विडंबन

नकळत सारे घडले

शाम भागवत's picture
शाम भागवत in जनातलं, मनातलं
4 Mar 2019 - 10:23 pm

हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!
(पाक प्रवक्ता हे मुख्य पात्र आहे. त्याचे नाव आहे फुरफुर. त्याने वॉररूम सारखी ट्विटररूम बनवली आहे. त्यात तो स्वत: व त्याचे तीन दुय्यम सहकारी बसलेले आहेत. सर्वाच्या पुढे फोन, मोबाईल, लॅपटॉप वगैरे सगळी अत्याधुनिक साधने आहेत. याच रूमला जोडून फुरफुरची एक साऊंडफ्रुफ केबीन आहे.)

भाग १

विडंबनविरंगुळा

खेळ राजकारणी असा रंगला....

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जे न देखे रवी...
14 Feb 2019 - 8:30 am

गदिमा आणि सुलोचना चव्हाणांची माफी मागून,
मूळ गीत - फड सांभाळ तुर्‍याला ग आला....

खेळ राजकारणी असा रंगला....
काका लागला काड्या घालायला || धृ ||

मूळ बारामतीचं बेणं....
हळूहळू यानं गिळलं पुणं....
धोका देण्यात अति प्रवीण....
घेतलं कडेवर जनता पार्टीला....
दिला धक्का वसंतदादांला....
बाईने हाकललं याच्या सरकारला....
परतून धरले राजीवच्या पायाला….
काका लागला काड्या घालायला || १ ||

विडंबन

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी....

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जे न देखे रवी...
12 Feb 2019 - 11:54 pm

कवी संजीव यांची क्षमा मागून
मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ ||

माया माहेराची बोफोर्स दलालीची...
'इकडून' घातली भर पाचशे कोटींची...
गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ ||

येता निवडणूक साडी नेसावी...
आई - भावासाठी मते मागावी...
चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया...
विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ ||

विडंबन

एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान

Anonymous's picture
Anonymous (not verified) in जे न देखे रवी...
9 Feb 2019 - 7:48 pm

हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान
एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान

दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया
बालपणी गेलासी तू शाखेसी धराया
हादरली ती जननी, थरथरले घरचे जन

भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन
अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम
मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण

मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका
कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका
सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन

कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ?
मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला?
खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान

भावकविताहास्यअद्भुतरसकविताविडंबनविडम्बन

सोनियाच्या सुता तुला खानदानी वरदान....

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जे न देखे रवी...
9 Feb 2019 - 8:37 am

दादा कोंडकेंची माफी मागून
मूळ गीत - अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

सोनियाच्या सुता, तुला खानदानी वरदान....
एकमुखाने चमचे, गाती राहुल आख्यान || ध ||

माता किरीस्ताव तुझी, पिता पारशी बावा...
जानवेधारी ब्राह्मण म्हणूनी, कैसा तू खपावा?
पन्नाशीला आला, बुद्धी बालकासमान.... || १ ||

चहुकडे ऐसे ज्ञान, पाजळशी राया...
सकाळच्या रात्री उठीसी, ऐसी तुझी माया...
खुळावले शिंदे, झाले मनमोहन हैराण... || २ ||

विडंबन

तुझ्या 'सविते'ची ओळ उर्फ भाभीजी

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
26 Jan 2019 - 12:55 pm

पेर्ना

तुझ्या 'सविते"ची ओळ
अवचित दिठी येते
'रानातल्या' निवडुंगा
इवलेसे फूल येते..

तुझ्या 'सविते'ची ओळ
अवचित दिठी येते
खाटल्याच्या खोळातून
कामधून उमटते..

तुझ्या 'सविते'ची ओळ
अवचित दिठी येते
पाखरांच्या थर्थरीने
वठली वेल मोहोरते..

'सविते'ची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा दिठी येते
पुन्हा पुन्हा भिजवूनिया
पुन्हा पुन्हा हुबारते..

cyclingविडंबन

जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited)

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
7 Jan 2019 - 4:48 pm

आमचे प्रेरणास्थान... साडेतीन शहाणे
https://www.misalpav.com/node/43829

दिलो में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम...
जावेद अख्तर लिखित वरील सुंदर ओळीवर जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा संपतो...
ह्यानंतर कबीर (अभय देओल),इम्रान (फरहान अख्तर) आणि अर्जुन (ह्रितिक रोशन) आपापली जिंदगी जियायला निघून जातात. साधारण पाच वर्षांनी तिघेही मुंबईच्या एका बारमध्ये भेटायचं ठरवतात. कबीर आणि अर्जुन बारमध्ये आधीच पोहोचतात. इम्रान सवयीप्रमाणे अजून पोहोचला नाहीये.
कबीर: इम्रान आला नाही यार अजून?

विडंबनविरंगुळा

(तनुने नानास मी टू म्हणणे )

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
3 Jan 2019 - 12:41 pm

पेरणा अर्थात

तनुने नानास मी टू म्हणणे
रसिकांच्या मनी अदम्य लवथव
पडद्यावरचे विश्व विभ्रमी
कल्पिताहुनीही अद्भुत वास्तव

नटसम्राटासही क्षुद्र ठरविते
असीम व्याप्ती मिडीयाची
लाईक डीस्लाईक मोजुनी थकती
व्हॉटसाप ट्विटरच्या थिट्या मिती

हलकट स्पर्शी फोडा मुस्काट
जागेवराती लंपटाचे
मौन रहाणे अनेक वर्षे
विणती जाळे संशयाचे

पैजारबुवा,

Biryaniकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडशांतरसबालगीतविडंबनशुद्धलेखनऔषधोपचारकृष्णमुर्ती

'विडंबित' अंगाई गीत

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
11 Dec 2018 - 11:30 am

ब्लॉग दुवा https://www.apurvaoka.com/2018/12/blog-post.html

लहान मुलं झोपत नाहीत अशी तक्रार बहुतेक पालकांची असेल कदाचित. अशाच एका पालकाच्या तक्रारीवर चिंतन करताना गमतीत सुचलेलं एक काव्य.

सो गया ये जहाँ च्या चालीवर काही मराठी ओळी. यांनी चार दोन मुलं मुली वेळेवर झोपल्या तर त्यांच्या पालकांनी जरूर अभिप्राय कळवावा☺️

झोपली जंगले
झोपली श्वापदे
झोपले झाड ही
झोपली पाखरे
झोपली धरा अन अंबरे
घरे अन मंदिरे
झोपले चराचर

कविताबालगीतविडंबन

मी घेतली यॉट

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
27 Nov 2018 - 8:36 am

मी घेतली यॉट

ढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही.

मी तर घेतली बाबा यॉट
फेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट
मी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ ||

नकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे
अन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे
मध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१||

इंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड
मराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट
मराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२||

हास्यविडंबन