ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे. पुणे वेगाने कॉस्मोपॉलिटीन होत असल्यामुळे शहरात मैदानेच अस्तित्वात राहिलेली नाहीत. खेळांचा अभाव, बैठेकाम, दिवसरात्र संगणकावर बसणो, रात्रीचे काम, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो, अवेळी खाणे आदींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. यामुळे लठ्ठ असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग वेगाने जडू लागले आहेत. यामुळे पुणेकरांना लठ्ठपणाचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर आजाराबाबत पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
प्रतिक्रिया
17 Nov 2014 - 12:16 pm | विलासराव
मी पयला!!!!!
17 Nov 2014 - 12:19 pm | पिवळा डांबिस
मी पयला काय विलासराव, पयला लठ्ठ?
असो, असलांत तरी हरकत नाही. म्हणा, "अनिच्य!!!"
:)
17 Nov 2014 - 12:21 pm | दिपक.कुवेत
बेक्कार हसतोय पिडा काकांच्या ह्या वाक्यावर.... :D
लोक्स आता तरी धागा पुर्ण वाचून, समजून "मी पयला" लिहित जा!!!!
25 Nov 2014 - 11:15 am | इरसाल
प्र.१ लठ्ठ म्हणजे काय ?
प्र.२ लठ्ठालठ्ठी म्हणजे काय ?
17 Nov 2014 - 12:18 pm | एस
अच्छा? म्हणजे मी तिघांमधला एक आहे होय? मला वाटायचे मी लाखांमधला एक आहे! :-P
17 Nov 2014 - 12:29 pm | एस
आता मी पयला झालो, पण पिडांकाकांचा प्रतिसादपण उगीच उडाला. ओल्याबरोबर सुकं पण... असो! भारी होता.
परत टाका हो! अमुच्यच ना? :-D
17 Nov 2014 - 12:42 pm | पिवळा डांबिस
कशाला परत टाकायचा?
ज्या कोणी उडवला असेल तो पुनःप्रकाशित करेलच की!!
नायतर मग बघू काय करायचं ते! काय?
20 Nov 2014 - 7:24 am | जेपी
दम भारी देतात.
प्रतिसाद पुना जिवंत झाले. =))
17 Nov 2014 - 12:18 pm | हरकाम्या
विलासराव मोजणी झालेल्या पुणेकरात तुम्ही " पयले " का ?
17 Nov 2014 - 12:24 pm | दिपक.कुवेत
आप कौनसे नंबर पे आते हो? पहले ३ में या उसके बाद? बाय द वे आम्हाला (पक्षी: मला) लठ्ठ आणि त्यातुन पुणेकर म्हटल्यावर एका व्यक्तिची प्रकर्षाने आठवण झाली आहे...
17 Nov 2014 - 12:34 pm | पगला गजोधर
कोन बर्र दीपक-काका ? सांगा तरी बरे, तुमच्या डोळ्यासमोर कोण ते ?
.
.
दरम्यान माझ्या बाजूचा म्हणतो, पुणेकर तरी बरे, तिघातला एकच लठ्ठ.
नागपूरमध्ये तर दर ऐका नागपूरकरामध्ये तीन लठ्ठ ! असे म्हणतोय.
17 Nov 2014 - 12:25 pm | बॅटमॅन
हे तर अमेरिकेपेक्षा जास्त % झालं की. वा वा वा, पुणे तिथे काय उणे.
17 Nov 2014 - 12:26 pm | जेपी
विलासराव 'मी पयला संघटना' बुडाली की,
=))
17 Nov 2014 - 12:26 pm | हरकाम्या
पुणेकर " लठ्ठ " होत आहेत हे सांगण्यासाठी किंवा लठ्ठ पुणेकरांची संख्या मोजण्यासाठी कुठल्या संस्थेची गरज नाही.
संध्याकाळी पुण्यात लागणार्या " वडापाव " च्या गाड्या आणि त्याभोवती उभे असलेले पुणेकर यावरुन ही गोश्ट सहज
लक्षात येते.याशिवाय पुण्यात वाढणारी " Hotel " ची दिवसागणिक वाढणारी संख्या यावरुन पुणेकर हे " लठ्ठ "
होत आहेत हे दिसतेच आहे.
