इथे वरचेवर लिहिणारे, वावरणारे सभासद, लेखक यांच्यासाठी ही कविता. कोणतेही कवितेचे बंधन न पाळता लिहिलेली. जितकी नावे आठवली इथे सापडली आणि कवितेत गुंफण्यास सोपी वाटली त्या सभासदांचि नावे घेतली आहेत.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. ही निव्वळ कविता आहे.. आणि सगळ्यांनी हलकी घ्यावी हि विनंती..
मिसळपाव नावाच्या कुरणामध्ये लहानमोठी मेंढरं जमवतो,तात्या मेंढपाळ स्वतःला मात्र विसोबा खेचर म्हणवतो..
ओंकार,निलकांत असती या कुरणाचे राखणकर्ता,दाढा कोरत बसतो प्रसाद, बिपिन म्हणे मी कार्यकर्ता..
ऐतिहासिक झाली प्रियाली, सहज्-सर्किट इथे रमती,जर्मनीच्या गमती जमती, सुगरण होई दोन्ही स्वाती..
सुर्याला ठेऊन सर्वसाक्षी, कोलबेरही फोटो काढतो,बेसना सारखी लाडवी गझल सुमार म्हणत केशव फाडतो..
स्कॉच सारखा पिवळा डांबिस एखादी चरोळी तोंडात टाकतो,मुलगा तो धमाल म्हणत ऋषिकेशही एक गझल हाणतो..
सागर, चतुरंग, धनंजय काळा, व्यक्त होऊ पाहणार अव्यक्त,चारोळ्या गुंफत यांच्या समवेत सुनितही होई मुक्त..
भडकम्कर तो नदिपरी संथ, 'राज' साठी इनोबा तडफडेआनंदाचे यात्री अन् घन, 'सकाळा'त अभिजीतच्या आनंदीआनंद गडे..
काम नको टाईमपास करा, सदान्कदा सांगे वरदा..प्रभाकराच्या हाटिलात मात्र फुकट खाण्याची स्वप्ने सदा..
चित्रमुद्रिता राजमुद्रा, सृष्टीचे लावण्या घाली पसारा,वाटाफोडित जातो सुधिर, शेखर म्हणे मेतकुटभात बरा..
आठवणींत भिजतो सतिश, गोडबोलत अशोक लिहितो,मनिष, धृव, मानस अधे मधे, झकासही कोल्हापूरला नेतो...
धोंडोपंतांचे ग्रहतारे, गुंडोपंतांना नौशिया भरे,राजे निघाले सफरीवरी, प्रमोदांना मात्र देव स्मरे..
पुष्कर, किशोरी नित्याचेच, लंबूटांग, गंधार नेवेही यासुनिल, हर्षल, मदनबाण, माहिती प्रसारण माझी दुनिया..
कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरतीएकमेका घेऊन सोबती, गगनावेरी.... वेलू नेती.
- (कुरणातली शेळी)प्राजु
प्रतिक्रिया
25 Feb 2008 - 2:15 am | बेसनलाडू
लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
26 Feb 2008 - 9:11 pm | केशवसुमार
म्हणतो..
लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.
(लाडवी गझला फाडणारा)सुमारकेशव
25 Feb 2008 - 5:13 am | llपुण्याचे पेशवेll
सही जमली आहे..
पुण्याचे पेशवे
25 Feb 2008 - 6:46 am | विद्याधर३१
एकदम सहीच ...
विद्याधर
25 Feb 2008 - 7:20 am | प्राजु
बेसन लाडू, धनंजय, विद्याधर आपले मनापासून आभार.
- सर्वव्यापी)प्राजु
25 Feb 2008 - 7:34 am | विसोबा खेचर
प्राजू, तुझी कविता खरंच सर्वव्यापी आहे! मस्त वाटली वाचायला...!:)
कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरतीएकमेका घेऊन सोबती, गगनावरती.... वेलू नेती.
क्या बात है...!
इथे फक्त 'गगनावरती.... वेलू नेती' च्या ऐवजी 'गगनावेरी.... वेलू नेती' असे पाहिजे असे वाटते. ज्ञानोबामाउलीनेही 'तयाचा वेलू गेला गगनावेरी' असेच म्हटले आहे..
असो...
आपला,(मेंढपाळ) तात्या.
25 Feb 2008 - 7:48 am | प्राजु
धन्यवाद तात्या..- (सर्वव्यापी)प्राजु
25 Feb 2008 - 8:18 am | ऋषिकेश
सही आहे.. मजा आली वाचताना
-ऋषिकेश
25 Feb 2008 - 12:28 pm | धमाल मुलगा
प्राजुताई, झकास! कुठून सुचत॑ बॉ तुम्हा लोका॑ना एव्हढ॑ छान लिहायला?एखाद॑ औषध वगैरे आहे का त्यासाठी? घ्याब॑ म्हणतो...५-७ लिटर :))कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरतीएकमेका घेऊन सोबती, गगनावेरी.... वेलू नेती.हे एकदम मस्त.स्कॉच सारखा पिवळा डांबिस एखादी चरोळी तोंडात टाकतो,मुलगा तो धमाल म्हणत ऋषिकेशही एक गझल हाणतो..च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा? (कुरणातली शेळी)प्राजुह.ह .पु.वा.-कुरणातल॑ नाठाळ कोकरूध मा ल.
26 Feb 2008 - 12:25 am | ऋषिकेश
च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?
असं का रे धमाल? मला का बॉ 'ऑड मॅन आउट' काढतोयस? ;) मला धमाल आली त्या पंक्तीत बसायला :प
-(ऑड मॅन)ऋषिकेश
25 Feb 2008 - 12:43 pm | राजमुद्रा
किती मिसळून गेली आहेस ग मिसळपावमध्ये ! इतकी की स्वता:ला सुध्दा विसरलीस?
आज तू मला अशी वाटलीस-
मिसळलीस तू अलगद, मन विचारी रंग तुझा कोणता?
तू म्हणालीस पाण्यासारखा,
लाल मिसळता प्रेमा, हिरवा मिसळता हरीता,
पिवळा मिसळता तेजा, निळा मिसळता सरीता.
राजमुद्रा :)
25 Feb 2008 - 1:14 pm | बिपिन कार्यकर्ते
प्राजु, मस्तच जमली आहे कविता...
कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
हे मात्र एकदम चपखल बसले आहे.
बिपिन कार्यकर्ते.
25 Feb 2008 - 1:30 pm | स्वाती दिनेश
प्राजु,मिसळ कविता झकास!स्वाती
25 Feb 2008 - 2:03 pm | विसोबा खेचर
ह्या सुंदर कवितेकरता प्राजूचे तर कौतुक निश्चितच आहे, परंतु त्याही पलिकडे जाऊन खालील एक विचार सहजच आत्ता मनात डोकावला.
अवघ्या चारसहा महिन्यांच्या कालावधीतच मिपावर वावरणार्या इतक्या सार्या मंडळींच्या लेखनानुसार, वावर-विशेषानुसार एक सुंदर कविता लिहिली जावी, ही माझ्यामते मिपाकरता नक्कीच भूषणावह गोष्ट आहे!
मिपाकरांचा मिपावरील अगदी घरच्यासारखा वावर, कुठेतरी माणसांबद्दलची आपुलकी आणि ओढ, थोडीशी पारिवारीक, कौटुंबिक भावना इत्यादी गोष्टी असल्याशिवाय अशी कविता जन्म घेत नाही असं मला वाटतं!
असो...!
आपला,(समाधानी परंतु अंतर्मूख!) तात्या.
25 Feb 2008 - 2:24 pm | किशोरी
अरे वा प्राजु एकदम मस्त कविता,या कुरनाचे रुप सुदधा एकदम पालतुन गेले आहेवा सगळ्च छान वाटते आहे!!मस्त....(कुरनात चरायला येनार मेंढृरु)किशोरी
25 Feb 2008 - 4:48 pm | माझी दुनिया
अरे वा ! माझाही उल्लेख आला की. अर्थात तो नसता तरी कौतुक केलं असतंच.मस्तच जमलीय कविता.माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
25 Feb 2008 - 5:19 pm | इनोबा म्हणे
शब्दच सुचत नाहीत...
प्राजू ,लय भारी
(येडं कोकरु)
||इनोबा म्हणे||
25 Feb 2008 - 7:24 pm | ब्रिटिश टिंग्या
शेळीताई,
कुरण आवडले......
छोटी टिंगी ;)
अवांतर : दोन ओळींमध्ये इतकी जागा रिकामी कशी ? लाईन स्पेसिंगचा प्रॉब्लेम आहे का?
25 Feb 2008 - 8:19 pm | प्राजु
अरे धनंजय काळा.. शिफ्ट पकडून एन्टर मार.. म्हणजे लाईन स्पेसिंग कमी होईल.
- (सर्वव्यापी)प्राजु
25 Feb 2008 - 7:41 pm | चतुरंग
फारच छान रचना. संवेदनशील आहेस. अशीच रहा.
