गटारी स्पेश्यल : अॅबसिन्थ - एक हरिताप्सरा
एक श्वान आणि एक कच्छप वगळता सांप्रत काहीही पाळत नाही, श्रावण तर दूरची गोष्ट. सबब, "गटारी" साजरी करण्याचे काहीही कारण असण्याची आवश्यकता नाही, नसावी.
तरीही "गटारी" साजरी होतेच!
म्हणजे कसं आहे की, आपण चवथीला मोदक किंवा होळीला पुरणपोळी खातो ती काय त्या दिवसांनतंर बराच काळ मोदक वा पुरणपोळी खायला मिळणार नाही म्हणून नव्हे, तर एक रिवाज म्हणून. तसेच माझ्या "गटारी"चेही!
एक रिवाज म्हणून साजरी करायची.
खेरीज, यंदा खास आकर्षण होते ते म्हणजे - अॅबसिन्थ.




