"दाखवणे" आणि फॉर्मल कपडे

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in काथ्याकूट
20 Apr 2013 - 9:39 am
गाभा: 

बॅटमॅनचा हा धागा वाचला अन मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हंटल दुसरा धागाच उसवावा. असो.

तर आता आमच्या डोक्यात आलेल्या प्रश्नांबद्दलः
लग्नाचं वय झालं (वेगवेगळ्या आई-वडीलांच्या मते १६ पासुन पुढे ) कि दाखवण्याचे प्रकार सुरु होतात...म्हणजे मुलाला मुलगी दाखवणे वेग्रे. गैरसमज नको उगाच. तर अशा प्रसंगी मुलींना साधारणपणे साडी घालायचा आग्रह होतो. म्हणजे शाळा कालेजात असताना अन बाहेर हिंडताना भले पँट / जीन्स/ स्कर्ट / हाप्पँट / बर्मुडा / पंजाबी ड्रेस - त्यातही बरेच प्रकार आहेत, झालंच तर थ्री फोर्थ वेग्रे घालणार पण पसंतीच्या वेळेस मात्र साडीच असावी. का? तर भारतीय प्रथा आहे शिवाय आपले संस्कार दिसतात असं कारण. साडी घातल्याने संस्कार कसे दिसतात हा एक प्रश्न.

मुलं मात्र जीन्स - टी शर्ट झालंच तर बर्मुडा (आजकाल याला कै वेगळं नाव असेल तर माहीत नै) असं घालतात...म्हणजे जर घातलंच तर आक्षेप नसतो. फॉर्मल कपडे जसे की साधा शर्ट अन फॉर्मल पँट सुद्धा घालतात नै असं नै. आता मुलांना मुळातच कपड्यांच्या निवडी अतिशय कमी त्याला आमचा नाईलाज आहे अन म्हणुनच दोन - तीन उदा. दिलेत.

एकदा आम्हाला मुलगा पहायला मंबईतुन पुण्याला जायचं असल्याने हे सगळं कसं सांभाळायचं असा प्रश्न पडल्याने शेवटी जीन्स अन आखुड शर्ट घालुन जावं लागलं. एकच एक दाखवायच्या वेळेस उपयोगी म्हणुन आणलेला पंजाबी ड्रेस धुण्यात होता हे अजुन एक कारण. आधुनिक लोकं असल्याने .किंवा "अशा वेळेस कशी बै शर्ट पँट घातली? अशी मुलगी नकोच" म्हणुनही असेल पण कोणी (म्हणजे मुलगा अन त्याची आई)यांनी कै आक्षेप घेतला नै. असो.

तर मुद्द्या म्हणजे फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना असे साडीच घालायचा आग्रह कितपत योग्य आहे? मिपाकरांनी आपापले अमुल्य मत द्यावे.

टीप : आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु. उगाच भलत्या चौकशा करु नयेत.

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Apr 2013 - 10:05 am | पैसा

विषयात वाद शब्द पाहिल्याने माघार घेत आहे. शिल्पाला नेहमीप्रमाणेच आमचा संपूर्ण पाठिंबा आहेच. स्त्रीमुक्तीवादी आणि विचारवंताच्या प्रतिसादांच्या खास प्रतीक्षेत. महिला विभाग पुरस्कर्ते आणि विरोधक यांची पुन्हा एकदा जुगलबंदी पहायला मिळेल हीच माफक अपेक्षा.

मत विचारले आहेच तर कुणी कोणते कपडे केव्हा घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. निव्वळ कपड्यांवरून मुलीची निवड कोणी करत असेल तर अशा माणसाबरोबर लग्न न झालेलेच चांगले.

कपिलमुनी's picture

20 Apr 2013 - 2:58 pm | कपिलमुनी

पॉपकॉर्न घेउन बसलेय हे पैसा तै नी किती संसदीय भाषेत संगितला

स्त्रीमुक्तीवादी आणि विचारवंताच्या प्रतिसादांच्या खास प्रतीक्षेत. महिला विभाग पुरस्कर्ते आणि विरोधक यांची पुन्हा एकदा जुगलबंदी पहायला मिळेल हीच माफक अपेक्षा.

टवाळ कार्टा's picture

20 Apr 2013 - 10:39 am | टवाळ कार्टा

टीप : आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु. उगाच भलत्या चौकशा करु नयेत.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

पक पक पक's picture

22 Apr 2013 - 1:14 pm | पक पक पक

आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु.

अच्छा म्हणुन तुम्हाला काकु म्हण्तात का..? ;) साधारण याच स्टेज नंतर घराघरात वेगवेगळ्या विषयांवर बायका काकु(काथ्या कुट ) करायला लागतात.. :)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2013 - 10:41 am | परिकथेतील राजकुमार

शिर्षक फसवे आहे.

(इथे खाली 'मचा क' अशी सही करण्याचे फार्फार मनात आले होते, पण शिल्पाकाकू डोक्यात दगड घालतील म्हणून कीबोर्ड आखडता घेतला.)

मदनबाण's picture

20 Apr 2013 - 10:53 am | मदनबाण

पराशी १०० % सहमत ! ;)
स्त्री साडी मधे जितकी सुंदर दिसते तितकी ती इतर कुठल्याही पोशाखास दिसत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे.
बाकी पाहण्याचे आणि पाहुन घ्यायचे अनेक भन्नाट अनुभव माझ्या गाठीशी आहेत ! ते इथे लिहीत बसत नाही... ;)
अर्थात कपड्यांपेक्षा एकमेकांच्या स्वभावाचा,आवडी-निवडीचा जास्त विचार केलेला अधिक उत्तम ! तेव्हा लग्नाळु मंडळींनी याकडेच जास्त लक्ष द्यावे.

टीप :-आमचं लग्न होउन सध्या बाळ रांगतय,तेव्हा इतरांना उपयोग म्हणुन हा प्रतिसाद टंकण्याचे कष्ट घेतले आहेत.

मालोजीराव's picture

22 Apr 2013 - 2:16 pm | मालोजीराव

स्त्री साडी मधे जितकी सुंदर दिसते तितकी ती इतर कुठल्याही पोशाखास दिसत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे

आपलंपण हेच मत

बाकी पाहण्याचे आणि पाहुन घ्यायचे अनेक भन्नाट अनुभव माझ्या गाठीशी आहेत ! ते इथे लिहीत बसत नाही...
अर्थात कपड्यांपेक्षा एकमेकांच्या स्वभावाचा,आवडी-निवडीचा जास्त विचार केलेला अधिक उत्तम ! तेव्हा लग्नाळु मंडळींनी याकडेच जास्त लक्ष द्यावे.

टीप :-आमचं लग्न होउन सध्या बाळ रांगतय,तेव्हा इतरांना उपयोग म्हणुन हा प्रतिसाद टंकण्याचे कष्ट घेतले आहेत.

याचा आमच्यासारख्या होतकरू ब्याच्लरांना उपेग होणार ना मालक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2013 - 10:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना असे साडीच घालायचा आग्रह कितपत योग्य आहे ?

साडीत मुली संदुर दिसतात इतरही ड्रेस मधे सुंदरही दिसत असतील पण एक भारदारपणा, गंभीरपणा, आणि मंगलमय असं एक वातावरण अस या दाखवण्याच्या कार्यक्रमात येतो, असे वाटते.

आमच्या वेळेस सालं असं नव्हतं. तेव्हाचे आई वडील म्हणायचे मुकाट उभे राहा आणि तेव्हाचे पोरं मुकाट लग्नाला उभे राह्यचे.

बाकी, दाखविण्याच्या विविध प्रकाराचे तपशील येऊ द्या राव. मूलगी पाण्याचा तांब्याभरुन पाणी घेऊन, खाली मान घालून बसण्यासाठी पाटाच्या दिशेने चालली आहे. बैठकीतील मंडळी ओझरतं तिच्याकडे पाहताहेत. मामानं विचारपुसासाठी मनातल्या मनात प्रश्नांचे अनुक्रम ठरवले आहेत. बै तुझं नाव काय, कितवी शिकली आहे, तुझ्या मामाचं गाव कोणतं. च्यायला, काय भन्नाट परंपरा होत्या राव.

