वैद्यराज
.... एका हिवाळ्यात मी कामानिमित्त मराठवाड्यातील उदगीर येथे गेलो असताना थंडीतापाने आजारी पडलो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांनी लगेचच गावातील डॉक्टरला बोलावणे पाठवले. १९५० सालची गोष्ट आहे. त्यावेळेस उदगीरमधे कसले डॉक्टर आणि कसले काय. तेथे एक वैद्यराज होते हेच माझ्यासाठी खूप होते. त्यांनाच सर्वजण डॉक्टर म्हणून हाका मारत. अर्ध्या तासात वैद्यराज आले. वैद्यराज म्हणण्याइतपत काही ते म्हातारे दिसत नव्हते. केस अजूनही काळे होते. तरतरीत नाक व सडपातळ शरीरयष्टी वरून मला तरी ते त्यावेळी तिशीतले वाटले.