एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते?
कारण चित्रपट, कादंबर्या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात?
वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय? शिक्षक-पालक साधारण कधी ही माहीती देतात? आणि देत नसतील तर हे आवश्यक नाही का?
"एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे याचा कशी उहापोह झालेला माझ्या माहीतीत नाही. नैतिक मूल्य-मूल्य म्हणून ती डोक्यावर घेतलेली गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला जबरदस्त व्यावहारीक मूल्य आहेच हे कधी हायलाईट होत नाही ते.
मुलांशी मनमोकळेपणाने बोलणे हे नैतिकतेइतकेच किंबहुना जास्त व्यावहारीक (प्रॅक्टिकल) पातळीवरुन व्हायला पाहीजे.
असो. या विषयावर गंभीर आणि संयत प्रतिसादांची अपेक्षा मिपाकरांकडून ठेवली तर वावगे ठरेल का? आशा करते लेखामागची भूमिका जाणवून मग प्रतिसाद येतील. नुसता कळफलक बडवला असे होणार नाही. नाना स्तरांतून, नाना वयाच्या, प्रगल्भतेच्या, व्यवसायीक स्तरांमधून आलेल्या व्यक्ती मिपावर वावरतात तेव्हा ही अपेक्षा अवाजवी ठरु नये.
प्रतिक्रिया
22 Jan 2013 - 7:44 pm | मन१
इतकं थेट, स्पष्ट अशा गोष्टीबद्दल ह्या व्यासपीठावर कुठेही वाह्यात वाटू न देता लिहिलेलं पाहून कौतुक आणी आश्चर्य वाटतय.
.
वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय?
हे थेट बोलल्याबद्दल सर्वाधिक आश्चर्य.
.
"एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे
curt statement
.
माझ्या पाहण्यात तरी ज्या दोन्-चार मराठी सायटी नि त्यावरचे धागे आहेत, त्यामध्ये असा धागा पाहण्यात आलेला नाही.
.
अवांतरः-
सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते.
ह्याबद्दल थोडसं बोलायला आवडएल. पण ते अवांतराकडं जाइल. शिवाय नेमकं शब्दांत पकडता येत नाहिये सध्या.
22 Jan 2013 - 8:00 pm | रेवती
आजपासून पुढे महिना दीड महिना आमच्या मुलाच्या शाळेत त्याच्या इयत्तेला यावर तासीका असणार आहे. यावर्षी मुलामुलींना एकत्र बसून ऐकता येईल असे ज्ञानदान होईल ;), तर पुढील वर्षी मुली व मुलांचे स्वतंत्र गट करून माहिती करून देण्यात येईल.
आमच्या फक्त मुलींच्या शाळेत फक्त मासिक धर्म यापेक्षा जास्त (वैद्यकीय)माहिती मिळाली होती शुचीतै.
मन१, याविषयावर स्वाती२ ताईंचा एक धागा बराच पूर्वी येऊन गेला होता.
22 Jan 2013 - 8:12 pm | शुचि
http://misalpav.com/node/20247 - टीन एजर्स आणी एस टी डी
हा धागा असावा. पण तांत्रिक कारणांमुळे त्यातील मजकूर हरवला आहे.
माझ्या मुलीशी यावेळेला "बोलायचे" आहे. आतापर्यंत अनोळखी लोकांपासून, धोक्यापासून स्वतःला कसे दूर ठेवायचे त्याबद्दल सांगून झाले. आता पुढची पायरी. शाळेतूनही ज्ञानवर्धन होतेच आहे.
22 Jan 2013 - 8:27 pm | रेवती
आणखीही एक धागा आला होता स्वाती२ताईंचा. थोडी गंमत गोष्ट लिहिल्यासारखा.
22 Jan 2013 - 8:06 pm | संजय क्षीरसागर
हेच तर विवाहाच सर्वोच्य रहस्य आहे.
`सहजीवनाचं व्यावहारिक मह्त्त्व' असं शीर्षक द्यायला हवं होतं. ते यथार्थ झालं असतं.
पोस्ट द्विशतकी होणार याबद्दल संशय नाही!
22 Jan 2013 - 8:17 pm | अग्निकोल्हा
Well! You know ? I believe in holistic education system.
थोडक्यात क्रियेविणे वाच्या व्यर्थ आहे. प्रॅक्टीकल शिवाय शिक्षण मरतं आहे... असे म्हणतो.
22 Jan 2013 - 8:18 pm | अन्या दातार
आमच्या संपादक मित्राच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत!
22 Jan 2013 - 8:22 pm | पैसा
चिंचवडवाले की मुंबैकर?
23 Jan 2013 - 12:13 am | सूड
दोन्ही !! संपादकीय चर्चेचा फार्स वाचायला मिळेल. ;)
23 Jan 2013 - 12:09 pm | स्पा
+१
23 Jan 2013 - 12:17 pm | गवि
कोणताही संपादक मुंबईकर नाही अशी माझी माहिती आहे.
23 Jan 2013 - 12:18 pm | स्पा
+१
23 Jan 2013 - 2:11 pm | पैसा
ठाणे आणि नवी मुंबई पण घ्या त्यात. आमची मुंबै सर्वांना आपलं म्हणते! :D
23 Jan 2013 - 9:26 pm | जेनी...
हे चुकिचे आहे .
एकतरि संपादक आमच्या मुंबईचा हवाच ...
मुंबईकरांवरचा अन्याय कदापि सहन केला जाणार नाय :-/
24 Jan 2013 - 1:02 am | विश्वनाथ मेहेंदळे
गवि............... काय बोलताय काय ??
अहो मुंबईच्या मध्यवर्ती भागातून चांगले ४-५ संपादक असताना तुम्ही असे म्हणता. मुंबईचा भूगोल नीट वाचा.....
काही अडले तर सांगा, पुढील संदर्भ देतो. आणि शिकवणीसाठी शिक्षकांची नावे पण सांगतो.
24 Jan 2013 - 1:32 am | सूड
म्हणजे ?? मीनाक्षीला संपादक केलेनीत का काय? दादरला राहते म्हणून ?
24 Jan 2013 - 2:17 am | विश्वनाथ मेहेंदळे
दादर नाही रे बाबा, मुंबईचा मध्यवर्ती भाग म्हणालो. कुणी सांगितले तुला दादर मध्यवर्ती आहे म्हणून ??
तुला ना काही म्हणजे काही माहित नाही. पुण्यात गेल्याने तुझे मुंबईबद्दलचे ज्ञान outdated झाले आहे.
सध्या इतकेच अवांतर पुरे या धाग्यावर. बरा चालला आहे धागा.
22 Jan 2013 - 8:43 pm | मदनबाण
सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात?
महत्वाचा प्रश्न ! आपण जे पाहतो त्यावर विचार करतो,तसेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो,मग कामोत्तेजन वाढवणार्या गोष्टी किती गोष्टी आपल्या पाहण्यात सध्या येतात ? जाहिराती पासुन ते चित्रपटां पर्यंत, तर इंटरनेट हा अगदी मुक्त पर्याय आहे.मग मनावर नियंत्रण कसे ठेवावे ( विशेषतः त्या वयात) हे शिकवणे गरजेचे वाटते का ? बरं हा छुपा भडिमार कसा होतो याचे उत्तम उदा. म्हणजे subliminal messages चा वापर ! अनेक जाहिरातदार याचा शाब्दिक किंवा दॄष्य स्वरुपात वापर करत असतात. अगदी उदा. द्यायचे झाले तर सध्या हिंदुस्थानात डियो विकणार्या कंपन्यांच्या जाहिराती पाहिल्यात तर अमुक एक स्प्रे वापरल्या तर स्त्रीया येउन बिलगतील किंवा उत्तेजित होतील असा काहीसा आशय साधला जातो...म्हणजे सेस्क्युअल भावनेला हात घालुन उत्पादन विकणे...यात तुमच्या मनावर नक्की कोणता परिणाम होत असावा ?
एक चित्र इथे उदा. म्हणुन देत आहे.
(चित्र जालावरुन घेण्यात आले आहे.)
यात सेक्स हा शब्द दिसला ? (जालावर अशा अनेक जाहिराती आहेत ज्यात याचा वापर कसा केला जातो ते तुम्हाला पाहता येईल.) अश्या मेसेजेस वापर करुन जाहिरात टिव्हीवर दाखवण्यास युके मधे बंदी आहे.