-दिलीप बिरुटे
(आज्ञाधारक)

साडीचा आग्रह नको हे (हृदयावर दगड वगैरे ठेवून) मान्य, पण मुळात अलीकडे साडीवर इतका भर दिला जातो का???

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Apr 2013 - 3:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नाही रे. आउटडेटेड लेख आहे हा. पण आता कुणाचे दाखवण्याचे कार्यक्रम सत्तरच्या दशकात झाले असतील तर तेव्हा मिपा नव्हते यात कुणाचा काय दोष ?? मग तेव्हाचा धागा आत्ता काढला असेल ;-)

प्रसाद गोडबोले's picture

20 Apr 2013 - 3:51 pm | प्रसाद गोडबोले

"दाखवायचा कार्यक्रम " म्हणल्यावर कपडे कशाला घालायचे असा एक भाबडा प्रश्न लहान पणापासुन आपल्या मनात डोकावतोय ...आणि घालचेच असतील तर साडी इज्ज बेष्ठ मुलींसाठी !
पण आमच्यात म्हणे मुलीला दाखवायचा कार्यक्रम नसतो ...मुलीच मुलाच्या घरी येतात म्हणे बघायला...

आमच्यात म्हणे मुलीला दाखवायचा कार्यक्रम नसतो ...मुलीच मुलाच्या घरी येतात म्हणे बघायला...

माझ्या बाबतीत तरी हेच घडलं. असल्या नगाला घेउन परक्यांच्या घरी अब्रुचे धिंडवडे नको असा सुज्ञ विचार आई बाबांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ;)
आणि हो आमच्या होणार्‍या सौ. मस्त पंजाबी ड्रेस घालून आल्या होत्या.
(नशिबाने पहिल्या कार्यक्रमातच निकाल लागला आणि मुलगा उजवण्यासाठी बाबांना पादत्राणं झिजवावी लागली नाही.)

बाकी बायकांच सौंदर्य नीट नेसलेल्या साडीत खुलुन दिसतं यात दुमत नाही.

सल्या नगाला घेउन परक्यांच्या घरी अब्रुचे धिंडवडे नको असा सुज्ञ विचार आई बाबांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हो आमच्या होणार्‍या सौ. मस्त पंजाबी ड्रेस घालून आल्या होत्या.
हॅहॅहॅ... शेम टु शेम. ;)

नशिबाने पहिल्या कार्यक्रमातच निकाल लागला
इथे मात्र आमची इष्टोरी येगळी हाय.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2013 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार

"दाखवायचा कार्यक्रम " म्हणल्यावर कपडे कशाला घालायचे असा एक भाबडा प्रश्न

बेक्कार फुटलोय!
=)) =)) =)) =))

+११११११११११११११११११११११.

वाईट्ट वाईट्ट फुटलोय!!!!!!

प्यारे१'s picture

20 Apr 2013 - 5:16 pm | प्यारे१

आतातरी आयडी नेम बदला.
कृपा करा.

अशक्य हसतोय.....!

गणपा, एवढं गोड गोड नाही बोलत आहेत गोडबोले! ;)

नाही माझा तसा काही समजही नाही झाला. ;)
त्यांनी उपहासाने लिहिलं असेलही. पण माझ्या बाबतीत ते खरं होतं म्हणुन तेवढंच वाक्य कोट केलं. :)

अप्पा जोगळेकर's picture

20 Apr 2013 - 4:01 pm | अप्पा जोगळेकर

सत्तरच्या दशकातला धागा आहे याला अनुमोदन. मुलाला भेटायला जाताना शक्य तितके उत्तान कपडे वापरण्याकडे मुलींचा कल असतो हे अनुभवावरुन सांगू शकतो.

दादा कोंडके's picture

20 Apr 2013 - 4:15 pm | दादा कोंडके

मुलाला भेटायला जाताना शक्य तितके उत्तान कपडे वापरण्याकडे मुलींचा कल असतो हे अनुभवावरुन सांगू शकतो.

अनुभव वैग्रे नाही पण, "अगदीच तोकडे कपडे नको पण 'अ‍ॅसेट्स' दिसतील असे कपडे घाल" असं क्यांटीनमध्ये असा एक मुलीने दुसर्‍या मुलीला दिलेला सल्ला या कानाने ऐकला आहे.

बाकी धागा दोन-चार दशकामागचा आहे याच्याशी देखील सहमत.

अनुभव वैग्रे नाही पण, "अगदीच तोकडे कपडे नको पण 'अ‍ॅसेट्स' दिसतील असे कपडे घाल"

भयानक आहे हे. अश्याने इनकम वाले धाडी घालतील ना ?

प्रियाकूल's picture

20 Apr 2013 - 4:25 pm | प्रियाकूल

भारतात सत्तर टक्के जनता खेड्यात राहते. त्यांची मुलं शिकलेली असतात.त्यांना चालतील मुली ड्रेस किंवा जीन्स मधे पण आई,वडील,आजी,आत्या,मामा लोक आले कि त्यांना मुलगी साडीतच पहायची असते,कारण अजूनही फक्त मुलालाच मुलगी पसंत असून भागत नाही. मुलाच्या घरचेही परत मुलीला पाहायला येतातच. त्यामुळे मुलीला साडी घालणे हे आलेच.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Apr 2013 - 5:08 pm | निनाद मुक्काम प...

मी भारत ज्यावेळी सोडला त्याच स्थितीत तो नेहमीच आहे , जग बदलले पण भारत मात्र माझ्या आठवणीतला आहे किंवा तो तसा असावा असा गोड गैरसमज एक अनिवासी ह्या नात्याने मी कधीच करून घेतला नाही.
काही वर्षांच्या पूर्वी ही जाहिरात पहिली होती.

मैत्र's picture

20 Apr 2013 - 5:41 pm | मैत्र

लग्नही जीन्स अन आखुड शर्ट असा मुलीचा पोशाख आणि टिशर्ट व बर्म्युडा किंवा ट्रॅक पँट असा मुलाचा पोशाख असं व्हावं.. काहीच हरकत नाही.
सर्व फॉर्मल समारंभही आपल्याला हव्या त्या पोशाखात व्हावेत. आता आहेत कोणी इंद्रा नुयी, कोच्चर, किंवा किडवाई तर त्यांच काम आणि बुद्धिमत्ता हेच महत्त्वाचं ना.. पोशाखामुळे काय अडतंय..
उद्दिष्ट महत्त्वाचं .. बाह्य पोशाख कसा का असेना.
विरोध महत्त्वाचा...

मैत्र's picture

20 Apr 2013 - 5:43 pm | मैत्र

लग्नही जीन्स अन आखुड शर्ट असा मुलीचा पोशाख आणि टिशर्ट व बर्म्युडा किंवा ट्रॅक पँट असा मुलाचा पोशाख असं व्हावं.. काहीच हरकत नाही.
सर्व फॉर्मल समारंभही आपल्याला हव्या त्या पोशाखात व्हावेत. आता आहेत कोणी इंद्रा नुयी, कोच्चर, किरण मुजुमदार किंवा किडवाई तर त्यांच काम आणि बुद्धिमत्ता हेच महत्त्वाचं ना.. पोशाखामुळे काय अडतंय.. त्यांनीही
उद्दिष्ट महत्त्वाचं .. बाह्य पोशाख कसा का असेना. त्यांनीही बिनधास्त आखुड शर्ट, टँक टॉप्स, केप्रि यात मुलाखती द्याव्यात, कॉन्फरन्सेस ला जावं, सीआयआय आणि दावोस मध्ये बोलावं.
मुख्य काम काय तर बिझनेस.. उगाच पोशाखाचं प्रदर्शन कशाला..

(विरोधासाठी) विरोध महत्त्वाचा...

प्रकाश घाटपांडे's picture

20 Apr 2013 - 6:05 pm | प्रकाश घाटपांडे

जातीच्या सुंदरा काहीही शोभते।
र्यापर कंच बी असल तरी आतला माल मात्र चांगला पाहिजे! पारखी लोकांना रत्नाची पारख असते.

दादा कोंडके's picture

20 Apr 2013 - 8:32 pm | दादा कोंडके

खरंय.