17 Nov 2014 - 12:37 pm | बॅटमॅन
वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय? मुंबई तर दशकानुदशके वडापाववर जगत आली आहे तरी लठ्ठ का बरं नै झाली?
17 Nov 2014 - 12:39 pm | एस
'कोकणात सगळेच भात खातात, कुठे आहेत लठ्ठ?'... :-)
17 Nov 2014 - 12:53 pm | पगला गजोधर
हुं, वडापावमधे थोडीच 'शिकरण आणि मटार उसळ' सारखी पोषकमुल्ये मुल्ये कुठे आहेत ? मग बोडी कशी पोसणार ?
20 Nov 2014 - 2:22 am | मुक्त विहारि
उदा,
दाबेली चापणारी गुजराथी मंडळी.
25 Nov 2014 - 11:47 am | सस्नेह
किती वेळ उकडता हो बिचाऱ्या बटाट्याला, मुविकाका ?
22 Nov 2014 - 9:12 pm | विवेकपटाईत
तिथे लोकल मध्ये त्यांना पिळून काढला जातो. त्या मुळे मुंबईकर लठ्ठ होत नाही.
17 Nov 2014 - 1:04 pm | सुबोध खरे
@हरकाम्या
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी फिरायला गेलो होतो तेथे एकाला एक खेटून असलेली हॉटेलं पाहून पुण्यात बायका संध्याकाळी स्वयंपाक करीत नाहीत कि काय अशी एक शंका मनात येऊन गेली ( पण उघड बोलायची हिम्मत झाली नाही--पुण्य नगरी सोडून आठ वर्षे झाली असल्याने वाद घालायची शक्ती आता राहिली नाही)
17 Nov 2014 - 3:36 pm | सस्नेह
*biggrin*
17 Nov 2014 - 7:46 pm | सामान्यनागरिक
खबरदार ! पुण्यातल्या लोकांची अशी निंदा केल्यास अति भयानक मानव संहारक अस्त्रे सोडण्यात येतील.
17 Nov 2014 - 7:48 pm | दिपक.कुवेत
सामान्य नागरिक बोलतोय म्हणजे परीस्थीती गंभीरच म्हटली पाहिजे....
17 Nov 2014 - 12:27 pm | दिपक.कुवेत
उडालेत, उडवलेत कि मलाच दिसत नाहियेत?
17 Nov 2014 - 12:28 pm | किसन शिंदे
तीन पुणेकरांमागे माहीत नाही, पण दोन पुणेकरांमागे एक आहे हे माहीत आहे. ;)
17 Nov 2014 - 12:30 pm | एस
ते दोन पुणेकरांमागे एक चिंचवडकर आहेत असे म्हणायचे होते का तुम्हांला? :-D
17 Nov 2014 - 12:34 pm | दिपक.कुवेत
मुद्दा काय....लठ्ठपणा!! तो तर कॉमन आहे?
17 Nov 2014 - 2:17 pm | अत्रुप्त आत्मा
@ते दोन पुणेकरांमागे एक चिंचवडकर>>> =))))) अहो...पण ते ऑलरेडीच लठ्ठ आहेत.. अता तुम्हाला त्यांना गलेलठ्ठ म्हणायचे असेल..तर बघा व्बॉ! :-D
17 Nov 2014 - 3:05 pm | सूड
=))))
17 Nov 2014 - 12:35 pm | वेल्लाभट
आता कराचं काय !?
17 Nov 2014 - 12:44 pm | दिपक.कुवेत
सोपं आहे....पहिल्या ३ मधेच रहायचा प्रयत्न करायचा!!! (अर्थात तुम्हि पुणेकर असाल तरच हि अट लागू)
17 Nov 2014 - 12:38 pm | नाखु
बरे झाले घाई-घाईत " मठ्ठ "असे वाचले होते (नसता गदारोळ होता-होता वाचला म्हणायचा!!!)
