लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान हे प्रथमेश परब (आपला टाईमपास मधला दगडू) आणि नवीन तारका मिताली मयेकर यांना नवीन चित्रपटात घेऊन आले आहेत. मराठी चित्रपटाचा जीव म्हणजे "प्रेम" तर यात आहेच पण या बरोबरच मैत्री, कुंभमेळा आणि दहशवाद असल्या पूर्णपणे विरुद्ध कोनी विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो. प्रयत्न चांगला असला तरी प्रेक्षक कितपत स्वीकारतात हे बघणेबल राहील.
विक्रम प्रधान किंवा स्वत: प्रथमेश परब या दोघांपैकी कुणीतरी किंवा दोघेही अजूनही "दगडू" या व्यक्तिरेखेच्या अमलाखालीच असावेत असे वाटते. या चित्रपटातली 'देवा' ची एन्ट्री पासूनच अनेक प्रसंगात दगडूची छाप व्यक्तिरेखेवर अनेकदा जाणवते. दगडू हा जसा टपोरी टाईपचा असामी होता आणि एका ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडून तिला गटवतो असली कहाणी टाईमपास १ आणि २ मध्ये होती आणि अप्रतिम दिग्दर्शन-अभिनय आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे संगीत या पुंजीवर तगून गेली. पण हि किंवा असली कहाणी दर वेळेस प्रथमेश परब सोबत चालून जाइल या गैरसमजाला काय म्हणावं? तरी इथे स्पष्ट उल्लेख कसलाच नाही पण अंगुलीनिर्देश तसल्या प्रकारच्या कहाणीकडे आहे हे कविता लाड आणि मिलिंद पाठक यांच्या व्यक्तिरेखा अनेकदा प्रेक्षकांना जाणवून देतात. अभिनयासाठी उपेंद्र लिमयेंच्या ए सी पी कुलकर्णी या व्यक्तिरेखेचा उल्लेख करावाच लागेल कारण त्यांनी अगदी दमदारपणे एक ATS अधिकारी उभा केलेला आहे जो शून्यातून कथेच्या मूळ कारणाशी पोचतो. भलेही शेवट जरा दुखान्त या सदरात मोडत असला तरी तेथेही प्रेक्षकांची सहानुभूती हि देव म्हणजे मुख्य व्यक्तिरेखेला मिळायला हवी पण घेऊन जातात उपेंद्र लिमये.
मिताली मयेकरचा हा पहिलाच चित्रपट आणि तिला प्रत्येक गोष्टीत लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी इतक्यांदा महत्व दिलेले आहे कि ती कहाणीत नसताना पटकथेचा तोल जातो व कहाणीच भरकटण्याची शक्यता निर्माण होते. यात कोणताही हेतू नसावा हे स्पष्ट आहे पण अजाणतेपणी अस घडलंय खर. देवाची आणि अमृताची जोडी जमणे अन तुटणे या आणि इतक्याच हेतूत कुंभमेळा-दहशतवाद झालंच तर धर्मोल्लेख असल्या अनेक बाबींना विक्रम प्रधान हे स्पर्श करतात. या मागे कथा पुढे जावी इतकाच हेतू असला तरीही इतक्या चित्रविचित्र बाबींचे परस्परसंबंध दाखवताना किंवा चितारताना असे म्हणू विक्रम प्रधान हे शब्दश: अपयशी ठरलेत. या अपयशामागे इतर काहीही नसून चित्रविचित्र बाबींना स्पर्शण्यात सुटलेली कथेवरची पकड इतकेच एक कारण आहे. चिनार-महेश या संगीतकार जोडगोळीचा टाईमपास १ नंतरचा एक उत्तम प्रयत्न असा उर्फिचा उल्लेख करावाच लागेल.
अभिनयात आधीच उल्लेखल्याप्रमाणे दगडू अका प्रथमेश परब आणि अमृता (मिताली मयेकर) या दोघांनीही आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे. मिताली मयेकर चा स्क्रीन प्रेझेन्स हा सुखावह वाटतो. इशकझादे मधल्या परिणीती चोप्राची आठवण करून देते ती कित्येकदा. कारण तो हि अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट असला तरी तिला मुख्य बिंदूपाशी ठेवून तिच्या सभोवती पूर्ण कथा चित्रपटाची फिरली होती इशकझादेत. यशराजचा तो एक माइलस्टोन अशी त्याची ओळख आज असली तरी त्या यशात तिचा सहभाग हा सर्वोच्च होता. हि तुलना करावीशी वाटली कारण अमृताच्या व्यक्तिरेखेलाहि दिग्दर्शकाने तसेच अतिमहत्व दिलेले आहे. इतके कि तिच्या अपघातानंतर कहाणीवरची पकड सुटण्याइतकी ढिली पडते!!
