छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
31 Oct 2014 - 1:03 pm

http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931

********************************************

नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा! मग तो उत्सव एका पणतीचा असेल किंवा लखलखत्या रोषणाईचा, किंवा आकाशातल्या नैसर्गिक रोषणाईचा. 'प्रकाश उत्सव' ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात तर इथे!

प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. बर्‍याच जणांच्या विनंतीवरून ही मुदत ७ ऐवजी १५ दिवस करत आहोत. इतर सर्व नियम मात्र दुसर्‍या आणि तिसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील!

सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

कलाजीवनमानतंत्रछायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनसद्भावनाशुभेच्छाआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Oct 2014 - 1:13 pm | माम्लेदारचा पन्खा

विस्मरण झालंय.....जरा लिंक द्याल का कोणी?

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2014 - 11:58 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या वर्षी आमच्या ओळखीच्या मिश्र (भारतीय पती, अमेरिकन पत्नी) जोडप्याकडे थँक्सगिविंग डिनरला गेलो होतो. कॅंडल लाइट डिनरसाठीची सुंदर सजावट होती. त्यावेळी काढलेला हा फोटो.

Light photo DSC06233_zpse38f803c.jpg

EXIF Details: Sony Nex5N; F/5.6; 1/100

फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही.
फोटो मोठ्या आकारमानात बघायचा असल्यास कृपया चित्रावर क्लिक करावे.
माझ्या छायाचित्रणात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

स्पा's picture

3 Nov 2014 - 10:43 am | स्पा

सुरेखच आलाय फोटु

काव्यान्जलि's picture

1 Nov 2014 - 10:48 am | काव्यान्जलि

लक्ष्मी पूजना दिवशी काढलेला फोटो...
उत्सव प्रकाशाचा....

Exif Details : Canon EOS 600D
Lens- 18-55
Stutter speed - 1/15s
Aperture - f/5.6
ISO 1250

फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही.

स्पा's picture

3 Nov 2014 - 10:43 am | स्पा

झकासच

मोहन's picture

1 Nov 2014 - 12:26 pm | मोहन

जयपूरला कुठे ते आठवत नीही
Utsav - जयपूर

Exif Details - Canon EOS 1000 , Lens : 18-55
Exposure 1/6 , Focal Length - 18 mm
f/3.6
ISO 800

(संपादन : चित्र पानावर नीट दिसावे यासाठी त्याचा आकार योग्य तेवढा कमी केला आहे.)

स्पा's picture

3 Nov 2014 - 10:44 am | स्पा

सहिच रे
पाण्यात पडलेलं प्रतिबिंब मस्तच दिसतंय

temple
मोठे छायाचीत्त्र पाहण्या करीता फोटो क्लिक करा
Canon EOS 600D
Focal Length: 18 mm
Aperture: 7.6
Exposure: 1/250
ISO:100
पोस्ट प्रोसेसिंग केले आहे

मी जर चुकत नसेल तर हे सासवडचे संगमेश्वर मंदिर आहे. १३ व्या शतकातले, यादवकालीन. कळस मात्र नंतर जीर्णोद्धारीत केलेला. टिपिकल पेशवेकालीन शैली.

खोंड's picture

1 Nov 2014 - 3:29 pm | खोंड

अंदाज थोडासा चुकला …
हे सासवड जवळील ऐतिहासिक हिवरे गावातील शंकराचेच मंदिर आहे. फक्त २ कि मी लांब असेल.
हे मंदिर पांडवकालीन आहे. कऱ्हा नदीवर अशी बरीच सुंदर शंकराची मंदिर आहेत उदाहरणार्थ संगमेश्वर, वटेश्वर, सिद्धेश्वर, पांडेश्वर … इ.
या बद्दल एक आख्यायिका आहे.
जेंव्हा या भागात पांडवांचा वास होता तेंव्हा त्यांनी महायज्ञ करायचे ठरवले आणि त्या साठी ब्र्म्हदेवाला आमंत्रित करायचे होते.
त्यांना बोलवायचं काम भिमाकडे होते. ब्र्म्हदेव तेंव्हा तपस्चर्या करत होते.
त्यांना जागे करण्यासाठी भीमाने त्यांच्या डोक्यावर कमंडलू उपडा केला आणि त्या पाण्यातून कऱ्हा नदीचा उगम झाला .
तपश्चर्या भंग केली म्हणून ब्र्म्हदेव भीमच्या मागे लागले. जसे ब्र्म्हदेव जवळ येत तसा भीम एक शंकराची पिंड बनवत असे.
ब्र्म्हदेव शंकराचे भक्त असल्याने पूजा न करता त्यांना पुढे जाता येत नसे.
याच पिंडींवर नंतर पांडवांनी मंदिरं बांधली. सगळी मंदीरं प्रत्येकी एका रात्री बांधली असं म्हणतात.
या मंदिरामध्ये प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एका शिलेमध्ये ५ अगदी गोलाकार अशी भोक आहेत. ती पांडवांची खून आहे अस म्हणतात.
या मंदिराला एक दगडी गच्ची देखील आहे. हे छायाचित्तर गच्चीवरूनच काढले आहे.

