राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई- राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सरकारी संकेतस्थळ व इतर संकेतस्थळ अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे.
सरकारी संकेतस्थळाच्या गटासाठी पहिला पुरस्कार १५ हजार रुपये, दुसरा १० हजार आणि तिसरा पुरस्कार ५ हजार रुपयांचा असेल. तर इतर संकेतस्थळासाठी पहिला पुरस्कार ३५ हजार रुपये, दुसरा २० हजार आणि तिसरा १५ हजार रुपयांचा असेल. या पुरस्कासाठी १८ डिसेंबर ते १८ जानेवारीपर्यंत राज्य मराठी विकास संस्थेच्या http://www.rmvs.maharashtra.gov.in/rmsv या संकेतस्थळावर आणि सीडॅकच्या http:/www.cdacmumbai.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संकेतस्थळासाठी वापरण्यात आलेली प्रमाणके, टंक, संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता वापर करणा-यांना पुरवण्यात आलेल्या सोयी, उपयुक्तता, सहभागाची सोय, माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह आदी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून संकेतस्थळाचे परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी गिरीश पतके यांनी दिली.
माहिती स्त्रोत : प्रहार दैनिक
मिसळपाव ने यात सहभागी व्हावे यासाठी ही माहिती शेअर करत आहे.
प्रतिक्रिया
14 Dec 2012 - 4:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपानं आपला सहभाग नोंदवावा, असे मला वाटते.
-दिलीप बिरुटे
16 Dec 2012 - 2:09 am | मोदक
सहमत..
पण आधी जुने लिखाण दिसण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, असे मला वाटते.
16 Dec 2012 - 6:34 am | अत्रुप्त आत्मा
+++111 आणी प्रतिसाद स्वसंपादन,आलेल्या खरडींची नोंद दिसणे,प्रतिसादात सही ऍडवता येणे...ह्या पण सोई पुन्हा उपलब्ध व्हाव्या.
16 Dec 2012 - 7:26 am | पाषाणभेद
मोदकास अनुमोदन.
काय नक्की कोणती तांत्रिक अडचण आहे की ज्यायोगे जुने लेख, प्रतिसाद दिसू शकत नाही? एखादे ड्रूपलचे मॉड्यूल आडवे येत आहे काय? तसे असेल तर ते मॉड्युल काढणेच योग्य आहे. व्यवस्थापकीय मंडळींनी गंभीरतेने या मुद्याचा विचार करावा.
16 Dec 2012 - 7:08 am | आनन्दिता
सहमत.......