढून पाषाणावर अंथरू लागला. सगळेजण डोळे फाडफाडून पाहू लागले.
‘इथे लंगोट्या हरवल्या म्हणून, आम्ही कवाचे शोधतोय! आणि याच्याकडे पहा थप्प्या .....!’
‘इतक्या लंगोट्या याच्याकडे कशा पण?’
‘चोर आहे हा फकीर साला! आमच्या लंगोट्या आम्हालाच दाखवतो!’
पण तसं स्पष्ट तोंडावर बोलायची हिम्मत कुणातच नव्हती!
मिळाली तर त्यातली एकतरी लंगोट, प्रत्येकालाच हवी होती!
दीर्घश्वास घेऊन, लोकांवर एक बाsssssरीक नजर टाकून फकीर म्हणाला,
‘यातली, आपापली लंगोट ओळखून, ज्यानं त्यानं घेऊन जावी!
पण अट एकच - जर चुकीची लंगोट उचलाल, तर त्याक्षणी तुमचे पोपट गायब होतील!’
हे ऐकताच प्रत्येकाने घाबरून आपापल्या पोपटावर हात ठेवले.
प्रत्येकाचे मन धक्का लागून मागे सरकले.
मी मी म्हणणारे विद्वान, पोपट हरवण्याच्या भितीने कासावीस झाले.
सगळे लंगोट एकसारखे दिसत होते! ओळखायचे कसे?
बराच वेळ सन्नाटा पसरला.
पोपट कि लंगोट या विचारात प्रत्येकजण हरवला.
फकिराने आरामात चिलीम पेटवली. म्हणाला,
‘विचार करा. घाई नाही. उद्या सगळे लंगोट घेऊन मी परत इथे येईन!’
लोक आपापल्या पोपटासह घरोघरी परतले.
............. ............. ...................
तेव्हापासून आजपर्यंत दररोज तो फकीर नित्यनेमाने सगळे लंगोट घेऊन त्या गावात जातो,
पाषाणावर एकएक लंगोट अंथरतो.
लोकही आपापल्या पोपटासह तिथे जातात.
पण, अजूनही स्वतःच्या लंगोटाची ओळख न पटल्याने
दिशाहीन होऊन अंधारात सैरभैर गावभर भटकत राहतात......
प्रतिक्रिया
27 Nov 2015 - 6:09 pm | शिव कन्या
हा अनुवाद नसून, स्वतःचे स्वतंत्र लेखन आहे.
27 Nov 2015 - 7:11 pm | पगला गजोधर
जवां नवीन पोपट हां, लागला विठू विठू बोलायला ...........
27 Nov 2015 - 7:15 pm | सुबोध खरे
PATHETIC -केविलवाणे
28 Nov 2015 - 10:32 pm | शिव कन्या
कथेतील लोकांच्या स्थितीबद्दल ' केविलवाणे ' हा शब्द प्रयोग करत असाल, तर मान्य.
तुमची समज मानली.
धन्यवाद .
27 Nov 2015 - 7:30 pm | तिमा
यातून लेखक्/लेखिकेला कोणता संदेश द्यायचा आहे ?
27 Nov 2015 - 8:11 pm | सायकलस्वार
मला वाटतं फकीर हे कृष्णाचं प्रतीक आहे आणि गावकरी म्हणजे गोपी. पोपट हे बहुधा भक्तीचं प्रतीक असावं. कॄष्णाने गोपींचे वस्त्ररुपी लंगोट हरण केल्यामुळे त्यांची लैंगिकता नष्ट होऊन त्यांच्या ठायी विशुद्ध भक्तिभाव निर्माण झाला आहे. वस्त्रे परत घेतली तर लैंगिकता परत मिळेल पण भक्तिसुखाला पारखे व्हावे लागेल, अशा दुग्ध्यात गावकरी उर्फ गोपिका पडल्या आहेत. ज्या वाचकांना ही कथा पॅथेटिक वाटत आहे त्यांना कथेमागचा अध्यात्मिक भावच लक्षात आलेला नाही असे वाटते.
- (विषयव्यापी)
27 Nov 2015 - 8:14 pm | मांत्रिक
धन्यवाद! अतिशय उत्तम परिचय करुन दिलात. मानलं तुम्हाला साहेब.
