!माझी छबी!

sayali's picture
sayali in जनातलं, मनातलं
25 Oct 2017 - 1:26 pm

तिचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे. एकमेकींचे लाड करतो. उपदेश करतो. आमचे जितके मतभेद असतात तितकाच जिव्हाळाही असतो. आमचे संवाद कधी हळवे तर कधी हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे, कधी बौध्हिक पातळीवरचे तर कधी स्वयंपाकातील धाडसी प्रयोग यांची प्रेरणा देणारे, कधी उद्बोधक तर कधी आयुष्याला वेगळे वळण देणारे असतात.
माझा तिला आणि तिचा मला शारीरिक, बौधहिक, मानसिक बदल लगेच जाणवतो. या मागे कोणती अंतःप्रेरणा असेल ?
जन्मजनमांतरिचा एक स्त्री असल्याचा समान धागे तुझ्यातल्या मला माझे दर्शन घडवून देत असते. कशाला बघू मी उगा आरशात ! माझीच छबी दिसे मला तुझ्याच रूपात !
आईचा सुखद जीवन प्रवास म्हणजेच तीचीच छबी असणारी आणि तिचे वेगळेपण जपणारी तिची मुलगी! जशी तू माझी. आणि म्हणून माझी प्राणप्रिय आहेस ह्याचाच मला अभिमान वाटायला लावणारी तू माझी सावली?, की प्रतिकृती ? की तुझ्यासारखी तूच !

मुक्तकजीवनमानलेखअनुभवप्रतिभा