अश्या आणि अनेक स्वरुपात तुमच्या मनावर कामुक भावनांचा भडिमार होत असेल तर नियंत्रण कसे ठेवायला हवे हे सुद्धा लैगिक शिक्षणात आले पाहिजे.
बरं सेक्स एज्युकेशन आणि सेफ सेक्स ही संकल्पना परदेशात बरीच प्रगल्भ असताना तिथे परिस्थीती काय आहे ? तर अमेरिकेतल्या Philadelphia मधील २२ शाळांमधे काँडम व्हेंडिग मशिन्स बसवण्यात आलेली आहेत ! कारण तिथे STD ( sexually transmitted diseases) चा रेट जास्त आहे.
लैंगिकता हा मानवी जिवनाचा अविभाज्य भाग आहे,परंतु त्याच्या आहारी जाणे योग्य नाही असा संदेश लैंगिक शिक्षणात दिला जाईल का ?
काही संदर्भः-
Condom vending machines installed in 22 public high schools in Philadelphia
Philadelphia Tries Out Condom Vending Machines To Combat ‘Epidemic’ STD Rates
Should High Schools Install Condom Vending Machines?
Subliminal advertising leaves its mark on the brain
Subliminal advertising really does work, claim scientists
22 Jan 2013 - 8:51 pm | शुचि
उत्तम पैलू मदनबाण.
22 Jan 2013 - 9:03 pm | शुचि
हा संदेश पालक या नात्याने आपण मुलांना नक्की देऊ शकतो. वर म्हटल्याप्रमाणे उत्तमच पैलू आहे.
पण , जर काही कारणाने जर लैंगिकतेबद्दल "ऑबसेसिव्ह" विचार येऊ लागले तर ते कसे हाताळायचे, याचं भान मुलांना देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त "दमन" हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही.
24 Jan 2013 - 8:41 pm | सांजसंध्या
ब-याच गोष्टी शाळेतल्या लैंगिक शिक्षणात मिळणार नाहीत असं वाटतं. पालक म्हणून काही टक्के पालक थेट संवाद साधूही शकतील. माझ्या मते वयात आलेल्या मुलांना लैंगिक समुपदेशनाची नक्कीच गरज आहे. कच्च्या विषयांसाठी शिकवणी लावणे, आजार पडल्यावर डॉक्टरकडे जाणे हे जितकं सहज होतं तितकंच वयात येणा-या पिढीसाठी समुपदेशनाचे चांगले कोर्सेस उपलब्ध असणे गरजेचे आहे. आनंदी लैंगिक आयुष्य ही सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. दुर्दैवाने पुरुषाला आनंद घेणे इतकंच माहीत असतं. देणे हा ही महत्वाचा भाग आहे हे त्याच्या गावीही नसतं. या साठी तरी नक्कीच गरज आहे. हेमाशेपो.
24 Jan 2013 - 8:51 pm | शुचि
जनरलाइज्ड स्टेटमेंट आहे. अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो तो हा की - स्त्रीला उत्तेजित करणं ही सर्वस्वाने पुरषाची जबाबदारी आहे हा गैरसमज आहे. स्वतःच्या शरीराची ओळख नीट असल्याने स्त्रीनेदेखील टेक्निकस वापरुन स्वतःचे स्वतःला संभोगासाठी उद्दीपीत करणे महत्त्वाचे असते.
24 Jan 2013 - 10:05 pm | तर्री
स्वतःच्या शरीराची ओळख नीट असल्याने स्त्रीनेदेखील टेक्निकस वापरुन स्वतःचे स्वतःला संभोगासाठी उद्दीपीत करणे महत्त्वाचे असते.
१०० % सहमत आणि ९० % दुर्लक्षित मुद्दा.स्री आणि पुरुष मिळून माणसाला जेवढे अवयव आहेत त्यामध्ये मदन ध्वज तथा क्लियटोरीस हा एकच अवयव असा आहे की जो केवळ "आनंद निर्मिती " साठी ( गेवाने / निसर्गाने ) बनवला आहे. बाकी इतर सर्व अवयवांना लैगिक सुखाबरोबर पुनरुत्पादनाची कामेही विधात्याने दिली आहेत.
हया नितांत सुन्दर योजनेला समजून न घेता , स्त्री - पुरुषांकडून सर्वसाधारण पणे "तिकडे " अत्यंत "अरसिकतेने पाहण्यात येते.
22 Jan 2013 - 9:05 pm | जेनी...
वाचतेय ....
मला पैसा ( आमच्या सासुबै ) , गवि , पिंडा काका ,
आणि आत्ताच्या पिढितले सदस्य बॅटमॅन ( माझा भौराअब्या ) , किसन शिंदे , नैनी( म्रुगनैनी )
पियुशा , ह्यांच्या सविस्तर प्रतिक्रिया अपेक्षित आहेत ...
वाचतेय बर्का ..
एक अवांतर : वास्तव म्हणजे सेफ सेक्स काय??
--------------------------------------------
अगं शुचि वास्तव म्हणजे संजय दतचा पिच्चर नै का येउन गेला ???
तु पण ना :-/
22 Jan 2013 - 11:01 pm | तर्री
पुण्याचे प्रशिध्द लेखक श्री.ज.जोशी यांचा "पुणेरी (?) हया पुस्तकात , आमच्या पिढीचे कामजीवन हा एक लेख वाचला होता. त्यावेळी मी दहावीत होतो. "मराठीमध्ये" असे काही लिहिलेले असेल याची कल्पना मला नव्हती. तो पर्यन्त काही पिवळी पुस्तके वाचून झाली होती. जोशी बुवांचा तो लेख वाचून "सेक्स " हा विषय पंचांगा इतका पवित्र,शुद्ध असु शकतो हे जाणवले. पिवळी पुस्तके वाचून बीघडलेला माझा हया विषयाकडे पाहण्याचा कल बदलला.
हया विषयातले अनेक पैलू आहेत. शरीररचना , प्रजोत्पादन , संतती नियमन , समाज , प्रेम भावना , गुप्त रोग , लिंग आणि योनी ची स्वच्छता, मुलींना , स्रियांना सार्वजनिक ठिकाणी स्पर्शाचे संकेत , सम्भोग , गरज , भावना व आनंद, लैगिक व्यक्तिमत्व व स्वातंत्र्य अश्या अनेक संदर्भातून चर्चा होऊ शकते आणि ती तशी करणे आवश्यक असते.
काय सांगतो हया बरोबर कसे सांगतो ह्यावर "फोकस " असावा. साधारण ३/४ टप्पे करून चर्चा पुढे नेता येईल.
फुले , फळे. प्राणी यांचे संदर्भ असतील तर मुलांना हे शिक्षण जास्त नैसर्गिक वाटते.
माझे काही मुद्दे :
१.पुस्तके वाचायला देवून हे काम अधिक सोपे करता येईल.
२.कोड वर्ड असल्यास बोलणे सोपे जाते . उदा. एफ. आर. एस. म्हणजे फिमेल रेप्रोड्क्टीव सिस्टीम व एम.आर. एस. म्हणजे मेल रेप्रोड्क्टीव सिस्टीम.
३.अनेक आई वडील , मुलांना "कटवून , फुटवून " संभोग करतात.(जागे आभावी तसे करावेही लागते म्हणा.) अश्या वागणुकीने संभोग हे "चोरून" करण्याची गोष्ट आहे हे मुलांच्या मनावर बिंबते.तरीही १८ वर्षे वयाच्या (समजूतदार)मुला मुलींना "आम्हाला प्रायवसी हवी आहे " असे स्पष्ट सांगून पहावे.
४.लग्न , हनिमून , गरोदरपणा , गर्भपात , मासिक पाळी ह्यां विषयावर बोलताना मुलांनी प्रश्न केल्यास त्याचे स्वागत करा , संधी चालून आली आहे असे समजा. टाळाटाळ ण करता थेट व स्पष्ट बोल
अवांतर :
मुलांना शिक्षण देण्या आधी महिलांनी हया विषयात निदान आपल्या नवऱ्याशी / पार्टनरशी मोकळेपणी बोलायला काय हरकत आहे ? बहुतांश महिला आपल्या कामाजीवानातील आवडी निवडी नवऱ्याशी / पार्टनरशी बोलत नाहीत , कारण बायकांचे असे बोलणे समजून घेणारे नवरे / पार्टनर फारच विरळा.
