जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे - भाग -०३

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
28 Dec 2010 - 11:35 pm

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे - भाग -०३

हॊटेल शीतल

पत्ता - कर्वे पुतळ्याच्या चॊकातच डाविकडे, म्हणजे पेट्रोल पंप, डोमिनोजच्या उजव्या साईडला. बदामाचं झाड ही खुण
प्रकार - शुद्ध शाकाहारी ---वेळ - सकाळी ७ ते रात्री ११
खाण्याचे प्रकार - नाष्टा व जेवण
खर्च - नाष्टा - . १००/- जेवण - रु.२००/- ( दोघांसाठी,पोटभर या हिशोबात)

हॊटेल शीतल, कर्वे पुतळ्याच्या चॊकात असलेले हे एक जुनं आणि छान हॊटेल आहे. डोमिनोज च्या बाजुने पुढे डेक्क्नकडे जायला लागलं की एक दोन बदामाच्या झाडांच्या मागे हे आहे. बेसिकली उडुपी असलेलं हे ठिकाण फक्त साउथ ईंडियन नाही तर पंजाबी डिश व सॆंडविच वगॆरे पण सर्व्ह करतं.

नाष्ट्याला इथे सगळे साउथ ईंडियन पदार्थ मिळतातच आणि छान पण असतात. इडली वगॆरे तर डिश मध्ये एक छोटंसं केळिचं पान टाकुन दिली जाते. सांबार व नारळाच्या चटणीबरोबर पुदिन्याची चटणी असते. इथल्या इडल्या गरम गरमच संपवाव्या लागतात, बहुधा जाड्या रव्याच्या असल्याने गार झाल्यावर थोड्याश्या चिकट होतात. इतर डोसा, उत्तपा हे प्रकार मस्त असतात. इथे बटाटेवडा हा खरेच बटाटेवडा असतो, उगीचच जोशी/रोहित सारखा चपटा नसतो. उपावास असेल तर फक्त साबुदाणा वडा घ्या,उपवासाची कचोरी हा मला कुठेच न आवडणारा प्रकार आहे तेच इथे पण.

इथे जेवणासाठी पंजाबी व चायनीज पर्याय आहेत, पण बहुधा उडुपी हॊटेल असल्यानं चायनीजची टेस्ट फारशी बरी नाही, त्यापेक्षा पंजाबी छान, माझी इथली आवडणारी डिश व्हेज बगदादी - मिक्स व्हेज भाजीवर एक छोटंसं टोमॆटो ऒम्लेट टाकुन ती भाजी पुर्ण कव्हर केलेली असते, जशी बिर्याणि कणीक लावुन पॆक करतात ना तशी.ती भाजी आणि त्या ऒम्लेटचा मिक्स वास हा लगेच भुक वाढवतो. बाकी रोटी इत्यादी चांगले असतात इतर हॊटेलपेक्षा फार ग्रेट नाही.

कोथरुड ते कर्वे पुतळा या भागातील व्हेज जेवणासाठी शितल हे एक सेफ बेट आहे असं मी म्हणॆन.

हर्षद.

वावरपाकक्रियामुक्तकसमाजजीवनमानराहणीप्रवासराहती जागामौजमजाप्रकटनप्रतिक्रियाआस्वादअनुभवमतशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

28 Dec 2010 - 11:41 pm | मी-सौरभ

कोकण एक्सप्रेस अन् कामत जवळच आहेत. ते सुद्धा १ चांगला पर्याय आहेत.
अजुन एक मयुर कॉलनी जवळ 'स्वागत' म्हणून एक टपरीवजा दुकान आहे तिथे पण अप्रतिम पदार्थ मिळतात.

(खादाड) :)

मृत्युन्जय's picture

29 Dec 2010 - 10:23 am | मृत्युन्जय

कामत गेलं आता. त्याच्याजागी थाटबाट आलंय.