ही सर्व मंदिरे पाहिली आहेत.
बाकी ह्या आख्यायिकांची नेहमीच मोठी गंमत वाटते.

तुषार काळभोर's picture

21 Nov 2014 - 12:13 pm | तुषार काळभोर

हे तर आमच्या आजोळचे मंदीर!
शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीचे कैक दिवस या मंदीरात घालवलेत. आवारात, सभागॄहात, गच्चीवर...

(अवांतरः हे मंदीर ओढ्याच्या पलिकडे आहे. ओढ्याच्या अलिकडे एक म्हसोबाचेदेखील मंदीर आहे. त्यात ९-१० फूट उंच शीळा आहे, ज्याची म्हसोबा म्हणून पूजा केली जाते. हिवर्‍याची यात्रा याच म्हसोबाची यात्रा असते.)

जयंत कुलकर्णी's picture

1 Nov 2014 - 4:58 pm | जयंत कुलकर्णी

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

चिगो's picture

2 Nov 2014 - 11:07 am | चिगो

हा घ्या आमचा उजेड.. ;-)
a

चिगोचे फोटो नेहमीच खास असतात.

चिगो's picture

2 Nov 2014 - 11:10 am | चिगो

हा स्पर्धेसाठी नाही.. सहज टाकलाय. चालत नसल्यास उडवावा, ही विनंती..

b

पैसा's picture

2 Nov 2014 - 12:34 pm | पैसा

1

*****

2

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Nov 2014 - 3:28 pm | माम्लेदारचा पन्खा

EXIF not available-photo taken from mobile camera

घरची दीपमाळ.....मोबाईलमधे घेतलेले छायाचित्र.....

कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही..........

स्पा's picture

3 Nov 2014 - 10:55 am | स्पा

स्पर्धेला परफेक्ट बसणारा फोटू वाटतोय मला
अप्रतिम आलाय

काल कमला नेहरु पार्क { मलबार हिल} इथुन { जिथे म्हातारीचा बूट आहे } सैफी हॉस्पिटल पासुन दिसणारा क्वीन्स नेकलेस {मरीन ड्राइव्ह } टिपला... बरीच कसरत आणि सेटींग्स चे प्रयोग करुन फोटो काढले. त्यातला एक इथे देतो आहे.

Queen's Necklace
फोटोत डाविकडे जी वास्तु दिसते आहे ते सैफी हॉस्पिटल आहे, झूम करुन ती बिल्डींग नक्की कशी दिसते ते खालील फोटोत कळेल. { फक्त १ फोटो देण्याचा नियम अर्थातच लक्षात आहे, फक्त ती वास्तु कशी दिसते त्यासाठीच खालचा फोटो दिला आहे,स्पर्धेसाठी वरचाच फोटो धरला जावा.}
सैफी हॉस्पिटल :-
 SAIFEE HOSPITAL

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIC sells Rs 7,700 crore shares in 14 Sensex companies, ups stake in 10

मला खालचाच फोटो आवडला जास्त :)