22 Jan 2013 - 11:18 pm | शुचि
आपण मांडलेले पैलू योग्यच वाटतात.
हा अॅप्रोच बरोबर वाटला.
सोपे करता येईल या मुद्द्यास सहमती मात्र नंतर थेट संवादातून अधिक चांगल्या रीतीने पार पडेल यावर भर. "वयात येताना" हे पुस्तक पौगंडावस्थेत वाचले होते. शतायुषी आदि मासिकांतील लेखांचादेखील उपयोग झाला.
शक्य आहे. नव्हे तसेच असावे. उपाय स्वीकारार्ह वाटतो.
थेट व स्पष्ट संवाद उत्तमच. माझ्या आठवणीत लहानपणी (५ वी ६ वी) मध्ये मी शतायुषीतील लेख वाचून "अंगावर पांढरे जाणे, लाल जाणे" आदि वाक्यांचा अर्थ विचारला होता. अर्थात उत्तर मिळाले नाही. पण माझ्यापुढे जर असे आव्हान आले, तर मी निराळ्या रीतीने हाताळेन हे नक्की.
एकंदर मो़कळेपणा, थेटपणा व योग्य ज्ञान यावर भर योग्यच वाटतो.
22 Jan 2013 - 11:32 pm | मुक्तसुनीत
"उत्पल" नावाचे आमचे एक मित्र आहेत त्यांची कविता या संदर्भात मला आठवली. मूळ कवितेची लिंक देता आली असती तर आवडले असते. परंतु ते शक्य दिसत नाही. म्हणून कविताच देतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जगन रेप कर.
असं जगनला कुणी सांगत नाही.
जगन आपणहूनच रेप करतो.
शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न केलेला, फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत.
त्यातले सगळेच रेप करू शकतात.
जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.
पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो.
आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही टाकतो.
जगन वाईट आहे. भयानक वाईट.
पण वाईट जगनपैकी एकाची एक केस आहे.
या केसमधल्या जगनला इतर जगनसारखंच पंधरा-सोळाव्या वर्षी इरेक्शन आलं.
कमलला न्हाण आलं त्याच्या एक-दोन वर्षांनंतर.
इरेक्शन आल्यावर काय करायचं हे त्याला आई-बाबांनी सांगितलं नाही.
कारण त्यांना त्याचा संकोच वाटायचा.
कमलला पाळी आली की आई तिला काय करायचं ते सांगते.
पण जगनला इरेक्शन आलं की काय करायचं हे बाबा त्याला सांगत नाही.
कारण बाबालाही ते कुणी सांगितलं नव्हतं.
बाबाच्या बाबाने त्याला एकदा नग्न बायकांची चित्रं असलेलं पुस्तक वाचताना पकडलं होतं आणि मारलं होतं.
पण इरेक्शनचं काय करायचं हे सांगितलं नव्हतं.
बाबाने तीसएक वर्षांपूर्वी हेलनला नाचताना बघून हस्तमैथुन केलं होतं.
आता तर नाचाची खूप प्रगती झालीय. जगनपुढे आता खूप बायका नाचतात. मल्लिका, मुन्नी, शीला वगैरे सगळया.
शिवाय कॅमेरा त्यांच्या शरीरावर फिरतो.
कारण कॅमेऱ्याला हे माहीत आहे की जगनला ते आवडेल.
आणि कॅमेऱ्याच्या मागच्या माणसांना खूप पैसे मिळतील.
असे खूप जगन तयार करणं हे कॅमेऱ्याचं ध्येय आहे.
पण ते असो.
चूक जगनची आहे.
जगनही मग हस्तमैथुन करतो.
ते करताना एकदा आईने पाहिलं तर तिने भंजाळून जाऊन बाबाला सांगितलं.
बाबाने मार खाल्ला होता, म्हणून त्याने जगनला पण मार दिला.
पण मार खाऊन इरेक्शन थांबत नाही.
म्हणून मग जगन पुन्हा नाच बघतो, संभोगचित्रांची पुस्तकं वाचतो, ब्ल्यू-फिल्म बघतो.
आणि हस्तमैथुन करतो.
आपली परंपरा फार थोर आहे.
तिचा विजय असो.
आपल्या परंपरेनं शिकवलं आहे की लग्नाआधी संभोग वाईट.
त्यामुळे लग्नापर्यंत थांबून नंतर सगळी कसर भरून काढली तरी चालेल.
म्हणजे पहिल्या रात्री बायकोला त्रास झाला तर चालेल.
पण लग्नापर्यंत स्त्रीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे.
त्यामुळे जगन नग्न बाईचे फोटो बघत थांबतो.
शिवाय अशा नग्न बायकांना वाईट समजलं जातं.
कारण त्या जगनला बिघडवतात.
पण जगनला त्या आवडतात.
कारण ज्याच्यामुळे इरेक्शनपासून सुटका मिळते ते जगनला चांगलं वाटतं.
पण इरेक्शन कायमचं कधीच संपत नाही.
जगनला आता 'बाई' हवीच असते.
तो कमलकडे आता बाई म्हणूनच बघू लागतो.
आणि एके दिवशी तिच्यावर झडप घालतो.
जगनचं जनावर होतं.
दुर्दैवाने जगन पुरूष आहे.
संस्कृती प्रगत झाली तरी संस्कृतीकडे अजूनही इरेक्शनला उत्तर नाही.
शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं.
पुरूषसत्ताकतेचं.
म्हणजे बाबा कुटुंबप्रमुख.
आई त्यानंतर.
जगन, तू मुलगा आहेस.
मुलींसारखा रडतोस काय?
जगन, तू मुलांच्यात बस बघू.
मुलींबरोबर कसला बसतोस?
जगन, मुली फक्त क्रिकेटमध्ये नाचण्यासाठी असतात.
क्रिकेट खेळायचा असतो मुलांनी.
जगन, स्वयंपाक तू नाही करायचास.
पण तुला प्लंबिंग आलं तर चांगलं आहे.
जगन, बायकांना डोकं जरा कमीच असतं.
त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच बसावं.
जगन, तू मर्द आहेस.
बाईला जिंकणं यात मर्दानगी असते.
वगैरे.
आधीच इरेक्शन आणि त्यात पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन.
जगन पार बिघडून गेलाय.
त्याच्यातला हिंस्त्रपणा जनारांनी लाजावं इतका वाढलाय.
कमलच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी, आई-बाबा आणि परंपरा सगळ्यांनाच जगनचा प्रचंड राग येतो.
त्याला फाशी द्यावी असं वाटतं.
जगनला फाशी जरूरच द्यावी.
त्याने जगन नक्की मरेल.
पण नर उरेल.
कारण नर आणि मादी कधीच कायम मेलेले नाहीत. अजूनही मरत नाहीत.
नर पुन्हा हस्तमैथुन करत वाढेल आणि पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन त्याला दिलं जाईल.
आणि मादी पुन्हा अनंतकाळ पहात असलेली वाट पहात राहील.
शुभंकर संभोगाची.
- उत्पल
23 Jan 2013 - 12:25 am | संजय क्षीरसागर
उत्पलना अशीच एक कविता कमलच्या बाजूनं करायला सांगा
23 Jan 2013 - 12:26 am | मुक्तसुनीत
धन्यवाद.
मला तुमच्या सुचवणीमागे काय म्हणायचं ते नीटसं समजलेलं नाही. थोडं उलगडून सांगाल का ?
23 Jan 2013 - 12:33 am | संजय क्षीरसागर
कमलच्या मानसिकतेचं असंच काही असेल
23 Jan 2013 - 12:36 am | मुक्तसुनीत
>>>कमलच्या मानसिकतेचं असंच काही असेल <<<
शक्य आहे.
१. उत्पल यांनी पुरुषाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही कविता लिहिलेली आहे.
२. कविता बलात्काराच्या संदर्भात होती. लैंगिकतेसंदर्भातली पुरुषांची जडणघडण , त्याची प्रक्रिया किती विविध प्रकारच्या विसंगतींनी युक्त आहे ते कविता उत्तम रीतीने मांडते.
23 Jan 2013 - 12:46 am | बॅटमॅन
सॅड बट ट्रू :(
23 Jan 2013 - 12:53 am | शुचि
दाहक सत्य मांडले आहे कवितेत. कविता विचारास खरच प्रवृत्त करते.