बाकी बॅट्या मोड ऑन "पुण्यात वाढणारी " Hotel " ची दिवसागणिक वाढणारी संख्या यावरुन पुणेकर हे " लठ्ठ "
होत आहेत हे दिसतेच आहे. हा निक्शर्ष फारच रोचक आहे बॅट्या मोड ऑफ.
बाकी नेहमीप्रमाणे पुणे आणि अ-पुणे असा वळणावर धागा जाईलच.
17 Nov 2014 - 12:42 pm | स्वामी संकेतानंद
करा चैन! खा! रोज शिकरण खा! मटार उसळ खा!
17 Nov 2014 - 12:48 pm | दिपक.कुवेत
तो पगले ये उदात्त कार्य आप अपने हाथ में क्यु नहिं लेते?? आगे बढो...हम आपके साथ है!!!
17 Nov 2014 - 12:56 pm | पगला गजोधर
"पुणेकरांमध्ये जनजागृती" म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे, मी पगला आहे हे कबूल, पण येवडापन पगला नाय आपन !
17 Nov 2014 - 12:58 pm | प्रसाद गोडबोले
This is not funny ...
परवाच दिवाळीची खरेदी करायला कपड्यांच्या दुकानात गेलो अन मला साक्षात्कार झाला की आता मलाही स्लिम फिट शर्ट्स बसत नाहीयेत :( ढेरीची गोलाई ४- ५ महिन्यांची वाटायला लागलीये आता ... *dash1*
काही तरी केलं पाहिजे राव :( आता परत पळायला सुरुवात केली पाहिजे च
17 Nov 2014 - 3:04 pm | सूड
>>काही तरी केलं पाहिजे राव आता परत पळायला सुरुवात केली पाहिजे च
असं नुसतं म्हणत राह्यलात तर काय्येक होणार नाही गिर्जाकाका!!
17 Nov 2014 - 1:03 pm | एस
हे 'पुणो' कुठे आहे बरं?
17 Nov 2014 - 2:13 pm | पगला गजोधर
गल्तीसे मिस्टेक हुएला हय.
17 Nov 2014 - 1:04 pm | पैसा
सगळ्या जगात पुणे हे एकच शहर आहे काय??
17 Nov 2014 - 1:17 pm | एस
या.
17 Nov 2014 - 3:46 pm | पैसा
पुण्यालाच काय सोनं चिकटलंय बघू ना!
17 Nov 2014 - 3:50 pm | एस
या धाग्यात जर पुणे नसते तर कुणी ढुंकूनही पाहिले नसते. अॅग्री ऑर नॉट?
कल्पना करून पहा, म्हणजे, 'तीन रत्नागिरीकरांमागे एक लठ्ठ!', 'तीन सांगलीकरांमागे एक लठ्ठ!', 'तीन नागपूरकरांमागे एक लठ्ठ!' किंवा अगदी 'तीन मुंबईकरांमागे एक लठ्ठ!'... असे काहीसे शीर्षक असते तर?
17 Nov 2014 - 1:20 pm | पिवळा डांबिस
आता रत्नांग्रीत लठ्ठ शोधायचे म्हणजे शोधणार्यावर नाही नाही ते आरोप होणार!!!!
;)
17 Nov 2014 - 3:50 pm | पैसा
रत्नांग्रीत लट्ठंभारती कोण नाय. शोधायला लागला कोण तर आरोप नाय करणार, हायकोडतात केस घालीन सरळ!
17 Nov 2014 - 2:07 pm | पगला गजोधर
पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच !
17 Nov 2014 - 3:53 pm | पैसा
पुण्यनगरीत एक चहा फुकट मिळवण्यासाठी मला गोवा ते पुणे तीन फेर्या मारायला लागल्या. ते पुणेकर स्वतः पण काय खात असतील असं वाटत नै! मग लट्ठ कसे होतील?
17 Nov 2014 - 3:58 pm | सूड
दुसर्यांना काय देत नाही म्हंजे स्वत: काय खात नसणार हा समज जरा चुकीचा नै का वाटत? आठवा बरं तुम्ही शन्वारवाड्यावर आणलेली काजूची पाकीटं....किती वेळ तुमच्या डोळ्यासमोर राह्यली ;) झालंच तर कुंदा किती वेळात संपला?