वरचा फोटो तांत्रिक दॄष्ट्या मला काढायला कठीण गेला, मी ट्रायपॉडचा वापर केला नाही. तर जे लोखंडाचे सुरक्षतेचे कठडे आहेत {ज्यावर कॅमॅरा न हलता सरळ राहुच शकणार नाही असा} त्यावर ठेवुन काढला आहे. अनेक लोक तिथे येतात, त्यामुळे तशी गर्दी तिथे असतेच. त्यात आपल्या इथे जर लोक रस्त्यावर चालताना बागेत चालल्या सारखे चालतात, तर बागेत कसे चालत असतील याचा अंदाज केलेला बरा ! ;) बरं लोकांना आपण काही आदेश देउ शकत नाही, की ओ... ओ... अहो मी फोटो काढतो आहे मधे येउ नका. लोक तर असेही पाहिले आहेत, तुम्ही फोटो काढत असाल तर मुद्दामुन समोर येउन उभे राहतील. :) असो... तर अनेकांचे धक्के बसले ! :) त्यामुळे अनेक क्लीक्स वायाच गेले. आता तो लोखंडी कठडा ज्यावर ठेवुन { खरं तर नुसता टेकु देउन ठेवणे अधिक योग्य वाटेल} मी हा फोटो काढला तो तुमच्या सुरक्षतेसाठी { हो कॅमेरा ठेवण्यासाठीही तो नाही हे मला ठावुक आहे. ;) } आहे, पण अगदी डब्लु डब्लु एफच्या रिंगणात कसे दोरांवर कसे आदळतात, तसे धावत येउन आदळणारेही नग असतात. हल्ली सफ्लीच वेड आहे, प्रत्येक जण त्या लोखंडी कठण्याला टेकुन फोटो काठतात, त्यामुळे त्या कठड्यात मस्त कंपने येतात ! :) अश्या कठड्यावर ठेवुन सुद्धा ब्लर न होता फोटो आला,शिवाय एवढ्या अंधारात हे सगळं करण अधीक कठीण होत. त्यामुळे मी तो फोटो दिला आहे. झूम फोटो त्यामानाने मला काढायला सोपा वाटला.

पद्मावतीच्या देवळात देवीसमोर तिन्हीसांजेला एका दगडीत लागलेला दिवा

fgf

चिगो's picture

7 Nov 2014 - 9:37 am | चिगो

खुपच सुंदर.. अत्यंत मंगल तरीही अत्यंत गुढ असं काहीसं फिलींग देणारा फोटो.. तुझी "फोटोजेनिक" नजर अत्यंत जबरा आहे, स्पा..

वेल्लाभट's picture

3 Nov 2014 - 12:58 pm | वेल्लाभट

जबरदस्त क्लिक !

वेल्लाभट's picture

3 Nov 2014 - 1:00 pm | वेल्लाभट

सगळेच!

माझी एंट्री - कारंज्याच्या तुषारांनी तयार झालेले इंद्रधनुष्य!
स्थळ : फिलाडेल्फिया झू, फिलाडेल्फिया
काळ : २०१० मधे कधी तरी

Image

पैसा's picture

6 Nov 2014 - 3:09 pm | पैसा

प्रकाशाचा आणि पाण्याच्या थेंबांचा खेळ!

किसन शिंदे's picture

3 Nov 2014 - 6:35 pm | किसन शिंदे

1

सूड's picture

3 Nov 2014 - 8:43 pm | सूड

एकच नंबर !!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2014 - 6:55 am | अत्रुप्त आत्मा

किसन्देव ... लै भारी फोटू!

चिगो's picture

7 Nov 2014 - 9:34 am | चिगो

लैच जबरदस्त, किसनदेवा.. ह्या अश्या फोटोजसाठीतरी 'फटाकेमुक्त दिवाळी' नसावी, असं वाटतं..

असंका's picture

7 Nov 2014 - 6:31 pm | असंका

सुरेख!

प्रचेतस's picture

3 Nov 2014 - 9:47 pm | प्रचेतस

कॅमेरा - कॅनन ५०० डी
फोकल लेन्ग्थ - ५५ मीमी
ऑपरेटिव्ह मोड - मॅन्युअल
एक्स्पोजर - ५ सेकंद
अ‍ॅपर्चर - f/10
मिटरींग - इवॅल्युअ‍ॅटिव
आएसओ - १००

a

प्रचेतस's picture

3 Nov 2014 - 9:52 pm | प्रचेतस

स्पर्धेसाठी नाही

माझं भुलेश्वर

a

एस's picture

4 Nov 2014 - 12:15 am | एस

पोस्टप्रोसेसिंगमध्ये ब्लू चॅनेल सिलेक्ट करून थोडासा ब्लू कास्ट कमी करून पहा. अजून परिणाम छान दिसेल. फ्रेमिंग असं का घेतलं असावं असा विचार करतो आहे.