पुरुषसत्ताकता, योनीशुचिता हे तर पैलू आहेतच
पण मधुराभक्ती, शिवलिंग (लिंग व योनीचे एकत्र प्रतिक) आदि काही गोष्टींनी सेक्सकडे पहाण्याचा दृष्टीकोन जो बदलतो त्याचे काय हा देखील प्रश्न आहेच. इतकं पवित्र, पवित्र जे या गोष्टीला (जी की खरं तर नैसर्गिक प्रेरणा व क्रिया) मानले गेले आहे ते देखील तद्दन चूकीचे वाटते. जसा मिळेल त्या नराने मिळेल त्या मादीबरोबर संग करणे (व व्हाईसे व्हर्सा) हे एक टोक झाले तसेच शुभंकर संभोग हे दुसरे टोक झाले.
23 Jan 2013 - 12:57 am | मुक्तसुनीत
>>>शुभंकर संभोग हे दुसरे टोक झाले. <<<
"शुभंकर संभोग" हे मलाही काय नीटसं समजलेलं नव्हतं. पण ते तुमच्या प्रतिसादात आलेल्या गोष्टींइतकं क्लिष्ट किंवा महाभयंकर पवित्र वगैरे असेल असं काय वाटलं नव्हतं. :)
23 Jan 2013 - 12:04 am | कवितानागेश
अश्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपला स्वतःचा अभ्यास चांगला असणं आवश्यक आहे. नाहीतर काहितरी सांगताना आपलाच चेहरा गांगारला, तर मुले अजून गोंधळतात.
आणि शाळेवर किंवा पुस्तकांवर अवलंबून रहाण्यापेक्षा स्वतः माहिती दिलेली चांगली. त्यामुळे पालक आणि मुलांमधे विश्वास वाढतो.
23 Jan 2013 - 12:18 am | सुनील
डॉ विठ्ठल प्रभू यांचे ह्या विषयावर एक पुस्तक आहे. आता नाव विसरलो.
23 Jan 2013 - 1:09 am | दादा कोंडके
हे पुस्तक आम्ही अकरावित असताना हॉस्टेलवर पोस्टानी मागवलं होतं.
23 Jan 2013 - 9:13 am | तर्री
निरामाय कामजीवन
23 Jan 2013 - 12:40 am | चित्रगुप्त
या विषयावर तांत्रिक दृष्ट्या प्रगत असलेल्या संस्कृतींपेक्षा आदिम, अदिवासी संस्कृतीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्याबद्दल कुणाचा अभ्यास असल्यास अवश्य लिहावे.
मनुष्येतर प्राण्यात बलात्कार होत नसावेत. आदिवासींमधे (शहरीकरणापासून दूर असलेल्या) होतात किंवा कसे, ठाऊक नाही.
लैंगिक शिक्षणाची पहिली पायरी नग्नतेकडे सहजतेने बघायला शिकणे/शिकवणे हे होऊ शकते.
खजुराहो वगैरेच्या काळची संस्कृती आजच्यापेक्षा जास्त निकोप, प्रगल्भ होती असे म्हणता येईल.
खिस्ती शिकवणीपासून (आदम आणि ईव्हचे आदिम पाप वगैरे) नग्नता/कामप्रेरणा धिक्कारली जाऊ लागली, असे वाचनात आले आहे. याविषयी नेमके काय घडले, हे कुणी सांगेल का?
23 Jan 2013 - 1:39 am | अभ्या..
म्हणजे परत बॅक टू बेसिक्स का? मग घोटूल वगैरें?
आधी खुलेपणा मग बंदिस्त मग त्याचापण जाच होऊन परत मर्यादित खुलेपणाचा आग्रह. पुढे काय?
आणि हिच जर संस्कृती असेल तर त्यात विकृती कशी शिरली? याची कारणे शोधायला हवी खरेतर.
तीच या प्रश्नांची उत्तरे असतील.
23 Jan 2013 - 2:18 am | बॅटमॅन
मुळात समाजाशी निगडित प्रत्येक गोष्ट सायक्लिक असते, एकच एक असा प्रवास शक्यतो असत नाही. आणि हे बदलेल असे मला वाटत नाही.
27 Jan 2013 - 6:58 am | मी_आहे_ना
सध्या कामानिमित्त सिडनीला आहे, आणि बाजुलाच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचे कार्यालय आहे, गेल्या आठवड्यात तिथे त्यांच्या प्रसिद्ध वार्ताकाराने 'स्तनपान तितकेसे खुलेपणाने चारचौघात (नक्की शब्द सुचत नाहिये) करण्याची गोष्ट नाही' असे म्हणले आणि दुसर्या दिवशीच सकाळ पासून निषेधासाठी शेकडो माता जमल्या... ऑस्ट्रेलियामधे एकूणच बायकांचा प्रभाव सर्व क्षेत्रांत आहे, पण शेवटी त्यांनीही ही लढाई सोडायचे ठरवले आहे. (प्रतिसाद अवांतर वाटला तरी संदर्भ नग्नतेकडे निकोपतेने पाहण्याचा आहे.)
27 Jan 2013 - 10:01 am | प्रभाकर पेठकर
निषेध होणारच. त्यांनी 'अर्भकास स्तनपान .....' असे लिहीणे जास्त सयुक्तिक ठरले असते.
27 Jan 2013 - 1:22 pm | दादा कोंडके
:)
14 Feb 2013 - 4:29 pm | परिकथेतील राजकुमार
पेठकर काका __/\__
23 Jan 2013 - 5:24 pm | मदनबाण
मनुष्येतर प्राण्यात बलात्कार होत नसावेत.
बहुतेक Orangutan आणि chimpanzees बलात्कार करतात.(जालावर या बद्धल जास्त माहिती मिळणे कठीण जाते आहे.)
संदर्भः- http://alturl.com/hhhji
आदिवासींमधे (शहरीकरणापासून दूर असलेल्या) होतात किंवा कसे, ठाऊक नाही.
आदिवासींमध्ये बलात्कार होत नाहीत: डॉ. राणी बंग
23 Jan 2013 - 9:14 pm | अभ्या..
हे विषयसूत्र परत योनीशुचिता येथेच जाते. गरज आहे ती जीवनमूल्यांबद्दल मानसिकता बदलायची. लैंगिक शिक्षणच पुरेसे नाही त्याला. आणि हे काही ठराविक सिलॅबसने साध्य होईल असे वाटत नाही. संस्कारी पालक हाच बेस्ट पर्याय. अर्थात ही पण खूप लांब चालणारी प्रक्रीया असेल. सुरुवात अशी होत असेल तरी चालेल.
24 Jan 2013 - 7:36 pm | शुचि
खाली एका लेखाचा दुवा दिलेला आहे त्यातील हा पॅरा -
Only religions still take sex seriously, in the sense of properly respecting its power to turn us away from our priorities. Only religions see it as something potentially dangerous and needing to be guarded against. Perhaps only after killing many hours online at youporn.com can we appreciate that on this one point religions have got it right: Sex and sexual images can overwhelm our higher rational faculties with depressing ease. Religions are often mocked for being prudish, but they wouldn't judge sex to be quite so bad if they didn't also understand that it could be rather wonderful.
हा लेख जरुर वाचा - http://www.psychologytoday.com/articles/201212/12-rude-revelations-about...
23 Jan 2013 - 12:59 am | अग्निकोल्हा
या वयात लैंगीकता व फँटसि या दुधात पाणी असावं इतक्या एकजीव स्वरुपात असतात. माणसाला बोलायला लाज लैगिकतेची न्हवे तर त्यासोबतच्या फँटसिजची असतें. त्याची सावलीही चर्चे मधे उघड होउ नये इतपत ती नकोशी असते. सभ्यपणाचा बुरखा फँटसिवर असतो.
अश्लिलता ही फँटसिला धरुन असते आणि लैगीक शिक्षण म्हणजे फँटसि वगळुन लैंगिक माहितीचे केलेले हस्तांतरण होय. पण लैंगीकता व फँटसि मुळातच एका नाण्याच्याच दोन बाजु आहेत... अनं दर वेळी फक्त एकच बाजु उलगडवणे नक्किच जिकरीचे काम आहे.
