हे चैतन्याच्या विराटा
शांत निवांत समुद्र
अस्ताला जाणारा नारायण
येऊ घातलेल्या भरतीची लाटांशी अस्पष्ट कुजबुज
आताशा भान हरपत नाही
आठवते अक्राळविक्राळ वादळ
सुरुची बाग पिळवटून काढणारं
उन्मळून टाकणारं
रौद्राच अफाट दर्शन
खरं काय म्हणावं
मन रिझवणारी संध्याकाळ की मन उध्वस्त करणारी कातरवेळ
सुख दुःखाच्या या खेळाचा आयोजक कोण
हे चैतन्याच्या विराटा,
मला सामावून घे!!