प्रचेतस's picture

4 Nov 2014 - 8:52 am | प्रचेतस

पोस्ट प्रोसेसिंग कॉन्ट्रास्ट कमी जास्त करण्यापलीकडे येतंच नाही. तुमच्या पोस्ट प्रोसेसिंगवरील लेखाची अजूनही वाट पाहतो आहे.

फ्रेमिंग असं घेण्याचा काही विचार नव्हता. फक्त मूर्तीवर एकाच बाजूने प्रकाश पडला होता आणि अर्धी बाजू अंधारात पूर्ण बुडून गेली होती त्याच वेळी हा फोटो क्लिकवला.

खटपट्या's picture

4 Nov 2014 - 12:18 am | खटपट्या

सगळे फोटो जबरा आले आहेत.

एस's picture

4 Nov 2014 - 12:20 am | एस

सर्वच छायाचित्रे एक से बढकर एक आहेत. खूपच छान!

अवांतर - पोस्टप्रोसेसिंग केलेले नाही असे बर्‍याचजणांनी मुद्दाम सांगितले आहे. का बरे केलेले नाही? ;-)

श्रीरंग_जोशी's picture

4 Nov 2014 - 1:18 am | श्रीरंग_जोशी

पोस्टप्रोसेसिंग करणे जमत नाही. फार पूर्वी शिकत असताना फोटो इम्पॅक्ट नावाचे टूल थोडेबहुत वापरले होते.
अमेरिकेत राहून नव्याने फोटोशॉप वगैरे शिकायचे असेल तर पहिले ते विकत घ्यावे लागेल.
त्यामुळे आधिच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी अवस्था आहे :-) .

कवितानागेश's picture

4 Nov 2014 - 8:24 am | कवितानागेश

मस्त आलेत सगळेच फोटो.

१) फारसे जमत नाही :P
२) फोटो चांगला येणं महत्वाचं आहे असं वाटत. पोस्ट प्रोसेसिंग मुळे फोटोग्राफरचे खरे स्किल्स लपवले जातात. (असं वाटणं कदाचित पोस्ट प्रोसेसिंग येत नाही म्हणूनच असावं.) पण आधी, बरे फोटो काढायला शिकायाचेत. मग प्रोसेसिंग !!

चौकटराजा's picture

6 Nov 2014 - 5:18 pm | चौकटराजा

२) फोटो चांगला येणं महत्वाचं आहे असं वाटत.
मुळात आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण कॅमेर्‍यातील अनेक तांत्रिक गोष्टींचा वापर करूनच फोटो घेत असतो.माझा अनुभव असा आहे की पोस्ट प्रोसेसिंगने फोटो अमुलाग्र बदलता येतो. विशेषत: फोटोतील छायाप्रकाशात एक प्रकारचा स्निग्धपणा आणता येतो. ( लेव्हल करेक्शन) कलर कास्ट दूर करता येतो.( कलर बॅलन्स) एकूण फोटोतील सर्वसाधारण प्रकाश वाढवता वा कमी करता येतो. ( एक्स्पोझर करेक्शन) .फोटोशॉप ला पर्याय म्हणून असणारी ओपन सोर्स
सॉफ्टवेअर ही हे काम करतात. व हे शिकायला अर्धा तास पुरे. सबब फोटो करेक्शनने फोटोतील मजाच निघून जाते हे म्हणणं युक्त नाही. खरा फोटोग्राफर तोच जो कोणताही प्रगत कॅमेरा न वापरता ( आयसोली टाईप) उत्तम फोटो काढतो बाकी आपण बहुतेक जण तंत्राचेच गुलाम असतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2014 - 11:28 am | डॉ सुहास म्हात्रे

@ स्वॅप्सः

लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग काय आस्तंय ते तेच्यावर एक लेख :)

(नुसता कॅमेर्‍यात पाहून किलिक कर्नारा छायाचित्र-आशिक्शित बिगारी फटुग्रापर) इए

लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग काय आस्तंय ते तेच्यावर एक लेख
हेच म्हणतो. :)
मी आता सगळे फोटो रॉ फॉरमॅट मधेच काढत असल्याने पोस्ट प्रोसेसिंग करतोच. {पुर्वी पोस्ट-प्रोसेसिंगला माझा विरोध होता कारण आपण स्वतःच फोटो असे काढावेत की त्याची गऱज पडु नये असा माझा विचार होता. मग हळुहळु रॉ फॉरमॅटवर स्वीच झाल्यावर पोस्ट प्रोसेसिंगचे महत्व कळले आणि पटले देखील.} प्रत्येकाची स्वतःची आवड आणि कौशल्य जसे असते त्या प्रमाणे फोटो प्रोसेस केलेले दिसतात.तरी सुद्धा अती प्रोसेसिंग टाळावे, कारण मग मूळ प्रकाशचित्रातली मजा निघुन जाउन फक्त पोस्ट-प्रोसेसिंगच नजरेला दिसते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }

एस's picture

4 Nov 2014 - 1:28 pm | एस

अती प्रोसेसिंग टाळावे, कारण मग मूळ प्रकाशचित्रातली मजा निघुन जाउन फक्त पोस्ट-प्रोसेसिंगच नजरेला दिसते.

पोस्टप्रोसेसिंग आणि एडिटिंग असा तो फरक आहे. अर्थात काय किती प्रमाणात चांगलं हे फारच सब्जेक्टिव आहे. लेख लिहायला बराच वेळ लागेल अजून. पूर्वतयारीत मग्न आहे.

बादवे, त्यासाठी महागडी सॉफ्टवेअर घेण्याची सध्या गरज नाही. तुम्ही गिम्प सारख्या किंवा फास्टस्टोनसारख्या चकटफू गोष्टी वापरू शकता. बेसिक तत्त्वे एकदा समजली की मग तांत्रिक बाजूंचा विचार करू शकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2014 - 2:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

IMG_20141010_215851

कोणतीही प्रोसेसींग नाही.

मोबाईलफोन lava iris x5
(सुनील बिरुटे)

-दिलीप बिरुटे

विलासराव's picture

4 Nov 2014 - 8:26 pm | विलासराव

1

हा स्पर्धेसाठी नाही:
2

विलासराव's picture

5 Nov 2014 - 10:01 am | विलासराव

पहिला स्पर्धेसाठी आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2014 - 11:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पर्धेकरिता नाही...

दुबईतील बूर्ज खलिफावरील नविन वर्ष २०१४ ची रोषणाई (जालावरून)...

स्पंदना's picture

5 Nov 2014 - 6:45 am | स्पंदना

सुरेख फोटोज.
स्वॅप्स आणि मबां मुले बरीच माहिती मिळते आहे.
स्पाचा फोटो अतिशय भारी.

अनुरोध's picture

5 Nov 2014 - 3:12 pm | अनुरोध

२०१२ च्या दस-याला औरंगाबाद येथे रावण दहनाच्या संन्धेला काढला आहे हा फोटो.
स्पर्धेत फोटो पाठवण्याचि माझी तशी पहिलिच वेळ....

..

जाता जाता:- स्पा रावांचा फोटो एकदम खत्रुड आहे..... Smile

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2014 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो दिसत नाही.

शेवटचा फोटू अनुरोध यांचा दिसत नाहीये. बाकीच्यांचे ग्रेट आलेत.
मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं?

विलासराव's picture

5 Nov 2014 - 11:35 pm | विलासराव

मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं?

मी तिथे जवळच रहात होतो. एकदा माझ्या एका मित्राला मी गमतीने ते ताज हॉटेल आहे असे सांगीतले. त्याने ताज पाहीले नसल्याने ते त्याला खरंच वाटले होते.

आनी दुसर्या एका मिपाकराने तर मला मरायला हेच हॉस्पीटल आवडेल असे सांगीतले होते.

मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं?
जल्ला आपल्या काय बी माहित नाही ! ;) मी इथुन बर्‍याच वेळा गेलो आहे,हॉस्पिटल जबरदस्त दिसते ! समोर अरबी समुद्र आहे, त्यामुळे सी-व्हू असणारे हॉस्पिटल झगमगाट असणारे असणारच ! ;)

@विलासराव :-
मी तिथे जवळच रहात होतो.
फोटु पाहुन जिथुन काढला आहे त्याची कल्पना तुम्हाला चांगलीच आली असावी आता... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naik

विलासराव's picture

6 Nov 2014 - 11:15 am | विलासराव

फोटु पाहुन जिथुन काढला आहे त्याची कल्पना तुम्हाला चांगलीच आली असावी आता... Smile

य्य्स सर!!!

