जीवनमान

चांगले गुण आणि वाईट गुण

अबोली.'s picture
अबोली. in काथ्याकूट
14 Oct 2014 - 8:29 pm

माझा हा मिसळपाव वरचा पहिलाच लेख.

आपल्या भोवती अनेक माणसे असतात जसे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, सहकारी वगैरे. प्रत्येक माणसाचे काही चांगले गुण आणि काही वाईट गुण असतात. इथे आपण एखाद्या माणसाचे चांगले गुण आणि वाईट गुण यांची यादी करू. त्यातून कदाचित नवीन चांगले गुण कळतील. आणि एखाद्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळेल. आणि वाईट गुण टाळता येतील. माणसाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. नुसत्या गुण दोष चर्चा करूया.

उदाहरणार्थ- चांगले गुण- टापटीप पणा, शिस्त, साधेपणा
वाईट गुण - विचार न करता एकदम बोलणे, टोमणे मारणे वगैरे वगैरे.

क्लास

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
14 Oct 2014 - 10:41 am

प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे.

समाजजीवनमानतंत्रप्रवासविचारलेखअनुभवमत

चूत्झस्पा

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
13 Oct 2014 - 5:08 pm

चूत्झस्पा -
अगदी आत्ता कालपरवा ऐका हिंदी चित्रपटात हा ज्यू बोलीभाषेतून उगम पावलेला हा शब्द ऐकला, चित्रपटातील ऐक पात्र, त्याचा अर्थ समोरच्याला समजवण्यासाठी, ऐक छोटेखानी गोष्ट सांगतो. ऐका मुलावर त्याचा आई- वडीलांच्या हत्येचा आरोप असतो, पण जजसमोर तो दयेची याचना करतो, जज विचारतो कि 'अरे बाबा, तू सख्ख्या आई बापाचा खून केलास, तुझ्यावर कोणी दया का म्हणून दाखवावी ? ', त्यावर तो मुलगा म्हणतो कि 'मी ऐक अनाथ(यतीम) मुलगा झालो आहे म्हणून'

निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
12 Oct 2014 - 10:56 am

निंदकाचे घर असावे शेजारी असे जरी पूर्वजांनी सांगून ठेवले आहे तरी हे निंदक कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला मारक ठरतात. त्यातल्या त्यात जर हे निंदक घराशेजारी नसून जर आपल्या घरातच असतील तर मग पाहायलाच नको.

निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण":
नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात.

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई.

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in जनातलं, मनातलं
11 Oct 2014 - 12:30 pm

कैलाश आणी मलाला,तुमचा अभिमान आहे, नव्हे त्यापेक्षाही वेगळ काही वाटत तुमच्याविषयी, कुठे तरी आशेचा किरण जाणवतोय्,की जगात सगळेच प्रश्न काही तलवारीच्या धारेवर आणी बंदुकीच्या गोळीने सुटत नाहीत्,तुमच्याकडे पाहुन पटतय मला की प्रेमानेही आणी अहिंसेने बरच काही शक्य होते,ज्या सिद्धार्थ गौतमाचे,महात्म्याचे,आणी दिनदुबळ्यांची आई मदर तेरेसाच्या तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या माझ्या भारतभुमीचा उर आज आनंदाने भरुन आला असेल.

समाजजीवनमानविचार

मर्डर ऑनलाईन

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
9 Oct 2014 - 12:42 pm

यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत ,
पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर

अमित खोजे's picture
अमित खोजे in जनातलं, मनातलं
9 Oct 2014 - 7:56 am

या पूर्वी . . .

आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट

कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला.

जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)!

समाजजीवनमानअर्थव्यवहारमाहितीसंदर्भ

पेट्रोलपंपवाल्यांची चालुगिरी

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in काथ्याकूट
8 Oct 2014 - 5:54 pm

काही महीन्यांपूर्वी पौड रोड,पुणे (दशभुजा गणपती ते चांदणी चौकापर्यंत) येथील एकमेव पेट्रोलपंप श्रीमती अनघा घैसास या धाडसी महिलेने केलेल्या तक्रारीमुळे बंद पडला.अजुनही तो बंदच आहे.
अनघा यांनी आपल्या कारमध्ये पेट्रोल भरले आणि त्यात हातचलाखी केल्याचा त्यांना संशय आला. केवळ तिथल्या कर्मचार्‍यांशी वाद घालुन न थांबता त्यांनी भारत पेट्रोलियम कंपनी व पोलिसांकडे तक्रार केली. ईतकेच नाही तर त्याचा पाठ्पुरावा केला आणि पंप बंद करण्यात यश मिळवले.त्यांना अनेक प्रकारच्या धमक्याही आल्या असतील किंवा अजुनही येत असतील. त्यामुळेच त्यांच्या धाडसाला सलाम.

मी लोकलयात्री

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
8 Oct 2014 - 4:34 pm

मी लोकलयात्री

स्टेशनावरी उभा ठाकतो
ट्रेनागमना पुढे वाकतो
युद्धासाठी सज्ज जाहतो
मी लोकलयात्री

गर्दी बघता चमकून जातो
तरीही क्षणात मी सावरतो
मग अंगीचे बळ जागवतो
मी लोकलयात्री

बसण्या जागा मृगजळ जरी
उभे रहाण्याचे बळ जरी
ट्रेन रिकामी बघून हर्षतो
मी लोकलयात्री

एकच गलका उडे क्षणातच
कुणी कधीचे कुठे क्षणातच
मेंढरापरी गर्दीत घुसतो
मी लोकलयात्री

नवे चेहरे रोज पुढ्यात
नवे वास मम नाकपुड्यात
रोज नव्याशी जुळवून घेतो
मी लोकलयात्री

हास्यवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसकवितासमाजजीवनमानतंत्र