दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १
प्रसंग १-
वेळः २ महिण्यापुर्वीची.
स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला)
ग्राहक-आत येउ का सायेब
मॅ- या
ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे.
...मॅनेजर कागदपत्र पाह्तो.
मॅ- किती कर्ज पाहिजे ?
ग्रा- द्या कि एक लाख काय.
मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ?
ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा.
आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु. काय !!