मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(भिती तुझ्याउरी पण)

नाखु · · जे न देखे रवी...
भिती तुझ्याउरी पण,उमजे तुलाच नाही. या अवसानाचा,का भार व्यर्थ घ्यावा? धाग्यात मांडताना,कुंठते निवांत मती. या मूढ तारस्वरांचा , सांग काय बोध घ्यावा? फेके जिव्हारी तूही , दुसराही परजे भाला . मधल्या वाचकांचा, असा काय अपराध देवा? सोडून नेक वाट,चळते बुद्धी​ जराशी. मग अशांत त्या मिपाशी,कोठून नूर यावा? जमले मिपावरी हे, गोंगाट भाट सारे. नाहिरे कसे म्हणू मी? का नुसताचं स्वार्थ पहावा! आता मौनवदनी, सोडून देतं आहे. विझली फुण्गी जरी ही,नित-मात्र दक्ष पहारा! मोडून काय लाभे? तारेत क्षणभराचे. हे मोजकेच आहे, लागला (तरच ) अर्थ घ्यावा. थांबवू कसातरी मग मी? या नित्य अधोगतीला? त्या सुज्ञ मिपाकरांनी,आता विचार घ्यावा. ___----------- विडंबन साठी गीत अर्थात बुवांच असलं तरी जखम आधिच्या विखारी धाग्यांची आहे नाखु वाचकांचीही पत्रेवाला

वाचन 4186 प्रतिक्रिया 0