वलय (कादंबरी) - प्रकरण ७
प्रकरण ६ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41864
--
प्रकरण ७
सोनी, सुप्रिया आणी रागिणी रहात असलेले ते वर्किंग विमेन्स हॉस्टेल असल्याने तेथे जायला यायला वेळेची बंधने नव्हती कारण मुंबई सारख्या शहरात आजकाल कामानिमित्त लोक दूर प्रवास करतात आणि आजकाल स्त्रीयासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. पण हॉस्टेलवर कुणाला भेटायला बोलवायचं असेल तर मात्र नियम होते.
त्या दिवशी सुप्रिया पुण्याला गेलेली होती आणि रागिणी गेले दोन दिवस सूरजच्या फ्लॅटवर होती.