27 Nov 2015 - 8:45 pm | सुबोध खरे
@सायकलस्वार
लंगोट हा पुरुषांचा असतो. (व्युत्पत्ती पहावी).
बाजीरावाची शेंडी अहमद शहा अब्दालीला लावून काय फायदा?
28 Nov 2015 - 10:35 pm | शिव कन्या
नाही. असा कोणताही अध्यात्मिक अर्थ, लिहिताना आणि आत्ताही माझ्या मनात नाही.
पण आपल्या सूक्ष्म अध्यात्म दृष्टीला प्रणाम.
28 Nov 2015 - 10:36 pm | शिव कन्या
@ सायकलस्वार......
नाही. असा कोणताही अध्यात्मिक अर्थ, लिहिताना आणि आत्ताही माझ्या मनात नाही.
पण आपल्या सूक्ष्म अध्यात्म दृष्टीला प्रणाम.
27 Nov 2015 - 7:36 pm | दमामि
कोणता झेंडा घेऊ हाती????
27 Nov 2015 - 8:01 pm | शिव कन्या
उत्तम न् बरोबर आकलन. धन्यवाद .
27 Nov 2015 - 7:46 pm | जव्हेरगंज
मैने बद्दल पण असंच कायतरी येऊ द्या!!!!!
आवडेल वाचायला!!!!!
27 Nov 2015 - 8:03 pm | अभ्या..
.
काहीही कळाले नाही. फक्त 'माझी चिमणी उडाली फुर्र. माझा पोपट पिसाटला.' हे गानं आठवलं.
दुसर्या कोणा पुर्षनाम्वाच्कायडीने हेच लिहिले असते तर काय झाले असते हे पण आठवले. असो.
28 Nov 2015 - 10:39 pm | शिव कन्या
जे आठवले ते लग्गेच सांगितलेत, प्रांजळपणा आवडला.
रच्याकने, पुरुष वा स्त्री आयडीची काळजी घेऊन प्रतिक्रिया देता, हे काय मनास पटले नाही!
लेखन लेखन असते.
27 Nov 2015 - 8:28 pm | अनुप ढेरे
सध्याच्या असहिष्णुतेच्या वादाबद्दल आहे का हे?
27 Nov 2015 - 8:40 pm | माहितगार
नेमके रुपक लक्षात आले नाही. "कोणता झेंडा घेऊ हाती????' या संदर्भानेही आमचा ट्यूबलैट द्यापतरी पेटलेला नै. तरीसुद्धा सध्याच्या चालू असहिष्णूता वादाचा संदर्भ लावला तर लंगोट म्हणजे पुरस्कार, मानधन, सन्मान; आणि पोपट म्हणजे विचारस्वातंत्र्य असे काहीसे बसते का ?
अजून कुणी इस्कटून सांगू शकेल का ?
27 Nov 2015 - 8:41 pm | प्रसाद गोडबोले
काहीही
27 Nov 2015 - 8:57 pm | DEADPOOL
मस्त मुक्तक!!
27 Nov 2015 - 9:04 pm | मांत्रिक
धागाकर्त्रीने यापूर्वी अनेक उत्तम रचना दील्या आहेत. तेव्हा प्रीज्युडाईस न होता त्यांना त्यांचे मत मांडू देत. त्याशिवाय रचना कळणार नाही.
28 Nov 2015 - 11:22 pm | शिव कन्या
उत्तम रचना लक्षात ठेवल्यात. आभारी आहे.
रूपक कथेची हीच खासियत आहे! या कथांचे अर्थ जो तो ज्याच्या त्याच्या एकूणच कुवतीनुसार काढतो.
रचना अनेकांना कळली पण झेपली नाही, झेपणारही नाही!!! असो.
28 Nov 2015 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार
अशी भन्नाट कल्पना सुचल्या बद्दल कवयत्रीचे मन:पूर्वक अभिनंदन.
लंगोटवाहु वादळ ही कल्पनाच मुळी जबरदस्त आणि आकर्षक आहे. कविता वाचताना मस्त वाटत होते. पण कविता संपल्यावर, ही कल्पना म्हणजे दुर्दैवाने केवळ कवी कल्पनाच आहे याची जाणीव होउन मन अधिकच उदास झाले.
असे वादळ अजून तरी ऐकिवात नाही. ना बीन लंगोटीचा फकीर कुठे पहाण्यात आला.
