भिती तुझ्याउरी पण,उमजे तुलाच नाही.
या अवसानाचा,का भार व्यर्थ घ्यावा?
धाग्यात मांडताना,कुंठते निवांत मती.
या मूढ तारस्वरांचा , सांग काय बोध घ्यावा?
फेके जिव्हारी तूही , दुसराही परजे भाला .
मधल्या वाचकांचा, असा काय अपराध देवा?
सोडून नेक वाट,चळते बुद्धी जराशी.
मग अशांत त्या मिपाशी,कोठून नूर यावा?
जमले मिपावरी हे, गोंगाट भाट सारे.
नाहिरे कसे म्हणू मी? का नुसताचं स्वार्थ पहावा!
आता मौनवदनी, सोडून देतं आहे.
विझली फुण्गी जरी ही,नित-मात्र दक्ष पहारा!
मोडून काय लाभे? तारेत क्षणभराचे.
हे मोजकेच आहे, लागला (तरच ) अर्थ घ्यावा.
थांबवू कसातरी मग मी? या नित्य अधोगतीला?
त्या सुज्ञ मिपाकरांनी,आता विचार घ्यावा.
___-----------
विडंबन साठी गीत अर्थात बुवांच असलं तरी जखम आधिच्या विखारी धाग्यांची आहे
नाखु वाचकांचीही पत्रेवाला
प्रतिक्रिया
17 Jan 2018 - 4:48 am | मुक्त विहारि
चिखल फेक सुरु झाली, की पॉप कॉर्न घेवून बसावे.
17 Jan 2018 - 5:20 am | मुक्त विहारि
आम्ही कोण म्हणून काय पुसता,
आम्ही कोण म्हणूनि काय पुसता?आम्ही असू दोडके
मिपाचे दिधले असे आंतरजाल आम्हांस खेळावया;
बरेचसे धागे येथील पहा, आमच्या पुढे ते फिके.
वांझोट्या चर्चाच आमच्या शतके मारीतसे.
वादांचीच खूमखूमी आमची आपोआप ती टंकतसे.
हार न मानता, खडे फेकणे हेच आमूचे ध्येय असे.
शुन्यवत केली कित्येक स्थळे आमुच्या या हल्यांनी
मिपाला असूरलोक साम्य आणले आमुच्या शब्दांनी
ते आम्हीच, द्वेष व्यक्तीं मधला, शब्दां मधूनी सदा पाझरे
ते आम्हीच, शतकी आय.डी. लेऊन टंकणारे.
आम्हाला वगळा-सकस होतील सकल संकेत स्थळे
आम्हाला वगळा-स्वर्ग रुपी वाटेल मिपावर बागडणे.
17 Jan 2018 - 8:28 am | एस
:-)
17 Jan 2018 - 8:41 am | प्रचेतस
+१
17 Jan 2018 - 11:24 am | अत्रुप्त आत्मा
वाहवा ! भावना सुंदर अधोरेखित झाली आहे.
17 Jan 2018 - 1:16 pm | ज्ञानोबाचे पैजार
सुरेख, आवडली कविता,
भावना पोचल्या,
पैजारबुवा,