23 Jan 2013 - 1:13 am | शुचि
या फँटसीज (उघड) करावयास, बोलावयास जीवाभावाची/चा मित्र-मैत्रिण का शोधू नये? किंबहुना असे कोणी शोधले अन मिळाले तर अन्य कोणाचे (समाजाचे) पोट का दुखावे हा एक प्रश्न आहेच. सामाजिक पैलू झाला. माझ्याकडेदेखील सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीतच, पण प्रश्न मात्र आहेत.
23 Jan 2013 - 2:23 am | अग्निकोल्हा
:) लैंगिकता वाहवत न्हेते. आगित तुप ओतल्यावर तो विझत नाही तर भडकतो, त्यामुळे "जीवाभावाचं" शोधुन फँटसीज फक्त बोलल्या जात नाहीत तर पोसल्या जातात. केवळ बोलल्या जाणार्या फँटसीज लवकरच हुकमी "सिडक्शन" बनतात.
म्हणुनच लैंगिक शिक्षणाचा हेतु व पध्दत ही फँटसीमधे इंटरफेअर करणार नसेल तरच ती प्रभावीपणे स्विकारली जाउ शकते. सिगारेटमुळे कँसर होतो हे शिकवुनही ती ओढली जातेच, लैगिक शिक्षणामुळेही फार महान गोष्टी घडत/टळत नसतात. कामप्रेरणा भल्या भल्यांना संपवते/बदलते.
लैंगिकतेमुळे मनात अनावश्यक न्युनगंड, वर्तनात पराकोटीचा बदल वा शरीरात रोग तर पोसले जात नाही ना यापुरती जाणीव मुलांना करुन दिली तरी पुरे आहे. या विषयावर बरीच पुस्तके मराठीतही उपलब्ध आहेत जसे की "वयात येताना", "हस्त मैथुन शाप कि वरदान" वगैरे वगैरे वगैरे ही आपण होउन मुलांना वाचायला दिली त्यावरुन चर्चा केलित तरी चालण्यासारखं आहे असं वाटतं.
अवांतर:- अमेरिकन पाय मधिल जिम'चा बाप एक सॉलिड कॅरॅक्टर आहे. अर्थात विनोद निर्मीतीला त्याच्या स्वभावाचा वापर करुन आचरट विनोद आहेत पण एकुणच व्यक्तिरेखा लैंगिकतेच्या बाबतित समजुतदार आहे. विषेशतः द्वितीय भाग. स्वजबाबदारीवर चित्रपट पहावा.
23 Jan 2013 - 1:23 am | योगप्रभू
प्रत्येक व्यक्तीने आधी आपली शारीरिक व मानसिक स्वच्छता आणि आरोग्य जपले तरी चांगली सुरवात होऊ शकेल.
23 Jan 2013 - 2:24 am | शुचि
मी तर म्हणेन - Each soul is an eternal pilgrim. आणि मला कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार नाही एवढं जरी प्रत्येकाने लक्षात घेतलं तरी बरच मिळवलं.
23 Jan 2013 - 11:54 am | नगरीनिरंजन
नीतिमत्तेच्या, समाज नियमनाच्या आपल्या संकल्पना दुसर्यावर लादणे थांबवा. जगा आणि जगू द्या लोकांना मुक्तपणे, कोणत्याही अपराधी भावनेशिवाय पाळू द्या शरीरधर्म. फेकून द्या आपला वृथा अहंकार, सोडून द्या हट्ट सगळे पर्फेक्ट असण्याचा आणि सोडून द्या आव समाजाचे इंजिनिअरिंग करण्याचा. जगातल्या कोणत्याही धर्मापेक्षा शरीरधर्म महत्त्वाचा आहे.
पचनसंस्थेबद्दल शिकवल्याने माणसाची भूक भागत नाही.
23 Jan 2013 - 11:57 am | अर्धवट
आमेन..
23 Jan 2013 - 5:24 pm | शुचि
कोणतेही प्रेमी युगल हे काही एक "कॅल्क्युलेटेड रिस्क" घेऊन, जवळ येत (येत असावे). त्यांच्या शारीरीक, मानसिक गरज, त्यांचे ऋणानुबंध असतील, स्पिरिच्युअल अॅस्पायरेशन्स ही असतील. यात समाजाला मधे पडण्याचा अधिकार नसावा. दूषीत नजरेने, पोट्दुखीने त्यांच्याकडे पहाणे हीच विकृती.
24 Jan 2013 - 11:44 am | योगप्रभू
बरोबर आहे,
पण त्या युगुलांनीही आपली स्पिरिच्युअल अॅस्पायरेशन्स बंदिस्त साधनागृहात शेअर करावीत. आजकाल बरीच युगुले ही साधना सार्वजनिक ठिकाणी करतात. त्यामुळे लगेच चमत्कार घडू लागतात. उदाहरणार्थ - बागेत लहान मुले अशा साधनास्थळांकडे वेगाने आकर्षिली जातात. त्यांचे चेंडूही सतत तिकडे जाऊ लागतात. त्यामुळे युगुलांच्या साधनेत आणि मुलांच्या खेळण्यात व्यत्यय येतो. पुन्हा मुलांना या अध्यात्माच्या शंका पडतात त्यांचे निरसन आम्हा पालकांना सोप्या भाषेत करता येत नाही. त्यामुळे मला वाटते, की लैंगिक शिक्षणाचा सुबोध असा अभ्यासक्रम तयार व्हायला हवा. सोप्या आकृत्यांच्या किंवा चित्रमय पद्धतीने विषय सोपा करुन सांगायला हवा. एकदम फ्रॉइडियन थिअरी मुलांना झेपणार नाही, असे वाटते.
24 Jan 2013 - 12:39 pm | अभ्या..
किंवा अॅनिमेशन वापरून, त्यातल्या त्यात ३डी आणि व्हीएफऐक्स बेस्ट. वा वा.
चला, आहे पुढे स्कोप आम्हाला. को की नै रे स्पावड्या? ;)
23 Jan 2013 - 1:25 am | जेनी...
अजुनहि कुनाच्याच प्रतिसादात नाविन्य नाहि . तेच तेच वाचल्यागत वाटतय .
23 Jan 2013 - 12:28 pm | खटासि खट
आपल्याबद्दल आदर वाटू लागलेला आहे.
23 Jan 2013 - 9:29 pm | जेनी...
आपल्याला वाटलेला आदर हा नक्कि आदरच आहे का , अशी शंका वाटु लागलेली आहे .
24 Jan 2013 - 8:59 am | श्री गावसेना प्रमुख
गणिताचार्य रामाणुजन विलायतेत गेल्यावर तेथील शिक्षक म्हणाले तु काहुन लक्ष देत नाही ,त्यावर रामाणुजन म्हणाले हे तर मी पयलीतच शिकलो बुवा.
तशीच गत तुमची झालेली दिसतेय पुजा बै
24 Jan 2013 - 8:09 pm | जेनी...
ओ सेनाप्रमुख तुमी तुमच्या गावाच्या विकासाचं बघा .... उगा नको त्याच्या आयुष्यात
नाक खुपसु नका ..... आयंदा याद रखना !
25 Jan 2013 - 9:01 am | श्री गावसेना प्रमुख
मी कुठे नाक खुपसल
लागल ना बोलन
(इथे मध्ये खाजगी आयुष्य नका आणीत जाउ,सगळ कस निथळ हव)
23 Jan 2013 - 11:59 am | पियुशा
भारतातील दारिद्र्य रेषेखाली जगणार्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे अशा हातावर पोट भरणार्या लोकांनी कधी शाळेचे तोंडही बघितलेले नाही त्यांच्या मुलांचीही तीच गत खेळण्याच्या - शिकण्याच्या वयात ही मुलेमुली रस्त्यावर / सिग्नलवर पेपर विकताना ,भीक मागताना किंवा एखाद्या कारखाण्यात बालकामगार म्हणुन काम करतात. "लैंगिक शिक्षण" ह्या विषयापासुन अशी मुले कोसो दुर आहेत . अशा मुलांचा शालेय शिक्षण हा विषयच बाद आहे ,अशा मुलांना पालकाकडुन काय माहीती मिळणार ? " ह्यांच आला दिवस कसातरी ढकलायचा ह्या तत्वावर जगणारी ही मुले अन हाता- तोंडाची कशी गाठ पडेल ? रोज ह्या विवंचनेत जगणारा पालक काय शिकवणार ? अन काय माहीती देणार ?
