बिज्जी लेखिकेची आळवणी
(ज्यांना ही कविता टोचायला, सॉरी, पोचायला हवी त्यांना नक्की पोचेल अशी खात्री आहे. इतरांनी मात्र ती विशुद्ध साहित्यिक दृष्टीने वाचावी ही नंब्र इनंती!)
बिज्जी लेखिकेला
असे घाई भारी
मिटिंगा लई
सुप्रभाती, दुपारी
बिज्जी लेखिका ती
भुसनळी पेटलेली
कुणी त्रास देता
ठासते आग 'खाली'
स्वयंपाकही तो
पाचवीं पूजलेला
शिव्या मोजिते
पाहता ती घड्याळा
तिची नाटिका जी
प्रेक्षकां झालि प्यारी
सदोदीत टाळ्या
फुल्ल तिकिटांचि बारी
प्रयोगास येती
मोठमोठे असामी
पाहता लेखिकेला
'मुग्ध' होती प्रणामी