मुन्नी बदनाम- एक रसग्रहण

प्यारे१'s picture
प्यारे१ in जे न देखे रवी...
12 Apr 2011 - 5:38 pm

मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल....

तर थोडी माहिती.
गीत- मुन्नी बदनाम हुई'
चित्रपट - दबंग्ग
संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला)

हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात.

मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया. आपल्याला चमच्याने भरवणे (२१) अपेक्षित नाही.

मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिए - 3
- (ओळीपुढील आकडे तितक्या तितक्या वेळा आळवणी करण्या साठी आहेत. द्विरुक्ती अथवा त्याहून जास्त वेळा कुठलीही गोष्ट उच्चारली की तिचा विशेष प्रभाव पडतो हे मुन्नीला आणि कर्त्यांना अर्थातच ठाऊक आहे.)

मुन्नी स्वतःच म्हणते की बदनाम झाली आहे.
बदनाम झाली तर का, कशी आणि कुणासाठी हे मुख्य प्रश्न आपल्यापुढे उपस्थित होतात. त्याचे उत्तर आपल्याला पुढील ओळींमध्ये मिळते.

मुन्नी त्यापूर्वी स्वतःचे वर्णन करते. ह्यात विशेष काय ते तुम्ही ओळखालच.
गुलाबी गाल, शराबी डोळे आणि नवाबी चाल हे तिचे गुणविशेष विद्यार्थ्यांनी उकलून पहावेत. (संदर्भ: स्वतःशी ताडलेले बरे)

खरेतर इथून पुढे आपले खरे रसग्रहण सुरु होते.

ले झंडू बाम हुई, डार्लिंग तेरे लिए

आपल्या प्रियकरासाठी 'डारलिंग' हा विशेष शब्द ती उच्चारते. याउप्पर ती आपले रुपांतरण दाखवते झंडू बाम बनून. मुन्नी ला झंडू बाम बनावेसे वाटण्याचे कारण म्हणजे तिची सर्हुदयता. (शब्द समजून घ्या) ज्याप्रमाणे बाम वेदना शमन अथवा हरण करण्याचे काम करते त्याप्रमाणेच आपल्या प्रियकराची वेदना हरण करण्याचा उदात्त हेतू मुन्नीकडे आहे. ही कोमलता आपल्या अंगी कधी येणार बरे?????

शिल्पा सा फिगर बेबो सी अदा, बेबो सी अदा
शिल्पा सा फिगर बेबो सी अदा, बेबो सी अदा
है मेरे झटके में फिल्मी मज़ा रे फिल्मी मज़ा
हाए तू ना जाने मेरे नखरे वे
हाए तू ना जाने मेरे नखरे वे लाखों रुपैया उड़ा

वे मैं टकसाल हुई, डार्लिंग तेरे लिए
सिनिमा हॉल हुई, डार्लिंग तेरे लिए
मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिए - 2

पुढच्या कडव्यात मुन्नी आपल्या सौंदर्याची नम्रपणे जाणीव करुन देते आणि आपल्या कार्याचे वेगळे असे पैलू देखील नजरेस आणवून देते. प्रियकरासाठी काहीही करण्याची तयारी असलेली मुन्नी प्रियकराच्या दु:ख वेदना दूर करण्या बरोबरच त्याची तितकीच चांगल्या प्रकारे करमणूक देखील करते, त्याच्या विरंगुळ्याचे साधन बनते.

आपण सिनेमाला कशासाठी जातो? आपली करमणूक होण्यासाठी, शीण घालवण्यासाठी आणि सिनेमा पाहिला जातो चित्रपट गृहात, सिनेमा हॉल मध्ये.

मुन्नी सिनेमा हॉल बनते ते आपल्या 'डारलिंग'च्या करमणूकीसाठी, त्याचा शीण घालवण्यासाठी. इतकी चांगली प्रेमिका शोधून तरी मिळेल का बरे?

बरं नुसती करमणूक करुन थांबली नाही बरं मुन्नी.पुढच्याच वाक्यात ती म्हणते, 'वे मै टंकसाळ हुई ....'

याचा अर्थ मी तुम्हाला सांगायचा का? बेकार मुलासाठी जशी आई तशीच जणू मुन्नी आपल्या प्रियकरासाठी उत्पन्नाचे स्त्रोत जणू. मुन्नी कोणत्या मार्गाने पैसे मिळवते हे मात्र ती पुढच्या कडव्यात चाणाक्षपणे सांगते.

