अर्धा भरलेला प्याला आणि त्यासंदर्भातला आशावाद/निराशावाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. त्याबाबतचे माझे नवे विचार मी खाली मांडले आहेत:
आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.
पण आता दोन्ही प्रकारच्या व्यक्तीसंदर्भात दोन शक्यता वर्तवता येतात:
(१) आपण प्रथम आशावादी मनुष्याचा विचार करू:
(१-अ) आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो त्यामुळे त्यात तो समाधानी होतो आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी कधी प्रयत्नच करत नाही.
किंवा
(१-ब) आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो त्यामुळे त्याचा आशावाद त्याला उरलेला अर्धा प्याला सुद्धा भरायला उद्युक्त करतो.
(२) आपण आता निराशावादी मनुष्याचा विचार करू:
(२-अ) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे त्यात तो समाधानी नसतो आणि त्याला तो पूर्ण भरण्याची ऊर्मी मिळते.
किंवा
(२-ब) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे तो अधिक निराश होवून प्याला पूर्ण भरण्याचा विचार सोडून देतो.
तुम्हाला काय वाटते कोणती जोडी बरोबर आहे?
जोडी १- (१-ब) आणि (२-ब): आशावादी असणे चांगले!
जोडी २- (१-अ) आणि (२-अ): निराशावादी असणे चांगले??? (काय सांगता?)
जोडी ३- (१-ब) आणि (२-अ): कोणताही "वादी" असले तरी परिणाम चांगलाच??? असे कसे? असे कसे?
जोडी ४ - (१-अ) आणि (२-ब): कोणताही "वादी" असले तरी परिणाम वाईटच??? असे कसे? असे कसे?
प्रतिक्रिया
6 Jan 2015 - 11:50 am | सतिश गावडे
छान लिहिलंय.
अतिशय मौलिक असे विचार आहेत तुमचे. जणू काही विचारमौक्तिकेच. या विचारमौक्तिकांना पुस्तकाच्या कोंदणात बसवा. येणार्या कित्येक पीढयांना हे विचारधन मार्गदर्शक ठरेल.
6 Jan 2015 - 11:51 am | डॉ सुहास म्हात्रे
(२-क) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे तो अधिक निराश होवून तो पिऊन टाकतो आणि पूर्ण रिकामा करतो.
6 Jan 2015 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे
आणि ते "असे कसे? असे कसे?" असे नाही...
"असं कसं ? असं कसं ?" असं आहे. :)
6 Jan 2015 - 11:55 am | सस्नेह
*lol*
आणि अधिकाधिक निराश होतो !
6 Jan 2015 - 11:59 am | सतिश गावडे
त्या पेल्यात बहूधा रंगी-बेरंगी कडवट पेय असावे. आणि प्याला रिकामा झाल्यावर ती व्यक्ती बेभान होऊन
असे साकीला* म्हणत असावी
*साकी - साहित्यिक कीडा(आभार: नाद खुळा)
6 Jan 2015 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा
@. त्याबाबतचे माझे नवे विचार मी खाली मांडले आहेत>> ते जाऊ द्या!
चकण्याला काय आणू? :P
6 Jan 2015 - 12:49 pm | नाखु
हे कुणाचे नाव आहे???? *mosking* *JOKINGLY* 8P 8p
6 Jan 2015 - 1:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
अहो, ते "चकणा" उपनावाच्या त्यांच्या दोस्तासाठी काय आणू ? असे आहे. :)
(शारिरीक व्यंगावरून कोणाला नावे ठेऊ नयेत अशी तंबी द्यावी काय असा विचार चालू आहे.) ;)
7 Jan 2015 - 11:23 am | टवाळ कार्टा
"तंबी" यावर सुध्धा असेच म्हणता येइल ;)
6 Jan 2015 - 12:50 pm | धर्मराजमुटके
अजून एक प्रकारचा माणुस असतो माझ्यासारखा. तो ह्या पेल्याकडे त्रयस्थ नजरेने पाहतो. पेला अर्धा भरलेला आहे ना ? आणि अर्धा रिकामा आहे ना ? असू दे, असू दे.
जीवनातली घडी अशीच राहू दे.
6 Jan 2015 - 12:51 pm | मुक्त विहारि
आणि मग एक-दोन थेंब इकडे-तिकडे उडवून मग त्या ग्लासातल्या वारूणीचा आस्वाद घेतो...
ग्लास अर्धा भरणे आम्हास नामंजूर
आणि ग्लास अर्धवट भरलेला ठेवणे आम्हास नामंजूर...
6 Jan 2015 - 1:01 pm | निमिष सोनार
:-)