तुमचं आमचं सेम नसतं भाग - ३

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
10 Feb 2011 - 10:08 am

४ महिने म्हणता म्हणता ७-८ महिने बार्शी जवळ साईटवर गेले,महिन्यातुन एक -दोन दिवस घरी येउन जायचो. पाईप लाईन व पंपिंग अशी दुहेरी जबाबदारी घेउन काम चालु होतं. आता आपण लवकरच लग्न केलं पाहिजे ही भावना जोर धरु लागली होती, जे मनात येतंय कुणाशी तरी बोलावसं वाटतंय ते ऎकणारं कुणितरी असावं हा विचार आता सारखा सारखा छ्ळायला लागला होता, अशातच भेटली ती, साखर कारखान्याच्या हंगामी शाळेत शिकवायला येणारी बार्शीच्या एका कॊलेजची काही मुलं आणि अर्थातच मुली पण. रडार वर पुन्हा ठिपके दिसायला लागले. आम्ही रोज बार्शी ते साईट येणं जाणं करायचो, त्यामुळं कधि या मुलांची एसटि चुकली की आमच्या जिप मध्ये त्यांना कारखान्याच्या फाट्यावर सोडत असु. एके दिवशी या ग्रुपबरोबर एक नविन मुलगी होती. त्यांचं बार्शीत ऒषधांचं दुकान होतं आणि काका काकु कारखान्यावर होते ऎडमिन मध्ये.दोन दिवसात तिचं नाव कळालं, माधवी. अजुन दोन दिवसांनी साईटवरच्या सुपरवायझर व ड्रायव्हरनी त्यांचं दुकान कुठं आहे ते हुडकुन काढलं.

