माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''!
म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक!
No one is exempt from talking nonsense. The great misfortune is to do it solemnly.
१९९२ साली प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकात वेगवेगळ्या धर्माच्या, संप्रदायांच्या आचार्यांच्या - गुरुंच्या आयुष्याविषयीच्या शिकवणी मोठ्या खुबीने मांडल्या आहेत. ह्यांतील ''मास्टर'' हा कोणी एक व्यक्ती नसून त्यात हिंदू गुरु, झेन रोशी, ज्यू रबाय, ताओ साधू, ख्रिश्चन साधक, सूफी गूढवादी या सर्वांचा समावेश आहे. लाओ-त्सु, बुध्द, सॉक्रेटस, झरतुष्ट्र, मुहम्मद यांपैकी तो कोणीही असू शकतो. त्याने सांगितलेले ज्ञान महत्त्वाचे की तो पूर्वेकडून आला की पश्चिमेकडून हे महत्त्वाचे? त्याचा इतिहास खरोखर इतका महत्त्वाचा आहे काय? कारण, शेवटी इतिहास म्हणजे तरी काय? तर, जे दाखवलं गेलं त्याची नोंद....जे होतं त्याची नाही! जे कागदांमध्ये लिहिलं गेलं त्याची नोंद म्हणजे इतिहास.... त्या दोन ओळींमधील रिकाम्या जागेची, मौनाची नोंद कोठेच सापडणार नाही!!!
पुस्तकात अक्षरशः एका मिनिटात वाचून संपवता येणारे अनेक उतारे, ओळी, काव्यपंक्ती आहेत....त्या वाचून जरी एका मिनिटात संपत असल्या तरी त्यांवर पुढचे चोवीस तास मंथनही अपुरे पडेल! मनात एकदम ''ओह्ह्ह्ह!!!! अहो!!!'' असा आश्चर्यपूर्ण आनंदाचा प्रकाश-झोत टाकण्यासाठी ह्या पुस्तकातील एखाद्या पानावरची ओळच पुरेशी असते. मग मिळालेल्या त्या विचारकणाला उरा-पोटाशी धरून रिकाम्या क्षणांना त्या विचारावर अजून मंथन करायला आपण मोकळे होतो!
उदाहरणार्थ :
(अनुवादित)
१. आचार्यांना विचारधारांची अॅलर्जी होती. ते म्हणाले, '' विचारांच्या युध्दात जर कोणाचा बळी जात असेल तर तो आहे माणसाचा!'' पुढे ते म्हणाले, '' लोक पैसा व सत्तेसाठी खून करतात. पण सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.''
[ "In a war of ideas," he said, "it is people who are the casualties." Later he elaborated: "People kill for money or for power. But the most ruthless murderers are those who kill for their ideas.]
२. तुम्ही जेव्हा सत्य, वास्तवाला शब्दांचे रूप द्यायला जाता तेव्हा तुम्ही अव्यक्ताला शब्दबध्द करु पाहत असता.... तेव्हा तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाणार हे नक्की! त्यामुळे सत्याचे व्यक्त स्वरूप असणारे ज्ञानग्रंथ वाचणारे लोक आपले व्यवहार ज्ञान वापरण्याऐवजी त्यांना ''उमगलेल्या'' ज्ञानग्रंथांनुसार वागताना अनेकदा मूर्ख व क्रूर वर्तन करताना दिसतात.
["When you speak about Reality," said the Master, "you are attempting to put the Inexpressible into words, so your words are certain to be misunderstood. Thus people who read that expression of Reality called the Scriptures become stupid and cruel for they follow, not their common sense, but what they think their Scriptures say."]
त्यासाठी आचार्य एक चपखल उदाहरण देतात : एका गावातल्या लोहाराला त्याच्याकडे काम करण्यासाठी कमी पगाराची व भरपूर कष्टाची तयारी असलेला एक मदतनीस मिळाला. लोहाराने त्या मुलाला लगेच शिकवायला सुरुवात केली. त्याने सूचना केली, ''मी जेव्हा आगीतून धातू बाहेर काढून तो ऐरणीवर ठेवेन आणि मुंडी हालवेन तेव्हा तू त्यावर चटकन हातोड्याने घाव घालायचास!''
मदतनीसाने त्याला ''वाटल्याप्रमाणे'' सूचनेचे तंतोतंत पालन केले.
दुसर्या दिवशी त्याला गावाचे लोहारपद मिळाले!!!!
३. एकदा एका नास्तिकाने विचारले, '' ईश्वर आहे का हो खरोखरीच?''
आचार्य म्हणाले, ''मी जर तुझ्याशी प्रामाणिक रहावे असे तुला वाटत असेल तर मी ह्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही.''
नंतर एका शिष्याने आचार्यांना विचारले की त्यांनी उत्तर देण्यास का नकार दिला....
''कारण त्या प्रश्नाचे उत्तरच नाही!'' आचार्यांनी सांगितले.
''म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का?''
''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!''
["Tell me," said the atheist, "Is there a God — really?"
Said the master, "If you want me to be perfectly honest with you, I will not answer."
Later the disciples demanded to know why he had not answered.
"Because the question is unanswerable," said the Master.
"So you are an atheist?"
