क्रॉस सबसिडी
क्रॉस सबसिडी
क्रॉस सबसिडी
मेंदुला दुखापत
मी शोधात आहे अशा कवितेच्या,
तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे,
असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात
हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता
जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव –
हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा,
थंड दुधारी कट्यारी इतका
खराखुरा
डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप ।
डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।।
डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें ।
डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।।
मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग ।
जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।
वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी ।
वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।।
सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे ।
आंजालोकी मिपालोकी उरावे । पिंकरूपें ।।५।।
"पप्पूलीची पिन्नी - पिन्नीचा पप्पूली" हे ऐकायला वेगळ वाटत असल तरी थोडस वेगळ आहे. पप्पूली शिवाय पिन्नी अपूर्ण आहे का माहीत नाही पण पिन्नी शिवाय पप्पूली अगदीच अपूर्ण आहे. पिन्नी आणि पप्पूली चे नाते बाप-लेकाचे आहे कदाचित त्यापेक्षाही अधिक आहे. विठ्ठल कामतान्चे एक वाक्य आहे " अ चाईल्ड गिव्ज बर्थ टू अ मदर" त्याचेच थोडा बदल करून मी म्हणेन " अ चाईल्ड गिव्ज लाईफ टू अ फादर"
मी हैद्राबादमध्ये गेली ६ वर्षं राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या काही इलाक्यांमध्ये (जसं की मेहंदीपटनम) बकऱ्यांचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे साऱ्या भारतभरातून विक्रीसाठी आणले जातात. यामध्ये तगडे बोकड, पुष्ट बकऱ्या, मध्यम बकऱ्या आणि अगदी कोवळी पिल्लं पण असतात. ज्याला जसा परवडेल तसा प्राणी विकत घेता येतो. कुर्बानीसाठी भाविक (?) लोक, मोठ्या कुटुंबातील लोक, मशिदींचे प्रतिनिधी तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात.
एक पक्षी अंधारात
बरसणाऱ्या जलधारात
घरट्यात एकटाच . . . .
झाडावरचं एक फूल
उमलून कोमेजलेलं
झाडाच्याच पायाशी ......
पाहतो शून्यात मी
आजकाल नेहमी
विश्व निर्मिती तिथूनच !
जुळवले शब्द काही
अर्थ उमगलाच नाही
तरीही अर्थपूर्ण !
आतापर्यंत 'आबाा' यांंचावर बरच लिहल गेलय पण हे जरा वेगळ आहे चार भाग लिहतोय
त्यातील भाग एक
तिन्ही बंगल्यांच्या म्होर वावरात आबा बशेल व्हता
मन भरुन बंगले पाता पाता आबाला हुंदका आला आन आबान माग वळुन पाह्यल तसा आबा भूतकाळाच्या गर्द झाडीत शिरला
"दादा य दादा"
दिगु न त्याच्या मोठ्या भावाला हाक मारलि
" काय झालर दिग्या "
विहरी जवळ गेलेल्या पुरुषोत्तम दादा ने वो देत प्रश्न केला
"आर पंकु बेसुध झालीय अन आबा अन भागु तिला दामुनानाच्या बैलगाडी त घेऊन वैद कड नेताल "
दादान सायकला टांग मारली अन तडक वैद्या कड गेला
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.
खरेदी एक भोग !