17 Nov 2014 - 5:10 pm | पगला गजोधर
'चहा फुकट मिळवण्यासाठी गोवा ते पुणे तीन फेर्या', मारण्याऐवजी, तिकिटाच्या(जर काढले असेल तर) रकमेत, वर्षभर घरीच तांब्याभर चहा परवडला असता किनै ?
17 Nov 2014 - 4:00 pm | सस्नेह
हे मात्र खरं...आख्ख्या महाराष्ट्राचा गाळिव 'अर्क' पुण्यात जमा झाला आहे..
आणि हे सगळे स्वतःला पुणेकरच म्हणवतात !
रच्याकने, हे 'ऐकामाद्वितीय ' काय भानगड आहे ?
17 Nov 2014 - 4:59 pm | पगला गजोधर
.
17 Nov 2014 - 5:11 pm | एस
या!
17 Nov 2014 - 5:58 pm | सस्नेह
पूस्प्गूच कुठंय ?
17 Nov 2014 - 6:12 pm | एस
पूस्प्गूचाची बाय (तिच्या) सासूबैंच्या धाकानं हल्ली येत नाय इकडं. :-) काय बाय, खरां आसां ना?
17 Nov 2014 - 5:30 pm | बॅटमॅन
ऐकामाद्वितीय म्हणजे 'ऐका माझे (पहिले व) दुसरे (बोलणे)'.
17 Nov 2014 - 4:13 pm | टवाळ कार्टा
आणि पुण्यातले सगळेच "पुणेकर" ऐकामाद्वितीय??
17 Nov 2014 - 5:02 pm | पगला गजोधर
म्हणजे काय, सौन्शयच नाही ! पुणेकर व एकमेवाद्वितीय हे समानार्थीच शब्द आहे, बेसिक आहे.
17 Nov 2014 - 1:09 pm | विजुभाऊ
अरे बापरे......
पुण्याबद्दल हे असले भलतेच काय ऐकायला मिळतय?
पूर्वीचं पुणे राहीलं नाही आजकाल?
17 Nov 2014 - 1:22 pm | जेपी
मी जर पुण्यात कुठला व्यवसाय चालु केलातर तो नक्कीच खाण्याशी संबधीत आसेल.एवढी खादाडी मी इतर कुठे पाहिली नाही.
17 Nov 2014 - 2:19 pm | पगला गजोधर
@JP, या या तुम्हीपण दुकान टाका पुण्यात, मराठवाड्याचे धपाटे, शेगावची कचोरी, कोल्हापुरी मिसळ, मालवणी फिश, सांगलीची भेळ, धारवाडी पेढे, राजस्थानी कचोरी यांच्या सारखी कैक दुकाने आधीच हैत, त्यात तुमचं पण ऐक दुकान.
17 Nov 2014 - 1:41 pm | माझीही शॅम्पेन
होय अगदी
एक नक्किच लठ्ठ आणि बाकिचे दोन हेल्मेट न घालणारे मठ्ठ अस प्रमाण असणार आहे !!!
कृपया ह. घ्या !!
17 Nov 2014 - 1:59 pm | टवाळ कार्टा
=)) वणवा पेटेल यावरून
17 Nov 2014 - 2:27 pm | जेपी
वणवा पेटेल यावरुन>>>>>
पेटु द्या .तेवढीच चरबी जळुन लठ्ठपणा कमी होईल.
17 Nov 2014 - 2:10 pm | पगला गजोधर
ओ कैच्या कै नका सांगू, बाकीचे दोघे कारवाले, मग कशाला ते हेल्मेट का घालतील ;)
17 Nov 2014 - 2:21 pm | बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी =))
17 Nov 2014 - 2:45 pm | काळा पहाड
ह.घ्या.ची काही गरज नाहीये. हेल्मेट न घालणारे फक्त मठ्ठच नसतात तर गाढव, अडेलतट्टू, बिनडोक आणि रा.गां. ही असतात.
17 Nov 2014 - 3:21 pm | टवाळ कार्टा
रा.गां. म्हन्जे?...व्यनी करता काय?
17 Nov 2014 - 3:27 pm | प्यारे१
>>> रा गां.
