मला एक प्रश्र्न पडला आहे "दाभोळकर की दाभोलकर" ?
गेले ३ दिवस डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांचे आडनांव बदलले आहे का?
व्याकरणाच्या द्रुष्टीने दाभोलकर हे चूकीचे आडनांव वाटते. जसे नेरुळकर,परळकर,परुळेकर, ह्या आडनांवात जसा "ळ" येतो तसाच "ळ" , "दाभोळकर" ह्या आडनांवात पण यायला पाहिजे.
विकिपेडिया आणि लोकसत्ता आणि इतर मराठी व्रुत्तपत्रांत पण दाभोलकर असाच उल्लेख आहे.