त्यामुळे अपुर्या माहीतीअभावी हाच समुदाय एडस सारख्या भयंकर आजारांना बळी पड्तो
23 Jan 2013 - 12:26 pm | खटासि खट
लैंगिक शिक्षण सार्वत्रिक झालं ? शाळेमधे लैंगिक शिक्षण दिल्याने निश्चित फायदा होईल पण लोकशाही व्यवस्थेत पालकांचं मत देखील विचारात घेतलं गेलं पाहीजे का ? विरोध असलाच तर त्यांचं म्हणणं ऐकून योग्य बाजूचा विचार व्हायला हवा. गैरसमज असल्यास दुर केले गेले पाहीजेत. लैंगिक शिक्षण देताना शास्त्रीय माहिती देणं इतकंच अभिप्रेत आहे कि नैतिक बाजूही शाळेत सांगितली गेली पाहीजे अशी अपेक्षा आहे ? एकतर नैतिकतेच्या कल्पना समाजागणिक बदलतात, त्यातून ज्या काही ऑल इंडियन नैतिकता संघाच्या कल्पना आहेत त्यांचं पाश्चात्यिकरण होत चाललंय. पाश्चात्यिकरण होणं हा शब्द योग्य /अयोग्य या संज्ञांशी जोडला जाऊ नये. लीव्ह इन रिलेशनशिपला मान्यता, समलैंगिक विवाहांना मान्यता या कल्पना हळूहळू आपल्याकडे मान्य होत आहेत. पण सर्वत्र मान्य असतील असं नाही. मुलांना या संबंधीचं शिक्षण योग्य वयात मिळणंहि आवश्यक आहे. स्त्री आणि पुरूष याशिवाय तिस-या लिंगाचे लोक यासंबंधीचं शिक्षण मिळाल्यास अशा लोकांबद्दल हेटाळणीचा / भीतीचा दृष्टीकोण जाऊन माणूस म्हणून समजावून घेण्याची वृत्ती विकसित होईल.
सध्या हा विषय अधून मधून डोकं वर काढतोय याला कारण दिल्लीच्या घटनेचा जनमानसावर झालेला परिणाम. पण अशा घटनांची प्रतिक्रिया म्हणून असे कार्यक्रम राबवण्याला माझा सख्त विरोध आहे. भावनेवर नियंत्रण ठेवता येणं हा त्या शिक्षणाचा एक भाग असला पाहीजे.
उद्देश क्लिअर असले म्हणजे झालं. त्यानंतर गुन्ह्यांत वाढ झाली किंवा अमूक एक ठिकाणची आकडेवारी काय सांगते याला फारसा अर्थ राहत नाही. आपलं काम आहे योग्य ते संस्कार देणं. जे आपल्या हातात आहे ते आपण करावं. गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी वारंवार संस्कार असावे लागतात. समाजत कुठली गोष्ट गुन्हा मानली जाते हे माहीत असूनही तसं करावंसं वाटणं याला इतर अनेक गोष्टी जबाबदार असतात म्हणून चोरी वाईट, परीक्षेत कॉपी करणं इ. इ. वाईट हे सांगणं आपण सोडून देत नाही. मुद्दा स्पष्ट झाला असावा असं मानतो.
धन्यवाद
23 Jan 2013 - 12:29 pm | गवि
शाळेत किंवा मोठ्या लोकांना, दोन्ही केसेसमधे आता तरी सेक्स म्हणजे केवळ रोग, धोका, अनचाहा गर्भ इतकंच सांगितलं जातं. अर्थातच हे मुद्दे अत्यंत महत्वाचे आणि प्राथमिकतेने सांगण्याचे आहेतच, पण सेक्स या गोष्टीत काही आनंद असू शकतो हे कोणाला जाणवणारच नाही इतपत दहशत बसते आहेच.
त्याउलट त्यातील आनंदाचा भाग सर्वांना आपोआप समजेलच असं गृहीत धरलं जातं. पण मनुष्य म्हणून जी समाजव्यवस्था आपण स्वीकारली आहे त्यात निसर्गतः तसं होतंच असं नाही. आणि आनंद या अँगलने पाह्णारा एकच सोर्स सर्व पौगंडावस्थेतल्यांना उपलब्ध आहे तो म्हणजे एकदम सविताभाभी किंवा चंद्रलोक टाईपचे दुसर्या टोकाचे लेखन. योग्य, वास्तव आणि सर्व बाजूंनी माहिती मिळणं कठीणच.
23 Jan 2013 - 1:31 pm | बापू मामा
काय गरज आहे ह्या लैंगिक शिक्षणाच्या थेरांची. आज आमची पन्नाशीतली पिढी आहे. आम्हाला कोणी लैंगिक शिक्षण दिलं ?
अरे, पाण्यात पडल्यावर पोहोता येतं, हेच ( आणी असेच) आम्ही शिकलो. ऊगीच ह्या विषयाचा बाऊ केला जातोय.
23 Jan 2013 - 2:02 pm | खटासि खट
आजपर्यंत काय काय चुकीचं केलम हे तरी समजेल कि..
23 Jan 2013 - 2:06 pm | बॅटमॅन
तसं तर अनेक गोष्टींबद्दल म्हणता येईल की मग. काय गरज आहे गाड्या बनवायची, आम्ही चालत जायचो. काय गरज आहे कॅल्क्युलेटरची, आम्ही पाढे पाठ करायचो. काय गरज आहे औषध घ्यायची, आम्ही जडीबुटी खाऊन स्वस्थ रहायचो. काय गरज आहे कारखाने काढायची, वल्कले नेसून स्वस्थ राहायचो, वगैरे वगैरे पैकीच हे वरचे वाक्य आहे. आणि लैंगिक शिक्षणाला थेर म्हणणे यावरूनच विचारपद्धती कळते.
23 Jan 2013 - 2:10 pm | गवि
शब्दरचनेशी नाही, पण मताशी सहमत. पूर्वीच्या काळी एड्स विषाणू अस्तित्वात असला तरी अक्राळविक्राळ स्वरुपात पसरलेला नव्हता. त्यामुळे अवेअरनेस आता जास्त आवश्यक झाला आहे. पूर्वी होणारे एड्सखेरीजचे गुप्तरोग बहुतांश पेनिसिलिन अथवा अन्य इंजेक्शनांनी बरे होऊ शकत असतील आणि थेट जिवावर उठत नसतील अशी शक्यताही नाकारता येत नाही. सर्वायकल कॅन्सरला जन्म देऊ शकणारा Human papillomavirus कदाचित पूर्वी कर्करोगाचं कारण म्हणून तितका ज्ञात नसेल. त्यामुळे सर्वायकल कॅन्सर झालेल्या स्त्रियांना नुसतंच दुर्दैवी ठरवण्यात येत असेल. त्याचा लैंगिक आयुष्याशी संबंध असू शकतो हेही माहीत नसेल.. ही फक्त उदाहरणं..
तस्मात शिक्षणाची आवश्यकता आहेच. फक्त सर्व बाजू शिकवण्यात याव्यात. आणि "शिक्षण" पेक्षाही अवेअरनेस (जाणीव!?) असं त्याचं स्वरुप असावं.
अवांतरः "पूर्वीच्या (आमच्या) काळी" आणि "हल्ली" अशी तुलना करताना निर्माण होणार्या गडबडींमागची कारणं पाहणारी प्रातिनिधिक उदाहरणं जुन्या पिढीतल्याच एका प्रख्यात आय सर्जनने दिली होती:
१. पूर्वीच्या काळी बायकांचे डोळे ठणठणीत असायचे. नजर अगदी तांदळातला खडा काढण्याइतकी किंवा सुईत दोरा ओवण्याइतकी तीक्ष्ण. हल्ली बघावं तर सर्वांना चष्मे.. आरोग्य बिघडलंय खरं.
- वास्तविक पूर्वीच्या काळी बायका जास्तीतजास्त वेळ घरात असायच्या. एका मर्यादेपलीकडे दूरचं पहायची वेळ / आव्हान आयुष्यात फारच कमी. त्यामुळे घरातल्या घरात काम होऊन जायचं. दूरचं नीट दिसत नाही याची खरोखर जाणीव नव्हती. निकटचं खराब दिसण्याचा दोष (चाळिशीत) आला की मगच तो जास्त जाणवायचा आणि चष्मा आणला जायचा.