जे बीन लंगोटिचे वाटले त्यांनी देखील कुठलीतरी लंगोटी घातली आहे असे शेवटी लक्षात आले आणि मोठा भ्रमनिरास झाला. त्यामुळे आता कोणावरच विश्र्वास ठेवावासा वाटत नाही.
पण हा SSS..... नुसत्या वादळाच्या कल्पनेने सुध्दा भल्याभल्यांच्या लंगोट्या उडालेल्या मात्र पाहिल्या आहेत, पहातो आहे.
प्रत्यक्षात असे वादळ येईल तेव्हा एखाद्या मोठ्या चक्रीवादळा पेक्षाही अधिक जास्त हाहाक्का:र उडवुन जाईल. अशा वादळात अनेकांचे पोपट उघडे पडतील.
असे वादळ येण्या आधीच स्वत:च स्वत:ची लंगोटी काढुन फेकाविशी वाटते. पण प्रामाणिकपणा कमी पडतो आणि त्यामुळे लंगोटी उतरवायची हिम्मत होत नाही. मग नाइलाजाने रंगीबेरंगी ठिगळे लाउन ती लंगोटी पुन्हा पुन्हा वापरत रहातो.
ज्याची त्याला प्यार लंगोटी,
लंगोटीतले पोपट पोपटी,
लंगोटातले पोपट वेडे
भुलती वरील रंगाला,
पोपट लंगोटीत दडला,
पोपट लंगोटीत दडला,
पैजारबुवा,
28 Nov 2015 - 9:56 am | आनन्दा
अहो तुम्ही आम्ही म्हणजेच फकीर.. त्यांना कुठे आता लंगोट ओळखता येतायत? तरी आपण दर ५ वर्षांनी जाणार त्यांच्याकडे त्यांचे लंगोट घेऊन.
मला आपले असे वाटते.
28 Nov 2015 - 10:51 pm | शिव कन्या
नमस्कार.
मर्मग्राही प्रतिक्रिया दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. जाणकार वाचक मिळायलाही भाग्य लागते.
[पण प्रामाणिकपणा कमी पडतो आणि त्यामुळे लंगोटी उतरवायची हिम्मत होत नाही. मग नाइलाजाने रंगीबेरंगी ठिगळे लाउन ती लंगोटी पुन्हा पुन्हा वापरत रहातो. ] या प्रतीचा प्रामाणिकपणा अथपासून इतिपर्यंत कुठेच दिसत नाही. म्हणून आजही दिशाहीन झुंडी, स्वतःचे लंगोटच ओळखायची क्षमता हरवून बसलेल्या गर्दीची बजबज दिसते.
28 Nov 2015 - 11:31 am | अभ्या..
प्रत्यक्ष लेखिका महोदयांनी येऊन, लंगोट म्हणजे हे, पोपट म्हणजे ते, फकीर म्हणजे तो असे समजावून सांगितल्याशिवाय काही खरे नाही बाबा.
.
३ री क
28 Nov 2015 - 10:53 pm | शिव कन्या
:):):) वर्गात काय चाललेय, त्याकडे लक्ष द्या.
28 Nov 2015 - 1:00 pm | रातराणी
खरचं नाही कळलं हे.
28 Nov 2015 - 2:36 pm | माहितगार
"ज्यांचे पोट हातावर" हा काव्यांश वाचल्या नंतर संजीव खांडेकरांच्या लाकुडतोड्याची गोष्टची अल्पशी आठवण आली. त्यावरून या काव्यातील प्रतिमांसाठी लंगोटी म्हणजे स्वत्व आणि पोपट म्हणजे इभ्रत अशी कल्पना मनात आली; अर्थात संजीव खांडेकरांची लाकुडतोड्याची गोष्ट समजण्यास अधिक कठीण असलीतरीही अधिक सखोल आणि आशयपूर्ण वाटते. (लाकुडतोड्याची गोष्ट बद्दल माझे मिपावरील समिक्षण)
कदाचित तो शुक्रतारा-पाखरे वाला परिच्छेद मला नीटसा समजला नसावा पण त्यामुळे कवी(/यत्री)च्या शब्दात विसविशीतपणा वाटला-पण त्या कडव्यात काही रुपक आहे की जे मला अद्याप समजले नाही असे शक्य आहेच.