ती जिप मध्ये बसल्यावर आमचा ड्रायव्हर नेहमीपेक्षा वेगळी गाणी लावायचा, आता हे लक्षात येउ नये एवढी दुधखुळी नव्हती ती, कॊलेजातली असली तरी शाळेवरच्या तिच्या प्रेमाने तिनं शाळा एकदोन वर्षे उशिराच सोडली असावी असा संशय होता."बाकी चेहरेपट्टी व अंगकाठी बरी होती, अगदी हिरॊईन नसली तरी मला शोभुन दिसली असती " - हे माझं स्वगत आणि मनोज, माझा सहकारी याचं मत होतं. त्याचं लग्न ठरलेलं होतं त्याच्या आत्याच्या मुलीबरोबर त्यामुळं त्याला जणु या गोष्टींवर बोलायचा हक्क असल्यासारखा तो बोलायचा. आमची कामं संपत आली होती आणि आता मी तुम्ही वरुन तु पर्यंत आलो होतो. माधवी पण बहुधा एसटि चुकवायची आणि आमच्या जिपमध्ये यायची. मागच्या सिटवरुन आता मधल्या सिटपर्यंत प्रगती होती. चढता-उतरताना कळत नकळत खांद्याला तिचा हात लागला कि डोक्यात नुसतं झण्ण्ण व्हायचं. दुपारी त्यांचा ग्रुप चारच्या सुमारास कारखान्याच्या फाट्यावर येउन एसटि साठी थांबायचा, एकदा त्यांना बार्शीला सोडायच्या निमित्ताने माधवीचं घर पहावं असा विचार केला आणि मनोजला तसं सांगितलं, तो म्हणाला बरोबर हाय हो पुढं, आपण काही चुकिचं तर करत नाही, जा आज तु.
त्या दिवशी, दुपारी साईट्ची सगळी कामं संपवुन ड्रायव्हरला जिप लवकर काढायला लावली, कारखान्याच्या फाट्यावर आलो आणि काय तो सिन म्हणावा तर असा, तिथं फक्त माधवी आणि दोन शाळकरी मुली होत्या, आता आमच्या ड्रायव्हरला पण का लवकर निघालो याचा उलगडा झाला होता, त्यानं जिप थांबवली, माधवी पुन्हा मधल्या सिटवर बसली, पुन्हा चढताना तो स्पर्श आणि पुन्हा शहारा. जिप सुरु झाली आज मि मुद्दाम, सिटवर हात आडवा टाकुन बसलो होतो, जिप एखाद्या खड्यातुन जाताना तिनं आधारासाठी सिट धरलंच तर असावा हात या हिशोबानं. पुढच्या दहा मिनिटातच ज्या हुशारिनं भगवान क्रुष्णानं रथ / घोडे खाली करुन अर्जुनाला कर्णापासुन वाचवलं त्याच हुशारिनं आमचा क्रुष्ण रस्त्यावरच्या दिसेल त्या प्रत्येक खड्यातुन जिप चालवु लागला. पहिल्यांदा तिनं हात पुढं करणं टाळलं पण नंतर अगदीच नाईलाज झाला तसं सिट पकडायला सुरुवात केली. मी पण उगाचच हात खाली केल्यासारखं करायचो पण पुन्हा हात तिथंच. अर्धा तासाचा तो रस्ता संपुच नये असं वाटत होतं,
दोन शाळेतल्या मुली उतरल्या वर माधवीला विचारलं, तुला घरापर्यंत सोडु दे का ? आणि ति चक्क हो म्हणाली, पत्त्ता आणि दिशादर्शन सुरु केलं, डाविकडं, उजवीकडं सांगताना आता तिला वाकावं लागत होतं. तिचं घर पार बार्शीच्या दुस-या टोकाला होतं, गुंठेवारीच्या प्लॊटवर बांधलेलं एक मजली घर होतं. घर जवळ आल्यावर उतरली आणि दुसरा आश्चर्याचा धक्का दिला तिनं, चक्क चहाला घरात बोलावलं. आता खरी परिक्षा होती, एकटा असताना पाहिलेली स्वप्नं, मनोज बरोबरच्या गप्पा सगळ्या एका क्षणात डोळ्यासमोर येउन गेल्या. थेअरी बरीच झाली होती, पण आता प्रात्याक्षिक करायची वेळ आली तेंव्हा चक्क फाट्ली होती. बरं नको म्हणावं तर का नको आणि हो म्हणावं तर वेगळंच काही झालं तर काय हा प्रश्न होता. शेवटी,म्हणजे त्या मिनिटाच्या शेवटी तिच्याबरोबर तिच्या घरात जायचं ठरवलं, चला म्हणालो आणि तिच्या मागुन निघालो. ड्रायव्हर जिपमध्येच होता, काही दगाफटका झाला तर लगेच निघता यावं या उद्देशानं तो बहुतेक तिथंच बसला असावा.

क्रमश: (उरलेला भाग शनिवारी रात्री)

तुमचं आमचं सेम नसतं - भाग - २ http://misalpav.com/node/16340
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - १ http://misalpav.com/node/1६०८३

इतिहासकथामुक्तकसमाजजीवनमानराहणीराजकारणशिक्षणविचारअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पा's picture

10 Feb 2011 - 10:14 am | स्पा

खतरनाक ...

पुढच्या दहा मिनिटातच ज्या हुशारिनं भगवान क्रुष्णानं रथ / घोडे खाली करुन अर्जुनाला कर्णापासुन वाचवलं त्याच हुशारिनं आमचा क्रुष्ण रस्त्यावरच्या दिसेल त्या प्रत्येक खड्यातुन जिप चालवु लागला.


हे लय भारी

डाविकडं, उजवीकडं सांगताना आता तिला वाकावं लागत होतं

अं?

हे वाक्य कशाला...?
काही वेगळा अर्थ अपेक्षित आहे का? ;)

पर्नल नेने मराठे's picture

10 Feb 2011 - 2:49 pm | पर्नल नेने मराठे

डाविकडं, उजवीकडं सांगताना आता तिला वाकावं लागत होतं

मला पण हे वाक्य जरा खुपले !!!