ओ मुन्नी रे, ओ मुन्नी रे
तेरा गली गली में चर्चा रे
है जमा इश्क़ दा इश्क़ दा पर्चा रे
जमा इश्क़ दा इश्क़ दा पर्चा रे
ओ मुन्नी रे

या ओळी मुन्नीच्या गौरवपर वापरलेल्या आहेत. हल्ली आपण कुठलाही पुरस्कार प्रदान सोहळा पाहतो. त्या मध्ये जीवनगौरव मिळणार्‍या व्यक्ति बाबत काही काही लोक मध्येमध्ये काही काही बोलतात. तसेच काहीसे. अर्थात पुढे जायचे आहे आपल्याला म्हणून एवढेच.

कैसे अनाड़ी से पाला पड़ा जी पाला पड़ा
हो कैसे अनाड़ी से पाला पड़ा जी पाला पड़ा
बिना रुपए के आके खड़ा मेरे पीछे पड़ा
पोपट ना जाने मेरे पीछे वो सैफ़ू
(हाए हाए मार ही डालगी क्या)
पोपट ना जाने मेरे पीछे सैफ़ू से लेके लंबू खड़ा

कैसे अनाड़ी से पाला पड़ा जी पाला पड़ा
बिना रुपये के आके खडा मेरे पीछे पडा
या दोनच ओळींतून मुन्नी टंकसाळ कशी याचे सूचक उत्तर मिळते. पैसे न घेता आलेल्या व्यक्तिला अनाडी , पोपट अशा संसदीय शिव्या देऊन आपल्या पुढे मागे मोठमोठ्या व्यक्ति आहेत असे मुन्नी सूचित करते. प्रियकरासाठी मेणाहून मऊ मुन्नी बाहेरच्या व्यक्तिंसाठी कडक्लक्ष्मी बनते. पैसे असेल तरच असे म्हणून आपली व्यवहारनिपुणता देखील ती दाखवते.
अधिक रसग्रहणासाठी एखादा अभ्यास दौरा आयोजित करता येईल.असो.

आइटम यह आम हुई, डार्लिंग तेरे लिए
आइटम यह आम हुई, डार्लिंग तेरे लिए
मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिए

वरील महत्त्वाच्या व्यक्तिंबरोबरच मुन्नी कधी कधी 'आम म्हणजे सामान्य' होऊन जाते. यातूनच आपल्याला तिची सर्व परिस्थितीत जुळवून घेऊ शकण्याची क्षमता दिसून येते.

है तुझ में पूरी बोतल का नशा, बोतल का नशा
है तुझ में पूरी बोतल का नशा, बोतल का नशा
कर दे बुडापे को कर दे जवान रे कर दे जवान
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली, हाए
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली रे दे है जिया

तू आइटम बॉम्ब हुई, डार्लिंग तेरे लिए

मुन्नीला संबोधून पुन्हा एक गौरवपर 'क्लिप'

आपला अनुभवच जणू सांगत आहेत. की मुन्नी मध्ये ठासून नशा भरलेली आहे जी वयस्कर व्यक्तिंना तरुण बनवते. इथे झंडुच्याच आणखी एका प्रॉडक्ट्ची आठवण येते.
'झंडु का केसरी जीवन' साठ साल के बुढे या साठ साल के जवान.
पहा पहा. एक आणखी गुण.

होठोंपे गाली असणारी मुन्नी स्वतःला कसे वाचवावे याचे उत्तम ज्ञान देखील बाळगून हे हे विशेषतः तरुण मुलींनी लक्षात घ्यायला हवे.

नंतर परत येणार्‍या 'चोरस'च्या ओळी पुनः पुन्हा मुन्नीच्या महतीला आपल्या ह्रुदयी ठसवतात.

खरंतर मुन्नी बद्दल काय आणि किती बोलावं असं आहे. पण म्हणतात ना ..... काहीतरी. असो.

आपण आपल्या परीने मुन्नीच्या व्यक्तिमत्वाचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न वरील कवितेतून केला.
आकाश व्यापूनही अंगुळभर राहणारी ती थोर व्यक्ति.

आपण कुठवर पुरे पडणार?

----------------------------------------------

विशेष आभार : 'मुन्नी बदनाम' ह्या गाण्याची लिखीत प्रत त्वरित उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री. परिकथेतील राजकुमार ह्यांचे आभार.