कपिलमुनी's picture

6 Nov 2014 - 4:36 pm | कपिलमुनी

diwali

मोहनराव's picture

6 Nov 2014 - 5:43 pm | मोहनराव

Paris, Louvre Museum

मोहनराव's picture

6 Nov 2014 - 5:46 pm | मोहनराव

निकॉन ५१००
स्थळ : Paris Louvre Museum

प्रचेतस's picture

7 Nov 2014 - 7:10 pm | प्रचेतस

अप्रतिम.
हे असे लुव्र 'दा विंची कोड' ह्या चित्रपटात पाहिले होते.

इशा१२३'s picture

6 Nov 2014 - 10:24 pm | इशा१२३

p
पिचोला लेक उदयपुरला संध्याकाळी बोटींग करताना टिपलेला भव्य जगतमंदिर पॅलेसचा प्रकाशोत्सव...
नुकताच सुर्यास्त झाल्याने निळसर आकाश आणि निळ्या पाण्यावर रोषणाईचे प्रतिबिंब रम्य दिसत होते.

मोहन's picture

6 Nov 2014 - 10:34 pm | मोहन

फारच छान !

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2014 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

शांघाई बंडच्या रात्रीच्या सफरीत होणारे शांघाईचे लोभसवाणे दर्शन...

.

.

प्रचेतस's picture

7 Nov 2014 - 7:09 pm | प्रचेतस

क्या बात है.
सुरेख फोटो.

अगदी माझ्या मनातली कल्पना!! हाच प्रकाशाचा उत्सव!!!

खटपट्या's picture

6 Nov 2014 - 11:58 pm | खटपट्या

काय सालं फोटू हत !! माका बी शिकूक व्हयी ही कला !!

नन्दादीप's picture

7 Nov 2014 - 11:40 am | नन्दादीप

clouds

अबोली२१५'s picture

7 Nov 2014 - 3:27 pm | अबोली२१५

kandilgalli

चौकटराजा's picture

10 Nov 2014 - 5:40 am | चौकटराजा

फार स्पष्ट व सुंदर !!

anandphadke's picture

7 Nov 2014 - 6:17 pm | anandphadke

स्वता भोवती गिरकी घेणरा नर्तक

आदूबाळ's picture

7 Nov 2014 - 7:07 pm | आदूबाळ

मिडसमर नाईट्स ड्रीम

a

लायडेन या हॉलंडमधल्या टुमदार गावातल्या कॅनॉलवरच्या पुलावरून काढलेला फोटो. (वेळ रात्री १०:३०)

मस्तानी's picture

8 Nov 2014 - 6:04 am | मस्तानी

काळी रात्र उलटून सोनेरी सकाळ होताना अगदी काही क्षणापुरतं दिसलेल अदभुत

स्थळ : मिशिगन
दिनांक : ०७/११/२०१४

Sunrise Nov. 7, 2014

मस्तानी's picture

8 Nov 2014 - 6:09 am | मस्तानी

( information as per the file data from Google Photo album, no processing at all)

Camera COOLPIX S9100
Lens -
Focal Length 52.6mm
Exposure 1/400
F Number f/5.3
ISO 160
Camera make NIKON

मधुरा देशपांडे's picture

8 Nov 2014 - 9:10 pm | मधुरा देशपांडे

आयफेल टॉवर - रात्रीच्या अंधारात दर तासाला पाच मिनिटांसाठी चमचमणारे २०००० फ्लॅशिंग लाईट्स आणि लेझर बीम ने आसमंत उजळुन निघतो.

https://lh6.googleusercontent.com/-xLdLdZW_hyM/VF41sAV7itI/AAAAAAAAD90/lsZxw3tEO6Y/w385-h577-no/DSC_0907.JPG

NIKON D3100
Focal Length: 35 mm
Exposure: 1/13
ISO: 3200
F Number: f/5

मदनबाण's picture

8 Nov 2014 - 9:22 pm | मदनबाण

अरे वा.... :)
सुरेख फोटो पहायला मिळत आहेत. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official Video

मदनबाण's picture

8 Nov 2014 - 9:48 pm | मदनबाण

जरासे अवांतर :-
फटाक्यांचे आतिशबाजीचे होटो पाहुन मी मध्यंतरी पाहिलेला एक व्हिडीयो पाहिला होता तो आठवला... तो व्हिडीयो बर्‍यापैकी व्ह्यायरल झाला होता.
कोणता ? तर ड्रोनचा वापर करुन शुट केलेली फटाक्यांची आतिशबाजी. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official Video