५० फक्त's picture

10 Feb 2011 - 3:37 pm | ५० फक्त

महिंद्राच्या कमांडर(खास करुन ताडपत्रीवाल्या) मध्ये बसला आहात का तुम्ही कधी, असाल तर हे वाक्य तुम्हाला खुपणार नाही.

ह्या जिपचं मधलं सिट हे जास्त उंच असतं, आणि त्यावर बसणा-याला उंच व्यक्तीला पुढच्या काचेतुन बाहेरचं नीट दिसत नाही, त्यामुळं जर तिथं बसुन दिशादर्शन करायचं असेल तर पुढं वाकावं लागतं थोडंसं नाहीतर काही कळत नाही.

क्रुपया गैरसमज करुन घेउ नये, माझ्या लिहिण्यात जास्त स्पष्टता हवी होती हे खरं, पण लिखाणात १० वेळा आलेला जिपचा संदर्भ सगळ्यांना कळेल ही माझी अपेक्षा होती.

आणि जो गैरसमज होतो आहे त्या विषयावर मी सभ्यपणाच्या मर्यादात राहुन लिहु शकतो आणि लिहिलेलं आहे. संदर्भ- आज अचानक गाठ पडे - http://misalpav.com/node/15536.

सर्व प्रतिसादकांचे अतिशय धन्यवाद.

पर्नल नेने मराठे's picture

10 Feb 2011 - 4:25 pm | पर्नल नेने मराठे

*लिखाणात १० वेळा आलेला जिपचा संदर्भ सगळ्यांना कळेल ही माझी अपेक्षा होती.

हि अपेक्शा ठार चुकिची आहे. उगाच आमच्या ऐपती काढत बसु नका आमच्याकडे ताडपत्रीवाल्या जिपा नाहित म्हणुन.

*माझ्या लिहिण्यात जास्त स्पष्टता हवी होती हे खरं,

हेच १००% खरे !!!

शिल्पा ब's picture

10 Feb 2011 - 10:17 am | शिल्पा ब

शनिवारची वाट पाहतेय...

प्रचेतस's picture

10 Feb 2011 - 10:31 am | प्रचेतस

मी पण

स्वाती२'s picture

10 Feb 2011 - 6:12 pm | स्वाती२

+२
मी पण!

मुलूखावेगळी's picture

10 Feb 2011 - 11:36 am | मुलूखावेगळी

छान लिहिलेत हर्षद
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

बद्दु's picture

10 Feb 2011 - 2:29 pm | बद्दु

मस्त्..एक्दम हलकाफुलका विनोदी अंगाने जाणारा विषय परंतु तितकाच उत्कंठापुर्ण...

शनिवारची वाट बघतोय..

च्यायला .. एवढंस्स ? चांगलंय .. जरा मोठे होऊ द्या भाग @@
तुमच्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसते आहे.

शनिवारी संपूर्ण आख्यान सांगा .......
म्हणजे पुढल्या शनिवारची वाट बघायला नको ..

जरा मोठा भाग टाका हो.. क्रमशः लिहून टांगू नका..

- (दीर्घवाचक) पिंगू

५० फक्त's picture

13 Feb 2011 - 11:32 pm | ५० फक्त

सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद. पुढचा भाग टाकला आहे, वाचा व प्रतिसाद द्या.

http://misalpav.com/node/16771

हर्षद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Feb 2011 - 2:16 am | निनाद मुक्काम प...

@काही दगाफटका झाला तर लगेच निघता यावं
काय राव
तुम्ही काय अफजल खानच्या शामियानात जाणार होता कि काय ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Feb 2011 - 2:17 am | निनाद मुक्काम प...

@काही दगाफटका झाला तर लगेच निघता यावं
काय राव
तुम्ही काय अफजल खानच्या शामियानात जाणार होता कि काय ?

धमाल मुलगा's picture

14 Feb 2011 - 3:28 pm | धमाल मुलगा

हर्षदभौ,
आशे चालु असाल असं वाटलं नव्हतं आं ;)

आयडिया भारीए! चांगलंच रंगत चाललंञ की!
आय अ‍ॅम वाचिंग! :)