झेन कथा - सहनशिलता
मिपा वरील अलीकडील काही लेख, त्यावरील प्रतिसाद आणि त्या प्रतिसादांचे पडसाद वाचुन मला ही झेन कथा आठवली.
योग्य/अयोग्य, पाप/पुण्य, साक्षर/निरक्षर, इश्वरवादी/निरीश्वरवादी ई. वादग्रस्त वातावरणात थोडासा शितल शिडकाव करावा हा हेतु.
चंदन पुर गाव.
या गावात लहु लोहाराच एक दुकान असतं. दिवस भर भाता मारायचा, भट्टी पेटती ठेवायची आणि ऐरणीवर भट्टीमधे तापलेल्या लोखंडावर हातोड्याचे घाव घालुन वेगवेगळ्या वस्तु बनवायच्या हा त्याचा व्यवसाय.