"Certainly not. The atheist makes the mistake of denying that of which nothing may be said... and the theist makes the mistake of affirming it.]
४. एका गंभीर चेहर्याच्या पाहुण्याने आचार्यांना विचारले, ''गुरुचे काम काय?''
''लोकांना हसायला शिकवणे!'' आचार्यांनी तितक्याच गंभीरपणे उत्तर दिले.
["What is the work of a Master?" said a solemn-faced visitor.
"To teach people to laugh," said the Master gravely.]
५. अहंकाराचे ओझे जो टाकून देतो त्याची पावले कायमच आनंदी वाटचाल करत जातात.
[One always treads with a joyful step when one has dropped the burden called the ego.]
६. स्वतःचेच खरे मानणार्या एका धर्मशिक्षकाने आचार्यांना विचारले, ''तुमच्या मते जगातील सर्वात घोर पाप कोणते?''
आचार्य उत्तरले, '' ते (पाप) ज्यात तो इतर माणसांना पापी समजतो...''
[Said the self-righteous preacher, "What, in your judgment, is the greatest sin in the world?"
"That of the person who sees other human beings as sinners," said the Master.]
अशा अनेक चुरचुरीत (सु)वचनांनी हे पुस्तक ठासून भरलेलं आहे. नवीन दृष्टी देण्याबरोबरच ते आपल्याला हसायला लावते, कंटाळा झटक्यात दूर करते आणि विचारांना खाद्य पुरविते. मिळाले तर जरूर वाचा व आपल्या संग्रही बाळगा!
धन्यवाद!
-- अरुंधती
प्रतिक्रिया
16 Apr 2010 - 10:13 pm | शुचि
छान दिसतय ग पुस्तक. मस्त ओळख करून दिलीस.
>>''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!'' >> लै भारी :)
मला किनई, "डोंट स्वेट द स्मॉल स्टफ" हे पुस्तक सुद्धा असच वाचायचय.
असच मजेशीर असावं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
16 Apr 2010 - 10:24 pm | भानस
आता. आढावा एकदम छान. " सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.'' :( ठळक उदाहरणे पाहिली आहेतच याची आपण. " अहंकाराचे ओझे जो टाकून देतो त्याची पावले कायमच आनंदी वाटचाल करत जातात." नेमके हेच केले जात नाही आणि आम्ही कायम दु:खीच कसे हा विचार मन कुरतडत राहतो.
17 Apr 2010 - 12:56 am | शुचि
अरुंधती मला जालावर या पुस्तकातलं एक मस्त वाक्य सापडलं -
तुम्ही एक वेळ तुमच्या इच्छेनुसार , एखाद्याकडून सेवा करवून घेऊ शकता, पण त्याचं प्रेम साध्य करू शकत नाही.
O:) You can will an act of service but you can not will love. O:)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
17 Apr 2010 - 2:02 am | पिंगू
अतिशय सुंदर आणि पटणार्या गोष्टी आहेत....धन्यवाद अरुंधतीताई.....
- पिंगू
"आयुष्य सुंदर आहे.. पण ते जगणारयावर अवलंबून आहे"
21 Apr 2010 - 9:55 am | झुम्बर
नक्कि वाचते ....
झेन तत्व्द्यनबद्दल पुस्तक महित असल्यास सान्गवे ....
21 Apr 2010 - 10:05 am | निखिल देशपांडे
३. एकदा एका नास्तिकाने विचारले, '' ईश्वर आहे का हो खरोखरीच?''
आचार्य म्हणाले, ''मी जर तुझ्याशी प्रामाणिक रहावे असे तुला वाटत असेल तर मी ह्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही.''
नंतर एका शिष्याने आचार्यांना विचारले की त्यांनी उत्तर देण्यास का नकार दिला....
''कारण त्या प्रश्नाचे उत्तरच नाही!'' आचार्यांनी सांगितले.
''म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का?''
''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!''
हे आवडले..
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
20 Jul 2012 - 10:09 am | मोदक
+१११११११
16 Jul 2012 - 9:06 pm | मन१
भन्नाट...
18 Jul 2012 - 1:57 pm | पांथस्थ
अॅन्थनी डीमेल्लो हे एक मुक्त विचाराचे ख्रिस्ती धर्मगुरु होते. त्यांच्या अनेक पुस्तकांमधुन इतर अनेक धर्मांचा, त्यांच्या संताचा उल्लेख येतो. ह्या कारणास्तव त्यांना रोम ची नाराजी पत्करावी लागली होती.
त्यांची इतर पुस्तके - "साँग्स ऑफ द बर्ड्स", "दि प्रेअर ऑफ फ्रॉग", "साधना", "कॉल टु लव्ह" ई.ई. हि पण खुप छान आहेत. मला "साधना" विशेष आवडते - ज्या मधे अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे मेडिटेशन्स दिलेले आहेत.
इथे त्यांची पुस्तके विक्रिसाठी उपलब्ध आहेत.
18 Jul 2012 - 2:51 pm | चैतन्य दीक्षित
छान परिचय करून दिलात.
मिळवून वाचले पाहिजे आता हे पुस्तक :)
20 Jul 2012 - 12:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि
धन्यवाद अरूंधती.