तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०५

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
28 Feb 2011 - 12:14 am

तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०५

बाबांना खुप वाटायचं मी शिक्षक व्हावं असं, पण मला त्यात काहीच मजा वाटत नव्हती. लहानपणापासुन बाबांबरोबर दुकानात जाउन जाउन माझ्या डोक्यात ते वेगवेगळ्या ऒषधांचे वास बसले होते वस्ती करुन, ते काही केल्या जात नव्हते. ते आधीचं छोटंसं दुकान, मग नगरपालिकेने केलेलॊ तोडातोडी, मग ६-८ महिने चाललेली कोर्ट केस आणि मग नंतर हे मिळालेले खुप मोठं दुकान, सगळं सगळं आठवतय मला. माझा हट्ट पाहुन बाबांनी मला डिफार्मसीला घातलं, सोलापुरात होस्टेलवर मी एकटिच राहणार म्हणुन घाबरलेली मी, त्यात आईनं कुठुन कुठुन ओळखी काढुन दिलेले पत्ते, ही काकु, ती मावशी हे न ते सगळं सगळं लक्षात ठेवणं केवढं अवघड होतं ते माझं मलाच माहिती. त्यात गॊरी ताईचा गोंधळ, कारण तिला बार्शीतच कॊलेजला घातलं होतं म्हणुन.

ह्ळु हळु मी सगळ्याला सरावले होते आणि बघता बघता शिक्षण पण संपलं होतं. त्यावेळी किती तरी वेळा गप्पा व्हायच्या की कुणाला इथंच सासर मिळतंय कुणाला कुठं ? पण तेंव्हा हे फार सिरियस वाटलं नव्हतं, तेंव्हा काय आणि परवा पर्यंत तरी कुठं सगळं सिरियस होतं.

गेल्या मंगळवारी मी घरी आले तर , जास्तीची ताटं, कप बश्या पडलेल्या होत्या. मग आई आल्यावर आईला म्हणाले ’ कोण आलं होतं ग, काका काकु का?’ आई म्हणाली ’ हो, का ग ?’ आणि पुढं विचारलं ’ माधवी जरा एस्टीची तिकिटं दाखव गं?

मी म्हणाले ’ मी जिपनं जा ये करते कोण बसणार त्या फडतुस एस्टित धक्के खात’ एवढं ऐकल्यावर आई बेडरुम मध्ये जाउन रडत बसली, ताईचा फोन घेतला नाही,दुकानात पण गेली नाही, शेवटी महादेवकाकाच आले, चाव्या आणि पैसे घेउन. मला काही कळतच नव्हतं, मी एस्टीनं न जाण्यानं नुकसान होतंय एस्टीचं आणि आई का रडतेय, आणि गेले १५-२० दिवस तर पैसे पण देत नाही मी त्याला.

य्स्स्स, आत्ता उजेड पडला माझ्या डोक्यात, हे माझं त्याच जिपसाठी थांबणं कॊणितरी काकुच्या कानावर घातलं होतं आणि ते तिथुन आईपर्यंत पोहोचलं होतं. आता मलापण रडु येत होतं, काय करु सुचत नव्हतं. अगदी पिक्चरच्या हिरोईनसारखं होत होतं मला, मग होता नव्हता तो सगळा धीर गोळा केला आणि आईच्या समोर जाउन उभी राहिले. आई पाच मिनिटं ताडताड बोलत होती, माझ्या डोळ्यातुन धारा लागल्या होत्या, पण वर मान करायची डेरिंग होत नव्हती. माझ्या डोळ्यातलं पाणि माझ्याच पायांवर पडत होतं, आणि मनात वाद्ळ चालु होतं, काय केलंय मी असं ? फक्त दररोज एका जिपमध्ये बसते मह्णुन एवढा गोंधळ, एवढी चॊकशी.?