आयला ! ही सर्टीफाईड 'उपाधी' कधीपासून झाली? ज्युपिटरची एस्केप वेलॉसिटी?
20 Nov 2014 - 7:52 am | टवाळ कार्टा
ह्याचे उत्तर अजुन आलेले नाही :(
17 Nov 2014 - 2:25 pm | विजुभाऊ
एक नक्किच लठ्ठ आणि बाकिचे दोन हेल्मेट न घालणारे मठ्ठ अस प्रमाण असणार आहे !!!
शॅम्पेन आजोबा :काही शंका
१) पुण्यात हेल्मेट घालणारे सर्वच जण मठ्ठ नसतात हे कशावरून?
२) सर्व लठ्ठ माणसे हेल्मेट वापरतात हे कशावरून?
३) लठ्ठ लोक असणारे पुणे म्हणजे नक्की कोणते पुणे अभिप्रेत आहे. नदिच्या अलिकडचे? ( लाल देवळापर्यन्तच फक्त) की आणखीन नदिच्या अलीकडचे ( लाल देवूळ ते मगरपट्टा व्हाया बंडगार्डन )? नदिच्या पलीकडचे ( डेक्कन ,नळस्टॉप , कर्वेनगर ,कोथरूड , पौड रोड भुसारी कॉलनी सहीत) की मग नदी पलीकडचे हुच्च पुणे ( बाणेर , औंध हिंजेवाडी इ. )
पिंची, हडपसर ,खडकी , विश्रान्त वाडी हे भाग कोणत्या पुण्यात ठेवायचे यावर तज्ञांचे दुमत आहे. ९ बहुतेक हे भाग बारामतीशी सल्लग्न आहेत)
17 Nov 2014 - 3:07 pm | माझीही शॅम्पेन
अहो विजुभौ उर्फ खापर पणजोबा , तुम्ही आजिबात पुणेकर नाहीत हे ठामपणे सांगू शकतो
दर खेपेस मागच्या खेपे पेक्षा पुण्यातील वाहतूकीची आधिक-आधिक लागलेली वाट आणि
जागो जागी सहज दिसून येणारी "बाळसेदार" (पिठुळ पोती टाइप) माणसे सहजपणे नजरेस पडतात..
जास्त वेळ भु'गोला' वर वाद घालताना आपण गोल झालोय हेच कळल नसणार !!
असो आपल्याला काय बुवा त्याच..
(मस्तानीप्रेमी) माझीही शॅम्पेन
17 Nov 2014 - 2:31 pm | पगला गजोधर
पुण्यात गेल्या १० हजार वर्षात कधीही कोणीही मठ्ठ नव्हतं, नाही, आणि पुढची १० हजार वर्षे नसेल.
17 Nov 2014 - 2:48 pm | विजुभाऊ
हे असे बोलणारेदेखील अत्रे सासवडचे , पुणे जिल्ह्यातलेच होते
17 Nov 2014 - 3:07 pm | सूड
माहीत नाय बा!! आम्ही आपलं आठवड्यातनं तीनदा तरी वजनं उचलायला जातो, दोरीउड्यांचे १५० चा एक असे तीन सेट करतो, घरी येऊन ओटमील खातो. ;)
18 Nov 2014 - 2:02 am | विश्वनाथ मेहेंदळे
गाढवाला घोड्याच्या तबेल्यात बांधल्याने त्याचा घोडा होत नाही !!! ;-)
18 Nov 2014 - 2:42 pm | सूड
पण मग पुणे हे घोड्यांचा तबेला का? ;)
18 Nov 2014 - 4:42 pm | पैसा
माझी एक पुणेकर आतेबहीण 'हुजूरपागा' नावाच्या शाळेत जायची, तर तिचा पुणेकर भाऊ तिला आणि तिच्या मैत्रिणींना 'हुजूरपागेतल्या घोड्या' म्हणायचा!
18 Nov 2014 - 4:47 pm | सूड
तसं म्हणायला गेलं तर मुंबैला धोबीतलाव आहे, तिथल्या लोकांना गाढव म्हणायला काहीच हरकत नाही. ;)
23 Nov 2014 - 6:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे
धोबीतलावात धोबी असण्याची अपेक्षा समजू शकतो गाढव mandatory का ??
