लेख

अवकाश स्पर्धा (अमेरिकन बाजू) -भाग १

सतिश म्हेत्रे's picture
सतिश म्हेत्रे in जनातलं, मनातलं
17 Feb 2019 - 11:14 pm

टीप
1. या व येणार्‍या लेखांमध्ये सोविएत यूनियन ला रशिया म्हणून संबोधण्यात येईल.
2. अग्निबाणाला रॉकेट म्हटले जाईल.

पार्श्वभूमी(थोडक्यात)

    4 ऑक्टोबर 1957 रोजी स्पुटनिक-1 ला घेवुन आर-7 हे रॉकेट अवकाशात झेपावले आणि एका नव्या युगाची (अवकाशयुग) सुरवात झाली. स्वतःला “तंत्रज्ञानातील महासत्ता” आणि रशियाला “पिछाडलेला देश” समजणार्‍या अमेरिकेसाठी हा मोठा धक्का होता. मात्र या घटनेने रशियाला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. दिवसातून सात वेळा अमेरिकेवरून “बीप बीप” करत जाणार्‍या स्पुटनिक बाबत अमेरिका काहीच करू शकत नव्हती.

तंत्रलेख

अवकाश स्पर्धा (अमेरिकन बाजू)

सतिश म्हेत्रे's picture
सतिश म्हेत्रे in जनातलं, मनातलं
16 Feb 2019 - 5:24 pm

प्रस्तावना
या लेखमालेत माझा कयास मुख्यत्वे अमेरिकेच्या सुरवातीच्या अवकाश मोहिमांच्याविषयी असेल. रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित उपग्रह प्रक्षेपित करून या स्पर्धेत आघाडी घेतली. नंतर त्यांनी पहिला अंतराळवीर देखील अवकाशात पाठवला. याला उत्तर म्हणून अमेरिकेने आधी मर्क्युरी आणि नंतर जेमिनी व प्रसिद्ध अपोलो मोहिमा राबविल्या.

तंत्रलेख

दरवळ (शतशब्दकथा)

किल्ली's picture
किल्ली in जनातलं, मनातलं
13 Feb 2019 - 5:01 pm

“तुझा आवडता perfume कुठला?”
“मी नाही सांगणार, secret आहे.”
“दूरदेशी जातोय, तिथून तुझ्यासाठी सुगंधी भेट आणीन म्हणतो. कधी कधी वाटतं, जाई, जुई, मोगरा, चाफा ही मंडळी नशिबवान आहेत. त्यांना तुझा सहवास कायमच मिळतो. माझ्यामुळे तुझी संध्याकाळ सुगंधी, भारावलेली झाली तर मी कृतार्थ होईन गं!”
तिचे मौन बघून काहीश्या निराशेनेच तो तिथून निघाला.

कथालेख

गेम ऑफ थ्रोन्स पार्श्वभूमी

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
13 Feb 2019 - 4:05 pm

गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात -

वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल .

मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .

कलानाट्यलेख

चंद्रिका

किल्ली's picture
किल्ली in जनातलं, मनातलं
6 Feb 2019 - 3:00 pm

राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती.
"कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला. पण आजचं हिचं रूप जरा सुखावह आहे."मनात विचार भर्रकन येतात ना, तसंच झालं राधिकाला!

kathaaलेख

मैत्र - ५

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
6 Feb 2019 - 12:14 pm

“अगं, किती ओरडशील त्याला? जातोय डॉक्टरकडे आम्ही” बाबा कपडे घालता घालता आईला म्हणाले. पण आईचा राग काही कमी होत नव्हता.
“मला हौस आहे म्हणून चिडलेय मी! ‘जरा सडा घालायचाय, शेण आणून देतो का?’ म्हटलं तर तोंड फिरवून जातो हा. मग आता कशाला गेला होता त्या बैलाची शेपटी ओढायला?” म्हणत आईने ओट्यावर भांडे आदळले.
काळजीपोटी बडबडत असली तरी मला आता वैताग आला होता तिच्या बडबडीचा. “काही होत नाही, जरासं तर लागलय” असं सगळ्यांना सांगता सांगता आता हात चांगलाच दुखायला लागला होता. इन्नीने लावलेल्या चंदनानेही काही फारसा फरक पडला नव्हता. इकडे हात फण फण करत होता आणि तिकडे आई तण तण करत होती.

कथालेख

मैत्र - ४

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
5 Feb 2019 - 10:01 am

ऊद्यापासून ग्रेड परीक्षा असल्यामुळे तिन दिवस कॉलेजला सुट्टी होती. आम्ही सरांकडून लॅबमध्ये काम करायची परवानगी घेवून ठेवली होती, त्यामुळे कंटाळा यायचा फारसा प्रश्न नव्हता. कॉलेज सुटायच्या अगोदर दहा मिनिटे सखाराम सगळ्या वर्गांमधून सर्क्यूलर फिरवून गेला होता. ग्रेड परिक्षा झाल्यानंतर या वर्षीच्या वक्तृत्व स्पर्धा होणार होत्या. विषय होता ‘हुंडा-एक वाईट प्रथा’. त्यामुळे जोशीसर फार उत्साहात होते. विषय लक्षात घेता, मुलिंनी यात खासकरुन भाग घ्यावा अशी त्यांची ईच्छा होती. तरीसुध्दा याही वर्षी कप आमच्याच कॉलेजकडे रहावा म्हणून त्यांनी मला आणि शामला तयारी करायला घरी बोलावले होते.

भाषालेख

क्रश (शतशब्दकथा)

किल्ली's picture
किल्ली in जनातलं, मनातलं
4 Feb 2019 - 6:52 pm

पुर्वप्रकाशित असल्यामुळे स्पर्धेसाठी देता येणार नाही. म्हणून इथेच टाकत आहे, बघा जमलीये का..
सूचनांचे स्वागत आहे :)
--------------------------------------------------------------------------------------------
छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे. फिक्या तरीही फ्रेश रंगाचे फॉर्मल शर्ट, शक्यतो काळ्या रंगाची ट्राऊजर, गळ्यात नाजुकशी चेन, छोटुकले खड्याचे कानातले, महागातलं मेटल घड्याळ, हाय पोनीमध्ये बांधलेले केस आणि बेली शूज अशा पेहरावात येणाऱ्या त्या स्वप्नसुंदरीची छबी डोळ्यात टिपण्यासाठी तो आतुर होत असे.

कथालेख

ग्रीन सिग्नल

किल्ली's picture
किल्ली in जनातलं, मनातलं
4 Feb 2019 - 5:11 pm

एका वर्दळीच्या दिवशी संध्याकाळी ती तिच्या दुचाकीवरून घरी जाण्यास निघाली होती. संध्याकाळ कसली, चांगली रात्रच झाली होती. पण हल्ली तिच्या लेखी ही वेळ म्हणजे संध्याकाळच! घरी जाऊन जेवण केल्यांनतर रात्र होते असं तिने स्वतःच ठरवून टाकलं होतं. दिनक्रम, कामाच्या वेळा तशा होत्या त्याला ती तरी काय करणार. इथलं हेवी ट्रॅफिकही आता अंगवळणी पडलं होतं. विचारात मग्न असलेली ती एक एक चौक मागे टाकत रस्ता कापत घरी जाण्याचे अंतर कमी करत होती. रस्त्यावरून वाहने चालवणार्या प्रत्येकाची घरी जाण्याची घाई पावलोपावली जाणवत होती.

कथालेख