एका उमेद्वार मित्राला दुसर्‍या अनुभवी मित्राने सल्ला दिला की, बगायच्या येळी कंच्या बी पोरी म्येकप थापून सुंदर दिसत्यात. तू त्वांड बगू नको तर पाय बग. पाय लोन्यावानी असले पायजे बग. ह्यो गडी दुसर्‍या दिवशी पोरीचं त्वांड बगायचं सोडून वाकू वाकू खाली बगायला. शेवटी म्हातार्‍यानं, 'काय पडलयं का खाली?' विचारल्यावर गडी भानावर आला. :))

काय म्हणतीयेस काय शिल्पा? आजकालही साडी नेसून मुलाला मुलगी अथवा मुलीला मुलगा दाखवण्याचे कार्यक्रम होतात?
हैला!

राजेश घासकडवी's picture

20 Apr 2013 - 6:27 pm | राजेश घासकडवी

आजकालही साडी नेसून मुलाला मुलगी अथवा मुलीला मुलगा दाखवण्याचे कार्यक्रम होतात?

तुमच्या इंडियात नसतील होत, पण भारतात होतात.

शिल्पा ब's picture

20 Apr 2013 - 11:35 pm | शिल्पा ब

हेच म्हणायला आले होते.

मस्त कलंदर's picture

20 Apr 2013 - 8:43 pm | मस्त कलंदर

होतात.. मानपानाच्या भोंगळ कल्पना जिथे असतात तिकडे तर नक्कीच होतात. कुणीतरी नातेवाईकाने सुचवलेलं पण पसंत नसलेलं स्थळ, त्याला मुलगी दाखवली नाही तर तो नातेवाईक नाराज होईल म्हणून कार्यक्रम करावाच लागेल असं म्हटल्यावर '(किमान) आधीच पसंत नसलेल्या मुलाला बघायच्या कार्यक्रमात साडी नेसणार नाही' असं म्हटल्यावरचे सारे गदारोळ आठवताहेत अजून मला.
इतकंच काय, 'दुबईत नोकरी करतो' या एकाच क्वालिटीवर पाहायला आलेल्या आणि मूग गिळून बसलेल्या मुलाच्या बापाने साडी किंचित वर करून पाय दाखव असंही म्हटलं होतं, आणि यावर मी सोडून बाकी कुणाचा आक्षेपही नव्हता. त्यांना म्हणे पांढर्‍या पायाची, पालथ्या पायाची सून नको होती. इथं मला तो असला मुलगा आख्खाच नको होता त्याचं मात्र त्यांना काही नाही.

सबब, मुंबई-पुणे तत्सम शहरे(इथेही काही घरांतून साडी नेसलीच पाहिजे अशी अट असू शकते) किंवा शिकून खरेच 'सुसंस्कृत' असलेली काही कुटुंबे म्हणजे पूर्ण समाज नाही. आपले श्रामो म्हणतात ना, तशी समाज ही खूपच गुंतागुंतीची गोष्ट आहे.

मस्त कलंदर's picture

20 Apr 2013 - 8:45 pm | मस्त कलंदर

या निमित्ताने पांढरे आणि पालथे पाय कसे दिसतात यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2013 - 8:49 pm | श्रीरंग_जोशी

काही सिनियर मित्रांच्या तोंडून ऐकले होते ज्यांचे कित्येत राउंड होवूनही काही जमत नव्हते.

तर मुद्दा असा की जर बघायला गेलेल्या मुलीच्या पायाच्या अंगठ्या शेजारचे बोट अंगठ्यापेक्षा जराही लांब असेल तर ती मुलगी आयुष्यभर नवर्‍यावर वर्चस्व गाजवेल, फार हसू आले होते बुवा तेव्हा ;-).

मला प्रत्यक्ष हा अनुभव नसल्याने अधिका काही सांगण्यासारखे नाही.

मस्त कलंदर's picture

20 Apr 2013 - 9:11 pm | मस्त कलंदर

माझ्या घरात माझी आईच्या आणि माझ्यासकट दोन्ही बहिणींची अंगठ्याशेजारची बोटे अगदी सहज जाणवण्याइतपत अंगठ्याहून लांब आहेत. माझे, मधले बोटही अंगठ्याहून थोडे जास्त लांब असेल.

लॉरी टांगटूंगकर's picture

20 Apr 2013 - 11:48 pm | लॉरी टांगटूंगकर

मला कोणी तरी हे हुशारीचं लक्षण असतंय असं सांगितलेलं. मंजे अंगठा लहान असला अन् दुसरं बोट मोठ तर ती व्यक्ती बक्कळ डोकंवाली असते असं

शिल्पा ब's picture

20 Apr 2013 - 11:59 pm | शिल्पा ब

तेच हो !! बायको नवर्‍यापेक्षा हुशार नको. फटकळ असली तर चालतै ! तिला भांडखोर म्हणता येतं

पैसा's picture

20 Apr 2013 - 9:17 pm | पैसा

म्हणजे एखादी वस्तू घेताना सगळ्या बाजूंनी पारखून घेऊन विकत घेतात तसला प्रकार. नशीब, चालून दाखव, नाहीतर बोलून दाखव असले काही सांगितले नाही. एरवी पांढर्‍या पायाची म्हणजे काय याबद्दल मलाही कुतुहल आहे.

प्यारे१'s picture

21 Apr 2013 - 12:07 am | प्यारे१

>>>पांढर्‍या पायाची
बहुतेक कोड असणार्‍या व्यक्तीला पांढर्‍या पायाची असं म्हणतात.

अवांतर : एका मठात एकदा उंदीर खूप झालेले असतात. समयांच्या तेलात बुडवलेल्या वाती तेलासाठी पळवून नेत रात्री बेरात्री. मठाधिपतींनी बर्‍याच उपायानंतर शेवटचा उपाय म्हणून मोठ्या परातीत पाणी घेऊन (उंदरांना उडी मारुन पोचता येऊ नये एवढी मोठी परात) त्यात मध्यभागी समया ठेवल्या.

काळ सरला. मठाधिपती गेले, उंदीर औषध खाऊन मेले. आजही मठात समया परातीत मध्यभागी पाण्यात ठेवतात.

असो.

सूड's picture

21 Apr 2013 - 12:28 pm | सूड

पाय बघण्याचा संबंध पांढर्‍या पायाशी नसून सपाट पायाशी असतो असं कोणीतरी सांगितल्याचं आठवतंय. माझ्या एका रुममेटचे पाय सपाट होते. चपला घ्यायला दुकानात गेलो तेव्हा दुकानदाराने त्याला बूटात एक Arch बसवून घ्यायचं सुचवलं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Apr 2013 - 1:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सपाट पायाचा इथे संबंध नसावा रे. तशी १००० वैगुण्ये असू शकतात शरीरात. काय काय चेक करणार? सपाट पायाने त्रास होतो तो धावताना किंवा कुठलेही खेळ खेळताना. ते पण खूप जास्त काळ केले तर. बायको निवडताना हे निकष असतील असे वाटत नाही.

पैसा's picture

21 Apr 2013 - 2:02 pm | पैसा

सपाट पायाची माणसं अपशकुनी असतात असा समज खेडेगावातून होता पूर्वी.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Apr 2013 - 3:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आयला असे आहे होय !!! आता कळले मी नेहमी वाद का ओढवून घेतो ते...

(सपाट पायाचा) विमे :-(

सूड's picture

22 Apr 2013 - 11:50 am | सूड

सपाट पायाची मुलगी सून म्हणून घरात आली तर सगळं घर सपाट करते (थोडक्यात ती येण्यापूर्वी त्या घराचा जो मान, वैभव असतं ते सगळं ती आल्यानंतर लयाला जातं) असा जुन्या जाणत्या (?) लोकांचा समज होता. जावई सपाट पायाचा असला तर काही फरक पडत नाही. ;)

सूचना: वरील वाक्य उपहासाने लिहीलंय, लगेच सगळ्या पाशवी शक्तींना जाग यायची गरज नाही.

इरसाल's picture

22 Apr 2013 - 12:23 pm | इरसाल

मुलगी असली तर तिच्या पतीकडे पैसा टिकत नाही अशी मान्यता आहे.

पांढर्‍या पायाची म्हण्जे जिचे पाय वाजवीपेक्षा रंगाने सफेद अशी ही अपशकुनी मानली जाते.

प्रभाकर पेठकर's picture

22 Apr 2013 - 9:09 pm | प्रभाकर पेठकर

तळपायाला नैसर्गिकरित्या असणारी कमान शरीराचा भार तोलण्यासाठी आवश्यक असते असे म्हणतात. तशी ती नसेल तर अशी माणसे जास्त काळ शारीरीक काम करू शकत नाहीत लवकर थकतात असे ऐकले आहे. म्हणून चुकुन सपाट पायाची मुलगी घरात सुन म्हणून आली तर ती घरकाम जास्त करू शकणार नाही आणि गृहकृत्यात कमी पडेल असा त्या काळी समज होता. खरा की खोटा हे एखादा डॉक्टरच सांगू शकेल.

एअर फोर्सच्या शारीरीक तपासणीत तळपायांची ही कमान आणि दोन्ही पाय जुळवून उभे असताना गुडघे एकमेकांना चिकटतात की वेगळे राहतात हे पाहिले जाते. ह्या शारीरीक तपासणीतून मी स्वतः गेलो आहे.

मस्त कलंदर's picture

21 Apr 2013 - 3:28 pm | मस्त कलंदर

म्हणे बर्का, रावणाचे पाय पालथे होते, आणि मग त्याने मदांध होऊन नवग्रह पालथे घातले आणि त्यावरून चालत गेला. त्या मध्ये आपले शनिबाबा पण होते. ते कोपल्यामुळे रावणाला पुढची सगळी दुर्बुद्धी झाली. आता या सगळ्या दंतकथा जरी असतील, तरी त्या वरच्या समई आणि परातीसारख्या वडाची साल पिंपळाला लावून लोक समज- खरे तर गैरसमज बाळगून असतात.

कधी कधी असा नसता कर्मठपणा दाखवल्यामुळे आजूबाजूचे काही लोक दबून असतात, त्यामुळे थोडासा अहंकार सुखावतो म्हणूनही हे असले समज बाळगणं होत असेल.

मृत्युन्जय's picture

23 Apr 2013 - 2:14 pm | मृत्युन्जय

मके स्पष्ट बोलतो राग नको मानुन घेउस. पण चूक त्या लोकांची नव्हती तर तुझ्या घरच्यांचीच होती. आलेली लोकं माठच होती. पण त्यांनी साडी वर करुन पाय दाखव म्हटल्यावर तुझ्या घरच्यांनीच या गोष्टीला आक्षेप घ्यायला हवा होता. नपेक्षा मुलानेही पँट वर करुन दाखवावी असे सुचवायला हवे होते. लोक काय वाट्टेल त्या अपेक्षा करतील.

अवांतरः पाय दाखव म्हणण्याऐवजी तुला कोड नाहित याचे डॉक्टरी स्पष्टीकरण दे असे सांगितले असते तर तुला चालले असते का? हाच प्रश्न तुझ्या नवर्‍याने (देवाच्या दयेने तो हुषार आहे. माठ नाही. असले काही विचारणार नाही. तरी.._ ) विचारले असते तर तुझी तितपतच चिडचिड झाली असती का?)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Apr 2013 - 9:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पारंपरिक पद्धतीमधे असे प्रश्न फक्त मुलीलाच विचारले जातात; मुलगा फक्त क्रोमोझोम्सची एक जोडी XY आहे (XX नाही; किंवा फ्रॉयडीयन स्पष्टीकरण बघावे) या सबबीस्तव वैगुण्यरहित असतो असं मानलं जातं. अलिकडे शहरांमधे मुलीही मुलाला judge करताना दिसतात, तिथे त्या बाबतीत समानता आहे. मकीचे अनुभव पहाता तिला या बाबतीत समानतेचा अनुभव नाही. समानता ही ट्रॅफिकमधल्या 'राईट ऑफ वे' सारखी असते. ती मागून मिळत नाही, आणि बळकावूनही नाही. ती द्यावी लागते.

इथं मला तो असला मुलगा आख्खाच नको होता त्याचं मात्र त्यांना काही नाही.

या वाक्यातून, माझ्या मते, (ती मुलगी असल्यामुळे) तिच्या मताला थोडाही मान न देणार्‍या, तिचा तिथे उपस्थित सगळ्या लोकांवर असणारा वैताग दिसतो आहे. फक्त मुलावर किंवा त्याच्या घरच्यांवर नाही; आणि त्यापेक्षाही एकंदर परंपरेच्या (उरल्यासुरल्या) अवशेषांवर टीका.

मस्त कलंदर's picture

24 Apr 2013 - 1:35 am | मस्त कलंदर

तुझा आधीचा प्रतिसाद आहे की मुलींना आक्षेप का असतो या कार्यक्रमावर. उत्तर आहे कार्यक्रम ज्या पद्धतीने पार पडतो त्यावर आक्षेप असतो. बरेचदा मुलगा बिझी असतो, मग आईबाबा बघतात, त्यांना पसंत तर बाकीचं लटांबर घेऊन येतात. यात मुलीला पण दोनदोनदा दाखवून घ्यायला वेळ नसू शकतो. लग्न दोघांनाही करायचं असतं, दोन्ही बाजूंकडून ते तसंच घेतलं जात नाही असा स्वानुभव आहे..

माझ्या त्राग्यावर घरच्यांचे उद्गार होते, "त्यात काय, परवाच आपल्या नात्यातल्या तिलापण असंच सांगितलं होतं". इथं माझी लढाई सगळ्यांच बाजूंनी होती. चुकीच्या परंपरा, ज्यांना लग्न करायचंय तो तोंड उघडून एक शब्द बोलत नाहीत मग असल्या मुलांशी मला लग्न का करायचं नाहीय हे पुन्हापुन्हा पटवून देत राहाणं , माहित असलेलेच प्रश्न विचारणं(एकाने चक्क मार्कलिस्ट पाहायला मागितली होती) आणि इथून तिथून विचारणार काय, की नोकरी करणार तर घरचा स्वयंपाक कोण करणार वगैरे वगैरे.

मला खरंतर शास्त्रीय आधार असलेलं काहीही विचारलं तर काहीच प्रॉब्लेम नसेल, मग तो मेडिकल रिपोर्ट का असेना. पण माझा मागायचा आणि स्वतः चेक-अप करायचं नाही असा दांभिकपणा नको..

मृत्युन्जय's picture

24 Apr 2013 - 11:50 am | मृत्युन्जय

हे असेच उलटे माझ्याबाबत पण झाले आहे. एक दोन मुलींचे आईवडील आधी येउन मल घराला बघुन गेले आणि मग मुलीला घेउन आले. हे असे सगळीकडे सगळ्यांच्या बाबतीत होते ग. किमान मला तरी तसे अनुभव आले.

अमोल खरे's picture

27 Apr 2013 - 5:17 pm | अमोल खरे

मलापण मलापण. दोन वेळेस असे अनुभव आले आहेत. मुलीचे आई वडिल आधी येऊन आमचे घर आणि मला पाहुन गेले होते. नंतर मुलीला घेऊन आले. पण काय आहे ना, की मुलांच्या नावाने खडे फोडले की विचारवंत म्हणुन कौतुक होतं.

टीप- हा प्रतिसाद मकीला उद्देशुन नाही.

मुलांच्या नावाने खडे फोडले की विचारवंत म्हणुन कौतुक होतं.

प्रचंड सहमत.

एकाने चक्क मार्कलिस्ट पाहायला मागितली होती

च्यायला, ही तर हद्द च झाली. मग तुम्हीही त्याची पेस्लीप मागायची होती, जशास तसे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Apr 2013 - 1:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थिअरेटीकली बरोबर आहे. पण ते लग्नाबद्दल सुरू होतं हो. आंजावरची चर्चा नव्हती! ;-)

मुक्त विहारि's picture

20 Apr 2013 - 9:34 pm | मुक्त विहारि

आवडला..

साडी किंचित वर करून पाय दाखव असंही
फुल्या फुल्या त्याच्या नावाने. बरं अश्यावेळी नाही म्हणणारे आपण एकटेच असलो की जाम पंचाईत होते.
लग्नात तर पाय धुण्याच्या कार्यक्रमाचा असाच संताप येतो. एका लग्नात मी सरळ नाही म्हणून सांगितले. माझ्या तिप्पट वयाची बाई माझे पाय धुणार हे काहीतरीच! ती लहान असती तरीही मी नकोच म्हणाले असते.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Apr 2013 - 11:08 am | प्रकाश घाटपांडे

<<लग्नात तर पाय धुण्याच्या कार्यक्रमाचा असाच संताप येतो. एका लग्नात मी सरळ नाही म्हणून सांगितले. माझ्या तिप्पट वयाची बाई माझे पाय धुणार हे काहीतरीच! ती लहान असती तरीही मी नकोच म्हणाले असते.>>
मला ही पुर्वी हे आवडायच नाही. पण काही लोकांच्या मते यात उच्च नीचता, मान अवमान असा भाग नसून केवळ परंपरेच जतन करण्याचा 'शास्त्रा'पुरता भाग आहे. जो पाय धुणारा आहे तो पराजीत व धुउन घेणारा आहे तो जेता अशी भावना त्या दोन्ही पक्षाची नसते. परंपरागत पुरुष प्रधानते मुळे अनेक अनेक बाबी वरपक्षाकडे झुकणार्‍या आहेत. आपण अनेक निरर्थक व कालबाह्य गोष्टी परंपरा म्हणुन जपत असतो. काही लोक त्याचा आनंदही घेत असतात. पारंपारिक गाणी, नउवारी साडी नथ घालून मंगळागौर खेळणार्‍या बाया इतर वेळी आधुनिक असतात. अंधश्रद्धा सुद्धा एंजॉय करणारे लोक असतातच. त्यांना बळी कस म्हणाव असा प्रश्न पडतो कधी कधी मला. असो

फॉर्मल नको नॉर्मल कपडे घालावेत.

चित्रगुप्त's picture

21 Apr 2013 - 8:25 pm | चित्रगुप्त

...फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना साडीच घालायचा आग्रह...
... अजिबात योग्य नाही.
हा बघा आदम आणि हव्वाचा दाखवण्याचा कार्यक्रम (तात्कालीन 'फॉर्मल' कपड्यात):
चित्रकारः पीटर पॉल रुबेन्स (१५७७-१६४०)
s
(चित्र विकिपिडिया वरून)

शिल्पा ब's picture

22 Apr 2013 - 12:02 pm | शिल्पा ब

तुम्ही डकवलेल्या बहुतेक चित्रात लोकं / स्त्रिया नागव्याने का असतात? एक आपला प्रश्न पडला म्हणुन विचारावं म्हंटलं इतकच.

मी तर नवर्‍याला पहायला/दाखवायला स्कर्ट मध्ये गेलेले.

नगरीनिरंजन's picture

22 Apr 2013 - 12:34 pm | नगरीनिरंजन

पाहण्या-दाखवण्याच्या रोमांचक अनुभवांना मुकलेलो असल्याने चर्चा वाचून वेगळाच आनंद आणि ज्ञानप्राप्ती होत आहे.
येऊ द्या.

आशु जोग's picture

22 Apr 2013 - 1:27 pm | आशु जोग

असे विषय बरे असतात त्यानिमित्ताने अनेक लोकांना आपले पुरोगामित्व प्रदर्शित करायची संधी मिळते

बा द वे
> > "दाखवायचा कार्यक्रम " म्हणल्यावर कपडे कशाला घालायचे असा एक भाबडा प्रश्न लहान पणापासुन आपल्या मनात डोकावतोय .

इथे या धाग्याचा शेवट झाला आहे.

कवितानागेश's picture

23 Apr 2013 - 1:46 pm | कवितानागेश

नक्की काय होउन लग्न जमतं हा खरं तर मोठ्ठा प्रश्नच आहे. पण कुठले कपडे घातलेत यावर खरोखरच काही अवलंबून असेल असं वाटत नाही.
एक मैत्रीण रोज सकाळी साधा घरातला कळकट गाउन घालून त्यांचा भयानक दिसनारा बॉक्सर कुत्रा बागेत फिरवायला न्यायची. तिला त्या बागेजवळ राहणार्‍या एका डॉक्टर मुलानी आईवडलांसकट घरी येउन मागणी घातली. व्यवस्थित लग्न झाले.
अजून एक डॉक्टर मैत्रीण काही दिवस रोज हिरवा गाउन आणि हिरवा मास्क लावून एका सर्जनबरोबर काम करत होती. तिचेपण लग्न असेच मुलानी आईवडलांसकट घरी येउन मागणी घालून झाले.
मी पहिल्या वेळेस नवर्‍याला भेटले तेंव्हा तर दिवसभर भटकून गेले होते, त्यामुळे तोंड पण धुतले नव्हते. ते माझ्या पांढर्‍या ओढणीला पुसले तर ओढणी काळी झाली. मग ओढणी वाईट दिसेल या भितीनी नेहमीप्रमाणे ड्रेसच्या बाहीला पुसलं. मग अबोली ड्रेसची बाहीपण काळी झाली! ;) तरीपण तो म्हणाला घरी ये आईबाबांना भेटायला!
काही दिवसांनी त्याच्या घरी माझ्या आईला घेउन गेले आणि आधी मान खाली घालून गपचुप बसले. तेंव्हा अचानक लक्षात आले की मी जांभळ्या टॉपवर गुलाबी ओढ्णी घेतलिये आणि सलवार मात्र पांढरी-शुभ्र घातलिये! तरीपण लग्न ठरलं. :D
... कपड्यांवर काही अवलंबून नसतं ...

पैसा's picture

23 Apr 2013 - 1:49 pm | पैसा

वेंधळी मुलगी बर्‍याच जणांना आवडते असे ऐकून आहे. मात्र बॉक्सर कुत्र्याला सांभाळणारी मुलगी काही करू शकेल असे वाटले असेल कदाचित!

मृत्युन्जय's picture

23 Apr 2013 - 2:43 pm | मृत्युन्जय

पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट होणारी सगळी स्त्रीशक्ती नेहमी "दाखवायच्या" कार्यक्रमाला तीव्र नापसंती व्यक्त करतात हे काही कळत नाही. २५ वर्षापुर्वी गोष्ट वेगळी होती. त्याकाळी मुलगी "बघायला" जायचे आणि मुली मान वर करुन फारश्या धीटपणे कदाच्त मुलांना बघायच्या नाहित. पण सध्याच्या बघायच्या कार्यक्रमात मुलीही मुलांना बघत नाहित यावर विश्वास बसत नाही. आणि मग दोघे एकमेकांना बघणार असतील तर नक्की प्रॉब्लेम काय असतो? न बघता अक्कड बक्क्ड बम्बे बो करुन जीवनाचा साथीदार निवडला जावा की काय?

दुसरी गोष्ट म्हणजे मला दाखवायच्या बहुतेक कार्यक्रमात (बरोबरच लिहिले आहे. च्यायला मीच जास्त लाजायचो) मुलीच मला बघायला घरी आल्या. म्हणजे इथे दाखवायचा कर्यक्रम माझाच झाला असे म्हणायला हरकत नाही. त्यावेळेस प्रेझेंटेबल मलाही रहावे लागायचे. आम्ही मुळातच ध्यान असल्याने थोडे जास्त सजग असायला लागायचे. मी सुद्धा पायजम्यावर दात घासत घासत किंवा झओपेतुन उठल्यावर डोळ्यातली घाण काढत किंवा ओठांजवळची लाळ पुसत मुलींना सामोरे नाही गेलो. मग मुलीही थोड्याश्या बर्‍या अवतारात असल्या तर काय बिघडले.

दाखवणे या कार्यक्रमाबद्दल आस्था फारशी कोणालाच नसते. पण गरज असते. आपण आपल्या जीवनाचा साथीदार पटवण्याच्याबाबतीत माठ आणि अडाणी असलो तर तो आपलाच दोष आहे. गपगुमान बघण्यादाखवण्याचे कार्यक्रम केलेच पाहिजेत. तर मग बघायला येणार्‍या लोकांना उगाच कशाला दोष द्यावा. तुम्ही स्वतःही तेच करत असता ना?

बघायला जाताना बर्म्युडा घालुन जाणारे लोक असतील तर असोत बापडे. तुम्हालाही त्याच्यावरताण मिनीस्कर्ट घालुन जायचा असल्यास घाला की. तुम्हाला त्यापासुन परावृत्त करणारे तुमचे आईवडील असतात. वरपिता / वरमाता नव्हेत.

