अनुभव

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
11 Aug 2022 - 12:58 pm

दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे.

अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर)
गोसावी समाज साधू मंदीर
नवनाथ मंदीर
मोहाडेश्वर मंदीर
अहिल्यादेवी बारव
मोहाडमल्ल देवस्थान
सोमवंशी वाडा
ग्रामपंचायत कार्यालय
सह्याद्री फार्म कारखाना भेट व
तेथेच जेवण
(जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल)
परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल.

तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे.

संस्कृतीइतिहासजीवनमानतंत्रप्रवासभूगोलप्रकटनप्रतिसादआस्वादअनुभवमतशिफारसमाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरे

नाते प्राजक्ताचे

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
10 Aug 2022 - 12:21 pm

सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले.

मुक्तकविचारलेखअनुभव

नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
25 Jul 2022 - 1:31 pm

काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकरांच्या ‘प्रतिपक्ष’ ह्या युट्युब चॅनल वरील “पाच लाख आणि वीस कोटीची गोष्ट” ह्या व्हिडिओची शिफारस करण्यात आली होती.

शिर्षकावरून विषयाचा काही अंदाज न आल्याने उघडून बघीतला तर अवघ्या सव्वादोन वर्षांच्या वाटचालीत प्रतिपक्ष चॅनलच्या सदस्यसंख्येने (Subscribers) ५ लाखांचा आणि एकुण दर्शन संख्य्येने (Views) २० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी भाऊंनी हा छोटासा व्हिडीओ तयार केल्याचे लक्षात आले!

मांडणीशुभेच्छाअभिनंदनलेखअनुभव

वह्या पुस्तके

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
19 Jul 2022 - 5:37 pm

जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते.

भाषासमाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवविरंगुळा

आठवणींच्या जंगलात

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
2 Jul 2022 - 3:15 pm

पूर्वरंग

त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे. उद्देश तेंव्हा आणी आता याची सांगड घालत मनोरंजनाचा प्रयत्न.अंतर खुप मोठे आहे लेखनात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गाभा

३० जुन,"महा"वादळ थांबले होते, धुळ,पाला-पाचोळा खाली बसत होता.नऊ दिवस अथक वादळाच्या बातम्या देणाऱ्या पत्रकार आणी टि व्ही चॅनेल्सनी एक खोलवर श्वास घेतला.

मुक्तकप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

यह मेरा काम नही है

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
1 Jul 2022 - 12:08 pm

"अरे सचिन यहा आना तो."

अनिल ने मला त्याच्या कॅबीनमध्ये बोलावले.

अनिल म्हणजे डाटा सेंटरचा हेड मॅनेजर होता. स्वभावाने अगदीच मोकळा नसला तरी एक माणूस म्हणून तो ठिक होता. एखादी गोष्ट, नवी टेक्नॉलॉजी माहीत करून आपल्या डेटा सेंटर मध्ये कशी आणता येईल याबाबत तो नेहमी विचार करत असे.

आता त्याने मला कसल्यातरी कामाला बोलावले होते. तसेही मी काही महत्वाचे काम करत नव्हतो.

"तुम्हे कल शाम को नगर जाना पडेगा. यह अपना पहेलाही प्रोजेक्ट है. वहा जाके कॉम्पूटर को नेटवर्क मे लाना यह काम है." - अनिल.

"मतलब वहा जाकर कॉम्पूटर इंटॉल करना वगैरा काम है क्या?", मी प्रश्न केला.

जीवनमानतंत्रनोकरीप्रतिसादअनुभव