भूछत्रीधोरणसंस्कृतीकलानृत्यबालगीतविडंबनव्युत्पत्तीशब्दार्थसुभाषितेविनोदजीवनमानऔषधोपचारअर्थकारणशिक्षणमौजमजाचित्रपट

प्रतिक्रिया

भारी एकदम रसग्रहण .. आवडले.

आपल्या प्रियकरासाठी 'डारलिंग' हा विशेष शब्द ती उच्चारते. याउप्पर ती आपले रुपांतरण दाखवते झंडू बाम बनून. मुन्नी ला झंडू बाम बनावेसे वाटण्याचे कारण म्हणजे तिची सर्हुदयता. (शब्द समजून घ्या) ज्याप्रमाणे बाम वेदना शमन अथवा हरण करण्याचे काम करते त्याप्रमाणेच आपल्या प्रियकराची वेदना हरण करण्याचा उदात्त हेतू मुन्नीकडे आहे. ही कोमलता आपल्या अंगी कधी येणार बरे?????

भारीच आहे एकदम

अन्या दातार's picture

12 Apr 2011 - 6:30 pm | अन्या दातार

>>अधिक रसग्रहणासाठी एखादा अभ्यास दौरा आयोजित करता येईल.असो.

प्यारेगुर्जी, दौरा कधी काढताय? बादवे, हा दौरा असणार आहे कि शैक्षणिक सहल???

शेवटच्या बेंचवरचा (चावट)
अन्या

५० फक्त's picture

12 Apr 2011 - 6:45 pm | ५० फक्त

एक एसेमेस आठवला -

बिछड गये भाई बहन
बिछड गये भाई बहन
न पुछो क्या हुवा अंजाम
मुन्ना तो बना एमबिबिएस
मुन्नी हुवी बदनाम.

प्यारे१ यांना या गाण्यात एवढा रस उत्पन होण्याचे कारण समजेल काय ? बाकी रसग्रहण मस्तच. आणि ते अभ्यासदॉ-याचे जरा घ्या मनावर.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Apr 2011 - 7:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कोण काय करेल काही भरोसाच नाही राहीला आजकाल....

काय भारी लिवलय वो.... लयी मजा आली बगा.... ;)

निनाव's picture

13 Apr 2011 - 1:54 am | निनाव

अरे बाप रे .. हा हा... खाली पडलो मी हसता हसता... भन्नाटच...

प्यारे जी : _/\_

सांजसखी's picture

13 Apr 2011 - 5:20 am | सांजसखी

>>>> औषधोपचार कला नृत्य धोरण संस्कृती बालगीत विनोद विडंबन व्युत्पत्ती शब्दार्थ जीवनमान सुभाषिते शृंगार भयानक अर्थकारण हास्य बिभत्स करुण शिक्षण मौजमजा
वीररस अद्भुतरस चित्रपट रौद्ररस शांतरस ???????

इतके सगळे रस ???

टारझन's picture

13 Apr 2011 - 10:03 am | टारझन

वा प्यारे ...
आता शिला कशी आली , आणि शिला कशी झाली ? ह्यावर पण एक पिवळाधम्मल रसग्रहणाचा अभिनव नमुना येउन द्या !! ;)

प्यारे१'s picture

13 Apr 2011 - 10:11 am | प्यारे१

हा हा हा....!!!

हे मंगल रसग्रहण कार्य आपणच हाती घ्यावे अथवा कोणा 'सुधारक गतलगा' कडून करुन घ्यावे. आमची प्रतिभाताई एवढी मोठी नाही. अजून प्लेग्रुपमध्येच आहे.('शिशु'गटात सुद्धा नाही हो)

बाकी ख व आहेच.

टारझन's picture

13 Apr 2011 - 10:48 am | टारझन

अजून प्लेग्रुपमध्येच आहे.

म्हणुनच आपल्याला शिला शुला चा विषय दिल्या गेला आहे :)

बाकी ख फ आहेच ,

मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिये, या गाण्यात अत्यंत उदात्त अर्थ भरला आहे. कृष्णप्रेमापोटी जशा राधा, मीरा बदनाम झाल्या तसेच ही मुन्नीही बदनाम झालीय. भजनी मंडळात याच चालीवर 'राधा बदनाम हुई, मुरारी तेरे लिये' हे भजन गाता येईल.

मुलांनो,
अशा गाण्यांत अत्यंत उदात्त अर्थ भरलेला असतो. 'माय नेम इज शीला, शीला की जवानी, आयेम जस्ट सेक्सी फॉर यू, मै तेरे हात ना आनी' हेही गाणे अशाच जुन्या बोधकथेची आठवण करुन देणारे आहे.

