गणपतीला जानवे कोणी घातले ?
गणपतीला जानवे कोणी घातले ?
आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू.