बाबा उवाच.... कोहणहकहर .... आस्तिक की नास्तिक (उर्फ आमच्या भाषेत...पुणेकर की अपुणेकर)
आमचे मोठे चिरंजीव कागदोपत्री इंजिनियर झाले (कागदोपत्री बरेच काही होता येते पण .....कागदोपत्री बरेच काही होणे, ह ह्या धाग्याचा विषय नाही....) म्हणून आमच्या बाबांकडे गेलो.शनिवार असल्याने बाबांच्या मठात बरीच गर्दी होती,त्यात चिलिमवाले बाबा, कटोरीवाले बाबा, खापरवाले बाबा आणि जपमाळ वाले बाबा पण होतेच.
आज बाबांच्या मठांत इतकी गर्दी पाहून मी जरा हबकलोच.पण मी पाय पळता पाय काढण्यापूर्वीच बाबांची नजर आमच्याकडे वळाली आणि बाबा म्हणाले.....
बाबा : या मुवि.काय काम काढलेत? तसे तुम्ही आजकाल कामाशिवाय आमच्याकडे पण येत नाही.आज मूद्दाम का आलात?