18 Nov 2014 - 2:56 pm | सूड
मी =गाढव,
मी = exमुंबईकर
म्हणून गाढव=मुंबईकर...?
18 Nov 2014 - 4:49 pm | सस्नेह
तुम्ही = (सध्या ) ...कर ?
:-> ...कर = गाढव ?
18 Nov 2014 - 4:52 pm | सूड
हे समीकरण गैरलागू आहे हो. अट बघा ना, गाढव (मुंबैकर/exमुंबैकर) घोड्यांच्या तबेल्यात (पुण्यात) बांधल्याने त्याचा घोडा (पुणेकर) होत नाही.
18 Nov 2014 - 5:15 pm | सस्नेह
माझं गणित अंमळ कच्चं आहे हो
23 Nov 2014 - 6:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे
करेक्शन.... एक्स बदलापूरकर ;-)
17 Nov 2014 - 3:42 pm | सस्नेह
पुण्यात दोन दोन बारीक माणसं आहेत ???
कै च्या कै ...
17 Nov 2014 - 3:47 pm | कंजूस
१)सतत खाण्यापेक्षा सतत खाण्याचाच विचार करणं यामुळे लठ्ठपणा येतो.
२)जिवाला काहितरी विवंचना असावी. पाच पोळ्या खाल्यास पहिल्या तीन पचतील का या काळजीने दोन पोळ्यांची शक्ती वापरली जाते आणि मेद वाढत नाही.
जाणकार आणखी सांगतीलच.
17 Nov 2014 - 4:56 pm | गौरी लेले
सगळे पुणेकरांवर खार खाउन का असतात देव जाणे ?
नसेल झेपत तर नका राहु ना पुण्यात ... कोणीसक्क्ती केलीये का ?
बाकी माझ्या माहीती नुसार ही माहीती चुकीची आहे , पुण्यात अजुन तरी ओबेसीटी इतकी तीव्र नाहीये !
17 Nov 2014 - 4:59 pm | प्यारे१
>>> खार खाउन
वजन वाढायला लोणच्याचा खार सुद्धा कारणीभूत असतो बहुधा!
मला कल्पना नाही. काटा मोडला मागच्या वेळी वजन करायला गेलो तेव्हापासून वजन करत नाही. ;)
17 Nov 2014 - 5:05 pm | गौरी लेले
नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला प्यारे जी ?
मला आपला प्रतिसाद कळाला नाही .
17 Nov 2014 - 5:30 pm | प्यारे१
लोणच्याच्या खारावर टिप्पणी केलेली होती. समजलं का?
17 Nov 2014 - 5:41 pm | गौरी लेले
लोणच्याच्या खारावर टिप्पणी केलेली होती. >>>
पण त्याचा वजन वाढीशी ( विशेषतः पुण्यातल्या ) काय संबंध ?
17 Nov 2014 - 5:58 pm | प्यारे१
पुन्याचं कोन काय बोल्लंय काय तै? आमी खाराचं बोल्लो व्हतो ना! खारामधे लई त्याल, लई मीठ आस्तंय.तेनं कोलेस्टेरॉल वाडतंय आनि वजन पन असं म्हनतेत.
आमाला कल्पना नै. आसं म्हनलो.
तुमी मूळ पुन्याच्याच का ?
17 Nov 2014 - 5:35 pm | बॅटमॅन
खारीसारखा बिचारा क्यूट जीव....त्याला खातं का कुणी? हे पुणेकर म्हणजे ना, वाट्टेल त्या कल्पना करतात.
तदुपरि-भारतीय संविधानानुसार आम्ही अख्ख्या भारतात कुठेही जाऊयेऊ, पुण्यात रहा वा नका राहू हे कुणी सांगायचं काम नाही.
पुणेकरांबद्दल काही बोलल्यावर इतका फणकारा असेल तर स्वतंत्र पुणे मिळवा आधी अन मग बोला. कसें?
