{ॲन इमॅजिनरी व्हॉट्सअप चॅट लीक्ड :-) }
अंधारात त्याच्या व्हॉट्सअप स्क्रीनवर नवीन मेसेजचं एक ग्रीन वर्तुळ चमकलं..
"'तूच आहेस का रे तिथे खाली?"'
तिचा मेसेज पाहून तो थोडा वेळ तसाच शांत बसून राहिला. मग रिप्लाय दिला, होय.!
"'अरे देवा..! कधीपासून बसलायस तिथे? मी आत्ता पाहिलं वर येताना..! तू जा बरं तिथून..'''
आजची तिसरी रात्र..! तू उत्तर दिलं नाहीयेस अजून.!
"'अरे पण हे असं रस्त्यावर नको बसत जाऊस अरे रात्र रात्रभर..! मला त्रास होतो उगाच..!"'
मी काय कुणाला त्रास देणार..! माझा मी शांतपणे बसून आहे फक्त..!
"'ओके ओके.. आपण सकाळी बोलू कॉलेजमध्ये..आत्ता तू जा तिथून.. पप्पा आहेत घरी.!'"
नाही..! उत्तर मिळाल्याशिवाय इथून हलणार नाहीये मी..!
"'मॅड आहेस का रे तू जरा ? मी नंतर सांगते बोलले होते ना? लगेच इथे येऊन बसायला कुणी सांगितलं तुला?'"
लगेच नाही..! दीडशे तास वाट बघितली..! तर तू दुर्मिळ..! फोनपण उचलत नाही..! लय हाल झाले..! मग काय करणार मी.!
"'हो का? मग आता अजून किती तास बसणारेस?'"
ते तू ठरवायचंस..! मी कसं सांगणार..!
"'बरं.. ऐक.. माझा निर्णय झाला की मग मी सांगते तुला..! आता तू घरी जा प्लीज..!"'
बरं..जातो जातो.. पण साधारण कधीपर्यंत होईल निर्णय?
"'उद्या भेटू. मी सांगते तुला...उद्या फोन करते तुला'"
पण आत्ता थोडासा अंदाज दिला असतास तर बरं झालं असतं.. म्हणजे मग आज तरी थोडीशी झोप लागली असती..!
"'तू आता घरी जा पहिला.. आणि झोप..! आपोआप लागते झोप.!"'
पण म्हणजे काय? होय की नाय?
"'ते सुद्धा मीच सांगायला हवंय का? आणि आत्ताच सांगायचंय का??"'
सांग ना..! सांग ना..! मला नाय समजलं..!
"'मर मग तिथेच... बस तसाच..!"'
प्रतिक्रिया
14 Feb 2022 - 10:49 am | कानडाऊ योगेशु
मस्तच.
वो ना कहेगी तो खुदखुशी कर जाऊंगा मै यारो.
वो हा कहेगी तो फिर खुशी से मर जाऊंगा मै यारो..
14 Feb 2022 - 11:24 am | श्रीगणेशा
मस्तच! :-)
14 Feb 2022 - 5:15 pm | चौथा कोनाडा
मस्तच !