जीवनमान

खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
14 Nov 2014 - 3:07 pm

'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच.

माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता.

तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे.

एकटेपणा

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
13 Nov 2014 - 9:35 am

एकटेपणा
आपल्या आयुष्यात, आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. काही संस्कार, परंपरा यातून काही अंगवळणी पडलेल्या असतात. अशाच गोष्टी, प्रसंग यांचा अन्वयार्थ शोधणारं हे नवं सदर… आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा…

जीवनमानलेख

सत्यनारायण पूजा:

वगिश's picture
वगिश in काथ्याकूट
12 Nov 2014 - 9:17 pm

सत्यनारायण पूजा:

मी मिपा वर नविन आहे.येथे असलेले लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचून माझे शंकानिरिसन होईल असे वाटते.

काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली.
पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.

ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?

घालीन लोटांगण

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
12 Nov 2014 - 9:35 am

कलमनामा – ३१/०८/२०१४ – लेख १ - घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदीनं चरण,

डोळ्यांनी पाहिन रूप तुझे,

प्रेमे आलिंगन आनंदे पूजन,

भावे ओवाळीन म्हणे नामा

जीवनमानलेख

इंटरस्टेलारच्या निमित्ताने...

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जनातलं, मनातलं
11 Nov 2014 - 7:05 pm

इंटरस्टेलार हा मी भारतातील थियेटरला पाहिलेला पहिला इंग्रजी चित्रपट.

एका हॉलीवूड चित्रपटवेडया मिपाकर मित्राच्या आग्रहास्तव त्याच्या सोबत हा चित्रपट पाहायला गेलो. इंग्रजी चित्रपटातील उच्चार कळत नसल्यामुळे चित्रपट कितपत समजेल याबद्दल साशंक होतो. मात्र चित्रपट सुरु होताच पडद्याच्या खालच्या बाजूला इंग्रजी सब टायटल्स दिसू लागली आणि मी निश्चिंत झालो.

चित्रपट अतिशय सुंदर असल्यामुळे नजर पडद्यावर खिळली होती. काही प्रसंग अक्षरशः श्वास रोखून धरायला लावत होते.

जीवनमानमाहिती

सार्वजनिक स्वच्छता: आधी स्वतःकडे बघा

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in काथ्याकूट
31 Oct 2014 - 7:20 pm

आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या पुढाकाराने 'स्वच्छ भारत अभियान' सुरु झाले. साक्षात पंतप्रधानांनी हातात झाडू घेउन रस्ता झाडला आणि इतरांना उदाहरण घालून दिले.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
31 Oct 2014 - 1:03 pm
कलाजीवनमानतंत्रछायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनसद्भावनाशुभेच्छाआस्वादप्रतिभा

काही असे लोका नावडे...पण मज गमते मनोहर...

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
29 Oct 2014 - 2:47 pm

आजची (पुण्यातली) सकाळ मस्त आहे. हवेत सुखद गारवा आहे; कोवळे-कोवळे ऊन थंडीची लज्जत आणखी वाढवतेय. आज कार्यालयात कामदेखील कमी आहे. सकाळी कंपनीच्या बसमधून कार्यालयात येतांना 'आशिकी'चे "मेरा दिल तेरे लिये, धडकता हैं..." ऐकले. मस्त वाटले. या गाण्याचा ठेका मला खूप आवडतो. एकदम शाळेतल्या वयात गेल्यासारखे वाटले. दिल बाग बाग हो गया. नंतर एकदम "तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे..." वर उडी मारली. अल्ताफ राजाचा तो निराकार आवाज ऐकून कॉलेजचे दिवस आठवले. मध्येच मला बायकोचा फोन आला. मी असा गाण्यांमध्ये रममाण झालेला असतांना तिचा फोन हमखास येतो.

समाजजीवनमानप्रकटनमत

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
28 Oct 2014 - 11:45 am

"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता.

भाषासमाजजीवनमानप्रकटनविचारलेखमत