आणि शेवटचे म्हणजे साडी ही आता फॉर्मल राहिली नसुन पंजाबी ड्रेस फॉर्मल झाला आहे. मी बघितलेल्यापैकी एकाही मुलीने बघण्याच्या कार्यक्रमात साडी नेसली नव्हती. आता पंजाबी ड्रेस घालण्याबद्दलही आक्षेप असेल तर गोष्ट वेगळी. तो बदलत्या सामाजिक आवडीनिवडींचा परिपाक आहे. शालीन वाटतीलसे कपडे घातल्याने समोरच्या पक्षाचे प्रतिकूल मत बनणे टाळता येउ शकते असा विचार करुन काही आईवडील आपल्या मुलींना समाजमान्य पेहराव करायला सांगतात असे वाटते. मुलीच्या भावी नवर्‍याच्या घरात मुलीला पंजाबी ड्रेस घालुन फिरायला आवडणार असेल तर पंजाबी ड्रेसच घालावा. जीन्स टी शर्ट हवा असेल तर तोच घालुन जावा (घरात गाउन घालुन फिरायला आवडते किंवा घरातच तर आहे ना मग कशाला हवे .... तर मी तेच घालुन जाणार असा जर विचार असेल तर हे लक्षात घ्या की कुठल्याही पुरुषाला घरी पायजमा किंवा ढगळ मळकट ट्रॅक पँट आणि बिन्बाह्यांचा बनियान घालुन बसायला आवडते. तोही तसाच आला तर आपल्याला आवडेल काय?)

बलीवर्दनेत्रभञ्जक प्रतिसाद. यावर काय प्रतिक्रिया येतील हे पाहणे आवडेल.

सूड's picture

23 Apr 2013 - 2:54 pm | सूड

>>कुठल्याही पुरुषाला घरी पायजमा किंवा ढगळ मळकट ट्रॅक पँट आणि बिन्बाह्यांचा बनियान घालुन बसायला आवडते. तोही तसाच आला तर आपल्याला आवडेल काय?

असेच म्हणतो.

शक्यतो बनियनही नको असतो असं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच दारावरची बेल वाजली की अस्मादिकांच्या कपाळावर बर्‍याच आठ्या पडतात. म्हणजे आता झटकन उठून शर्टबिर्ट घालणे आले.

बाकी पायजम्याविषयी, "मळकट" हा भाग सोडून सहमत. चटेरीपटेरी पायजमा मूळ कोंकणातील पिंडाशी जुळणारा सबब अत्यंत आवडता असूनही केवळ घटस्फोटाच्या भीतीने टाळावा लागतो. इतर कोणताही रंग चालतो पण मळकट नसावा.

असो. व्यक्ती तितक्या प्रकृती..

प्रकाश घाटपांडे's picture

23 Apr 2013 - 3:22 pm | प्रकाश घाटपांडे

न बघता अक्कड बक्क्ड बम्बे बो करुन जीवनाचा साथीदार निवडला जावा की काय?

अरे गडाबडा लोळण्याची स्मायली कुठे गेली रे!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Apr 2013 - 1:14 am | विश्वनाथ मेहेंदळे

लॉजिकल बोलतोस मृत्युंजया ??? ते पहा तुझ्या अशा वागण्याने अबोलींचा एक गजरा कोमेजून गेला !!!!
अरे कुठे फेडशील ही पापे ??

पिशी अबोली's picture

27 Apr 2013 - 10:26 pm | पिशी अबोली

काका, अबोलीचा 'गजरा' नसतो. अबोलीची 'वेणी' असते.
पुरुषी लॉजिकल बोलता बोलता लेक्सिकल बारकावे राहूनच गेले की.. अहो, मुलींना टोचून बोलताना अशी चूक अपेक्षित नाही तुमच्याकडून..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Apr 2013 - 11:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गजरा किंवा वेणी घेऊन द्यावे असे कुणी कधी नव्हते आयुष्यात. मग अशा चुका होणारच ना ;-)

बॅटमॅन's picture

27 Apr 2013 - 11:13 pm | बॅटमॅन

यावरून एक शंका.

कुठल्या फुलांचे गजरे हे वेणी म्हणून संबोधले जातात?

पिशी अबोली's picture

27 Apr 2013 - 11:31 pm | पिशी अबोली

गजरा हा सुईने दोर्‍यात ओवून केला जातो. मोगर्‍यासारख्या फुलांचा गजरा असतो.
वेणी धाग्यात गुंफून करतात. अबोली इतक्या नाजूक फुलांना सुईने ओवता येत नाही.
'मोगर्‍याचा गजरा' आणि 'अबोलीची वेणी' असं म्हणायची पद्धत आहे.

बॅटमॅन's picture

27 Apr 2013 - 11:34 pm | बॅटमॅन

माहितीकरिता धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2013 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी

ज्येष्ठ मिपाकर जागूतै यांचा इतर संस्थळावरचा हा लेख बघा.
http://www.maayboli.com/node/34998?page=1

त्यातील अबोलीच्या गजर्‍याचा हा फोटू तेथूनच आभार
अबोलीचा गजरा

पिशी अबोली's picture

27 Apr 2013 - 11:43 pm | पिशी अबोली

या लेखात फार क्वचित 'गजरा' असा उल्लेख आहे. नाहीतर 'वेणी' आणि 'कदंबा' असाच उल्लेख आहे.
सर्वसाधारणपणे 'वेणी' आणि 'गजरा' यांच्यातला फरक नजरेआड केला जातो. पण मुलींच्या लॉजिकला सतत सुईसारखं टोचणार्‍यांना तो माहीत असावा असं वाटलं (मुलींवरच्या टीकेचे गजरे ओवत बसायला बरं). काटेकोरपणा दाखवायचाच असला तर तो लॉजिक आणि सिमेंटिक्स दोघांमधेही दाखवा की..

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2013 - 3:44 am | श्रीरंग_जोशी

वर डकवलेल्या फोटो अगोदर जागूतैंनी खालील वाक्य लिहिले आहे.

हे बाजारातील गुंफलेले लाल अबोलीचे गजरे.

तसे म्हणणे योग्य की अयोग्य हे मी इथे ठरवत नाहीये.

राजेश घासकडवी's picture

28 Apr 2013 - 5:01 am | राजेश घासकडवी

काटेकोरपणा दाखवायचाच असला तर तो लॉजिक आणि सिमेंटिक्स दोघांमधेही दाखवा की..

काटेकोरपणाच करायचा झाला तर 'ओवलेला' तो गजरा 'बांधलेली' ती वेणी हे बरोबर नाही. गजरा ओवलेला असू शकतो किंवा बांधलेलाही असू शकतो. किंबहुना बाजारात गजरे जे मिळतात ते धाग्यांनी बांधलेलेच असतात. गजरेवाले गजरे धाग्यानेच गुंफताना दिसतात.

वेणीला जास्त घट्ट वीण असते हे बरोबर आहे. ती थोडीशी पट्टीसारखी असते, फुलांची दिशा विशिष्ट असते. ही पट्टी अंबाड्याभोवती गुंडाळता येते. गजरा हा पट्टीसारखा नसून, फुलं सर्व बाजूने असल्यामुळे गोलसर बनतो. गजरा जास्त गुबगुबित असतो, वेणी जास्त दाट, घट्ट आणि फ्लॅट असते.

त्यामुळे वरील चित्रातला हा गजराच आहे. जागूताईंनी बरोबर लिहिलेलं आहे.

पिशी अबोली's picture

28 Apr 2013 - 11:07 am | पिशी अबोली

'मोगर्‍याचा गजरा' आणि 'अबोलीची वेणी' असं म्हणायची पद्धत आहे.

असे मी वर म्हटले आहे. अबोलीची सर्वसाधारणपणे 'वेणी' बनवतात. वेणी ओवलेली नसते एवढं नक्की. गोल गुंफलेल्या फुलांना सरसकट गजरा म्हटले जात असले, तरी त्यांना 'सर' म्हणणे योग्य ठरेल.

पिशी अबोली's picture

28 Apr 2013 - 11:09 am | पिशी अबोली

पण वेणीचे हे वर्णन जास्त चांगले आहे.

