धारदार 'कट्यार'
'कट्यार काळजात घुसली' चित्रपट प्रदर्शित होऊन दीड दोन महिने झाले असतील, फेसबुक आणि वर्तमानपत्रात खूप वाहवा मिळवली, मुख्य नाटक बद्दल काही विशेष माहिती नव्हती आणि हा चित्रपट पाहायचाय ह्यावर दुमत नसल्यानी मी चित्रपट समीक्षा वाचायचे टाळले, आणि आज तो दिवस आला...संगीत-चित्रपट पहायचा आनंद मिळाला, अगदी सुरुवाती पासून शेवट पर्यंत!
तुलनात्मक सांगायचं झालं तर संगीतनाट्या/संगीतनात्या वर आधारित असलेला 'बालगंधर्व' पेक्षा 'कट्यार' जास्त आवडला!सुरुवातीलाच 'कट्यार' आणि 'संगीत' ह्या दोन विभिन्न गोष्टींचा मिलाफ का ह्याचे स्पष्टीकरण असलेला प्रसंग आहे, तिथेच अर्धी बाजी मारली आहे कथानकानी.