मेडीक्लेम / इन्श्यूरन्स - एक अनुभव.
राम्राम मंडळी.. एक प्रामाणिक शंका आहे - शक्य झाल्यास उत्तर शोधण्यास मदत करावी.
**************
नुकतेच घरातले एक आजारपण पार पडले. आठवडाभर हॉस्पीटलमध्ये अॅडमीट व एक अत्यावश्यक ऑपरेशन असे आजारपणाचे स्वरूप होते. (हृदय व मेंदू प्रकारातले गुंतागुंतीचे ऑपरेशन नव्हते.)
हाफिसच्या कृपेने मेडीक्लेम / इन्श्यूरन्सची काळजी नव्हती..