स्कायफॉल-

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
5 Nov 2012 - 5:03 pm

विदेशी चित्रपटात सकस कथा, स्पष्ट व्यक्तिचित्रण व अतिप्रगत छायालेखन यांचा संगम अनेक वेळा दिसून आलेला आहे. या सर्व व्यक्तिचित्रणात चार्ली चाप्लीन यांचा ट्रॅम्प, ब्रॅम स्टोकर यांचा काउंट ड्राक्युला , इयान फ्लेमिंग यांचा जेम्स बॉण्ड व स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा इंडियाना जोन्स हे लोकप्रिय आहेत. ५० वर्षे टिकून जेम्स बॉन्ड याने त्यात आघाडी घेतली
आहे यात शंकाच नाही.

नुकताच प्रदर्शित झालेला "स्कायफॉल" हा॑ चित्रपट कथेत जरा कमी असला तरी फोटोग्राफी , अभिनय, व्यक्तिचित्रण यात सरस ठरलेला आहे. पूर्वी दुखावलेला एक ब्रिटिश गुप्तहेर आता सायबर टेररिस्ट झालेला आहे. व एम या
अधिकार्‍याच्या मौतीसाठी त्याने विडा उचललेला आहे. त्याची माणसे व एम आय ६ या गुप्तहेर खात्याच्या निष्टावंताचा हा॑ संघर्ष.

स्कायफॉल हे जेम्स बॉन्ड लहानपणी ज्या वास्तूत वाढला त्या स्कोटलंडमधील एकांत जागी असलेल्या एका तिमजली घराचे नाव आहे.त्या घरातच या आपल्या " घरातील शत्रूचा " शेवट व्हावा या उद्देशाने जेम्स बॉन्ड त्याला व त्याच्या टोळक्याला त्या घरा़कडे खेचून आणतो .

एका मह्त्वाच्या हार्ड ड्राईव्ह शोध घेत असता बॉन्ड एका इसमाचा पाठलाग करीत असतो.या चित्तथरारक प्रसंगाने चित्रपटाची सुरूवात होते. ( हा प्रसंग आपल्या भारतातील कॅसलरॉक या स्थानकानजिकच्या पुलावर चित्रित होणार होता.) या चित्रपटातील हे चित्रिकरण तुर्कस्तानात झाले आहे. इस्तम्बूल मधील मार्केटच्या छपरावरून केलेला मोटारसायकलचा
पाठलाग अंगावर शहारे आणतो.पुढे एका आणीबाणीच्या काळी एम ने घेतलेल्या निर्णयात चुकून बोंन्डला गोळी लागते .
बॉन्ड बेपत्ता किंवा मृत असा कयास काढला जातो. पण नाराज झालेला बॉन्ड काही काळ अज्ञात स्थळी रहातो.

एम याना मारण्यासाठी " एम आय ६ च्या कार्यालयावर बॉम्ब स्फोट घडवून आणला जातो व कार्यालय एका जुन्या तळघरात हलवले जाते. दरम्यान ही बातमी बॉन्डला टीव्ही वरून समजते व तो एम याना येऊन भेटतो.त्यावेळी त्याचा व एम यांचा झालेला संवाद उत्कृष्ट अभिनयाने डेनियल क्रेग व जुडी डेंन्च यानी रंगविला आहे. आपला एक इतर सहकारी मेलरी याच्या विरोधाला न जुमानता बोंण्डला नव्या कामगिरीवर धाडण्यात एम यशस्वी होतात .. बॉन्डला टर्कीत गुंगारा देऊन पळालेला इसम काही कामासाठी शांघाई त येणार असल्याची खब्रर मिळते. बोंन्ड तेथवर पोहोचतो . त्या इसमाला एका उंच इमारतीवर गाठतो पण त्याकडून हवी माहिती मिळयापूर्वीच तो इसम मरणाला कवटाळतो. तिथे मिळालेल्या वस्तूच्या साह्याने माहिती मिळवून बोण्ड त्या इसमाच्या बोलाविता धनी कोण आहे हे शोधण्यासाठी मकाउ येथे जातो. तेथे त्याची एका महिलेशी गाठ पडते. आपण ज्याकडे नोकरीस आहोत तोच हा सारा दहशतीचा मामला घडवून आणत आहे व बॉण्डने त्यास ठार करावे या अटीवर ती त्याला एका बेटावर घेऊन जाते. या बेटावर इमारती आहेत पण वस्ती नाही अशी अवस्था असते. खलनायक राउल सिल्व्हा या इंडोनेशेयन सारख्या दिसणार्‍या दुरात्म्याशी बोण्डची गाठ पडते. त्याला हस्तगत करून बॉन्ड लंडनला परततो. दरम्यान एम यांच्या कारभाराची चौकशी चालू होते. व कैदेतील सिल्वा पळून जातो. मग लंडनच्या मेट्रो मधून त्याचा माग काढीत बोण्ड त्याला गाठणार तोच सिल्व्हा आपल्या रिमोटने मेटो ची आक्खी गाडी उध्वस्त करतो. व गायब होतो.

