हिशेब हिशेबाचा
आमची प्रेरणा
आमची प्रेरणा
रोजच्या जीवनात मला पडणारे प्रश्न
शहर कोणतेही असो
निवडणुका आल्यावर प्रत्येक रस्त्याच्या सुरूवातीला व शेवटी सदरचा रस्ता कोणत्या आमदार / खासदार वा नगरसेवकाच्या कुठल्या निधीतून झाला किती खर्च झाला
ठेकेदार कोण होते
असे भपकेदार पोस्टर / बँनर झळकत असतात
पण जेव्हा
त्याच रस्त्यावर खड्ड्याचां भुलभुल्लैया होतो
नागरिकांच्या मनक्यांचा शाँक अबझाँरव्हर होतो
वाहनांचा खुळखुळा आणि शरीराचा भुगा होतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या "खासदारांनी गाव दत्तक घेऊन आदर्श खेडे" या संकल्पने अंतर्गत सचिन ने (खासदार असून्ही आपुलकीने एकेरी ऊल्लेख करावासा वाटतोय त्या बद्दल क्षमस्व्)आंध्रामधील पुत्तमराजूकन्ड्रिगा
ईग्रजी नाव Puttamrajuvari Kandrika दत्तक घेतले होते साल २०१४ नोव्हेंबर.
त्याचा झालेला कायापालट गोषवारा असा:
उदय सद्दाम हुसेन.. खरे तर असल्या कुप्रसिद्ध माणसावर लेख लिहायची आणि स्वतःचे व इतरांचे मन कलुषित करायची आवश्यकताच काय, परंतु माणूस किती चरित्रहीन असू शकतो हे सांगण्यासाठी हा लेखप्रपंच.
सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना अनुभवलेली ही घटना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडतेयं. वय वर्षे २० असलेली आदिवासी समाजातील मंजुळा फार दूर नाही, नाशिकपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावरल्या एका गावात राहणारी. दुस-या बाळंतपणा दरम्यान तिचा मृत्यू झाला. ना पेपरात बातमी छापून आली, ना कुठे त्यावर चर्चा झाली. पण या प्रातिनिधीक घटनेमागे बरचं काही घडलेलं आहे.
फाळणीच्या कथा तश्या वेदनादायकच असतात. गेले खूप दिवस हि कथा मनात घर करून होती, काल जयंत काकांच्या मंटोच्या कथा वाचतांना पुन्हा आठवली.
उर्दू कथा : नन्दकिशोर विक्रम
__________________________________________________________________________
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले.
मुखपृष्ठ :
काही वैयक्तिक कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व..
--------------x--------------x----------
व्हिएतनाम युद्ध!, दक्षिणपूर्व आशियात कम्युनिस्ट विचारसरणीचा आणि पर्यायाने रशियाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी अमेरिका, 'व्हिएतनाम' या चिमुकल्या देशाविरुद्ध १९५४ पासून इनडायरेक्ट आणि ६०साली प्रत्यक्ष युद्धात उतरली. २० दिवसांत व्हिएतनामच्या मुसक्या आवळू या वल्गनेसह उतरलेली अमेरिका प्रत्यक्ष २० वर्ष या युद्धात अडकून पडली. हिच २० वर्षे थायलंडच्या तीन महत्वाच्या शहरांच्या अंतर्बाह्य बदलास कारणीभूत ठरली.
गावात पोहोचताच बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याजवळच्या मोकळ्या जागेत त्याने गाडी उभी केली. हौद्यातून गुंडाळलेले पोस्टर काढून बाहेर टांगले.
'हिमालयकी अद्भुत चमत्कारी जडीबूटीयो का चमत्कार' अशी अक्षरे असलेल्या त्या फलकावर बर्फाचा डोंगर व त्यात मधूनमधून उगवलेल्या काचेच्या, जडीबुटी भरलेल्या बरण्या असे विचित्र चित्र होते.
काही वेळातच मेगाफोनवर एक टेप लागली.
अमरत्व बहाल करणारी जडीबुटीवाला बाबा गावात आलाय, ही वार्ता लगेचच वाऱ्यासारखी फैलावत सुटली.
बघता बघता गाडीभोवती गर्दी जमली.
बाबानं आपल्या सहकाऱ्याला खूण केली, आणि बाबाचं भाषण सुरू झालं.