संत तुलसीदास तरुण होते. नवीन लग्न झालेले. एकदा पत्नी माहेरी गेली होती. यांना फारच बेचैन झाले. पावसाळ्याचे दिवस आणि गंगेला पूर आलेला. तरी पोहत नदी पार केली. सासुरवाडीला रात्री बेरात्री पोचले. बायकोच्या दालनात कसे पोचावे. एक दोरी दिसली. तिला धरुन चढून गेले. (नंतर समजले की ती दोरी नसून साप होता) नवर्‍याला बघून बायको आश्चर्यचकित झाली. ती बुद्धिमान नारी म्हणाली, ' देह आज तरुण आहे तसा पुढेही राहाणार नाही. कामवासनेतील हीच उत्कटता भक्तीत दाखवा.' आणि त्या बोलण्याने तुलसीदासांचे डोळे खाडकन उघडले.

प्रसिद्ध भक्तीगीत गायिका इला अरुण यांनी म्हटलेली गाणी ऐकून तर मन भावविभोर होते. वा! किती एकापेक्षा एक मधुर गीते. 'चढ गया उपर रे. अटरिया पे लौटन कबूतर रे ' किंवा पौर्णिमा या गायिकेचे 'सरकाईलेवो खटिया जाडा लगे' ही त्याची उदाहरणे.

खरंच ही गाणी म्हणजे आपल्या संस्कृतीचा अजरामर ठेवा आहेत.

भजनी मंडळात याच चालीवर 'राधा बदनाम हुई, मुरारी तेरे लिये' हे भजन गाता येईल.

भारीच

भडकमकर मास्तर's picture

13 Apr 2011 - 11:41 am | भडकमकर मास्तर

लेखउत्तम जमलेला आहे...
अभ्यासपूर्ण... :)

हे गाणे गीतकाराने काय भावनेने लिहिलेले असावे यावर काही जाणकारांत वाद आहेत...

दुसर्‍या महायुद्धात घडलेल्या रॉकेट्स आणि पाणबुड्यांच्या हल्ल्यावर आधारित हे गाणे लिहिले आहे... हिटलरचा वाढता साम्राज्यवाद, भांडवलशाही, कम्युनिझम यांवर एकत्रित भाष्य म्हणजे मुन्नी बदनाम...

पैसा's picture

14 Apr 2011 - 3:01 pm | पैसा

सहमत!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 1:39 pm | परिकथेतील राजकुमार

दुसर्‍या महायुद्धात घडलेल्या रॉकेट्स आणि पाणबुड्यांच्या हल्ल्यावर आधारित हे गाणे लिहिले आहे... हिटलरचा वाढता साम्राज्यवाद, भांडवलशाही, कम्युनिझम यांवर एकत्रित भाष्य म्हणजे मुन्नी बदनाम...

मास्तरांशी असहमत आहे.

सदर गाणे हे आय पी एल आणि मोदी ह्यांच्या संबंधावर बेतलेले आहे तसेच काही ओळी ह्या निना गुप्ता व रिचर्डसची आठवण जागवतात.

भरत's picture

14 Apr 2011 - 2:47 pm | भरत

आय पी एल मधल्याच सुनंदा -शशी थरूर च्या जोडीला पण गान सूट होईल.

वपाडाव's picture

14 Apr 2011 - 6:23 pm | वपाडाव

या ओळी मुन्नीच्या गौरवपर वापरलेल्या आहेत.

याला या ओळींत मुन्नीचा गैरवापर केल्या गेला आहे असे वाचले....
अन दु:ख झाले... पण चष्मा चढवुन वाचल्याने घोळ दुर झाला...
जै जै मुन्नीबाइ...
रजु हिरानींचा नवा शिनेमा... मुन्नीच्या प्रेमाखातर...

अरे हे वाचायचं राहुन गेलं होतं.
मस्त रे मित्रा.
'रस' पुरेपुर उतरलाय. ;)

शैलेन्द्र's picture

5 Nov 2012 - 12:30 am | शैलेन्द्र

आह्हा.. हे खरच राहुन गेलं होतं.. या निमीत्त, त्या धम्याची, सखुची आणी माझ्या रसग्रहणाची आठवण झाली.

मीनल's picture

6 Nov 2012 - 6:23 pm | मीनल

सर्वांची धन्य आहे.
कोपरापासून नमस्कार!