17 Nov 2014 - 5:49 pm | प्रसाद गोडबोले
पुणेकरांबद्दल काही बोलल्यावर इतका फणकारा असेल
>>> लेले ... म्हणजे सदाशिव पेठी असतील रे त्या म्हणुन राग आला असेल त्यांना !
17 Nov 2014 - 6:04 pm | बॅटमॅन
ळॉळ =))
17 Nov 2014 - 6:07 pm | सूड
>> म्हणजे सदाशिव पेठी असतील रे त्या म्हणुन राग आला असेल त्यांना !
हो तर !! त्या लेले आणि तुम्ही गोडबोले...तुमच्याशिवाय कोण नीट ओळखणार त्यांना! ;)
17 Nov 2014 - 7:40 pm | प्रसाद गोडबोले
पण आम्ही शनिवार पेठेतील आहोत तेही सातार्याच्या , त्यातही वरच्या शनिवार पेठेतले ...
जमीन आस्मानचा फरक आहे ...अगदी देशस्थ कोकणस्थ इतका फरक आहे ;) :D
17 Nov 2014 - 5:58 pm | अत्रुप्त आत्मा
@स्वतंत्र पुणे मिळवा आधी अन मग बोला.कसें?>>> आपल्याला-स्व तंत्र,असे म्हणायचे होते काय???![http://www.sherv.net/cm/emoticons/playful/tongue-in-cheek-smiley-emoticon.gif](http://www.sherv.net/cm/emoticons/playful/tongue-in-cheek-smiley-emoticon.gif)
17 Nov 2014 - 6:00 pm | प्यारे१
ते आधीपासूनच आहे की! सगळेच स्व-तंत्रानं वागतात ना 'पुन्यात'?
17 Nov 2014 - 6:08 pm | बॅटमॅन
होंय!!!!
इतकें असतां स्वतंत्र जागीर करोन घ्यावी, त्यास पेस्तर बोभाट आलियास उपराळा तेणेंगुणें तेथेंच काढतां येईल.
17 Nov 2014 - 5:15 pm | जेपी
आमचे तातश्री असेच बोलतात.कोणालाच काही कळत नाय
17 Nov 2014 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा
@कोणालाच काही कळत नाय>> =)))))
17 Nov 2014 - 6:00 pm | दिपक.कुवेत
तुम्हि बोलताय काय? असे कसे रे तुम्हि सगळे पुणेकर??
17 Nov 2014 - 6:03 pm | सूड
तू गंप रांव रे!! ;)
17 Nov 2014 - 6:04 pm | सूड
हयसंर कोण विषय धरुन बोलतंत काय?
17 Nov 2014 - 6:19 pm | तिमा
मिपाकरांमधे लठ्ठपणाचं प्रमाण काय आहे ? एकूण आणि पुणेरी मिपाकरांमधे.
17 Nov 2014 - 6:20 pm | एस
डु-आयडी किती वेळा मोजायचे?
17 Nov 2014 - 10:16 pm | टवाळ कार्टा
तुमचे किती ;)
17 Nov 2014 - 10:17 pm | टवाळ कार्टा
१००
17 Nov 2014 - 11:00 pm | एस
अरे बाप रे!
एवढे आहेत? मला माहीतच नव्हतं! :-D
17 Nov 2014 - 6:23 pm | स्पा
ह्या ह्या
बरीच करमणूक होतेय
17 Nov 2014 - 9:39 pm | कवितानागेश
दु दु स्पा!
17 Nov 2014 - 9:50 pm | सूड
दु दु is अगोबा, स्पा is just वशाड मेलो !! ;)
17 Nov 2014 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा
=))
17 Nov 2014 - 6:36 pm | सिरुसेरि
पुण्यामध्ये जिमची संख्याही वाढते आहे . पण त्या बद्दल कोण बोलणार नाही .
17 Nov 2014 - 6:46 pm | सस्नेह
तुम्ही बोला
आम्ही ऐकामा..
17 Nov 2014 - 6:57 pm | धडपड्या
असं कसं, असं कसं? उगाच नावं का ठेवायची? आता केस विंचरताना, आरशात दोन्ही कान दिसत नाहीत, पॅंट जरा मोठ्या आणाव्या लागताहेत, तर लठ्ठ लठ्ठ म्हणून चिडवू नये कोणी..!!
