श्रद्धांजली.... स्मिता तळवलकर .

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
6 Aug 2014 - 9:50 am

मराठीत चित्रपट ,टीव्ही मालिका, नाटके यात अभिनेत्री व निर्माती म्हणून अतिशय जिद्दीने काम करणारी स्मिता तळवलकर
आज आपल्यात नाही. वयाच्या ५९ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला ही सर्व रसिकाना चटका लावणारी घटना आहे.
कृष्णधवल अशा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून तिने आपल्याला रसिकांसमोर प्रथम आणले. त्याला फार मोठा काळ लोटला आहे.
त्यानंतर स्वत: चा अस्मिता चित्र या संस्थेमार्फत सर्व समस्यांशी झगडत तिने अवंतिका सारख्या मालिकेची तर कळत नकळत, चौकट राजा अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केलीय. मराठी अनेक कलाकाराना ज्या प्रमाणे महेश मांजरेकर संधी देऊन " गॉडफादर" ची भूमिका बजावतात तद्वत स्मितानेही अनेक नवे कलाकार रसिकाना दिले आहेत. एक विनोदाचा, काळजीचा , संस्काराचा उत्तम सेन्स असलेली व्यक्ति म्हणूनही तळवलकर मॅडम परिचित होत्या. चित्रपट निर्मितीतील त्यांचा
लढाउपणा पाहूनच की काय काळाने त्याना कर्करोगाची देणगी देऊन आपले निर्ढावलेपंण सिद्ध केलेय. पण तो फार मोठा
सामर्थ्यवान आहे. आपण काय त्यावर बोलावे ? एका हसर्‍या, सर्जनशील कलवतीला " चौकट राजा" ची आदरांजली.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

6 Aug 2014 - 9:52 am | कविता१९७८

स्मिता तळवलकर यांना श्रद्धांजली

खटपट्या's picture

6 Aug 2014 - 9:53 am | खटपट्या

स्मिता ताईना भावपूर्ण श्रद्धांजली

सविता००१'s picture

6 Aug 2014 - 10:00 am | सविता००१

स्मिता तळवलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली *sad*

भिंगरी's picture

6 Aug 2014 - 10:00 am | भिंगरी

भावपूर्ण श्रद्धांजली!
एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारी निर्माती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2014 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्मिता तळवळकर म्हटलं की मला चौकट राजा या चित्रपटाची आठवण होते. एक झोका चुके काळजाचा आणि त्या चित्रपटातील भावनिक गुंता काय अप्रतिम उतरला आहे, असो चांगला अभिनय आणि उत्तम चित्रपट मालिका निर्मिती करणारी आपलेपण वाटणारी एक मोठी कलाकार गेली. माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Aug 2014 - 10:07 am | ज्ञानोबाचे पैजार

भावपुर्ण श्रद्धांजली

सुहास झेले's picture

6 Aug 2014 - 10:14 am | सुहास झेले

भावपूर्ण श्रद्धांजली !!

तिमा's picture

6 Aug 2014 - 10:15 am | तिमा

अतिशय धक्का बसला. मध्यंतरी त्या पूर्ण बर्‍या झाल्याचे कळले होते. त्यांची घरकुल ही मालिका खूपच आवडली होती. चित्रपट तर उत्तमच असायचे.

मदनबाण's picture

6 Aug 2014 - 10:21 am | मदनबाण

फार वाईट वाटले. :(
भावपूर्ण श्रद्धांजली...

मदनबाण.....