अजुन एक मयुर कॉलनी जवळ 'स्वागत' म्हणून एक टपरीवजा दुकान आहे तिथे पण अप्रतिम पदार्थ मिळतात

स्वागत की स्वीकार (नळ स्टॉपवर पण एक स्वीकार आहे ते वेगळे. ते हॉटेल आहे. ही टपरी आहे)

धमाल मुलगा's picture

29 Dec 2010 - 8:43 pm | धमाल मुलगा

च्यायला...
स्विकारपाशी पडीक रे एकेकाळी आम्ही.
त्याच्या टपरीसमोर गाडी लावायची, त्याच्याकडचे पोहे म्हणजे जन्नत साला जन्नत! नंतर पोहे संपता संपता मित्राला टोकन घेऊन चहाच्या रांगेत उभं करायचं आणि कॉर्नरच्या टपरीवरुन बिडी आणायला पळायचं....मग त्या फंटाश्टिक चहासोबत २-३ जणात एक बिडी फिरवत निवांत गजाल्या कराव्यात! वेळ नाय, काळ नाय...स्विकारवाल्यानं हाकलेपर्यंत पब्लिक तिथंच पडीक. हो! कोण हलतंय कशाला तिथून? भूक लागली की खायची सोय होतेय, चहा-अग्निहोत्र तर आहेच...शिवाय पक्षीनिरिक्षणासाठी अप्रतिम स्पॉट! सगळे साले 'सलीम अली' होऊन जायचे. ;)

मी-सौरभ's picture

30 Dec 2010 - 3:25 am | मी-सौरभ

नाव जौ दे रे चव महत्वाची.. :)

कामतचं आता थाट्बाट झालंय, आणि तिथली गुजराथी थाळी काही फार चांगली नाही.

कोकण एक्स. मध्ये व्हेज पर्याय फारच कमी आहेत.

स्वागतचं नक्की लोकेशन सांगाल काय जाईन उद्याच.

अवांतर - तुम्ही मु.पो. तळेगाव दाभाडे असाल तर- तिथं एक पांड्वांचं मंदिर आहे म्हणे, जरा सांगाल काय कसे जायचं ते.

हर्षद.

मी-सौरभ's picture

28 Dec 2010 - 11:53 pm | मी-सौरभ

१. स्वागतः बँक ऑफ महाराष्ट्र समोर. कर्वे पुतळ्याकडून नळस्टॉप कडे येताना पहिल्या सिग्नलला डावीकडे वळल्यावर लगेच उजव्या हाताला.

२. हो असे एक मंदीर आहे पण मी कधी गेलेलो नाही. पण ते गावातच आहे त्यामुळे रिक्षावाला नक्की नेऊ शकेल.

५० फक्त's picture

28 Dec 2010 - 11:59 pm | ५० फक्त

आता विषय निघालाच आहे तर, स्वागतच्या लाईनला थोडं पुढे एक लोणि डोसा वाला असतो, त्याचा डोसा खाउन पहा, खुप मस्त असतो. अतिशय म उ आणि भरपुर लोणि घातलेला, कधि येतो आहेस सांग जाउ या. तो दुपारी २पर्य्तंत असतो.

हर्षद.

जं. महाराज रोडवरपण एक लोणी डोसावाला असून त्याच्याकडे अनेकदा (रात्री) खाल्लेले छोटे छोटे मऊ लुसलुशीत डोसे खूप आवडले.

तो पांढरे लोणी डोश्यावर घालतो.

मला वाटतं दावणगिरी लोणी डोश्यांची "हॉट चिप्स" सारखीच (पण अनब्रँडेड) आउटलेट्स ठिकठिकाणी निघाली आहेत गेल्या काही काळात.

सखी's picture

29 Dec 2010 - 12:06 am | सखी

शीतलचा दही वडा एकदम चांगला असायचा, गेल्या ३-४ वर्षात चक्कर नाही, त्यामुळे सध्याचे माहीती नाही.

शितल अगदी नविन नविन होतं तेंव्हा दोनदा जाणं झालं. नंतर नाही.
आतातर कोणी आठवण करून दिली तरच नाहीतर हाटेलं आठवत नाहीत.