सकाळी फिरायला गेल्यावर उगाच चार दोन बटाटेवडे, घरी आल्यावर चहासोबत उगाच डिशभर पोहे, जेवणात चार पाच पोळ्या, उगाच जरासा भात, बाधू नये म्हणून तूप, संध्याकाळी फिरताना भेळ वगैरे, आणि रात्रीचे थोडेसे जेवण... एवढ्याश्याने कोणी लठ्ठ होतं का?
17 Nov 2014 - 7:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
जर तीन माणसांच्या मागे असलेला माणूस दिसत असेल तर तो खरंच खूप लठ्ठ, नाहीतर कमीत कमी पुढच्या माणसांपेक्षा जास्त उंच असणार !
हे झालं एक साधं विश्लेषण. परतू खरा प्रश्न असे आहेत...
१. हे "पुणो" आहे तरी कुठे ???
२. त्या माणसाला तीन माणसांच्या मागे उभे राहण्यास भाग पाडण्याचा अन्याय कोण करत आहे ? त्यालाही इतरांबरोबर पुढे उभे राहण्याचा लोकशाही हक्क असला पाहिजे... मग तो लठ्ठ असो की उंच, काही फरक पडत नाही. इतका अन्याय होऊनही शासन अजून का बरे झोपलेले आहे ???
17 Nov 2014 - 7:25 pm | दिपक.कुवेत
गजोधरांच "णो" ह्या शब्दावर पगल्या सारखं प्रेम आहे. आता हेच बघा ना...संगणकावर बसणो, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो ई. तसचं ते पुणो. आपल्या माणसांना सॉरी मिपाकरांना आपणोच समजून घ्यायचो हो...
18 Nov 2014 - 9:21 am | पगला गजोधर
गल्तीसे मिस्टेक हुएला हय.
लठ्ठपणा =>जाड बोटे =>मोबैलवर टंकताना होणार्या चुका
18 Nov 2014 - 5:24 pm | समीरसूर
गजोधरांच "णो" ह्या शब्दावर पगल्या सारखं प्रेम आहे. आता हेच बघा ना...संगणकावर बसणो, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो ई. तसचं ते पुणो. आपल्या माणसांना सॉरी मिपाकरांना आपणोच समजून घ्यायचो हो...
अक्षरशः खाली पडतोय की काय इतके महाभयंकर हसलो. कंट्रोलच होईना... :-)
17 Nov 2014 - 9:51 pm | रेवती
व्यायामाला पर्याय नाही हेच यातून सुचवायचय ना! मग बरोबरच्चे ते!
18 Nov 2014 - 6:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पुणेकरांनी पुन्हा सायकली चालवायला घ्याव्यात.नाहीतरी पुणे सायकलींचे शहर म्हणून ओळकह्ले जायचेच.उत्तम व्यायाम होतो.बायकांना,मुलींना तोंडाभोवती तो दहशतवादी स्कार्फ गुंडाळायची गरज नाही.अर्थात त्यासाठी गाड्यांचे प्रमाण कमी करावे लागेल.
18 Nov 2014 - 6:49 pm | बॅटमॅन
हेच एखाद्या पुरुषाने म्हटले असते तर "घरातल्या स्त्रियांची आठवण येऊन मन द्रवलं कसं नाही" छाप प्रतिक्रियांचा पाऊस पडला असता.
(माईसाहेब व नेफळट नानासाहेबांचा फॅन) बॅटमॅन.
19 Nov 2014 - 12:38 pm | त्रिवेणी
नाय हो खरच म्हणता आहेत ते.
गाड्यांमुळे खुप प्रदुषण होते आणि त्यामुळे स्किन, केस खराब होतात ना. म्हणुन बायका बांधतात तसा स्कार्फ. आता दहशदवाद्यांनी केली ही फॅशन फॉलो तर काय बिघडले.
(निष्पाप) त्रिवेणी
19 Nov 2014 - 12:41 pm | प्यारे१
निष्पाप नस्तंय, निरागस अस्तंय
19 Nov 2014 - 1:12 pm | त्रिवेणी
हो हो खरच की.