मृगनयनी's picture

6 Aug 2014 - 10:49 am | मृगनयनी

~*~*~*~*~ "स्मिता"जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~*~

कॅन्सरग्रस्त होत्या.. तरी त्या टी.व्ही. शोज मोठ्या आवडीने अटेन्ड करायच्या. नवीन कलाकारांना मार्गदर्शन करायच्या. मुलाच्या लग्नानन्तर आपल्या सुनेला (सुलेखा'जी) फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या व तिचे करिअर घडवणार्‍या स्मिता'जींसारख्या सासू समाजात खूप विरळच असतील!! एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणूनही त्या ग्रेट होत्या..'पेशवाई'च्या शूटिन्गच्या वेळेस सेटवरच्या लोकांसाठी स्वयंपाकी अनअ‍ॅव्हेलेबल होता... तेव्हा स्मिताताईंनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवला होता.. (ज्या की स्वतः त्या सिरियलच्या निर्मात्या होत्या..) :(
नाटक, फिल्म आणि सिरियल इंडस्ट्रीचा खूप मोठा मानसिक आधार हरपला आहे. सर्वांना तो सहन करण्याची शक्ती मिळू देत.. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!......

एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारी निर्माती, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्तम कलाकार या तिन्ही भूमिका यशस्वीपणे सांभाळणाऱ्या स्मिताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Aug 2014 - 10:30 am | माम्लेदारचा पन्खा

स्मिताताईंना प्रत्यक्ष भेटणे एकदा झाले होते…. फार नम्र आणि गुणवान अभिनेत्री आहेत त्या… (हो …अभिनयरूपाने आपल्यात त्या कायम राहतील !!)

सकाळी सकाळी ही बातमी "काययंत्रावर" फिरत होती …अफवा समजून दुर्लक्ष केले (मागे बऱ्याच प्रथितयश लोकांच्या बाबतीत असा अनुभव आला आहे) पण दुर्दैवाने बातमी खरी निघाली …असो … देवाची इच्छा दुसरे काय म्हणणार? ईश्वर मृतात्म्यास शांती देवो !

सुधीर's picture

6 Aug 2014 - 10:33 am | सुधीर

भावपूर्ण श्रद्धांजली! अलिकडेच दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात त्यांच्या डोक्यावर रुमाल बांधलेला दिसला. बहुदा कॅन्सरने त्या आजारी असाव्यात. पण ही दु:खद बातमी इतक्या लवकर येईलसे वाटले नव्हते.

प्रभाकर पेठकर's picture

6 Aug 2014 - 10:35 am | प्रभाकर पेठकर

चौकटराजा, सातच्या आत घरात वगैरे दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी स्वतःचा असा एक आगळावेगळा ठसा मराठी मनावर उमटविला होता. त्यांच्या निधनाची बातमी नक्कीच फार धक्कादायक आहे. मिपा परिवाराच्या श्रद्धांजलीत मीही सहभागी आहे.

दिपक.कुवेत's picture

6 Aug 2014 - 10:37 am | दिपक.कुवेत

चौकट राजा पिक्चर त्यांच्यामुळेच चांगला लक्षात राहिला आहे.

नाव आडनाव's picture

6 Aug 2014 - 11:10 am | नाव आडनाव

श्रद्धांजली

मृत्युन्जय's picture

6 Aug 2014 - 11:18 am | मृत्युन्जय

स्मिता तळवलकर यांना श्रद्धांजली. त्यांनी बरेच उत्कृष्ट चित्रपटंची निर्मिती केली. पण तरीही त्यातही चौकट राजा खरोखरच अविस्मरणीय आहे. दिलीप प्रभावळकर, स्वत: स्मिता तळवळकर, अशोक सराफ, दिलीप कुलकर्णी सर्वांचाच अभिनय चित्रपटात लाजवाब होता.

कवितानागेश's picture

6 Aug 2014 - 10:58 pm | कवितानागेश

खूप वाईट वाटतय... :(

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2014 - 12:07 am | स्वाती दिनेश

मोबाईलवर फिरणारी ही बातमी, मी ही अफवा समजले होते, परंतु दुर्दैवाने ही खरी बातमी आहे. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून त्या कायमच लक्षात राहतील. त्यांचे अनेक चित्रपट, मालिका ह्यातून दर्जेदार अभिनय आपण पाहिला आहेच. कॅन्सर ग्रस्त असून त्यातून जिद्दीने बाहेर येऊन इतर अशा कॅन्सरपिडितांनाही त्या इस्पिरेशन देत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
स्वाती

प्यारे१'s picture

7 Aug 2014 - 12:39 am | प्यारे१

आदरांजली.