28 Nov 2015 - 11:16 pm | शिव कन्या
अर्थ समजून घेण्यासाठी केलेल्या आपल्या धडपडीला सलाम.
प्रतिमांचा अचूक अर्थ लावलात.
शुक्रतारा- पाखरे वाला परिच्छेद हा अशा लोकांना वाह्यलाय कि, ज्यांना स्वतःच्या गुलछबू सुखाने बरबटलेल्या जगाबाहेर दुसरे काही दिसत नाही, सलत नाही! त्यांना कोणता पीळच नसतो....अशा विसविशीत लोकांचे जग विसविशीत भाषेतच येणार की!!! तुमचे अचूक निरीक्षण मानले.
संजीव खांडेकर आता वाचणार.
अवांतर.... पोपटाची कल्पना सतिश तांबे यांच्या 'ऐसी अक्षरे' तील मुलाखतीतून एकदम strike झाली. बऱ्याच दिवसात आपल्याला जे म्हणायचे आहे, ते अशा रितीने मांडता येईलसे वाटले. मूळ उतार उद्धृत करीत आहे:
'एका पार्टीत एका नटीने तिथं जमलेल्या सर्व पुरुषांना उद्देशून "सर्वांनी आपले पोपट दाखवा" असं मोठ्याने सांगितले.ते वाक्य जेव्हा मला कळले, तेव्हा मला वाटले की एका स्त्रीच्या तोंडी असलेलं हे वाक्य जगातल्या अत्यंत श्लील वाक्यांपैकी आहे. आणि बीमार पुरुषी मानसिकतेला ते झेपण [ण वर अनुस्वार आहे, तांत्रिक अडचणीमुळे इथे तो टंकिता येत नाहीये] शक्य नव्हे.'
28 Nov 2015 - 11:52 pm | अभ्या..
अररर तिथली प्रेरणा हाय व्हाय. चालू द्या चालू द्या.
कळले काय नाही कळले काय. फरक पडत नाही.
.
धन्यवाद
30 Nov 2015 - 1:31 pm | माहितगार
आपला हा प्रतिसाद वाचल्यानंतर प्रतिमांसहीत काव्याचे पुन्हा एकदा वाचन केले. "...अशा विसविशीत लोकांचे जग विसविशीत भाषेतच येणार की!!!" हे पटले.
आपल्या काव्यातील खालील दोन परिच्छेद विशेषत्वाने भावले :
30 Nov 2015 - 1:37 pm | माहितगार
हम्म, हे वाक्यही किती जणांना चटकन समजेल जराशी शंका आहेच; एनीवे, पोपट शब्दा मागची आपण दिलेली प्रेरणा रोचक आहे.'
28 Nov 2015 - 2:39 pm | टवाळ कार्टा
डब्बल मीनींग लेख
29 Nov 2015 - 7:20 am | चलत मुसाफिर
सतीश तांबे यांचा 'मॉलमधील मंगोल' हा कथासंग्रह वाचला आहे आणि अतिशय आवडला आहे. एकएक कथा (पुरुष!) वाचकाचा लंगोट उतरवून हातात देणारी.
29 Nov 2015 - 9:58 am | चाणक्य
'फट्ट पांढरे म्हणजे काय ओ?' (ह.घ्या.)
29 Nov 2015 - 10:32 am | चांदणे संदीप
आम्ही लंगोटच वापरत नसल्याने आणि लंगोट वापरणाऱ्यांपासून चार हात लांबच असल्याने ह्या काव्यावर कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास आम्ही स्वत:ला लायक समजत नाही. तस्मात, आपला पोपट घेऊन इथून निघालेलेच बरे! चलो... बाय बाय!
टीप:आम्ही फकिर नाही!
धन्यवाद,
Sandy
30 Nov 2015 - 1:44 pm | pacificready
अत्यंत पारदर्शी आणि मन मोकळं लिखाण...!
शूकन्या यांचा दिसतो लांबचा पल्ला
मिपावर येऊन केला त्यांनी कल्ला
मिळेल त्यांना प्रतिसादांचा भरुन गल्ला
नाही येणार मारता त्यावर कुणास डल्ला
-कवी प्यारामदास आठवले
30 Nov 2015 - 2:38 pm | नितीनचंद्र
आम्हाला बुवा रामदास फुटाणे आठवले
मागे एकदा रामदास आठवले समाजकल्याण मंत्री झाले होते.
