मानवी स्थलांतरांना खूप मोठा इतिहास आहे तसा तो भारतीय स्थलांतरांनासुद्धा असणे ओघानेच येते. एकदा अधीक जुन्या इतिहासात गुंतले की काही वेळा अलिकडील इतिहासाचाही मागोवा घ्यायचे राहून जाते म्हणून या विषयाची सुरवात स्वातंत्र्योत्तर भारतापासून करतो आहे.
मानवी स्थलांतरांची शिक्षण, दुष्काळ ते रोगराई अथवा उपचार, व्यवसाय बदल अशी बरीच कारण असू शकतात. अर्थात स्थलांतर करणार्यांच एक मोठ प्रमाण पोटापाण्यासाठी स्थलांतर करण्यामुळे होते. अधिक उत्तम संधी तिकडे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. या स्थलांतरांमुळे स्थानिक आणि स्थलांतरीतांची विवीध स्वरूपाच्या देवाण घेवाणी सोबत सांस्कृतीक देवाण घेवाणही होत असते. आधुनिक दळणवळण आणि संपर्क माध्यमांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा वेग वाढला असला तरीही स्थलांतरीतांच स्थानिकात समरस होणे, अथवा सामाजीकरण होणे हि वेळखाऊ आणि शतकोन शतके चालणारी प्रक्रीया असू शकते प्रत्यक्षात त्यात अनेक अडचणी असू शकतात.
ब्रिटीशपुर्व काळात राजे आणि बादशाही नेमणूका आणि सैनिकी कारवायांमुळे स्थलांतरे होत होतीच पण ब्रिटीश काळात प्रशासकीय , औद्योगीक, शैक्षणिक इत्यादी कारणाने होणार्या स्थलांतरांच प्रमाण वाढल असेल. स्वातंत्र्योत्तर सुरवातीच्या काळात औद्योगीक कारणाने झालेल्या स्थलांतरा प्रमाणेच, केंद्रीय समाजवादी अर्थव्यवस्थेत केंद्रसरकारच्या शासकीय कर्मचार्यांच्या स्थलांतरात वाढच झाली असणार. प्रांत भाषा आणि जाती धर्म गटांनी विभागलेल्या समूहातील सर्वच भेद संपूष्टात आले असे नाही पण काही बदल वेगाने झाले. प्रत्येक प्रांतातील आणि समुदायाची वेषभूषा वेगवेगळी असे त्यात आता बराच एकसारखेपणा आला आहे, उदाहरणा दाखल पंजाबी ड्रेस हा सध्याचा भारतीय स्त्रीयांचा प्रमूख पोषाख झाला आहे. नवनीवीन फॅशन्स आल्या तरीही सर्व देशभर सर्वसाधारणपणे एकसारखा परिणाम होताना दिसतो आहे. यास दूरचित्रवाणी आणि चित्रपट इत्यादींचाही वाटा असेल. विशीष्ट प्रांताकरताच माहित असलेलेले खाद्य पदार्थ दुसर्या वेगेवेगळ्या प्रांतात मिळतातच एवढेच नाही तर अगदी घरातही रोजच्या जेवणात बनू लागले आहेत. दूरचित्रवाणी चित्रपट आणि क्रिकेट इत्यादी मनोरंजन साधनांनी सांस्कृतीकरित्या भारतीय लोक समरस होण्यात मोठी भर घातली आहे. गणेश आणि दुर्गाउत्सव देशातील वेगवेगळ्या भागात पोहोचले आहेत. भांगडा आणि गरबा हि नृत्ये एखाद्या विशीष्ट प्रांताची न रहाता आधूनिक भारताची महत्वपूर्ण सांस्कृतीक ओळख होत आहेत.
सामाजीकरणाच्या बर्याच समस्या शिल्लक आहेतच, या नंतरच्या धाग्यातून मला त्यांचा अधिक उहापोह करावयाचा आहेच परंतु तत्पुर्वी स्वातंत्र्योत्तर काळात सांस्कृतिक देवाण घेवाणीच जे यश आहे त्याची नोंद घेणे हा या धाग्याचा उद्देश. माझ्याकडून यशस्वी सांस्कृतीक देवाणघेवाणीचे बरेच बारकावे सुटले असण्याची शक्यता आहे. मिपाकरांना हा विषय आवडल्यास या बाबत सांस्कृतिक देवाणघेवाणीचे रोचक बारकावे नोंदवत अधिक चर्चा होऊ शकेल अशी आशा आणि विनंती.
प्रतिक्रिया
8 Dec 2014 - 2:28 pm | बोका-ए-आझम
विषय एकदमच छान आहे. एखादं शहर, उदाहरणार्थ मुंबई, जेव्हा भरभराटीला येतं तेव्हा स्थलांतरित लोकांचा त्यात वाटा असतो असं आपल्याला सर्वसाधारणपणे दिसून येतं. किंबहुना जी शहरं अशा स्थलांतरित लोकांना सामावून घेतात, तीच वाढतात. स्थलांतरितांची दुसरी पिढी तिथे जन्माला येते किंवा आईवडिलांबरोबर नव्या ठिकाणी जातात. तिसरी-चौथी पिढी त्या शहरालाच मूळ गाव समजते आणि शहराच्या अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण या पैलूंवर प्रभाव पाडायला सुरूवात करते. अर्थकारण आणि राजकारण यांचा सरळ संबंध हा आर्थिक-राजकीय सत्तेशी असल्यामुळे स्थानिकांशी किंवा इतर स्थलांतरित गटांशी संघर्ष छेडला जातो. जर भाषिक, धार्मिक, वैचारिक जाणिवा तीव्र असतील तर असे संघर्ष हिंसक आणि विनाशकारी होऊ शकतात. जे शहरांच्या बाबतीत खरं आहे ते देशांच्या बाबतीतही. अमेरिका हे स्थलांतरितांचंच राष्ट्र आहे.
8 Dec 2014 - 3:27 pm | माहितगार
औद्योगिकीकरणानंतरची शहरे आणि युएस आमेरीका कॅनडा इत्यादी स्थलांतरासाठी विशेषत्वाने आपण ओळखतोच. उत्क्रांतीवादाचे अभ्यासक सर्व मानवी जमातच एका अर्थाने स्थलांतरीतांची आहे असे मानत असले तरी ती खूप मोठ्या काळात खूप सावकाश झालेली प्रक्रीया आहे. भारतातही शतकानोशतके झालेली स्थलांतरे लक्षात घेतलीतर भारतही एका अर्थाने स्थलांतरीतांचे राष्ट्र असले तरीही आपल्याला तसे विशेषत्वाने जाणवत नाही कारण आपले स्थानिक समुदायात सामाजिकीकरण झालेले असते ते राष्ट्र ती भूमी ती संस्कृती आपण आपली मानत असतो. असो, अजून बरीच चर्चा होईल तेव्हा माझे स्वतचे आवरते ठेवतो .
8 Dec 2014 - 2:45 pm | बॅटमॅन
सामाजीकरण म्हणजे काय नक्की? हा शब्दही पहिल्यांदाच ऐकतो आहे.
8 Dec 2014 - 3:12 pm | माहितगार
सामाजिकीकरण अथवा सामाजीकरण हा शब्द मी (पारिभाषिक शब्द कोशात दिल्याप्रमाणे) सोशलायझेशन साठी वापरला आहे. इंग्रजी विकिपीडियावरील सध्याची पहिल्या परिच्छेदातील व्याख्या येणे प्रमाणे
सोशलायझेशन ह्या विषयाच्या अभ्यासाचा परिघ तसा बराच मोठा असावा. माझ्या व्यक्तीगत विशेष अभ्यासाचा विषय नसल्यामुळे जाणकारांनी अधिक प्रकाश टाकल्यास उत्तम.
मी इंग्रजी विकिपीडियावर कायदेविषयक सजगता (लिगल अवेअरनेस) या विषयाच्या लेखावर बरेच काम केले त्याच्याशी लिगल सोशलायझेशन असा विषय रिलेटेड आहे त्यावर सध्या काम चालू आहे. त्या निमीत्ताने उपरोक्त विषयाचे काही धागे काढण्याचा मानस आहे.
8 Dec 2014 - 3:16 pm | बॅटमॅन
ओह, अच्छा. धन्यवाद.
8 Dec 2014 - 4:23 pm | वारा
मूम्बईत सध्या स्थलांतरीतांचे पिक्च्रर फार लागतात.
उदा. घुस के मारब, तोहरा जिगर हमरे पास, कट्टा तनल दुपट्टापर...
8 Dec 2014 - 4:27 pm | माहितगार
त्यांच्यातला एखादा सिन्हा मराठी सारेगम गाण्यांच्या स्पर्धेत पुढे येत असतो तेव्हा मला वाटते समरसतेची प्रक्रीया कुठेतरी सुरुही होत असते.
9 Dec 2014 - 11:39 am | कलंत्री
भारताच्या जन्मापासूनच किंवा उदयाच्या वेळी सिंधी आणि बंगाली समाजाचा लोंढा भारतात आला आणि कालपरत्वे स्थिरावला आणि प्रगतीशील राहिला.
हे भारताचे सर्वात मोठे यश आहे असे मला वाटते.
9 Dec 2014 - 1:11 pm | माहितगार
खरयं. सिंधी समाज स्थिरावला आणि प्रगतीशील हे बरोबर आहे, सोबत कदाचीत शिरडीचे साईबाबा सिंधी समाजाने बर्यापैकी आंगिकारले असावेत पण जसे की बंगाली मिठाई किमान सणासुदीला बर्याच भारतीय घरात येते अशी काही सांस्कृतीक देवाण घेवाणी बद्दल अधिक माहिती करून घेण्यास आवडेल