आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या निमीत्ताने एकुश्येचे मनोगत
एकुश्ये म्हणजे बंगाली भाषेत २१.
एकुश्ये म्हणजे बंगाली भाषेत २१.
मित्रांनो,
मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/4715
"सकाळचा "च्या"
"चहा" हा विषय घेवून व पु / शंकर पाटील कसे लिहीतील याची एक झलक.
वपु:-
बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणून नये ही म्हण ज्या टाळक्यतुन निपजली त्या टाळक्याला सलाम.
नमस्कार
ह्या धाग्याची दोन उद्दीष्टे आहेत.पहिला लोकमान्य टिळकांची स्वतःची अनुवाद पद्धती (शैली) होती जी मुख्यत्वे गीतारहस्यामधील गीता अनुवादा करिता वापरली त्याची नोंद घेणे.स्वतःला हवा तसा अर्थ लावता येणारा स्वैर अनुवादा ऐवजी लेखकास अभिप्रेत तत्कालीन संदर्भ काय असले पाहीजेत हे लक्षात घेत जसाच्या तसा अनुवाद करण्यावर लोकमान्यांचा भर असावा. या बद्दल गीतारहस्याच्या युनिकोडीकरणा नंतर माहिती देणे अधीक सोपे असेल.
राजसाहेब आपली वक्तृत्वशैली असो वा जीवनशैली त्याचे प्रचंड आकर्षण आजच्या तरुणाईला आहे, तर इतरांना कौतुक. मग तो विरोधी पक्षातील असो वा अमराठी!!! अर्थात आम्हीही त्यास अपवाद नाही आहोत. पण ते वैचारिक साम्यतेमुळे. साहेब कोणत्या विषयावर काय बोलतील, कोणावर टीका करतील, कोणाचे कौतुक करतील याचे अचूक अंदाज आम्ही बांधत असू, ते इतके अचूक असत की काही मित्रांना मी भाषणे लिहून देतो की काय अशी शंका येते. पण आता साहेबांची मोहिनी ओसरत चालली आहे, आमचे अंदाजही चुकू लागलेत. जसा पक्षाचा विकास वेगाने झाला तशाच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या, पण त्यांचा भ्रमनिरासच झाला.
संदर्भ : लोकसत्ता पुणे पुरवणी दिनांक २३/०१/१४.
मराठी हितवर्धिनी सभे तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विषय,
१) शाळांतुन होणारा मराठीचा र्हास.
२) मराठी भाषा आणि २०२०.
३)मराठीत खुपणारे इंग्रजीचे खडे.
४)मराठी अभिजात भाषा आहे काय?
संपर्क : ८१४९१९४१९७
पत्ता,
मराठी हितवर्धिनी सभा,
लकडे भवन,३२, नारायण पेठ, माती गणपती जवळ,
केळकर रस्ता, पुणे.
कृपया या स्पर्धे सक्रिय भाग घ्यावा ही विनंती.
द्वारकानाथ कलंत्री
नुकतंच (म्हणजे दहा मिंटं झाली असतील) अविनाश बिनीवाले यांचं 'भाषा - आपली सर्वांचीच' हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. (अजून एक लिंक) आणि मराठी भाषेविषयीचा (खरंतर इतरही अनेक भाषांविषयीचा) दृष्टीकोन काही बाबतीतं नव्याने उमगला, काही बाबतींत दृढ झाला, काही बाबतीत तो पूर्णपणे बदलला. अविनाश बिनीवाले यांचे 'लोकसत्ता' मध्ये जुलै १९९८ ते डिसेंबर १९९९ या काळात भाषाविषयक सदरांत ७८ लेख प्रकाशित झाले.
प्लेसमेंट क्षेत्रात इंग्रजी भाषेचा प्रभाव बर्यापैकी दिसतो.कृपया मराठीमधील समर्पक शब्दांचा वापर सुचवावा.
कॅम्पस रिक्रूटमेन्ट
करिअरच्या
कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही
टर्निग पॉइंट
इंटरव्ह्य़ूसाठी
टिअर वन, टू, थ्री कंपन्या
कोअर इंजिनीअरिंग कंपन्या
बेसिक संकल्पना
कट् ऑफ
मार्केटिंग टीममध्ये
स्ट्रेटेजी
विद्यार्थ्यांची पॅशन
पॅनेलला
अॅप्टिटय़ूड
ऑफर
परदेशात पोस्टिंग
प्रोजेक्ट
विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे. मराठी विकिपीडियाचे एक जाणते सदस्य त्या बद्दल सध्या चर्चा:विवेकसिंधु येथे विवीध संदर्भ उधृत करत आहेत.
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.