!! सैनिक मरतो देश राहतो !!
दोन राष्ट्रांच्या वादामध्ये,
निष्पाप बिचारा अपराधी ठरतो,
आणि उगाच कारण नसतानाही,
सैनिक का सीमेवर मारतो ? !!१!!
त्यास न ठाऊक कारण युद्धाचे,
पालन करी तो आदेशांचे,
तरी बुद्धिबळाच्या खेळा मधला,
सहज मरणारा तो प्यादा ठरतो !!२!!
डॊकावूनी पहा त्या गणवेशातून,
आपल्या सम तो ही माणूस असतो,
सौख्य-सोयरे मागे टाकून,
कुणास ठाऊक तो कसे राहतो !!३!!
लढत मरावे, मरत लढावे,
ध्यास घेउनी जीवनभर जगतो,
अन तारुण्याच्या उंबरटयावर,
अकारण मृत्युच्या शैयेवर चढतो !!४!!