२. तेच "हल्ली" लहानपणी चष्मा लागण्याविषयी. पूर्वी मुलांना दृष्टिदोष होतेच. चष्मा लागणे हा विशिष्ट दोष डोळ्याच्या रचनेमुळे होतो, त्यात पूर्वी किंवा आता फरक नाही. (पोषण / खाणेपिणे यामुळे रातांधळेपणा आदि होऊ शकतात, दूरदृष्टिता / निकटदृष्टिता नव्हे.)
पूर्वी पोरांचे डोळे तपासलेच जायचे नाहीत आणि ते सतत डोळे ताणून / फाडफाडून अॅडजेस्ट करुन पाहण्याची सवय लावून घ्यायचे. आणि चष्म्याची गरज वय होईपर्यंत (स्नायू थकून अॅडजेस्ट होणं बंद होईपर्यंत) जाणवायची नाही.
....
पूर्वी वाटीवाटी तूप पिऊनही तब्ब्येती ठणठणीत असायच्या आणि हल्ली कोलेस्टेरॉल वगैरे भानगडी आल्यात असंही म्हटलं जातं. पण अनेकदा तूप पिणारे आणि शंभर जिलब्या उठवणारे ठणठणीत काका "गेले" कसे याचा शोध घेतला तर "पंगतीतच अचानक मान टाकली आणि डोळे फिरवले" असंही दिसतं.. :)
23 Jan 2013 - 2:19 pm | बॅटमॅन
पूर्वी होणारे गुप्तरोग हे पूर्वीच्या वैद्यकशास्त्राप्रमाणे पाहिले तर असाध्य नव्हतेच असेही नाही. पानिपतच्या युद्धाचे मुख्य कारण असलेला रोहिला सरदार नजीबखान लढाईनंतर किती आजारी होता त्याचे वर्णन अस्सल पत्रात दिलेले शेजवलकरांच्या पानिपत १७६१ या पुस्तकात लढाईनंतर किंवा उपसंहार या प्रकरणात आहे-
"नजीब अजारी बहुत. छ २२ तारखेस रात्री हातपाये आपटीत होता. सर्वांग सुजले आहे. इंद्रियाचे वाटे रक्त व पू वाहतो, लोकांचा मुजरा पडल्यापडल्या छावणीतच होतो."
त्यातच त्याचा अंत झाला, त्यामुळे गुप्तरोग घातक असू शकतो हे नक्की.
पण प्रसाराबद्दल सहमत आहे. दळणवळण फार जलद झाल्याने हा विषाणू इतका फैलावलाय की ज्याचे नाव ते. सर्वांगीण अवेअरनेस इज ए मस्ट.
23 Jan 2013 - 7:33 pm | शुचि
नक्कीच. एकदा गूगलवर इमेजेस शोधून पहा. चूकलेल्या लैंगिकतेचे विदारक रुप दिसेल.
23 Jan 2013 - 2:31 pm | बाळ सप्रे
गरज नक्कीच आहे..
काही उच्चशिक्षित लोकंदेखिल जेव्हा हेटाळणीच्या सुरात "षंढ", "वंध्यामैथुन" असे शब्दप्रयोग वापरतात तेव्हा खरच या शिक्षणाची किती गरज आहे हे जाणवतं... मनुष्याच्या कर्तृत्वाचा आणि त्याच्या शरिराच्या प्रजोत्पादक संस्थेच्या कार्याचा संबंध नाही .. मैथुनाचा प्रजोत्पादनाशिवाय किंबहुना त्याहुन अधिक संबंध आनंद मिळवण्याशी आहे.. एवढी मूलभूत माहिती सर्वांना असावी असे वाटते..
24 Jan 2013 - 12:47 am | विश्वनाथ मेहेंदळे
ओ गवि, मला ट्रोलनाथ म्हणाला होतात ना. बघा, याला म्हणतात ट्रोलींग.. पडलात ना बळी.
ए धत्तड तत्तड, धत्तड तत्तड !!!!!!!
24 Jan 2013 - 10:37 am | गवि
हॅ हॅ.. तो शब्द तुमच्याच एका प्रतिसादातून उचललेला होता, तो प्रतिसाद आवडला होता म्हणून.. ;)
24 Jan 2013 - 1:08 am | विश्वनाथ मेहेंदळे
ह्म्म्म्म... म्हणजे तुम्हाला "ते" सगळं सगळं नीट माहित आहे तर.. नक्की का ???
की तुम्हाला माहित आहे तेच "सगळं" आहे असे तुम्हाला वाटते ???
23 Jan 2013 - 2:20 pm | ऋषिकेश
लैंगिकतेबद्दल शाळेत शिकवलम जावं हे पटलं - पटतं.. मात्र विद्यार्थांना हे पालकांनी समजावल्यास अधिक उत्तम नाही का?
पालक स्वतःच्या पाल्याला जर इतक्या खुलेपणाने सांगु शकत नसतील तर शिक्षकांना हे विद्यार्थ्यांपुढे सांगणे किती अवघड जात असेल याचि कल्पना येऊ शकते.
यापेक्षा शासनाने काहि शास्त्रशुद्ध विडियो बनवावेत आणि ते शाळां-शाळांमधून दाखवावेत, ज्यामुळे कोणला 'सांगायची' गरज रहाणार नाही मात्र टार्गेट ऑडियन्सला सगळं काही समजेल.
बाकी, सेक्स ही पुनरुत्पादन करण्यासाठी आणि स्त्रियांवर हक्का गाजवण्यासाठी करण्याची क्रिया आहे असे गैरसमज असणार्या समाजात योग्य माहिती पाल्यांपर्यंत झिरपायला वेळ हा लागणारच
24 Jan 2013 - 1:45 pm | सांजसंध्या
पालकांनी शिकवणं सर्वात उत्तम. काही पालक करतातही. पण आपला समाज कसा आहे याची कल्पना आपल्याला आहेच कि. मुलांशी खुलेपणाने बोलणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. म्हणून तर शाळेच्या माध्यमातून हा विषय शिकवला जावा ही कल्पना पुढे आली. शिक्षकांना पालकांइतकं जड जाईल असं वाटत नाही. आपल्याकडे मुलांचं पालकांशी असलेलं नातं हेच खुलेपणाच्या आड येतं. मात्र मुलं-मुली यांना एकत्र हे शिक्षण देताना अनेक अडचणी येतात. लैंगिक शिक्षणात फक्त स्वतःची ओळख होणारे बदल आणि त्यांना सामोरं कसं जायचं तसंच विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल वाटणा-या आकर्षणाचं शात्रीय उत्तर इतकंच असेल अशी माझी कल्पना आहे. विकर सेक्सबद्दचा मानवतावादी दृष्टीकोण आणि सन्मानजनक व समतावादी वागणूक या गोष्टी संस्कारातून यायला हव्यात. ते शाळेत होत नसेल तर गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.
23 Jan 2013 - 2:22 pm | बापू मामा
अवेअरनेस कोणत्या बाबतीत द्यावा यालाही काही मर्यादा आहेत. अरे, भुकेलेलं लेकरु आई कडून अगदी जन्मताक्षणीच गरज
भागवितं. त्याला पोट कसं भरायचं हे कोणी शिकवितं ? तसेच या विषयाचे आहे. ऊलट या विषयावर (एडस, कंडोम )
इतके साहित्य रस्तो रस्ती ,अगदी बस च्या पार्श्वभागीही उपलब्ध आहे, कि वेगळे शिकवायची काय गरज आहे?
23 Jan 2013 - 2:36 pm | बॅटमॅन
या मर्यादा कोण ठरवतं आणि कशाच्या आधारावर? लैंगिक शिक्षण म्हणजे पोर्नोग्राफी बघण्याचा राजमार्ग नव्हे.
रादर म्हणूनच वेगळे सांगायची गरज आहे. नुसत्या कंडोमच्या काहिराती पाहून किंवा मुतार्यांतून मर्दाना ताकत, हवा भरून साईज ठीक करणे, वगैरे जाहिराती असतात त्या पाहून जर शिक्षण होईल असे वाटत असेल तर तुमची कीव करावी तितकी थोडीच आहे.
