अश्वत्थामा
मनाच्या एका खोलवर
अंधार्या कप्प्यामधे कुठेतरी
दडपून टाकलेली तूझी आठवण,....
कधीतरी उफाळून बाहेर येतेच
अचानक, मला नकळत......
आणि मग कोरड्या पडलेल्या
जखमा परत भळभळू लागतात
मनावर मोठा दगड ठेवून
तूला लिहिलेले ते शेवटचे पत्र
इतक्या वर्षां नंतरही.... जसेच्या तसे,
डोळ्यांसमोर नाचत असते,
मला आणि फक्त मलाच माहीत आहे
ते पत्र लिहिण्याचे खरे कारण
पत्रात खरे कारण लिहायची हिम्मत झाली नाही
आणि तूझ्याबरोबर खोटं बोलायच नव्हत,
(तू नेहमी प्रमाणे अचूक पकडलेच् असते)