सिल्व्हाला आपली प्रत्येक हालचाल अगोदरच कळते हे कळल्यावर बोण्ड एम ना घेऊन सुनसान अशा त्याच्या बालपणीच्या घरी जातो. तेथे मर्यादित बंदुका असतात पण एम उपलब्ध सामग्रीतून स्फोटके निर्माण करतात. सिल्वा माग काढीत तेथे येतो .मग भन्नाट गोळीबारी झडते. त्यात सिल्व्हाची अनेक माणसे मारली जातात.बॉन्डचे घर सांभाळणारा माणूस एम ना घेउन भुयारी मार्गाने निसटतो. मग मोठा घनघोर धमाका करून बॉन्डही भुयारातून पळतो.
सरतेशेवटी यातूनही वाचलेला सिल्व्हा बोंडच्या चाकूहल्यात मरण पावतो . पण "गड आला पण सिंह गेला" अशी अवस्था एम आय ६ या युनिटची होते. या सार्‍या धुमश्चक्रीत एम मारल्या जातात.

बोन्डपटांच्या परंपरेला साजेशी लोकेशन निर्मात्यानी निवडली आहेत. यात पाठलाग मारामारी वगैरे घडत असताना पार्श्वभूमीवर लंडन , व इस्तम्बूल शहरांचे रम्य दर्शन घडत असते. चित्रपटात पटकथेचा आवश्यक भाग म्हणून रात्रीचे
लंडन, रात्रीचे शांघाई, रात्रीचे मकाउ दाखविणारे शॉट्स आहेत ते डोळ्याचे पारणे फेडणारे. एका बेटावर लोकानी रिकामे केलेले एक शहर दाखविले आहे . त्यात आर्ट डायरेक्टरची प्रशंसाच करावयास हवी.ब्रिटनमधील सरे परगण्यात तीन मजली घर बनावट निर्माण करून ते खरे वाटावे याची ही काळजी घेण्यात आर्ट डायरेक्टर ची कामगिरी दिसून येते.
नेहमीप्रमाणे एका धुंदफुंद गीतासह श्रेयनामावली ग्राफिक्स नयनमनोहर दर्शन घडविते.एम आय ६ च्या इमारतीतील स्फोट व ज्वाला कम्ब्बशन सारख्या सोफ्टवेअरच्या साह्याने निर्माण करण्यात आले आहेत. बाकी धडाकेवाज स्टंटस बद्द्ल काय बोलणार ? ते रुपेरी पडद्यावर प्रत्यक्श पहाणेच श्रेयस्कर !