शिवाय, मुळात इतके सगळे उपलब्ध असले तरी सेक्स इज टॅबू हे लहानपणापासून शिकवले जाते त्याची काय वाट? पन्नाशीच्या पिढीच्या बालपणात, लैंगिकतेसंबंधी साधी शंका विचारली तरी कसा मार मिळायचा ते डोळेआड केलेत वाटतं. लैंगिकतेची ओळख पिवळ्या पुस्तकांतूनच व्हावी आणि लग्न होईपर्यंत त्या रोगट फँटसीज हाच एकमेव आधार असावा ह्यालाच तुम्ही जर ठीक आहे असे म्हणत असाल तर मग अरसिकेषु कवित्व कशाला करू?
23 Jan 2013 - 2:39 pm | ऋषिकेश
अगदी म्हणूनच या विषयावर 'आधिकारीक' पातळीवर शिकवायची गरज आहे.
हल्लीच्या पिढीकडे भरपूर माहिती आहे, त्यांना ती तुम्ही लिहिली आहे तशा अनेक मार्गांनी ती मिळत असते. त्यातील योग्य कोणती, अयोग्य कोणती, उपयुक्त कोणती आणि अपायकारक कोणती, आयोग्यपूर्ण कोणती हे सांगायला त्या क्षेत्रातील अधिकारी माणसाने माहिती देणे अधिकच गरजेचे झाले आहे
23 Jan 2013 - 2:52 pm | अर्धवट
मामा, मी काय म्हणतो,
अवेअरनेस कोणत्या बाबतीत द्यावा अथवा देऊ नये याची लिस्टच का देत नाही..
23 Jan 2013 - 3:14 pm | बापू मामा
आपली माघार !
आजकाल भाच्चे कंपनीच इतकी बुद्धिमान झाली की ती मामाचा "मामा" करतील.
लैंगिक शिक्षण म्हणजे पोर्नोग्राफी बघण्याचा राजमार्ग नव्हे.
सहमत.
अगदी म्हणूनच या विषयावर 'आधिकारीक' पातळीवर शिकवायची गरज आहे.
म्हणजे अधिकारी व्यक्ति कोण? व तिने एक्झॅक्ट काय करावे?
23 Jan 2013 - 4:26 pm | ऋषिकेश
शाळेतील प्रशिक्षित शिक्षक, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञाकडून समुपदेशन घेऊन योग्य शब्दात पाल्याला माहिती देऊ शकणारे पालक (किंवा या विषयाचे शिक्षण देणारे अधिकृत शासकीय कार्यक्रम, हे अजून सुरू व्हायचेत म्हणतात)
23 Jan 2013 - 5:13 pm | शुचि
पालकच हे काम उत्तम रीतीने पार पाडू शकतील.
23 Jan 2013 - 5:11 pm | अनन्न्या
(नववी पासून) काही प्रमाणात याबद्द्ल माहिती देण्यात आली आहे, मी अजून ते पुस्तक पाहिले नाही. त्याबद्दल फक्त ऐकले आहे. एक मात्र नक्की, पूर्वीपेक्षा आज सर्व माहिती सहज उपलब्ध असल्याने मुलांपर्यंत पोहोचणारी माहिती योग्य दिशेने आहे की नाही हे पाहणे, सजगतेने लक्ष ठेवणे आणि गरज पडेल तेव्हा योग्य दिशा दाखवणे हे महत्त्वाचे आहे. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतून याबाबत पालकांसाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
23 Jan 2013 - 5:28 pm | स्पंदना
खरतर इथले प्रतिसाद वाचुन काही समजेल अशी आशा होती. पण आता मीच बोलते.
या बद्दलच शिक्षण आवश्यक का?
एक अनुभव. कॉलेजात मैत्रीणीच्या भावाच लगन झाल. त्यावेळच्या अन आताच्याही मत प्रवाहापणे "इतक्यात नको" असा सगळ्यांचा भर होता. मग नविन लग्नाच्या दोघांनाही घरच्या "फॅमिली डॉकटर" कडे पाठवण्यात आले. डॉकटर काकांनी मुलाला लहानाच मोठ होताना पाहिलेले. मग त्याम्नी कंडोम घेउन ते कसे वापरायचे ते हाताच्या अंगठ्याचा वापर करुन सागितले.इकडे महिन्याभरात उलट्या सुरु. नवरा तावला, बायको त्याच्यावर गरम. मग हे कस झाल हे पहायला डॉक्टरकाकांकडे. डॉक्टरांनी जेंव्हा खर कारण ऐकल तेंव्हा त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. मैत्रीणीच्या भावाने डॉक्टरांच्या सांगण्याबरहुकुम कंडोम अंगठ्यावर चढवलेलं. मैत्रीण सांगत होती,"माझी वहिनी इतकी चिडली होती सांगु. काहीही माहिती नाही अन लग्न करतात म्हणाले भावाला." आता हे ऐकताना मग नक्की कस वापरायच कंडोम अन कंडोम म्हणजे काय हे प्रश्न आम्हालाही पडले होते.
अन आज माझी १४ वर्षे कन्या शाळेत टिचरला आम्ही प्रोटेक्शनवरुन चिडवल म्हणुन सांगत येते. कंडोम क्लास मध्ये आणुन दाखवले गेले. माझ एकच तत्व आहे, ऐकताना चेहर्यावर कोणतेही भाव आणायचे नाहीत. तिला कस सांगायच हे ज्ञान मला नाही. नवरा तर सपशेल पळ काढतो. मग तिला जी सर्वंकश माहिती शाळेत मिलतेय त्याला निदान काहीतरी हॉरीबल असल्यासारखे रिअॅक्ट न करणे एव्हढा शहाणपणा मला कळतो. बाकि कधी तिनेहोउन काही विचारल तर मी जमेल तेव्हढ शांतपणे उत्तर देते.
तरी माझी मुलगी १४ वर्षाची आहे. इथे ६ वी पासुनच हा विषय तज्ञ बोलावुन शिकवला जातो. मी प्रायमरी शाळेत व्हॉलेंटीअर करते.एकदा स्टाफरुम मध्ये ६वीची क्लास टिचर आली अन साम्गु लागली. माझ्या वर्गातली मुल जमिनीवर पडुन गडाबडा लोळत होती, अन त्यांच्या डोळ्यातुन पाणी गळत होत. व्हाय शुड वी मास्टरबेट हा प्रश्न विचारला त्यांनी त्या त्ज्ञाला अन तो सांगतो दॅट इज यॉर नीड. म्हणजे जेम्व्हा मुलांना अजुन या भावनेची ओळखसुद्धा नाही तेंव्हाच या गोष्टी सांगुन, जेंव्हा त्यांना याची गरज भासेल तेंव्हा आपण असे का वागतोय या गोष्टीचा ताण नाहीसा होत असावा. आता याचा परिपाक म्हणजे माझ्या मैत्रीणीच्या सहावीच्या पोरीने त्याच दिवशी कारमध्ये शिरल्या शिरल्या तिच्या एक वर्ष मोठ्या भावाला आईवडिलांसमक्ष विचारल्"डु यु मास्टरबेट" अन बिचार पोरग आई बाप सारे लालेलाल झाले.
पण एकुण मला वाटत ते हे की त्यामागचा स्ट्रेस नाहीसा झालाय, जो आमच्याबाबतीत होता.
23 Jan 2013 - 6:00 pm | दादा कोंडके
हा विनोद म्हणून एका डॉक्टर मित्राने सांगितला होता. हा किस्सा ऐकीव असावा असं वाटतं कारण खरं असं घडेल असं वाटत नाही. पण तुम्हाला खात्री असेल तर मला त्या भावाचं आश्चर्यच वाटेल.
बाकी सध्याचं वातावरण बघता 'बलात्कार किंवा एड्स काय आहे?' हा प्रश्न यायच्या आधी 'सेक्स' काय आहे' ते मुलांना सांगायला हवं. आमच्या काळात याच्या शिकवणीची सुरवात 'घाणेरड्या जोक्स'नी व्हायची. अनेक वेळा हे जोक्स अनैतिकतेच्या सीमा ओलांडत. आठवी-नववी पर्यंत साधारण सगळं बिट्स अँड पिसेस मध्ये कळलेलं असायचं. वर्गात सो कॉल्ड सज्जन मुलं यापासून दूर असायची. त्यांना असले जोक सांगितलेले आवडत नसायचं. पुढे बाहेरच्या राज्यातल्या मुलांमुळे आपणही किती 'सज्जन' आहोत हे कळलं. :)
23 Jan 2013 - 6:09 pm | बॅटमॅन
वाक्यावाक्याशी सहमत!!