आझाद नावाच्या १९५५ सालच्या सिनेमा मधे अण्णा चितळकरांनी चाल लावलेली "मरना भी मुहोब्बत मे कुछ काम ना आया" ही फार सुंदर कव्वाली आहे. खाली दिलेल्या लिंक वर ती बघता येईल. अण्णांनी नेहमीचीच कव्वाली कम मुजरा गीतांच्या चालीला एक सुंदर वळण दिलेले आहे. सिनेमा मधे दोन कलाकारांनी ती अतिशय प्रसन्न पणे सादर केली आहे.
आंतर जाला वर बघितले तर ती एका "रघुनाथ जाधव" यांनी गायली आहे. कदाचित चित्रण पण त्यांच्यावरच झालेले असावे.
http://www.youtube.com/watch?v=x58KzqeE54U
मुद्द्याची गोष्ट म्हणजे रघुनाथ जाधव हे नाव मराठी असुन सुद्धा कधी ऐकले नव्हते. मराठी असुन सुद्धा उर्दू उच्चार अगदी व्यवस्थित आहेत. कोणाला जास्त माहिति आहे का? त्यांनी अजुन काही गायले आहे का?
प्रतिक्रिया
14 Feb 2013 - 1:17 pm | अविनाशकुलकर्णी
ता कव्वालि नंतर त्यान्चे एकहि गाणे ऐकावयास आले नाहि यावरुन काय ते समजा ...........
14 Feb 2013 - 1:44 pm | प्रदीप
त्यावरून नक्की काय समजायचे?
14 Feb 2013 - 1:54 pm | बॅटमॅन
+१००००००००००००००००००००.
प्रचंड सहमत.
15 Feb 2013 - 2:41 pm | खटासि खट
माझी गाणी ऐकलीत का कधी ?