मुक्तक

मुंबईकर . . . . .

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
30 Sep 2017 - 11:54 pm

मृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . .
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

रोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . .
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

घड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं ?
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

कविता माझीकरुणमुक्तकराहती जागानोकरीव्यक्तिचित्र

तिन्ही सांजा.....

रुस्तुम's picture
रुस्तुम in जनातलं, मनातलं
29 Sep 2017 - 11:10 pm

मध्यंतरी हृदयगंधर्व हे पुस्तक वाचताना त्यातील स्वरोत्सव ह्या डॉक्टर लीना आगाशे ह्यांच्या लेखात, पंडितजींच्या एका वाक्याचा संदर्भ येतो, की त्यांना तिन्हीसांजा हे गाणं करताना त्यांना यमन राग पिवळसर रंगासारखा दिसू लागला होता. प्रत्येक राग हा कुठल्याही रंगात, कुठल्यातरी विशिष्ट रूपात त्यांना दिसतो.
त्यांचं हे बोलणं ऐकून लेखिकेने स्वतःचा ह्या वाक्याशी संबंधित एक अनुभव मांडलाय.

मुक्तक

हरिहरि...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
26 Sep 2017 - 11:20 pm

शब्दाचे वजन
झाले मासातोळे
कण्याचेही आता
करतो वेटोळे

व्हायचा गजर
उंचावता हात
कुठे गेली आता
सगळ्यांची साथ

केव्हाच फेकला
भिकेचा कटोरा
उरलासे आता
फुकाचाच तोरा

वाट जरा थोडी
पाहिलेली बरी
नाहीतर आता
करू हरी हरी

मुक्तक

मन

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
26 Sep 2017 - 10:12 pm

मन विचाराचे घर
मन कृतीचे आगर
मन अथांग सागर
मन मधुर साखर

मन आभाळीचा रंग
मन आत्मरंगी दंग

मन देहाचा आरसा
मन मायेचा वारसा
मन चंचल चंचल
मन कधी अविचल

मन मोकाट मोकाट
मन कधीचे मुकाट
मन धावे सैरावैरा
मन माळावरला वारा

मन गरीब पामर
मन कधी अनावर
मन वेडेही भासते
मन मनात हासते...

कवितामुक्तक

प्रिय नर्मदेस

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
24 Sep 2017 - 7:28 am

( आज सरिता दिन. त्या निमित्त.....)

धोरणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयमुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरप्रकटनविचारप्रतिसादलेखअनुभवसंदर्भप्रतिभा

गहन हे मर्म दु:खाचे

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Sep 2017 - 2:59 pm

गहन हे मर्म दु:खाचे
उमजणे कठिण किती असते
साचले युगांचे अवघे
निमिषात अश्रुरूप घेते

उफराटे गणित विषाचे
समजणे कठिण किती असते
मरण्यास पुरे इवलेसे
जगण्यास कितीही कमी पडते

शब्दांच्या निबिड अरण्यी
बहरणे कठिण किती असते
अमरत्व उमलण्या आधी
का मरण विकटसे हसते

कविता माझीमुक्तक

'किनारा'यण!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
20 Sep 2017 - 10:37 pm

एकदा एक बिनशिडाचं तारू भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि'नारा' गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होते. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या.

मुक्तकविरंगुळा

रमलखुणांची भाषा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Sep 2017 - 11:44 am

जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ
जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू

दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या
हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या

खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली
मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी

ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा

ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा
उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....

माझी कवितामुक्तक

प्रिय घरास

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
18 Sep 2017 - 7:28 pm

प्रिय घरास,

नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही.

धोरणमांडणीवावरवाङ्मयमुक्तकसाहित्यिकसमाजप्रकटनविचार