नगरीनिरंजन's picture

29 Dec 2010 - 10:31 am | नगरीनिरंजन

मला आठवतं त्याप्रमाणे शीतलची पावभाजीसुद्धा फार प्रसिद्ध होती.

जायला पायजे शीतल ला .. अजुन गेलो नाही.
कोकण एक्स्प्रेस मस्त आहे ...
जोग शाळेपुढे कायम जाणे होते
पण स्वागत माहिती नाही.. पाहतो नक्की ..

खाण्यासाठी मी कोठे ही जायला तयार असतो ..

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 4:56 pm | परिकथेतील राजकुमार

छान लेखमाला.

लेखकानी शक्य झाल्यास सारबागेबाहेरील स्टॉलवाले, संभाजी बागेबाहेरील पाणीपुरीवाले तसेच सकाळी सकाळी नाष्ट्याचे डबे घेउन तुळशीबाग, लक्ष्मी रोड ह्या ठिकाणी स्टॉल लावणारे ह्यांची देखील ओळख करुन द्यावी.

गवि's picture

29 Dec 2010 - 5:14 pm | गवि

हो.. अजून माहिती द्याच. अंदाजाने ट्राय करु गेल्यास वेळ फुकट जातो. आमच्या सारख्या व्हिजिटर्सना पुन्हा पुन्हा वेगवेगळी ठिकाणे ट्राय करायला चान्स कमी असतो.

असेच त्या संभाजी उद्यानाबाहेर सपना हॉटेलसमोर असलेल्या स्टीमी अफेअर्स म्हणून स्टॉलवर अनंत टाईपच्या इडल्या दिसल्या म्हणून काही नमुने चाखले. अजिबात आवडले नाही.

सखी's picture

29 Dec 2010 - 7:08 pm | सखी

लज्जत नावाचे हॉटेल आहे अजुन कोणाला माहीती आहे का? - कुमठेकर रस्त्याच्या आतल्या रस्त्यावर होते, गणपुले क्लासेसच्या समोर. तिथे बरेच हटके पदार्थ असायचे, व सगळ्यांची चव नावाप्रमाणेच लज्जतदार होती :) आता गुगलुन पाहीले असता एक दुसरेच लज्जत ला.ब. रस्त्यावर दिसते आहे, पण ते हे नसावे.

धमाल मुलगा's picture

29 Dec 2010 - 8:43 pm | धमाल मुलगा

सहा-एक महिन्यांखाली गेलो होतो तिकडं..चवी पाऽर गंडल्यायत.

सखी's picture

29 Dec 2010 - 9:55 pm | सखी

अरेरे - खरच वाईट्ट वाचलं वाटुन - पण कळवल्याबद्दल आभारी आहे.

५० फक्त's picture

29 Dec 2010 - 10:35 pm | ५० फक्त

सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद तसेच वाचनमात्रांना पण धन्यवाद.

श्री. परा,

निश्चितच, आठवड्यातले कमीत कमी ३ दिवस तरी बाहेर कुठेतरी खायला जातोच.( हे वाचुन बायको मारणार आहे).

सध्या जरा इतर कामं जास्त आहेत म्हणुन थोडा वेळ लागतो आहे.

हर्षद.

अहो..... ते कुठल्या उद्देशाने बोलले ते कळलंच नाही तुम्हाला!

अजून सरावला नाहीत वाटतं मिपा आणि हलकट मिपाकर यांना तुम्ही!!! :)

गणपा's picture

30 Dec 2010 - 3:35 am | गणपा

हा हा हा, सविता ताई ते हर्षदराव बी पुन्याच हाईत. ;)
अट्टल पुणेकर दुसर्‍या पुणेकराकडुन अपमान करवुन घेईलच कसा :D

विनायक बेलापुरे's picture

29 Dec 2010 - 10:43 pm | विनायक बेलापुरे

भरतकुंज स्पोर्ट्स कोम्प्लेक्स , शैलेश पूल