अभिनयात डेनियल क्रेग( जेम्स बोन्ड) जुडी डेन्च ( मिसेस एम ) जेवियर बारडेम ( सिल्वा) ,राल्फ फ्लेनेस ( मेलरी)
यानी आपापली कामे उत्तम केली आहेत. काही भावनिक प्रसंग ही जेम्स बोन्ड च्या वाट्याला आले आहेत.
थोमस न्यूमन यांचे संगीत ही वाखणण्याजोगे आहे, स्काय फॉल हे गीत मस्त.
या सर्वांची मोट बांधण्याचे काम समर्थपणे केले आहेच ते दिगदर्शक सॅम मेडीस यानी. ते प्रचंड कौतिकास पात्र आहेत.

सरते शेवटी बोंन्ड पटाचा ५० वा वधीपनदिन असल्याचा उल्लेख आहे व निर्माते बार्बरा ब्रोकोली व मिचेल विल्सन तसेच
वितरक मेट्रो गोल्डविन मेयर व कोलंबिया पिक्चर्स यानी " Bond will return " चे आश्वासन दिले आहे .जेम्स बोण्ड च्या चाहत्याना याहून काय हवे ?

मांडणीकलातंत्रमौजमजाचित्रपटछायाचित्रणप्रतिक्रियाआस्वादलेखअनुभवमतशिफारससल्लामाहिती

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

5 Nov 2012 - 5:23 pm | गणामास्तर

बाँड पटांचा पंखा असल्याने या चित्रपटाला हजेरी लावणी झालेचं.
चित्रपट अत्यंत संथ व रटाळ वाटला. सादरीकरण, चित्रपटाचे लोकेशन्स निव्वळ लाजवाब
आहेत. पण, कथेत चांगलाच मार खाल्लायं. एम मारली गेल्या मुळे एक प्रकारे खलनायकाचा
विजय झाल्या सारखेच दाखवले गेलेय. बाँड पट म्हणल्यावर अपेक्षित असणारे थरारक पाठलाग, तुफान हाणामारी,अतर्क्य गॅझेट्स यांची कमतरता जाणवली.
एकंदरीत अडीच तासाच्या या चित्रपटात म्हणावी तितकी मजा आली नाही.

मदनबाण's picture

5 Nov 2012 - 5:38 pm | मदनबाण

बॉन्ड (Pierce Brosnan)बदलल्या पासुन... बाँन्डपट पहावासा वाटला नाही !

जेनी...'s picture

5 Nov 2012 - 5:46 pm | जेनी...

एकदम सहमत !

प्रचेतस's picture

5 Nov 2012 - 6:07 pm | प्रचेतस

मस्त परिक्षण.
शॉन कॉनेरीचा 'फ्रॉम रशिया विथ लव्ह' हा सर्वश्रेष्ठ बाँडपट असे आमचे मत. त्यातल्या तातियाना रोमानोवापेक्षा सुंदर असलेली बाँडगर्ल नंतर इतर कुठल्याच बाँडपटात दिसली नाही. शॉनची धावत्या ट्रेनमधली मारामारी तर लाजववाब.

मदनबाण's picture

5 Nov 2012 - 6:52 pm | मदनबाण

त्यातल्या तातियाना रोमानोवापेक्षा सुंदर असलेली बाँडगर्ल नंतर इतर कुठल्याच बाँडपटात दिसली नाही.
ह्म्म... तातियाना दिसायला सुंदर आहेच,पण मला The World Is Not Enough मधली Elektra King म्हणजे Sophie Marceau मला आवडली होती. ;)
Sophie Marceau

चौकटराजा's picture

5 Nov 2012 - 8:07 pm | चौकटराजा

येकदम सहमत !

संजय क्षीरसागर's picture

5 Nov 2012 - 11:57 pm | संजय क्षीरसागर

धन्यवाद!

अर्धवटराव's picture

6 Nov 2012 - 2:25 am | अर्धवटराव

लाजवाब ;)

अर्धवटराव

खेडूत's picture

5 Nov 2012 - 10:57 pm | खेडूत

थोडा वेगळा असूनही हा पण आवडला.

सध्या त्याची ही गाडी आमच्या हापिसात स्वागत कक्षात लावली आहे.