शेवटी एकदाची आई थांबली आणि त्याच आवाजात विचारलं ’ कुठपर्यंत गेलीत ही थेरं? काही झालं गेलं तर नाही ना? आधी बापानं दिलेली आणि नंतर मिळालेली विद्या आहेच, नको ती , त्याचवेळी सांगत होते इथंच ठेवा इथंच ठेवा, पोरिची जात नजरेसमोर बरी, तर नाही ऐकलं कुणि आमचं, आणि आता उरलेय........मी........एकटी........सगळ्या दुनियेला तोंड द्यायला ’

या सगळ्या बोलण्यानं मला मी जेवढी बावरली नव्हते, तेवढं शेवटच्या तीन थांबत थांबत आलेल्या उश्वासांनी हादरले . काही कळायच्या आत आईच्या पायावर पडले, आणि जोरात ओरडले ’ नाही ग आई, काही नाही केलं ग मी.’

आईनं उठवुन विचारलं, ’ खरं बोल गधडे, आता लहान नाहीस तु, चांगली एकवीसची आहेस.

मी म्हणाले ’ आई एकदा मला तरी विचारयंस की ग असलं काहीतरी बोलण्याआधी?

आई ’ तुझं तोंड शिवलं होतं होय गं ? तुला नाही सांगता आलं ते?

मी ’ अग पण आई, तसं काही माझ्या मनात नव्हतंच ग, उगीच कोणितरी तुला काहीतरी सांगतं आणि तुझा विश्वास बसतो
.
आई ’ चल आता एकदा तुझ्यावर ठेवते विश्वास सांग काय आहे ते सगळं आणि खरं खरं, एक शब्द जरी खोटा निघाला ना तर तुझा तरी जिव घेईन नाहीतर मी तर जिव देईन.

मी कसाबसा धीर गोळा करुन सगळं सांगितलं, अगदि दोन महिन्यापुर्वी पहिल्यांदा एस्टि सुटली होती ते आजपर्यंत. दहा मिनिटं तरी बोलत असेन. एवढं ऐकल्यावर बहुधा आईचा विश्वास बसला असावा. तिनं त्याच करड्या आवाजात ऒर्डर दिली , कोण आहे तो त्याला उद्या घेउन ये त्याला घरी, दुपारी मी घरी येईन जरा लवकर आणि येताना काकांना पण निरोप दे.

मी म्हणाले ’ हो बोलते मी .’

आणि हे बोलल्यावर खरी काळजी सुरु झाली, जर उद्या तो भेटलाच नाही तर, उद्या तो नाहीच म्हणाला तर, आज नको उद्या येतो म्हणाला तर, एक ना बारा भानगडी, नको नको ते विचार मनात येत होते, म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती.
तेवढ्यात आईचा नेहमीचा आवाज आला ’ मधु, चला आज भाजी आमटी तुझ्याकडे आहे, माझी पोथी वाचुन होईपर्यंत घे आटोपुन, मग एकत्रच बसु, पण त्याआधी महादेवनं हिशोब ठेवला आहे तो तपास आणि निट, गेल्या महिन्यात सात-आठ चुका झाल्या तेंव्हाच मला ही शंका यायला हवी होती. पण विचार केला लेकरु उन्हातान्हांत जातंय, बाबाला बोललं होतं एक - दोन वर्ष शिकवेन कारखान्याच्या शाळेत, जाउदे, तर हिचं काय वेगळंच सुरु.’