स्मिताजींना श्रद्धांजली!
वाईट वाटलं.

मधुरा देशपांडे's picture

7 Aug 2014 - 12:47 am | मधुरा देशपांडे

भावपुर्ण श्रद्धांजली!

त्यांचा आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बघता बर्‍या होतील असं वाटलं होतं.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2014 - 1:20 am | अत्रुप्त आत्मा

श्रद्धांजली. __/\__

शिद's picture

7 Aug 2014 - 3:29 am | शिद

भावपूर्ण श्रद्धांजली !!!

स्मिता तळवलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राज्य सरकारच्या मराठी चित्रपटांसाठीच्या अनुदान योजनेचा फायदा घेणारी पहिली निर्माती. स्मिता तळवलकर निर्मात्या आणि शंन्ना (शं. ना. नवरे) हे लेखक असे भन्नाट कॉम्बिनेशन जमले होते. याचे उदाहरण म्हणजे 'कळतनकळत'. स्मितांनी नव्वदपश्चातच्या मरगळलेल्या मराठी चित्रपटाला ताज्या आणि नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या विषयांना हात घालून नवे वळण देण्याचे धाडस दाखवले. अत्यंत करारी आणि तितकेच प्रफुल्लित व्यक्तिमत्त्व. एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वतःची खूप जवळची मैत्रीण गेल्यावर तिच्या निधनाची बातमी सर्व दु:ख बाजूला ठेऊन शांतपणे बातम्यांत सांगणारी आणि बातमीपत्र संपल्यावर पुन्हा अश्रूंना वाट करून देणारी. घरचीच 'जिम' असली तरी आम्ही तळवलकरांच्या सुना काही बारीक होत नाही असा स्वतःच विनोद करून गोग्गोड हसणारी लाघवी स्मिता! 'घराबाहेर' च्या निमित्ताने एकदा भेटायचा योग आला होता. तेवढीच काय ती आठवण आता राहील सोबत...

एक धडाडीची निर्माती आणि तितकीच संवेदनशील, तरल अभिनेत्री आपल्यातून कायमची निघून गेली आहे.

सखी's picture

11 Aug 2014 - 12:50 pm | सखी

सुरेख प्रतिसाद स्वॅप्स! त्यांचे पतिसुद्दा अकालीच गेले ना? जवळची मैत्रिण म्हणजे स्मिता पाटील का?

सखी's picture

11 Aug 2014 - 12:54 pm | सखी

दुवा राहीलाच द्यायचा आत्ताच एका अनाहितेने दिला होता -http://www.maayboli.com/node/50265

सौंदाळा's picture

11 Aug 2014 - 2:29 pm | सौंदाळा

मला वाटतं भक्ती बर्वे.

सखी's picture

11 Aug 2014 - 7:57 pm | सखी

भक्ती बर्वे नसाव्यात, (हे नावसुध्दा ऐकुन त्या आपल्यात नाही ह्याचा अजुनही त्रास होतो). त्या २००१ मध्ये गेल्या तोवर स्मिताताई दुरदर्शनच्या निवेदक पदापासुन निवृत्त होऊन चित्रपट, मालिका क्षेत्रात रुळल्या होत्या.

प्यारे१'s picture

11 Aug 2014 - 8:18 pm | प्यारे१

स्मिता पाटीलच.

भक्ती बर्वे वाईच्या कृष्णाबाई उत्सवातला कार्यक्रम करुन येताना मुं पु द्रुतगती मार्गावर चालकाला झोप लागून अपघात झाल्यानं गेल्या. :(

मुक्त विहारि's picture

11 Aug 2014 - 2:49 pm | मुक्त विहारि

भावपूर्ण श्रद्धांजली !!!

अतिशय गोड चेहेर्याच्या अन संयत अभिनयाच्या गुणी अभिनेत्रीला मनःपूर्वक श्रद्धान्जली !