मस्त कलंदर's picture

24 Apr 2013 - 4:34 pm | मस्त कलंदर

खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट पाहतो आणि त्यावरून मत बनवतो. एकूणात व्यवहारातली लवचिकता ही कित्येकदा शहराच्या आकारावर आणि कित्येकदा जातींमधल्या रूढींवरतीही अवलंबून असते. जे मुंबईत होतं, तसंच कोल्हापुरात घडेल असं नाही, परंतु ते कदाचित अगदी खेड्यात राहणार्‍या ब्राह्मण कुटुंबात होऊ शकेल. मराठा आणि बहुजन समाज हा ब्राह्मण समाजापेक्षा अधिक ताठर आहे (हे मा वै म*) आणि कळालं तरी न वळवून ते तसंच व्हायला हवं हा त्यांचा अट्टहास असू शकतो. मी साडीच नव्हे, तर डोक्यावरूनही पदर घ्यायला हवा अशी उदाहरणं पाहिली आहेत.

मुंबई-पुणे सारख्या शहरांत आणि मुख्यतः अशा ठिकाणी की जिथे मुली मुलांच्या घरी पाहायला जातात अशा वेळेस पंजाबी ड्रेस हा प्रवासाच्या दृष्टीने सुटसुटीत पर्याय ठरू शकतो. इतर शहरांत आणि ज्या मुलींच्या घरी मुलाच्या घरचे पाहायला जातात तेव्हा काय परिस्थिती असते हे इतरांनी इथं सांगावं, मी माझा सँपल सेट बाजूला ठेवते. यावरूम माझी मतं बदलतील अशी परिस्थिती असेल तर ते मला जास्त आवडेल.

प्रक्रिया कुणाच्याही घरी पार पडली, तरी चिकित्सा कुणाची जास्त होते हा प्रश्न आहे. मुलींनी स्वयंपाक करू नये, घर सांभाळू नये अशा मताची मी नाही. परंतु आजच्या जमान्यात जिथे दोघेही एकाच प्रकारचे काम करतात तिथे ही फक्त एकाचीच जबाबदारी आहे असं मानणं चुकीचं आहे. पुन्हा एकदा, याबाबतीत विमे आणि मृत्युंजय यांची-त्यांच्या कुटुंबियांची मते वेगळी असू शकतात. पण सर्वसाधारण लग्नाळलेल्या मुलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता तशी असेलच हे होत नाही. कित्येकदा नवरा समजून घेतो पण घरच्यांच्या पुढे काही चालत नाही.

*हे माझं वैयक्तिक मत.

पिलीयन रायडर's picture

24 Apr 2013 - 4:45 pm | पिलीयन रायडर

प्रक्रिया कुणाच्याही घरी पार पडली, तरी चिकित्सा कुणाची जास्त होते हा प्रश्न आहे

हे मात्र बरोबर आहे. मुली चिकित्सा करत नाहीत असं मुळीच नाही. पण जेव्हा दाखवायचा कार्यक्रम असतो तेव्हा मात्र मुलीची जास्त चिकित्सा होतेच. तिच्या कपड्यांवरुन मत बनवले जाते. आणि अजुनही अनेक ठिकाणी "चालुन दाखव, सुईत दोरा ओवुन दाखव, पाय दाखव" असे प्रकार होतातच..

कित्येकदा नवरा समजून घेतो पण घरच्यांच्या पुढे काही चालत नाही.

ह्या वाक्याला १०० वेळा अनुमोदन कारण हे तर अगदी स्वानुभवातुन समजले आहे...

अपेक्षा मुलीकडून जास्त असतात, त्यांची चिकित्सा जास्त होते हे खरंच आहे. पण त्याचं कारण म्हणजे मुलाची फॅमिली भलतीच जास्त चिकित्सक असते असं नसून मुलीची फॅमिली अतिशयच "अचिकित्सक" आणि मुलाकडून किमान अपेक्षाही नसलेली असते हे आहे.

"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" हे दुर्दैवी प्रेशर जेव्हा नाहीसं होईल तेव्हाच दोन्ही बाजू समतोल दिसतील.

मस्त कलंदर's picture

24 Apr 2013 - 6:17 pm | मस्त कलंदर

"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" हे दुर्दैवी प्रेशर जेव्हा नाहीसं होईल तेव्हाच दोन्ही बाजू समतोल दिसतील.

यू सेड इट.

आमच्या शेजारच्या घरातली गोष्ट. नाममात्र एम ए झालेल्या एका कनिष्ठ क्लार्कचं लग्न एम. एस्सी. बी. एड. आणि तेही उत्तम मार्कांनी पास झालेल्या आमच्या शेजारच्या मुलीशी झालं. ती खरंच खूप हुशार आहे आणि तिची स्वत:ची विचारांची एक व्यवस्थित बैठक आहे. त्यामुळे बौद्धिक अंतर खूपच अधिक असल्याने तिला हे लग्न पसंत नव्हतं. पण झालं असं की ती तशी दिसायला यथातथाच असल्याने सगळ्या नातेवाईकांनी तिच्या आईबाबांना सतत " हिला कशी उजवणार रे बाबा तुम्ही?" असं हिणवलं होतं. तिकडून होकार आला, आणि मग हिचा कुणी विचारलाच नाही. सासरच्या लोकांनी माहेरच्यांकडून "आम्ही हिला नोकरी लावून देऊ" असं वदवूनही घेतलं. म्हणजे फक्त दिसण्यावरून तिचं सगळं शिक्षण-हुशारी मातीमोल ठरली आणि एक भविष्यातली एक बँक म्हणून तिच्याशी लग्न केलं गेलं. बरं तो मुलगाही काही मदनाचा पुतळा नव्हता, चांगला टकला होता आणि फक्त रंग जरासा उजळ असेल. या मुलीची लहान बहिण तेव्हा इंजिनिअरिंगला माझ्याच सोबत होती. लग्नानंतर तिला कळालं की नवर्‍याचे मित्र त्याला म्हणत होते की या मुलीशी लग्न करण्याऐवजी तिच्या बहिणीशीच का नाही केलंस? सुंदर आणि इंजिनिअर बायको तुला मिळाली असती. जणू काही पुरूष असणंच हे त्यांच्यालेखी एवढं मोठं क्वालिफिकेशन होतं की त्यापुढे एमएस्सी आणि इंजिनिअरिंग किस झाड की पत्ती!!!

हे ऐकून त्या मुलीने डोक्यावर हात मारून घेतला.

पिलीयन रायडर's picture

24 Apr 2013 - 6:33 pm | पिलीयन रायडर

आई बरोबर जनगणना करत फिरत असताना मी एका ओळीत अशी १०० घरं पाहिली आहेत जिथे बायका पोस्ट ग्रॅड. आणि नवरे दहावी / बारावी... ह्या बायकांचे दाखवायचे कार्यक्रम कसे झाले असतिल बरे?

तु ते सँपल सेट च बरोबर बोलली होतीस ग...

"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं"
अगदी बरोबर.
आमच्या एका नातेवाईक मुलीचे लग्न गेल्या पंध्रा दिवसांखालीच मोडले. कारण हेच!
मुलाकडच्यांची तक्रार होती की तुम्ही आमची चौकशी करायला नको होती. मुलीचे आईवडील म्हणाले की एकाच गावात मुलगा मुलगी रहात असताना गोष्ट वेगळी आणि परगावी मुलगी द्यायची, तिथे कोणी ओळखीचे नसताना आम्ही चौकशी करणारच. तुमचे सगळे बरे असेल तर भीती कशाची? अशा ठिकाणी आम्हालाच आता आमची मुलगी द्यावयाची नाही.

राजेश घासकडवी's picture

24 Apr 2013 - 7:11 pm | राजेश घासकडवी

"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" हे दुर्दैवी प्रेशर जेव्हा नाहीसं होईल तेव्हाच दोन्ही बाजू समतोल दिसतील.

अजून पंधरा वर्षं वाट पहा गवि. गेल्या दहा पंधरा वर्षांत ज्या आईबापांनी स्त्रीभ्रूणहत्या करून घेतल्या आहेत त्यांच्यावर अशीच मुलीचं स्थळ गमवण्याच्या भीतीची पाळी येणार आहे. आठ मुलांमागे सात मुली - सगळ्याच गेल्या पिढीपेक्षा जास्त शिकलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकणाऱ्या आणि अधिक मोकळ्या समाजात वावरणाऱ्या. मग दुसरं काय होणार?

