जीवनमान

तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

hitesh's picture
hitesh in काथ्याकूट
25 Nov 2014 - 3:56 am

सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.

सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.

पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..

सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.

सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.

बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग

नवे अएर्पोर्ट

सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.

फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

जबाबदार/जबाबदारी

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
24 Nov 2014 - 9:50 am

जबाबदार/जबाबदारी
जबाबदार आणि जबाबदारी हे शब्द राजरोसपणे वापरले जातात. मुलांची जबाबदारी, कामाची जबाबदारी, आईवडिलांची जबाबदारी अशा अनेक जबाबदार्या आम्ही पार पाडत आहोत किंवा उचलत आहोत किंवा निभावत आहोत असं बहुतेकदा ऐकायला मिळतं. पण नक्की जबाबदारी म्हणजे काय? कर्तव्य, काळजी आणि प्रेम यांचं जबाबदार किंवा जबाबदारी या संज्ञेशी नातं काय? जबाबदार आणि जबाबदारी यामध्ये नक्की अंतर किती? असे अनेक प्रश्न आणि त्यांची उकल म्हणजेच पुन्हा एकदा चिकित्सा. यासाठी आपण एका छोट्याशा गोष्टीचा आधार घेऊया.

जीवनमानलेख

नातं - भाग २

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
21 Nov 2014 - 11:26 am

नातं - भाग २
प्रत्येक व्यक्तिची साधारणतः किंवा प्रामुख्याने चार प्रकारची आयुष्यं असतात. वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, सामाजिक आयुष्य आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक आयुष्य. या चार निरनिराळ्या आयुष्यातील प्रत्येक नातं म्हणजेच चार वेगवेगळ्या प्रकारची नाती.

जीवनमानलेख

नातं - भाग १

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
20 Nov 2014 - 12:29 pm

नातं
कुण्या एका गावाच्या वेशीवर एक कुटुंब छोट्याश्या घरात रहात असतं. आईवडील आणि त्यांची चार मुलं. आईवडील वेशीबाहेरच्या जंगलात जाऊन वनौषधी गोळा करून गावातल्या एका वैद्याला विकत असत. त्यातून मिळणार्या पैशांतून घर चालत असे. दोन वेळेचं जेवण कसंबसं भागत होतं. वडिलांकडे वंशपरंपरागत आलेलं वनौषधी आणि आयुर्वेदाचं ज्ञान त्यांना जंगलात वनस्पती निवडण्यात कामी येत होतं. आईचं काम होतं त्यांना मदत करणं आणि चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणं. कित्येक वर्षं हे नित्यनियमाने सुरू होतं.

जीवनमानलेख

माणुसकी

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
19 Nov 2014 - 2:18 pm

लहान असताना आयुष्य म्हणजे काय ते माहीतही नव्हतं
आजूबाजूचे सगळे करतील तेच आणि तसंच करायचं
कधी कौतुक व्हायचं कधी दटावणी ….
रोज खूप वेगवेगळी स्वप्न बघायचो
कधी डॉक्टर तर कधी भाजीवाला ….
कोण होणार तू? ह्या प्रश्नाला माझं ठरलेलं उत्तर…."कारकून"
अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या अर्थाचा …आवडायचे म्हणून म्हणायचं !
मग म्हणायचे आधी माणूस हो ….
वय वाढतच होतं…. आजूबाजूचे तेच पण त्यांच्या अपेक्षा बदलू लागल्या
लहान मुलाचं रुपांतर स्पर्धेच्या घोड्यात झालं होतं …
पाठीवर दप्तराच खोगीर आणि डोक्यावर लादलेल्या अपेक्षा

मुक्तकसमाजजीवनमान

त्यागासारखं ढोंग नाही

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
19 Nov 2014 - 12:34 am

सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

धोरणवावरसमाजजीवनमानतंत्रराहणीविचारमत

त्रास

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
18 Nov 2014 - 8:56 am

कलमनामा – १२/१०/२०१४ – लेख ७ - त्रास
त्रास
२५ माळ्यांची इमारत. आठवड्यासाठी या इमारतीमधील लिफ्ट बंद. कारण नवीन लिफ्ट बसवण्याचा निर्णय सोसायटीने घेतलेला आहे. बरं, पर्यायी लिफ्ट किंवा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे सगळ्या फ्लॅटधारकांची, आठवड्यापुरती का होईना गैरसोय होणार आहे.

जीवनमानलेख

अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
17 Nov 2014 - 12:15 pm

ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे.

"e" पुस्तके आणि कागदी पुस्तके

sanjivanik१'s picture
sanjivanik१ in जनातलं, मनातलं
16 Nov 2014 - 3:18 pm

आजचा काळ इलेक्ट्रोनिक चा आहे. पुस्तक पण त्यातून सुटली नहित. e - books , e -magzines सगळीकडे बघायला मिळतात . त्यामुळे अर्थात कागदाची, पैशाची, झाडाची बचत तर होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होते. जुने अंक साठवायचा त्रास पण वाचतो आणि जागा पण .
मी पण या "e" प्रत चा वापर करते पण मी पूर्णपणे ती प्रत वाचू शकत नाही . काही सदर वाचून मी थांबते मग भले ती कितीही वाचावीशी वाटो . पण त्याचीच जर कागदी प्रत असेल तर मी ती पूर्णपणे आणि लगेच वाचून संपवते .

जीवनमानअनुभव