LandRover

इष्टुर फाकडा's picture

5 Nov 2012 - 11:56 pm | इष्टुर फाकडा

चित्रपटाचे परीक्षण/समीक्षा लिहिता का पटकथा? जरा टाकीत जाऊन पाहायला काहीतरी शिल्लक ठेवा! अथपासून इतिपर्यंत कथा लिहून रसभंग नका करू.
रच्याक्ने, कसिनो रोयाल हा माझा सगळ्यात आवडलेला बॉन्डपट.
डेनियल क्रेग आणि शॉन कॉनेरी सोडून बाकीचे सगळे बॉन्ड हे नाजूक साजूक वाटतात. क्रेगचा बॉन्ड हा सगळ्यात जास्त विश्वसनीय वाटतो (मलातरी).

मैत्र's picture

6 Nov 2012 - 1:14 am | मैत्र

चौरा -- संपूर्ण पटकथा / कथा मांडली तुम्ही. सागरशी प्रचंड सहमत
मी बाँड आणि डॅनियल क्रेगचा चाहता आहे आणि गेल्याच आठवड्यात चित्रपट पाहिला. नाहीतर हे 'परीक्षण' वाचल्यावर चित्रपटात काही शिल्लक राहिले नसते!

पुन्हा एकदा सागरशी सहमत. डॅनियल क्रेग आणि कॉनेरी हेच खरे बाँड... विशेषतः क्रेग आल्यापासून बाँडचा "human angle" दाखवण्याकडे कल आहे तो अपील होतो. उलट चॉकलेट हीरो दिसण्यार्‍या ब्रॉस्नन पेक्षा हा बाँड, जेम्स बाँडच्या इमेजला जास्त जवळ वाटतो.

नवीन चित्रपट आवडला. बराच वेगळा आहे बाँडच्या नेहमीच्या गोष्टींपेक्षा. थोडी खटकणारी बाब म्हणजे बाँड गर्ल, जबरदस्त चेस सीन्स, आणि बहुतेक सगळा ग्लोरीयस (मराठी?) भाग गायब आहे. मंदीच्या काळातला स्वस्त बाँड केला आहे असं विनोदाने म्हणावे लागेल.
तरीही एकूण अनुभव मस्त आहे. बाँड प्रेमासाठी पहा. गिझ्मो साठी हॉलीवूड छापतच असते नवीन नवीन गोष्टी..

चौकटराजा's picture

6 Nov 2012 - 8:11 am | चौकटराजा

सगळी कथा नाही लिहिलेली. पुष्कळसे तपशील गाळलेले आहेत.दुसरे असे की हा काही रहस्यपट नव्हे. त्यात प्रेक्षकाची उत्कंठा राखंण्यासाठी हातचे राखून लिहावे लागते. हा जर fugitive हा हॅरिसन फोर्ड अभिनित चित्रपट असता तर हातचे राहून लिहिण्यात हशील होते. बोंन्डपट हे कधीच रहस्यपट नसतात तर ते साहसपट असतात. शेवट चाहत्याना अगोदरच माहीत असतो.

कथा सांगितली तरी काय असा मोठा फरक पडणार आहे? तसेही सगळे बॉन्ड्पट फॉर्म्युल्या वरच आधारित असतात की !
नाही म्हणायला क्रेगने नेहमीचे "मनीपेनी आणि क्यू बरोबरच्या गप्पा" वगैरे क्लिशे टाळलेत.

(तरिही माझा सगळ्यात आवडता बॉन्ड क्रेगच आहे)

आबा's picture

6 Nov 2012 - 10:05 pm | आबा

क्रेग हा पुस्तकातल्या बॉन्डच्या जास्त जवळचा वाटतो !

आपल्या आवडत्या बॉन्ड ला मिसकॉल देऊन मत नोंदवा !

