आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी'

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
23 May 2014 - 11:39 am

मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच. मी तुमास्नी, 'वर्ल्ड वॉर झी' शिनेमाची थोडी श्टोरी सांगतो (ब्याकग्राउंडसाठी), उरलेल्या जगात मानसं झोंबी होण्याची साथ आलेली असते,फक्त ह्या साथीची सुरुवात होण्याच्या काही दिवस अगोदरच इस्राईल आपल्या देशाभोवती ऐक अतिप्रचंड कोन्क्रीट भिंत उभारतो, कि जिला ओलांडून झोम्बींना आत प्रवेश करता येत नाही, देशाचे रक्षण होतं. त्यांना कसं आधीच कळत ? काही दिवस आधी त्यांच्या मिलिटरीला इमेल येतो त्यात एकच शब्द असतो 'झोंबी'. अर्थातच संरक्षण विभागाचे जवळ जवळ सर्वच या गोष्टीला उडवून लावतात, पण ऐक माणूस उलट विचार करतो.

टेन्थ म्यान रूल (दहावा माणूस नियम), हा नियम क्रिटीकल थिंकिंग पठडीतला आहे, जगातील सर्वच नावाजलेल्या संरक्षण संस्था / कोर्पोरेट याचा वापर करतात. हा नियम कसा आला ? व काय आहे हा नियम ? योमकिप्पुर चे युद्ध व म्युनिक हत्याकांड, या सारख्या अवांछित अनपेक्षित घटनापासून देशाला वाचवण्यासाठी हि विचारसरण घडवली गेली.

"The Tenth Man. If nine of us look at the same information and arrive at the exact same conclusion, it's the duty of the tenth man to disagree." according to which even if there is unanimous agreement on something, it is the duty of one (the tenth man) to argue against it as a sort of devil's advocate. The idea is to take seriously even very remote possibilities and threats. It’s the tenth man’s responsibility to present a case for an alternative view point — no matter how ridiculous the idea sounds. If his evidence is still inferior and conflicts with the consensus of the other nine men , then they go through with their original plan. If the tenth man’s ideas prove to be superior, they explore his ideas further.

चित्रपटात तो दहावा देशाला दुसर्या कोनातून माहितीकडे बघण्यास मन वळवतो व चित्रपटात , देशाचे रक्षण होतं.

पगला गाजोधारची कोणाही व्यक्ती/संघटनेशी दुष्मनी नाही, जानेअन्जानेमे माझ्याकडून कोणी मिपाकर दुखावले असतील तर मला अतोनात खेद आहे.
या मिपावर सध्या तो दहावा माणूस असल्याचा, मला आहे अभिमान, कारण तुमच्यासारखाचं, भारतमातेची मीही ऐक संतान.

धोरणइतिहाससमाजराजकारणशिक्षणचित्रपटप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाप्रतिक्रियासमीक्षामतशिफारसवादविरंगुळा

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

23 May 2014 - 11:52 am | llपुण्याचे पेशवेll

बरं. तुम्ही करता आहात ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे ना! मग असलं स्पष्टीकरण ल्याहायची गरज काय? तुम्हाला १०थ मॅन रूल माहीत आहेत. त्याचे फायदे माहीत आहेत तर तुम्ही कार्यवाही करत रहा.

प्रसाद१९७१'s picture

23 May 2014 - 12:01 pm | प्रसाद१९७१

तुम्हाला इस्राईल चा उल्लेख चांगल्या रितीने करता आला हे म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवल्यासारखे आहे.

संचित's picture

23 May 2014 - 1:17 pm | संचित

आजकाल भलतेच फोर्मात आहात बुआ. सगळे लेख नाही पटले पण हे पटते.
येउद्या.

तुमचा अभिषेक's picture

23 May 2014 - 1:38 pm | तुमचा अभिषेक

या स्पष्टीकरणाची गरज होती की नाही माहीत नाही, पण आपल्या लेखांकडे माझ्याकडून तरी तसेच बघितले जात होते.
स्वता वैयक्तिक मी कोणत्याही लाटेत वाहून गेलो नसल्याने तटस्थपणे त्यावरही विचार करता येत होता.
खरे तर हल्ली जे भावूक ड्रामे घडत आहेत किंबहुना ते ड्रामे नसावेही पण त्याचे सोशलसाईटवर जसे उदात्तीकरण केले जात आहे त्याने थोडाफार वीट तर आणलाय. त्याला विरोधच केला पाहिजे असे गरजेचे नाही पण कुठेतरी थांबून शांतपणे विचार करणे गरजेचे.
येऊद्या आपले विचार, पुढील लेखाच्या प्रतीक्षेत !

आत्मशून्य's picture

23 May 2014 - 5:53 pm | आत्मशून्य

इतकाच टुकार आहे. त्यात ब्राड पिट वाया गेला तसाच लेखकही ?

भृशुंडी's picture

23 May 2014 - 11:09 pm | भृशुंडी

पुस्तक वाचा ...ते जरा बरं आहे म्ह्णे.

अवांतर ठरेल. कारण धागा लेखकाला चित्रपट चर्चा अभिप्रेत आहे.

विकास's picture

23 May 2014 - 11:14 pm | विकास

one (the tenth man) to argue against it as a sort of devil's advocate.

अच्छा म्हणून तुम्ही सॉर्ट ऑफ डाव्या-समाजवाद्यांची अ‍ॅड्वोकसी करत आहात तर. ;)

त्यांना टेन्थ मॅन रुल समजलेला दिसत नाही, कारण ते जे करताहेत ती अ‍ॅडवोकसी नाही, तर चिखलफेक आहे.

असो. यांच्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची नाही असे मी ठरवले होते, तुमच्यामुळे बोलावे लागले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 May 2014 - 12:04 am | निनाद मुक्काम प...

विरोधाला विरोध सुरवातीला हास्यास्पद व नंतर उबक आणणारा असतो.
सुरवातीला ह्यासाठी म्हटले की एका लेखातून तुम्ही मते वयक्त केल्यावर पुढे टी र पी च्या लाटेत वाहत जात जिलब्या पाडायला लागलात की उबक येतो.

स्पष्टीकरण देऊन बरं वाटलं का?......माझ्या मते आपले उत्तर 'नाही' असे असेल.

(म्हणजे हा लेख लिहिला नाही म्हणून वाटणारी रुखरुख आता वाटणार नाही, पण ते काही बरं वाटणं नाही...काय?)

पगला गजोधर's picture

26 May 2014 - 9:53 am | पगला गजोधर

All truth passes through three stages.
First, it is ridiculed.
Second, it is violently opposed.
Third, it is accepted as being self-evident.


Arthur Schopenhauer, philosopher (1788 – 1860)