जीवनमान
'ती' कोमातून बाहेर आली
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.
या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.
आजार!
आजार
हल्ली मनोविकारांवर काही वाचन झाले. ज्या रोगाचे हजारात निदान ७ जण बळी अहेत, अश्या एका कष्ट्साध्य रोगाबद्दल काही विशेष मुद्देसूद माहिती मिळाली. त्या निमित्ताने हे प्रकटन.
जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही.
प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती.
शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती)
जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन.
भारतीय स्वतंत्रता वाटचाल... एक शोध
उद्या स्वातंत्र्यदिन. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली. एकूणच या ६७ वर्षात आपण काय केले, मिळवले, गमावले याचा हा एक सहज आढावा.
मिळवले :
१. तंत्रज्ञान प्रगती
यंत्रसामुग्री, संवादमाध्यमे, अभियांत्रिकी इ. क्षेत्रात गेल्या ६७ वर्षात भरीव कामे झाली आहेत. त्यामुळे राहणीमानाच्या दर्जातही सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानात आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत. टेलिफोन वापरामध्ये आपण जगात नवव्या क्रमांकावर आहोत. दूरदर्शन वापरामध्ये चौथ्या, इंटरनेट वापरामध्ये तिसऱ्या तर मोबाईल वापरामध्ये जगात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहोत.
सलाम एसटी चालकांना
एखादी गोष्ट आपण अनेकदा केलेली असते, पण अशीच कधीतरी एकदा ती करताना विशेष भावते, त्यातून काहीतरी वेगळी अनुभूती होते. तसंच काहीसं त्या दिवशी झालं. एसटीतून इतके वेळा प्रवास केलेला आहे, पण काही प्रवास खास लक्षात राहिलेत त्यापैकी तो होता. बरेच दिवसांनी असं झालं की बसायला जागा नव्हती. त्यामुळे नेहमीच आवडती ठरलेली चालकाच्या बरोब्बर मागची स्टँडिंग सीट मी पकडली. वाहनाच्या समोरच्या काचेतून पुढचा रस्ता बघत बसायला मला प्रचंड आवडतं. त्यामुळे त्या वेळी बसायला न मिळाल्याचा मला आनंद झाला होता.
श्रद्धांजली.... स्मिता तळवलकर .
मराठीत चित्रपट ,टीव्ही मालिका, नाटके यात अभिनेत्री व निर्माती म्हणून अतिशय जिद्दीने काम करणारी स्मिता तळवलकर
आज आपल्यात नाही. वयाच्या ५९ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला ही सर्व रसिकाना चटका लावणारी घटना आहे.
कृष्णधवल अशा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून तिने आपल्याला रसिकांसमोर प्रथम आणले. त्याला फार मोठा काळ लोटला आहे.
स्वच्छता आणि आपली मानसिकता
माझं डोकं हटलं होतं. कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. त्याच विचारात घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. त्यामुळे साहजिकच वातावरण तापलेलं होतं. ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. माझ्यासमोर एक माझ्याच वयाचा, कृश शरीरयष्टीचा (हे महत्त्वाचं आहे) मुलगा दाणे खात बसला होता. दाण्याची सालं खाली टाकत होता. ज्या प्लॅस्टीकच्या पिशवीतून खात होता ती पिशवी खाऊन झाल्यावर त्याने खिडकीतून बाहेर फेकून दिली. मी हा सगळा प्रकार मुकाट्याने बघत होतो. त्याने खिशातून दुसरी पिशवी काढून त्यातनं पुन्हा दाणे खायला आणि साल खाली टाकायला सुरुवात केल्यावर मात्र माझा ताबा सुटला. आधीच डोकं भडकलेलं असल्याने बोलण्यात चेव सुद्धा होताच.
नाते गंधाशी.
गंध ...........
आपल्या जीवनात गंध हा अविभाज्य घटक आहे.(फक्त ज्यांना वासच येत नाही त्यांचे माहित नाही.)पण सर्वसाधारणपणे गंधाशी आपले जीवन निगडीत असते.
सुगंधाशी जवळीक आणि दुर्गंधापासून पलायन ही सर्वसामान्यपणे गंधाविषयीची प्रतिक्षिप्त क्रिया.
लहानपणापासून ते आत्तापर्यंत निरनिराळ्या गंधांशी काही आठवणी जोडलेल्या आहेत.काही सुखदायक काही वेदनादायक.