रेवती's picture

24 Apr 2013 - 7:23 pm | रेवती

सहमत.
पंजाबी ड्रेस हा प्रवासाच्या दृष्टीने सुटसुटीत पर्याय ठरू शकतो.
अगदी हेच म्हणते. माझे लग्न हे अर्धा तासात ठरले तेंव्हा साडीबिडी कोण नेसत बसणार? हौसेनं तशीही नेसत असे पण अचानक ठरलेल्या लग्नात हे मलाच नको वाटले. त्यावेळी त्यातल्यात्यात बरा असलेला कपडा घातला. नवराही फार काही भारी कपडे घालून आला नव्हता. हे दीड दशकापूर्वी झालं आणि आत्ता माझ्या इतक्या आते, मामे, चुलत बहिणींची लग्ने झाली, मला दोन वहिन्या येऊन जुन्या झाल्या. हे सगळे पुणे, मुंबई, याबरोबरच औरंगाबाद, कोकण, कोल्हापूर, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा ठिकाणी असलेले आहेत पण सगळ्यांनी पंजाबी कपडे, जीन्स व लांब कुडते, (ऑफिसातून डायरेक्ट दाखवण्याच्या ठिकाणी गेल्याने) ऑफीसवेअर अशा कपड्यांमध्येच मुले बघितली/मुली बघितल्या, पसंत केले, लग्ने झाली, मुलेही झाली. ;) त्यामुळे अजूनही साडी प्रकरणाचे जरा आश्चर्य वाटले.
माझ्या वहिनीला भावाने पसंत केले पण कधी नव्हे तो मला म्हणाला की तू भारतात चाललीयेस तर मला तुझे मत हवे आहे टाईप. त्यावेळे मुलीकडल्यांना "आम्ही येतो, तुम्ही ६ तास प्रवासात घालवू नका" (एकदा त्यांनी घालवले आहेत)पण त्यांनाच ते कसेतरी वाटले आणि नाही नाही आम्हीच येणार म्हणून आले पण माझी वहिनी पंजाबी कपडेच घालून आली होती. या एकमेव केसमध्ये मुलीला दोनदा बघण्याचा कार्यक्रम झाला, तोही आमच्याकडून पण मुलीकडून माझ्या भावाला ४ बघण्याचे कार्य्क्रम झाले. का? तर तुम्ही हुंडा घेत नाही म्हणजे मुलामध्ये काही कमीजास्त नाही ना हे बघण्यासाठी, शिवाय गोरा मुलगा सावळी मुलगी का म्हणून पसंत करेल? हे त्यांचे मत.

पिलीयन रायडर's picture

24 Apr 2013 - 7:30 pm | पिलीयन रायडर

माझे आजोबा मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांनी मामा साठी मुलगी पाहिली. तेव्हा दाखवायचा कर्य्क्रम एका बागेत भेटुन झाला (मामी ला मोकळे वाटावे म्हणुन..)साखरपुडा झाला तेव्हा आजोबांची आई वारली होती. दहाव्या दिवस होत.. पण मुलगी अपशकुनि नाही हे पटवायला त्यांनी साखरपुडा केला. लग्न हुंडा न घेता आणि अर्धा खर्च देऊन झाले. तिच्या आई-वडीलांनी १ ग्रॅमही सोने घातले नाही. आजोबांनी ५-१० तोळे घातले असावे...
..तर तेव्हा ही चर्चा होती की माझ्या मामात काहीतरी प्रॉब्लेम आहे...

अप्पा जोगळेकर's picture

27 Apr 2013 - 5:17 pm | अप्पा जोगळेकर

अपेक्षा कोणाकडून जास्त असतात हा विवाद्य मुद्दा आहे.
मला एका मुलीने सरळ सांगितले की १ बीएच्के म्हणजे फारच लहान घर झाले. त्यावर मी सांगितले की ,"मला यापेक्षा मोठे घर घेणे परवडण्यासारखे नाही. तुला शक्य असेल आणि तुला आवश्यक वाटत असेल तर तू आणखीन मोठे घर घे. तिथे राहण्यास मला काहीच अडचण नाही."
हे बोलणे बहुधा तिला खटकले असावे. ती सरळ उठून निघून गेली. तिच्या कॉफीचे बिलसुद्धा मलाच भरावे लागले.

अपेक्षा कोणाकडून जास्त असतात हा विवाद्य मुद्दा आहे.

विवाद्य नाहीये खरे तर, परंतु खरे काय ते सांगितलं की वाद होतात. म्हणून विवाद्य आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

तिच्या कॉफीचे बिलसुद्धा मलाच भरावे लागले.

पुरुषांनीच बिले भरायची, फुकट तसदी बाकी कोण कशाला घेणार म्हणा. बाकी रोखठोकपणा आवडला हेवेसांनल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Apr 2013 - 10:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पुरुषांनीच बिले भरायची, फुकट तसदी बाकी कोण कशाला घेणार म्हणा.

स्त्री पुरुष समानता असते, पण बिले नेहमी पुरुषांनी भरायची असतात. एकदा एक मैत्रीण मुलाला भेटायला गेली होती. त्याने कॉफी बिल TTMM प्रकाराने भरायला लावले. तो निगेटिव्ह मुद्दा गणला गेला. तो पण कमालीचा.

स्त्री पुरुष समानता असते, पण बिले नेहमी पुरुषांनी भरायची असतात. एकदा एक मैत्रीण मुलाला भेटायला गेली होती. त्याने कॉफी बिल TTMM प्रकाराने भरायला लावले. तो निगेटिव्ह मुद्दा गणला गेला. तो पण कमालीचा.

हा बेगडीपणा असतो, पण बोलायचे नाही. अबोलीचा गजरा आपलं वेणीसंहार होईल ना ;) =))

अमोल खरे's picture

28 Apr 2013 - 11:16 am | अमोल खरे

मलापण हा रोखठोकपणा आवडला. आणि वर ती मुलगी सरळ उठुन गेली, म्हणजे तिचा उद्धटपणा बघा किती.. हेच जर एखादा मुलगा उठुन गेला असता आणि ती मुलगी मिपाची मेंबर असती तर पुरुष कसे वाईट्ट ह्यावर धागा आला असता.

अप्पा जोगळेकर's picture

28 Apr 2013 - 11:45 am | अप्पा जोगळेकर

चालायचंच. एकंदरच स्त्री-पुरुष समानतेच्या नावाने बोंबच आहे.
हक्क बजावण्याला ओनरशिप घेण्याची वृत्ती चिकटलेली असेल तर ते शोभून दिसते.
मागे एकदा मी 'भारतात खेड्यांमधल्या स्त्रिया अतिशय कष्टाचे आयुष्य जगतात तर शहरी स्त्रिया फार शेफारुन गेल्या आहेत' असे विधान केले होते तर इथले स्त्री-मुक्तीवाले खवळून उठले होते.
अर्थात वस्तुस्थिती आजसुद्धा तशीच आहे म्हणा.

बॅटमॅन's picture

28 Apr 2013 - 11:47 am | बॅटमॅन

+१०^१००.

मोदक's picture

28 Apr 2013 - 11:31 pm | मोदक

'भारतात खेड्यांमधल्या स्त्रिया अतिशय कष्टाचे आयुष्य जगतात तर शहरी स्त्रिया फार शेफारुन गेल्या आहेत' असे विधान केले होते तर इथले स्त्री-मुक्तीवाले खवळून उठले होते.

आप्पा - लिंक आहे का धाग्याची...?

इरसाल's picture

23 Apr 2013 - 3:09 pm | इरसाल

उहापोह झा ल्यावर मला ल क्ष्याचा, निळु फुले आणी वर्षा उसगांवकरचा एक पिच्चर आठवला.
त्यात निळु फुले लक्ष्याला सांगतात जर तुला तिचे खरे सौंदर्य बघायचे असेल तर झोपेतुन उठवुन बघ. (शक्यतो झोपताना सामान्य स्त्री ही विना मेकप झोपते असा होरा)
त्यामुळे रात्री गाडीचा हॉर्न वाजवुन तिची झोपमोड करुन तो तिला पहातो.

पडोसन ची भ्रष्ट नक्कल आहे तो सिनुमामा!

साडी घालत नाहीत तर नेसतात.

लग्नात अपेक्षा कुणाकडून जास्त असतात याबद्दलचे वास्तव कन्फर्म करणारा एक लेख.