मी पुन्हा धास्तावले, ह्या अशा गोष्टी काय मी आईला सांगणार होते घरात, बरं गॉरिताईला फोन करावा तर तिचं नव्या संसाराचं कॊतुक, आत्ताच सांगत होती म्हणे ’आज काय ह्यांनी हाफडेच घेउन दुपारीच घरी आले अचानक आणि , त्यांचे सगळे कपडे इस्त्री करुन ठेवले आठवडाभराचे, मी म्हणाले, मी करत जाईन तर मला म्हणतात ही इस्त्री जड आहे, पुढच्या महिन्यात एखादी हलकी घेउ म्हणजे तुला पण करता येईल इस्त्री. रोज कडक इस्त्रीचा शर्ट लागतो ग यांना.’ आता माझ्या डोळ्यासमोर उगाच तो आला, आठवायला लागले त्याला कधी इस्त्रीचे कपडे घातलेलं पाहिलंय, कधीच नाही. नेहमी खाली जिन, वर एक शर्ट आणि टोपी उलटी घातलेली, त्या बाबा सैगल सारखी, शी बाई मला नाही आवडत असलं काही.

’मोहरी तडतडली नाही अजुन, गॆस संपला का ग? ’ इति आई. ’ अगं करते गं आता लगेच होईल, किती वेळ लागतो त्याला.’ मी उत्तर देउन रोजमेळ हातात घेतला आणि खरंच माझ्या चुका होत्या अर्थात पन्नास - शंभरच्या होत्या म्हणुन आई काही जास्त बोलली नव्हती, नाहीतर जेवण दिलं नसतं,बाबा करायचे तसं,हिशोब चुकला की रात्री जेवण नाही. हिशोब झाला, मग किचन मध्ये जाउन दोन्ही गॆस पेटवले, एकिकडे कढईत तेल गरम झालं की मोहरी टाकली. कुकरमधुन वरण काढेपर्यंत मोहरी जळाली, त्या वासानं आईचा आवाज ’ जरा सुधरा आता, हे असलं खाउ घालणार का उद्या नव-याला,होय गं ? आणि तो खाईल गप, त्याची आई,ती बरी चालवुन घेईल हे असलं’ यावर मला खुदकन हसु आलं,एकदम आठवलं, बाबांना पण ताटात लोणचं वाढलेलं खपत नसे,’ भाज्या करता येत नाहीत धड म्हणुन ही मुरवलेली लिंबं वाढता काय?’ हे असं चारचॊघात बोलायचे बाबा.

आईची पोथी वाचुन संपेपर्यंत कशीबशी आमटी झाली होती,’ कट्ट्याजवळ येत आई म्हणाली ’ अगं, मोहरी जळाली ना तर त्यात भाजी टाकायची, आमटीपेक्षा कमी वास येतो जळाल्याचा, सरक हो बाजुला. ताटं घे आणि आता मोठ्या ताटांत जेवायला शिका, ते तसलं कप्याकप्याचं ताट का नेणार आहेस बरोबर’ आई बहुधा माझं लग्न ठरल्यासारखंच वागत होती,ह्या सगळ्या कहाण्या आता तीन चार महिन्यांपुर्वी ऐकुन झाल्या होत्या, त्या परत एवढ्या लगेच ऐकायला मिळतील असं मलाच वाटलं नव्हतं. शेवटी भाजी आईनंच टाकली, तोपर्यंत मी बाकीचं आवरलं होतं. जेवणं झाली, सगळी झाकपाक करुन कड्या कुलुपं लावुन दोघी झोपलो, मला थोड्याच वेळात झोप लागली, काहीतरी आवाज झाला म्हणुन उठुन पाहिलं तर हॊलमधला दिवा चालु होता, बाहेर जाउन पाहिलं तर आई, बाबांच्या फोटोसमोर उभी राहुन बोलत होती. ’ काय करु मी, दुकानाचं बघु, गॊरीचं पहिलं वर्ष लग्नाचं, तिचं सणवार का हे मधुचं, असं सगळं एकदम कसं व्हायचं हो? बरं महेशभावोजींना सांगावं तर ते त्यांच्या साडुच्या मुलाचंच धरुन बसलेत, आपलीच पोर, आपलंच घर काही त्रास नाही काय नाही, पुढं मागं दुकान पण बघेल, हे सगळं असलं. हे सगळं रांगेला लावुन का नाही गेलात तुम्ही? काय घाई होती एवढी तुम्हाला ?