उर्फी हे टायटल का तर नाशिकचा कुंभमेळा अन त्या अनुषंगाने कथेत आलेला एक दहशतवादी हल्ला. त्यात जर मुख्य अभिनेत्याचा समावेश लेखकाला करायचा होता तर आधी त्याचा थोडातरी सहभाग प्रेक्षकांना पाटण्यासारखा दाखवायला नको?? एकदम त्याला आणून काय ते विशद करायला हा हिंदी सिनेमा आहे का? असले अनेक प्रश्न प्रेक्षकांसाठी विक्रम प्रधान सोडतात. याचे उत्तर बघणारे मराठी प्रेक्षक कितपत शोधतात हे बघण्यासारखे असेल
मिताली मयेकर ची मराठी चित्रपटातली एन्ट्री आश्वासक रित्या झालेली आहे. हि कथाच कदाचित तशी असल्यामुळे वाटत असावं कि काय हे नंतर तिच्या पुढील चित्रपटातून कळेलच पण तिच्यासाठी आणि उपेंद्र लिमयेसाठी मी चित्रपटाला 1* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
प्रतिक्रिया
6 Dec 2015 - 8:05 pm | जव्हेरगंज
धन्यवाद!
नाहीच बघणार!!
7 Dec 2015 - 11:24 am | उगा काहितरीच
धन्यवाद पैसे , वेळ वाचवल्याबद्दल !
8 Dec 2015 - 11:05 pm | समीर_happy go lucky
"उगा काहितरीच"
हे तुमचे नाव कि तुमची प्रतिक्रिया?? काही कळेना!!!
10 Dec 2015 - 2:27 pm | उगा काहितरीच
"उगा काहितरीच" हा माझा आयडी! प्रतिक्रिया नाही . काळजी नसावी , धन्यवाद .
9 Dec 2015 - 12:50 am | अभ्या..
अहाहाहा. अप्रतिम परिक्षण, अप्रतिम चित्रपट, अप्रतिम लेखन. वाहवा, मजा आ गया.
9 Dec 2015 - 9:32 am | चौथा कोनाडा
मराठी चित्रपट सरूष्टीचा झेंडा असाच पुढे न्यायचा असेल तर अश्या सिनेमांना टाळून चालणार नाही.
सर्वांनी सिनेमा पहावा व आतआपली वर्गणी जमा
करावी. :-)))
मार्क वाढवायंच तेवडं बगा की !
छान परिक्षण, सुंदर लेखन !
10 Dec 2015 - 8:57 am | नाखु
सुंदर लेखन वाढवायंच तेवडं बगा की !
छान परिक्षण,मार्क १* !
असं का दिसतयं मला??????????
अति अवांतर : चौभौ आलात कुठे गायबला हुता?
11 Dec 2015 - 11:12 pm | चौथा कोनाडा
:-))
नाखुभौ, कंपणीणे आमची पाठवणी मोहीमेवर ठरविली अन अचानक दक्षिणे कडे रवाना केले त्यामुळे मिपा फेर्र्या मर्यादित झाल्यात.
दिवाळीच्या दरम्यान नाखुभौ अन चौकोभौ असा द्विपक्षीय मिपाकट्टा करायचे योजत होतो, पण वेळ कमी पडला, कारण, तातडीने मोहिमेवर परतायचे आदेश आले. आता परत कधीतरी !
ऊर्फीच्या धाग्यावर आमची ८वण काढण्याची ऊर्मि दाखवली त्याबद्दल पेशब ठान्कु .
9 Dec 2015 - 12:33 pm | बोका-ए-आझम
हेतू नसावा आणि महत्व दिलंय ही दोन परस्परविरोधी विधानं नाही वाटत?
परिणिती चोप्राचा पहिला चित्रपट यशराजचाच ' लेडीज व्हर्सेस रिकी बहल ' हा होता. ' इशकजादे ' नायिका म्हणून पहिला चित्रपट होता.
म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? काही समजलं नाही.
9 Dec 2015 - 6:09 pm | कानडाऊ योगेशु
प्रतिसाद देण्याच्या स्टाईलवरुन असे वाटले कि बोकाभाऊ घासुगुर्जींच्या धाग्यावरुन लगोलग इथे आलेत कि काय? ;)
(कृ.ह.घे)
10 Dec 2015 - 10:14 am | बोका-ए-आझम
.
10 Dec 2015 - 1:27 pm | तिमा
चित्रपट जसा असेल तसा. पण पेपरातल्या जाहिरातीत चित्रपटाचे नांव वाचायलाच अतिकष्ट पडावेत वा ते दिसूच नये, असे करण्याचा उद्देश काय ?