सीन कॉनेरी - ०२२३०२५६७७१

जॉर्ज लेझेन्बी - ०२२३०२५६७७२

रॉजर मूर - ०२२३०२५६७७३

डाल्टन - ०२२३०२५६७७४

पियर्स ब्रोस्नन - ०२२३०२५६७७५

डेनियल क्रेग- ०२२३०२५६७७६

यादिमध्ये बॉंडगर्ल पण असत्या तर जास्त आनंद वाटला असता मत द्यायला !
;)

इरसाल's picture

6 Nov 2012 - 1:24 pm | इरसाल

ये किस्का नंबरा दे रख्या हे !

वाह्यात कार्ट's picture

6 Nov 2012 - 1:52 pm | वाह्यात कार्ट

सहमत !!!!

अमृत's picture

6 Nov 2012 - 2:53 pm | अमृत

संपूर्ण कथाच परिक्षणात दिल्याने निशेढ....बाकी माझा आवडता बाँड म्हणजे - पिअर्स ब्रॉसनन, कॉनरि आणि रॉजर मूर (उतरत्या क्रमाने). डॅनिअल साहेब आल्यापासनं ना 'गन बॅरेल सीन अस्तो ना ती बाँडपटाची सिग्निचर ट्युन असते ना तो नाव सांगताना 'My name is Bond... James Bond' असं म्हणतो ना बार मधे 'Vodka martine... shaken not stirred' म्हणतो त्यामूळे सगळा रसभंग होतो...

अमृत

इष्टुर फाकडा's picture

6 Nov 2012 - 6:44 pm | इष्टुर फाकडा

नक्कीच तुम्ही तीनही क्रेग पट लक्षपूर्वक पहिले नाहीत :) कसिनो रोयाल मध्ये किमान दोन वेळा तो मार्टीनी ची ऑर्डर देतो. Qauntam of Solace मध्ये शेवटी नावही सांगतो. आणि या स्कायफाल मधेही 'नाव' घेतो :)

मैत्र's picture

7 Nov 2012 - 8:19 pm | मैत्र

एकदम जुना सीन, वर्जिनल Aston Martin पण परत आणली आहे थोडा वेळ.
आणि ती आल्यावर एकदम झक्कास मूळ मुजिक येतं.. धमाल..
बार मध्ये सांगत नाही पण मिळते नेहमीचे ड्रिंक.. त्यामुळे पाहिले तरी आहे.
आणि मला वाटतंय एकदा किंवा दोनदा नाव पण सांगतो..

सहजरावांचा हा धागा आठवला.
http://www.misalpav.com/node/22960
नवीन चित्रपटाचं परिक्षण(?) करताना पटकथा उलगडुन (ज्यांनी तो चित्रपट पहिला नाही पण पहाण्यची इच्छा आहे अश्या ) वाचकांचा रसभंग होणार नाही याची काळजी घेतलेली बरी.
वरील काही प्रतिसाद वाचता या धाग्यात नव्या चित्रपटाची बरीच कथा उलगडली गेली आहे असे कळल्याने लेख वाचायचे टाळले आहे.
धन्यवाद प्रतिसादकहो.
(होय, चित्रपट परिक्षणे वाचण्या आधी मी प्रतिसाद वाचतो. ;) )

चित्रपट परिक्षणे वाचण्या आधी मी प्रतिसाद वाचतो

________________________________________

मीपण ;) ( वरच्या वाक्यात एकच बदल तो म्हणजे 'वाचते ' )

तुषार काळभोर's picture

7 Nov 2012 - 7:45 pm | तुषार काळभोर

याला म्हणतात "डोळस चोप्य-पस्ते"

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2012 - 6:11 pm | अत्रुप्त आत्मा

हा सिनेमा पारंपारिक बॉण्डपट आहे ,एवढं नक्की... बाकि कथा सरधोपट असली तरी चौराकाका म्हणतात,त्या इतर सर्व मुद्द्यांबाबत सहमत आहे. :-)

इष्टुर फाकडा's picture

6 Nov 2012 - 6:48 pm | इष्टुर फाकडा

हा सिनेमा पारंपारिक बॉन्ड पट नक्कीच नाही. पण नक्कीच चांगला सिनेमा आहे. हाविअर बार्डेमने तर कल्ला केला आहे.