आई बरंच काही बोलत होती, मी हळुच परत आले आणि झोपायचा प्रयत्न करु लागले, आता एक एक प्रश्न समोर उभे राहात होते, उद्या माझं झालंच लग्न तर ह्या घराचं काय? दुकान कोण बघेल? आईकडं कोण बघेल? माझ्या नावाचं लायसन्स काढुन पुन्हा पहिल्यासारखं कोणितरी लायसन्सवाला बघा, त्याला हिस्सा द्या, ही सगळी लफडी आईला निस्तरता येतील? माझी मला मीच स्वार्थी वाटायला लागले होते, आई-बाबांची अपराधी वाटायला लागले होते. पण त्याच वेळी, जिजाजी ताईला कसं इस्त्री करायला शिकवत असतील, बाजुला बसुन का मागं उभं राहुन हे असले विचार पण घुमायला लागले. आई आत आली, हातात चक्क चहाचा कप होता, थेट बाबा धरायचे तसा, गरम चहाचा कप थेट पकडायचा, कानाला नाही, आणि मला म्हणाली,’आज खुप आठवण येतेय गं तुझ्या बाबांची. ते असते ना तर खुप मारलं असतं तुला हे असलं ऐकुन. बरं झालं बाई तुझा मार वाचला.’ माझा विश्वासच बसेना माझ्या कानावर, आई मगाशी बोलत होती ते खरं का हे ? का दोन्ही ? छे या पेक्षा एस्टिने गेले असते दोन महिने तर काय बिघडलं असतं माझं.

क्रमश : (पुढचा भाग ५ मार्चला )

तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ४ http://misalpav.com/node/16771
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ३ http://misalpav.com/node/16697
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - २ http://misalpav.com/node/16340
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - १ http://misalpav.com/node/16083

हर्षद.

कथामुक्तकसमाजजीवनमानराहणीविचारप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Feb 2011 - 2:12 am | निनाद मुक्काम प...

@छे या पेक्षा एस्टिने गेले असते दोन महिने तर काय बिघडलं असतं माझं.

'कुणा न कळले त्रिखंडा तल्या हात विणकराचे''
त्याने नात्यंची वीण त्याने वरतीच विणली असते
आपण मर्त्य जगात फक्त औपचारिकता पूर्ण करायची असते .
माधवीचे भावविश्व व मनाची घालमेल मस्त रेखाटली आहे .
अर्थात तिच्या भावनाचे हिंदोळे समजून घ्यायला स्त्रीमन असणे अनिवार्य आहे .
आपण केवळ कल्पना करू शकतो .

छे या पेक्षा एस्टिने गेले असते दोन महिने तर काय बिघडलं असतं माझं.
____________________________________________

छान लिहिलंय !
हिंदोळ्यावाचून झुलायचे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे .

छान चालला आहे एस्टीचा प्रवास. पुढचा भाग येऊ दे लवकर..

- पिंगू

किशोरअहिरे's picture

28 Feb 2011 - 7:13 am | किशोरअहिरे

पुढील भाग येउद्यात पटकन ..

प्रचेतस's picture

28 Feb 2011 - 9:33 am | प्रचेतस

झकास हर्षद.
एकदम सुरेख प्रवास चालला आहे.

अवांतरः हा ५ मार्च लवकर का येत नाही?

झकास

पुढचे भाग पटापट टाका राव :)

पैसा's picture

28 Feb 2011 - 9:47 am | पैसा

माधवीचा जीपचा, एस्टीचा आणि आंतरिक प्रवास आवडला.
(तिसर्‍या भागाची लिंक भलत्याच गावाला जातेय! जरा बघ रे!)

शिल्पा ब's picture

28 Feb 2011 - 11:46 am | शिल्पा ब

+१

स्वाती२'s picture

28 Feb 2011 - 4:51 pm | स्वाती२

+२

मनराव's picture

28 Feb 2011 - 10:50 am | मनराव

मस्तच जमलय....