मेघनाद's picture

8 Nov 2014 - 11:06 pm | मेघनाद

आजवर झालेल्या स्पर्धांमध्ये माझी पहिलीच प्रवेशिका आहे. खाली दिलेली छायाचित्र माइक्रोमैक्स मोबिल कॅमेरा मध्ये टिपलेली आहेत.
सर्व छायाचित्र विरंगुळा म्हणून टिपलेली आहेत. मोबाईल मध्ये टिपलेली छायाचित्र असल्याने स्पर्धेसाठी पात्र नसल्यास रसिकांना पाहण्यासाठी डकवली आहेत.

सर्व छायाचित्र ऑटो ट्युन केलेली आहेत.

१. पणती

पणती

२. निरांजने

निरांजने

३. सूर्यास्त

सूर्यास्त

४. विजेचा दिवा

विजेचा दिवा

गुणोत्तरे निट न जमल्यामुळे छायाचित्रांची थोडी खेचाखेच झाली आहे तरी क्षमा असावी.

.......................................................................................................

ह्या पूर्वी देखील मी माझी निवडक छायाचित्रे दोन भागात प्रकाशित केली होति.
कोणी रसिक भेट देऊ इच्छित असल्यास खालील दुव्यावर टीचकी मारावी.

फावल्या वेळेतली फोटोग्राफी….

फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २

वेल्लाभट's picture

9 Nov 2014 - 3:20 pm | वेल्लाभट

A
Canon PowerShot SX220 HS
एफ ४ १/५० आयएसओ १००० -०.३
फोकल लेन्ग्थ १२ एम एम

चौकटराजा's picture

10 Nov 2014 - 5:39 am | चौकटराजा

ह्यो फटू माला सम्द्यात आवाल्डा !

चिगो's picture

11 Nov 2014 - 1:13 pm | चिगो

क्या बात है.. लै भारी फटू..

नूतन's picture

11 Nov 2014 - 7:26 pm | नूतन

आवडला

त्रिवेणी's picture

10 Nov 2014 - 2:37 pm | त्रिवेणी

m

सानिकास्वप्निल's picture

10 Nov 2014 - 9:39 pm | सानिकास्वप्निल

शेफिल्ड रेल्वे स्थानकाबाहेरची रोषणाई

.

हुकुमीएक्का's picture

10 Nov 2014 - 10:56 pm | हुकुमीएक्का

सर्वच फोटो अतिशय सुंदर आहेत. तरीपण मला आवडलेले काही फोटोज ...

श्रीरंग_जोशी - कँडल फोटो.
खोंड - शंकराच्या मंदिराचा फोटो.
पैसा - क्र. २ चा फोटो.
मदनबाण - क्र. २ चा फोटो.
स्पा - पद्मावतीच्या देवळातील फोटो.
किसन शिंदे - दिवाळीतील चक्राचा फोटो. +१ (हा फोटो पाहिल्यावर आकाशगंगा आणि तारकापुंज यांची आठवण होते.)
वल्ली - Crackers फोटो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - पणतीचा फोटो. ( background ब्लॅक ठेवला असता तर अजून छान वाटला असता.)
विलासराव - क्र. १ चा फोटो.
नन्दादीप - ढगाचा फोटो.
अबोली२१५ - आकाशकंदिलांचा फोटो.
anandphadke - लाइट फोटोग्राफी . +१
मस्तानी - सुर्योदयाचा फोटो.
मीता - Crackers फोटो.
मधुरा देशपांडे - आयफेल टॉवर.
मेघनाद - क्र २ चा फोटो.
वेल्लाभट - सुंदर लाइट इफेक्ट. +१

सगळेच फोटो मस्त आहेत. पण मतं द्यायची तारीख कधी?

हुकुमीएक्का's picture

11 Nov 2014 - 10:04 pm | हुकुमीएक्का

ते बाकी बरोबर. बरेच दिवसांनी मि. पा. वर आलोय. त्यामूळे उशीर!

संगणकावरील छायाचित्र कसे अपलोड करायचे

किल्लेदार's picture

13 Nov 2014 - 10:53 pm | किल्लेदार

रायरेश्वर येथे सकाळी पाहिलेला प्रकाशाचा उत्सव

Raireshawar 030