चतुरंग
25 Feb 2008 - 7:49 pm | नीलकांत
प्राजु कविता छान झालीये. आवडली बघ !
नीलकांत
25 Feb 2008 - 7:55 pm | सुधीर कांदळकर
कुरणात उतरली चारोळ्यांची परी.
खास मिपाकरांसाठी. झकास. मी तर अवघ्या महिन्यादोनमहिन्यापूर्वी आलो. आपल्या सहज आपुलकीने केव्हा मिपा कर झालो कळलेहि नाही.
असाच सर्वांचा लोभ असूद्या.
25 Feb 2008 - 7:57 pm | प्राजु
आपण सर्वांनी ही येडी कविता.. गोड मानून घेतलीत यातच सगळं मला मिळालं..राजमुद्राताई,तू माझ्यावर लिहिलेल्या रंगित ओळी खूप आवडल्या. मनापासून धन्यवाद.
बिरूटे सरांच्या "तात्या मनोगतावर .." या लेखातूनच खरंतर मला स्फुर्ती मिळाली असं मी म्हंटल तर वावगं ठरू नये. मी सरांची आभारी आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
25 Feb 2008 - 8:07 pm | मीनल
25 Feb 2008 - 8:18 pm | सृष्टीलावण्या
प्राजुताई, *** मिपाकरांचा एकूण स्वभाव पाहता तुमची ओळ म्हणजे फारच
सौजन्याचे लक्षण आहे म्हणायचे. तुमच्याऐवजी दुसरा कोणी मिपाकर असता
तर नक्की उकिरडा किंवा तत्सम शब्द वाचायला मिळाला असता या विषयी
शंका नाही.*** मूळ वाक्य पु.लंच्या असा मी असामी मधील. ऐका इथे :
http://ideasnext.com/marathimusic/Kathakathan/index.htm
25 Feb 2008 - 8:25 pm | प्राजु
अहो यात काही वेगळा अर्थ नाहिये. तुम्ही 'पसारा" या विषयावर इथे चर्चा घडवून आणली होती ना म्हणून तो संदर्भ तुमच्या नावासोबत घेतला. तसेच शेखर चा संबंध "मेतकुट भात" या चर्चेशी निगडीत आहे. वरदाच संबंध " ओफिस मध्ये काम नसताना तुम्ही काय करता? " या तिच्या लेखनाशी, सुधिर कांदळकरांचा 'वाट फुटेल तिकडे" शी, प्रभाकर पेठकरांचा त्यांच्या ओमान मधल्या रेस्टॉरंटशी.. बस्स!
- (सर्वव्यापी)प्राजु
25 Feb 2008 - 8:39 pm | सृष्टीलावण्या
मला अधून मधून असामी असा मी चे डायलॉग विनाकारण फेकायची
सवयच आहे... असो.
तुमचे नाव प्राजु न असता प्रांजळा असायला हवे होते असे मला वाटते...
25 Feb 2008 - 10:01 pm | प्रभाकर पेठकर
अभिनंदन प्राजु.प्रभाकराच्या हाटिलात मात्र फुकट खाण्याची स्वप्ने सदा..स्वप्ने कशा करीता? 'सत्यात' सर्वांनाच निमंत्रण आहे. चला, जमवा कट्टा. जेवण स्पॉन्सर करु.
धन्यवाद.
25 Feb 2008 - 11:10 pm | प्राजु
प्रभाकरजी.. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
26 Feb 2008 - 12:23 pm | प्रभाकर पेठकर
प्रभाकरजी..
अरेरे! अगदी उत्तरप्रदेशी, बिहारी करून टाकलेत. छे..! आता मनसे पासून सांभाळले पाहिजे.
25 Feb 2008 - 11:12 pm | सर्वसाक्षी
उत्तम घेतली आहे, जोरदार निरिक्षण.
25 Feb 2008 - 11:20 pm | पिवळा डांबिस
छानच लिहिली आहेस, प्राजु, तू ही कविता!
आगे बढते रहो...
तात्यांनू, कुरणांत ही बरीच शेरडं, मेंढरं, कोकरं जमायला लागली की हो!
बरं झालं, च्यायला, सागुतीची घरच्याघरीच सोय झाली, आता सकाळी-सकाळी उठून अब्दुलखाटकाकडे जायला नको.:))))
26 Feb 2008 - 12:25 am | स्वाती राजेश
काय मस्त लिहिली आहेस ग? एकदम सही$$$$ तुझ्या भाषेत.खरे तर एका कवितेत सर्वांची ओळख झाली आहे. नविन सदस्यांना ही कविता वाचली तरी एक एक सभासदांच्या कला (कळा)काय आहेत ते कळेल.....:)फारच छान.दिवाळी अंकात फराळाची कविता कशी येते तसे वाटले.
26 Feb 2008 - 7:05 pm | अवलिया
मेंढरांमधे आमचा समावेश न करुन आमच्यावर अन्याय झाला असे आम्ही मानतो व जाहिर निषेध व्यक्त करतो:)
नाना
26 Feb 2008 - 8:23 pm | चतुरंग
आता 'ना ना' न करता सामील व्हा :)!!
चतुरंग
26 Feb 2008 - 7:57 pm | प्राजु
खरंच की..
माफ करा हा नाना...
- (सर्वव्यापी)प्राजु
26 Feb 2008 - 9:36 pm | मुक्तसुनीत
कविता वाचून एकदम घरगुती, उबदार , छान वाटते. इंदिराबाईंच्या एका कवितेची अर्धी ओळ आठवते :
"असेच काही द्यावे.... घ्यावे....
म्हणून दिधला एक मरवा..."
27 Feb 2008 - 12:19 am | अव्यक्त
तांत्रिक अडचणींमुळे प्रतिसाद देता येत नाही. मिसळपावच्या कुरणांवर.........लाही देता आला नाही. कविता फार सुंदर आहे........!!!!
29 Feb 2008 - 10:45 pm | रंजन
याला काय गंम्त म्हणायची वाटत. इथे काय मेंढर रचायला येतात असे वाटावे इतके हिरवे कायि दिसले नाहि.
29 Feb 2008 - 10:53 pm | चतुरंग
ह.घ्या:))
चतुरंग
1 Mar 2008 - 10:37 am | पिवळा डांबिस
आयला, मेंढरांची तर हिथं लयलूटच हाय! काही आपखूशीनं येणारी मेंढरं आनी काही स्वतःला न कळत येणारी मेंढरं!!!!!! :))
1 Mar 2008 - 3:50 pm | लबाड मुलगा
च्यायला
अपन जरा ङ्याक्चीक मधे फिराय्ला काय गेल्तो तर कुर्णातुन अप्लया नावाचआ पत्ता क्ट
प्राजु.... हे चांग्ला नाय याचा तुला लय त्रास हुइल हा....
सांगुन ठिव्तोय
अपन यक्दम डेंजर हाय
पक्या
1 Mar 2008 - 8:41 pm | झकासराव
निरिक्षण शक्तीला दाद देतो. :)
एरवी मी कविता वाचत नाही कारण आपल्याला काय बी कळात नाय.
1 Mar 2008 - 9:38 pm | प्राजु
पक्या,
सॉरी बरं का...
झकास,
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
13 Jan 2011 - 3:50 am | मस्तानी
प्राजू ... आता "आजचे नवीन खेळाडू" घेऊन अशीच एक सही रचना होऊन जाऊ दे :)
या नवीन "शोध" सुविधेमुळे असंच काही जुन - चांगलं वाचायला मिळतंय सध्या !
13 Jan 2011 - 9:36 am | स्वानन्द
धन्यवाद मस्तानी... हा धागा वर आणल्याबद्दल. एवढी मस्त कविता वाचायची राहून गेली असती.
बाकी याचा सिक्वेल येऊन जाऊ देच.
13 Jan 2011 - 10:29 am | ज्ञानराम
अप्रतिम ... प्राजू
14 Jan 2011 - 8:42 am | सुधीर काळे
प्राजू,
तुझ्या धमन्यात कविता दौडत असते याचाच प्रत्यय पुन्हा आला!
वाटाफोडित जातो सुधिर, शेखर म्हणे मेतकुटभात बरा.. ही ओळ वाचल्यावर जरासे 'आँ' झाले होते (कारण 'म्या पामरा'ने कुठल्याही वाटा फोडल्या-बिडल्याची जाणीव तरी नाहीं) पण ते सुधीर कांदळकर आहेत हे कळल्यावर 'हुश्श' झाले.
14 Jan 2011 - 9:32 am | अरुण मनोहर
छान कविता आहे.
अदृष्य मेंढरू असण्याचे फायदे नेहमीच मिपावर मला मिळतात. पुन्हा एकदा तो फायदा देण्यासाठी प्राजूचे अभिनंदन.
संपादित-> अरेच्चा! हा धागा दोन वर्षांनी वर आणण्यात आला आहे तर! पण एनी वे, आमचे अदृष्य पणाचे फायदे अजूनही तसेच सुरू आहेत. नो प्रॉब्लेम!
14 Jan 2011 - 9:38 am | गंगाधर मुटे
:)