नगरीनिरंजन's picture

28 Feb 2011 - 11:52 am | नगरीनिरंजन

छान रंगतंय. लवकर लवकर लिहा भौ. हा भाग फार दिवसांनी आला.

छान चालु आहे येउ द्या अजुनः)

सातबारा's picture

28 Feb 2011 - 12:28 pm | सातबारा

लय भारी लिवलय गड्या ...

उत्कंठा वाढली आहे .. ( ५ मार्च फार लांब होते आहे राव ! )

कथा जरा वेगळ्याच "अंगाने" जाते आहे हर्षद मेहता जी , :) लवकर लिहा !

मुलूखावेगळी's picture

28 Feb 2011 - 1:50 pm | मुलूखावेगळी

ह्म्म छान जमलेय
५ मार्च का ?

किती नैसर्गिक लिहिले आहेस.. ग्रेट.. मान गये..

बॅकग्राउंडपासून सगळंच झकास..

फारच सुंदर.. खूप वाट पाहतोय..

RUPALI POYEKAR's picture

28 Feb 2011 - 2:55 pm | RUPALI POYEKAR

छान जमलय

हरिप्रिया_'s picture

28 Feb 2011 - 3:07 pm | हरिप्रिया_

मस्त लिहिलय...
पुढचा भाग वाचायला उत्सुक..

प्यारे१'s picture

28 Feb 2011 - 3:55 pm | प्यारे१

छान लिहिता आहात मालक.

चालू द्या.

आपण दोन्ही पक्षांकडून का???

इंटरनेटस्नेही's picture

28 Feb 2011 - 4:49 pm | इंटरनेटस्नेही

मस्त रे! साला आमचे बी आर टी एस - २ (बेस्ट) मधले दिवस आठवले.. ;)

-
हळवा, इंटेश लव्हकर!

माझीही शॅम्पेन's picture

28 Feb 2011 - 7:33 pm | माझीही शॅम्पेन

वाचतोय ! सर्व भाग एकदम छान आहेत ! पु ले शु (५ मार्च जरा लवकर यउद्या )

मागचा भाग आत्त्ता आठवला. बघा किती वेळ लावलात ते? विसरायला झाल होत.

या वेळी एकदम तीच्या बाजुने लिहायला लागलात? पण जम्या है. काळजी नय करनेका, लिखनेका!

५० फक्त's picture

1 Mar 2011 - 1:45 pm | ५० फक्त

सर्व प्रतिसादकांचे अतिशय आभार, तसेच वाचनमात्रांचेपण आभार.

पुढचा भात पाच तारखेच्या आधीच टाकायचा प्रयत्न करतो आहे.

हर्षद.

पर्नल नेने मराठे's picture

1 Mar 2011 - 2:24 pm | पर्नल नेने मराठे

मस्त यार !!! सुरेखच

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 9:46 pm | धमाल मुलगा

चांगली कामं चाललीयत हां सायटीवर! ;)

आणि ह्या भागात एकदम 'सुमती क्षेत्रमाडे' मोडमध्ये कसं काय घुसलासा मास्तुरे? :)
भारी लिहताय, येऊ द्या...
आणि हो, ते साठेंकडं पत्रिका बित्रिका विसरली होती ना? आणली का परत? :)

येतो आहे साठेंकडं दिलेल्या पत्रिकेकडं पण येतो आहे.

५० फक्त's picture

5 Mar 2011 - 11:29 am | ५० फक्त

सर्व प्रतिसादकांचे अतिशय आभार, तसेच वाचनमात्रांचेही.

सांगितलेल्या टाईमलाईन नुसार पुढचा भाग http://misalpav.com/node/17104 इथं टाकला आहे,

किशोरअहिरे's picture

7 Mar 2011 - 8:37 pm | किशोरअहिरे

पुढील भाग दिल्याबद्दल आभारी