तेव्हा फुटाणे यांची गाजलेली चारोळी.
आम्हालाही आठवले
आमचे नाव रामदास आहे
मागास वर्गीय नसल्यामुळे
आमच्या नशीबी वनवास आहे.
ही चारोळी साहेबांना फार बोचली. त्यांनी मग रामदास फुटाणेंना विधान परिषदेवर आणले.
पण ज्या चारोळी मुळे आपण प्रसिध्द होऊ शकतो तश्या कविताच का करुन नये असे मा. रामदासजी आठवले यांना वाटले असावे त्यामुळे हल्ली ते संधी सोडत नाहीत.
30 Nov 2015 - 3:58 pm | कंजूस
ये लंगोट के पिछे क्या है असं एखादं गाणं आलं तर ते अश्लील वगैरे नसून त्यात अध्यात्म भरलं आहे.
30 Nov 2015 - 4:09 pm | बॅटमॅन
आणि ढगाला लागली कळ, पाणी थेंबथेंब गळं हे गाणंही तुफान आध्यात्मिक आहे.
दादा कोंडकेंचे द्व्यर्थी ड्वायलॉक, उदा. उभयक्लेदनाचा ड्वायलॉकही तसाच.
बाबुरावापासून सखूपर्यंत सगळेच अध्यात्मिक.
30 Nov 2015 - 4:43 pm | संदीप डांगे
ढगाला लागली कळ हे 'निसर्ग गीत' आहे. त्यातून त्यांनी शेतीची, पिकपाण्याची माहिती दिली आहे. जनसामान्य शेतकर्यांच्या भावना सहज भावनेने मांडल्या आहेत. कोण तो द्वयर्थी म्हणणारा...?
30 Nov 2015 - 6:27 pm | टवाळ कार्टा
"उभयक्लेदनाचा ड्वायलॉकही"???
30 Nov 2015 - 4:41 pm | माहितगार
एक मिनीट, आपण भारतात राहतो भारतीय संस्कृतीत अध्यात्म अगदी कुठेही असू शकतेच ! (वाक्य केवळ चांगल्या अर्थाने घ्यावे)
30 Nov 2015 - 5:31 pm | कंजूस
झेन धर्म { आचरण } होतं आणि आहे जपान ( निहोंग )मध्ये.त्यात प्रत्येक वस्तूत आत्मा आहे असं मानतात.इकडे कोकणात झय्राच्या उगमापाशी एखादा देव मांडलेला असतो तस्साच जपानमध्येही असतो.उदबत्ती लावतात आणि दोनदा टाळी वाजवतात..दगडधोंड्यातही आत्मा दिसतो तर शरीरांतही असणार.तेव्हा वरील गाणी चिपळ्या,एकतारी वर म्हणून पहावीत .लंगोssssट केssss पीsssssछे.............;;;;;;;;;;पोरी तूsssssss जssssपून दांssssडा............ वगैरे.
30 Nov 2015 - 5:42 pm | तिमा
लंगोट, लंगोटी, कौपिन यांत फरक काय असतो ?
30 Nov 2015 - 5:46 pm | अभ्या..
तो लंगोट, ती लंगोटी, ते कौपिन
30 Nov 2015 - 6:42 pm | प्रसाद गोडबोले
मेलो मेलो मेलो
=)))))
30 Nov 2015 - 6:40 pm | कंजूस
एकच लांबलचक तीन चार इंच रूंद कापडाची पट्टी पुर्वी लहान मुले लावत.दोन्ही टोके कमरेच्या करदोट्यात अडकवतात.ही लंगोटी.लंगोटी लावून शाळेत जात असू तेव्हापासूनचे मित्र म्हणजे लंगोटीयार.दंगामस्ती करताना मुले एकमेकाची ओढतात ती ही.
एका रूंद पट्टीस दुसरी आडवी पट्टी शिवली (इंग्रजी T) सारखी की लंगोट.आडवी पट्टी कमरेला आणि उभी मागे खोचायची.करदोटा लागत नाही.
एक मोठा त्रिकोण पुढे त्याच्या दोन नाड्या कमरेला बांधून त्रिकोणाचे टोक मागे खोचले की कौपिन.रामदासांच्या चित्रात दाखवतात तसा.