तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
गंध मनाचा उडाला नभी
थेम्ब बनुनी खाली कोसळली
तुझी आठवण साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
झिजूनी काय मिळवले, माउली ?
चूल मोकळीच राहिली
हात जरी असले मदतीस हजार
तुझी चव मात्र आतच राहिली
उत्तरे न मिळती कोड्याची
सर्व दडले या अंतरी
मनी साठले भंगार सारे
अंगार बनुनी जाळी जीवा
ज्वाला जिथे तिथे पोहोचली
तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
चूक घडली , क्षमा नाही , अक्षम्य अपराध हा
आम्ही काशी नाही दाविली