ध्रांगध्रा - २१ ( अंतीम )
मला माझ्या मानेवर कसलासा थंड पणा जाणवतो. कसलासा थंड ओला स्पर्ष.माझ्या डावी कडे आणि उजवीकडे दोन मांजरे येऊन बसली आहेत. रानमांजरापेक्षा मोठी आहेत. त्यांचे तोंड मात्र माकडासारखे आहे. पाठीच्या कण्यातून बर्फाची लादी फिरवावी तशी शिरशिरी जाते. .... मर्कट व्याळ........ कथापुराणातून ऐकलेला , कधी शिल्पात पाहिलेले प्राणी माझ्या आजूबाजूला जिवंत बसलेत. महेश म्हणत होता ते खोटं नव्हतं.. माझ्या बाजूला बसल्यावर त्यांचं गुरगुरणं थांबलंय.
खिरलापखिरला माझ्याकडे थंड नजरेने पहातोय. त्याची ती नजर मी टाळू शकत नाही.